माझ्या मते आणखी थोडे पुतळे उभारावेत. म्हणजे पुतळे-कलाकारांना काम मिळेल. शिवाय पुढे त्या पुतळ्यांच्या देखभालीसाठी लोकांना पैसे मिळतील. त्यातूनही ज्यांना नोकरी मिळत नाही त्यांना ते पुतळे चोरताही येतील, आणखी काही लोकांच्या पोटाला चार घास मिळतील.
माझं मत, हो, पुतळे उभारावेच ... प्रत्येक रस्त्यावर दर ३.१४ कि.मी.मागे एक पुतळा असावा. रस्ता फार रुंद असेल, २.७८ मीपेक्षा जास्त, तर रस्त्याच्या डिव्हायडरवरही पुतळे उभारावेत.
पुतळे कोणाचे उभारावेत हा प्रश्न पडण्याची शक्यता कमीच आहे. कारण आपल्याकडे मर्त्य माणसालाही देव बनवण्याची फॅशन आहेच आहे.
अदिती
पुतळे जरुर उभारावेत, कारण पुतळे पुढील पिढ्यांना प्रेरणादायी ठरत असतात. कमीतकमी हा मनुष्य कोण होता वा आहे असा मनात विचार येवुन पुढील पिढी त्यांची आठवण ठेवते.
आता काही विशिष्ट माणसांच्या पुतळ्यांची भरमसाठ गर्दी आहे पण त्याला इलाज नाही. पुतळे उभारणा-यांनीच त्याच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यायलाच हवी, आणि कसुर करणा-यांवर कडक कारवाई व्हायला हवी !!
माणसातील आदर्श गुणांना लोकांच्या समोर आणुन त्यांना देवत्व देणे यात काहीच चुक नाही. कारण असे आदर्श समोर असतांना त्यांना न मानणे ही बौद्धिक दिवाळखोरी आहे. आणि असे आदर्श समोर येण्यासाठी पुतळा हे प्रभावी माध्यम आहे.
बाकी घोड्यावर मांड ठोकुन हातात तळपती तलवार घेतलेला थोरल्या आबासाहेबांचा पुतळा, वा शनिवारवाड्यासमोरचा भाला फेकणारा थोरल्या बाजीरावांचा पुतळा, वा एक बोट दाखवुन मार्गदर्शन करणारा आंबेडकरांचा पुतळा वा अशाच प्रातःस्मरणीय महनीय भारतीय व्यक्तींचे पुतळे पाहुन ज्याचे उर अभिमानाने भरुन येत नाही तो भारतीय नाही हे आमचे वैयक्तिक मत आहे.
बाकी आम्ही शिवरायांना रुद्राचा अवतार मानतो ते आमचे वैयक्तिक आणि काही प्रमाणात धार्मिक मत आहे आणि असे मत असणे हे आमच्या भारतीय घटनेने आम्हाला दिलेल्या आचारविचारस्वातंत्र्याचा भाग आहे.
शिवराय मनुष्य असले तरी माझा देव आहे. त्यांचा पुतळा दिसला की मी हात जोडुन नमस्कार करतो.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
माणसातील आदर्श गुणांना लोकांच्या समोर आणुन त्यांना देवत्व देणे यात काहीच चुक नाही. कारण असे आदर्श समोर असतांना त्यांना न मानणे ही बौद्धिक दिवाळखोरी आहे. आणि असे आदर्श समोर येण्यासाठी पुतळा हे प्रभावी माध्यम आहे.
बाकी घोड्यावर मांड ठोकुन हातात तळपती तलवार घेतलेला थोरल्या आबासाहेबांचा पुतळा, वा शनिवारवाड्यासमोरचा भाला फेकणारा थोरल्या बाजीरावांचा पुतळा, वा एक बोट दाखवुन मार्गदर्शन करणारा आंबेडकरांचा पुतळा वा अशाच प्रातःस्मरणीय महनीय भारतीय व्यक्तींचे पुतळे पाहुन ज्याचे उर अभिमानाने भरुन येत नाही तो भारतीय नाही हे आमचे वैयक्तिक मत आहे.
बाकी आम्ही शिवरायांना रुद्राचा अवतार मानतो ते आमचे वैयक्तिक आणि काही प्रमाणात धार्मिक मत आहे आणि असे मत असणे हे आमच्या भारतीय घटनेने आम्हाला दिलेल्या आचारविचारस्वातंत्र्याचा भाग आहे.
शिवराय मनुष्य असले तरी माझा देव आहे. त्यांचा पुतळा दिसला की मी हात जोडुन नमस्कार करतो.
अक्षराअक्षराशी १००१% सहमत!!
शिवाय हे आमचं वैयक्तिक मत आहेच त्यामुळे.....हॅहॅहॅ!!!!!
राहता राहिला प्रश्न चोरीचा, तर राजरोस चोर्या होतात म्हणुन सगळ्यांनी दागिने घेणं बंद करावं का? खिश्यात पैसे घेऊन बाहेर पडु नये काय? इ.इ.इ. प्रश्न अचानक मनात उद्भवले.
असो! कदाचित माझीच बापड्याची पुरातन विचारांमुळे गल्लत होत असेल.
नाना आणि धम्याशी सहमत
आम्ही थोरल्या आबासाहेबांना देव मानतो
त्यामुळे त्यांचा फोटो सुध्दा आमच्या साठी प्रेरणादायी आहे
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
पुतळे जरुर उभारावेत, कारण पुतळे पुढील पिढ्यांना प्रेरणादायी ठरत असतात
लोकसंख्येच्या प्रमाणात एका व्यक्तीचे किती पुतळे उभारावेत म्हणजे प्रत्येकाला प्रेरणा मिळेल ? दर हजारी काही प्रमाण ?
असे आदर्श समोर येण्यासाठी पुतळा हे प्रभावी माध्यम आहे.
व्यक्तीचा आदर्श समोर येण्यासाठी तिचा पुतळा उभारण्यापेक्षा तिच्या विचारांचा अभ्यासक्रमात वगैरे समावेष करणे अधिक प्रभावी नाही काय ? नुसता पुतळा बघून काय करायचे ? मायावतींचा पुतळा बघून मी काय बोध घ्यायचा ? (कमीत कमी लोकांच्या भावनांना धक्का पोचावा म्हणून मायावती यांचे नाव घेतले आहे.)
माणसातील आदर्श गुणांना लोकांच्या समोर आणुन त्यांना देवत्व देणे यात काहीच चुक नाही. कारण असे आदर्श समोर असतांना त्यांना न मानणे ही बौद्धिक दिवाळखोरी आहे.
गुणांना देवत्व देणे अगदी मान्य..दुर्दैवाने पुतळे उभारल्याने तसे न होता व्यक्तीला देवत्व दिले जाते.जर फक्त पुतळा बघून त्या व्यक्तीचे गुण, विचार समजून घ्यायची समाजाची पात्रता नसेल तर नक्कीच गल्लोगल्ली पुतळे उभारण्याला मी विरोध करीन.
पुतळ्यांना खालून चाके बसवावीत म्हणजे ते इथून तिथे सहज हलवता येतील. नवीन तंत्रज्ञान वापरुन ते रोबो सारखे बोलते पण ठेवावे, म्हणजे कोणी ढोंगी, लबाड नेता त्याला हार घालायला लागला तर तो सद् गुणांचा पुतळा त्याचा सर्वांसमक्ष उध्दार करेल!
अर्रे वा !! पाटकरसाहेब हल्ली भरपुर झळकत असतात पहिल्या पानावर :)
आत पाहिलं तर तिनचार लायनी :)
पण आम्हाला आपलं वैचारिक लेखण आवडतं हो :) चालु द्या
ऐर्या गैर्या नथु खैर्याचे पुतळे उभारल्यानं काय होणारे ?
आणि तसंही पुतळे उभारण्याला आपला विरोधच आहे ... कारण कोणी एक उपटसुंभ पुतळ्याची विटंबणा करतो आणि बाकी लोक दंगली करून जाळपोळ करून त्याच पुतळ्याच्या तत्वांना पायाखाली चिरडून पुन्हा विटंबणा करतात ... त्यामुळे विनाकारन फुसका उर भरून येण्यापेक्षा पुतळे नसलेले केंव्हाही बरे :)
|| श्री चप्लास्वामी प्रसण्णा !!
प्रतिक्रिया
होय
+१
ज्वलंत प्रश्न ??
पुतळे जरुर
+१ सहमत. शिव
नाना काय
वा नाना....व्वा!!!
सहमत.
+१०००१% सहमत
हातामध्ये
पुतळे जरुर
मोबाईल
अर्रे वा !!
पुतळे,