आशुतोष गोवारिकरचा हा भव्य दिव्य वादग्रस्त चित्रपट एकदाचा पाहायला मिळाला. भारतात हा चित्रपट बंद पाडण्यासाठी लोक रस्त्यावर का उतरले आहेत ह्याची पुसटशी कल्पना आली. इतिहास वगैरे मारो गोली पण आजकाल मल्टिप्लेक्सच्या दिवसात चित्रपट बघायचा म्हणजे जेव्हा दोन तीनशे रुपयाला फोडणी लागते तेव्हा त्या बदल्यात पदरात असले काही पडणार असेल तर लोकं रस्त्यावर येणारच. असो.. तर हा भव्य दिव्य चित्रपट सुरू होतो अमिताभ बच्चन ह्यांच्या खर्जातल्या आवाजाने. मुघल भारतात कसे आले इथपासून ते छोटा अकबर पानिपतावर कसा पोहोचला इथपर्यंत त्यांचा आवाज आपली सोबत करतो. पानिपतात मुघल सैन्याने हिंदू राजाला छोट्या अकबरा समोर पेश केले असता अकबर त्याला मारत नाही. 'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या' असं म्हणणार्या त्या बाल अकबराचे आपल्या कोण कौतुक वाटते (आता गांधींचा जन्म अकबरानंतर शेकडो वर्षांनी झाला असली ऐतिहासिक कुजकट शंका कुणाला येत असेल तर तो दोष तुमचा आहे! हा चित्रपट ८०%च इतिहासावर असून २०% गोवारिकरांचे स्वप्न रंजन आहे हे तुम्हाला माहीत नाही का?)
नंतर थोड्या लढाया स्पेशल इफेक्ट वगैरे झाले की कथा वळते राजपूत राज घराण्यांकडे. इथे आमेर नावाच्या संस्थानात एक वेडसर राजा असतो. त्याची मुलगी म्हणजे जोधा (ऐश्वर्या राय-बच्चन) जी फावल्या वेळात आपल्या भावाशी ढाल तलवार वगैरे (एकदम रजपूत ष्टाईल) खेळत असते. तर हा राजा लवकरच आपला वारीस जाहीर करणार असतो आणि जोधाला आपला ढाल तलवारवाला भाऊ नॉमिनेशन जिंकणार अशी खात्री असते. शेवटी दसर्याच्या दिवशी हा राजा (अर्थातच वेडसर असल्याने) दुसर्याच कुणाची तरी निवड वारस म्हणून करतो आणि आपल्या जोधाचा विवाह देखिल तिच्या बालपणीच ठरलेल्या राजकुमाराशी जाहीर करून टाकतो. इकडे सत्ता आपल्याला मिळत नाही म्हणून हा चिडलेला भाऊ राजाच्या विरोधात कट शिजवू लागतो. हे पाहून राजाची मात्र चांगलीच टरकते आणि तो सरळ जाऊन मुघलांशी हातमिळवणी करायचे ठरवतो आणि कहानीमे ट्वीस्ट इथे येतो.
मुघलांना मी माझे राज्य अर्पण करेन पण त्यांच्या बादशहाने माझ्या मुलीला देखिल त्याच्या जनानखान्यात भरती केले पाहिजे अशी 'अट' (जोधाला न विचारताच) परस्पर घालून टाकतो. आयतेच राज्यही मिळतेय आणि राजाची मुलगी देखिल हा राजाचा वेडसरपणा पाहून खरंतर अकबराच्या तोंडाला पाणी सुटते पण ते लपवून आपण ह्या प्रस्तावावर चक्क विचार करत आहोत असे दाखवण्यात ह्रितीक रोशनने अभिनयात कमाल केली आहे. शेवटी थोडेसे आढेवेढे घेतल्यावर अकबर ऑफर एकदाचा कबूल करतो. परंतु आता जोधा मात्र ह्या प्रकाराने वैतागलेली असते.. ती म्हणते माझ्या मना विरुद्ध लग्न ठरवताय? काही हरकत नाही! पण माझ्या सुद्धा दोन अटी आहेत. आता हा राजा, लग्न ठरवताना मुलीला कसलेही मत विचारत नाही पण ह्या अटींचे प्रकरण मात्र एकदम मान्य करतो... का? अहो शेवटी वेडसरंच ना तो! तर ह्या अटी ती फक्त अकबरालाच सांगणार म्हणे बाकी कूण्णालाही नाही असा क्लॉज देखिल असतो..झाले सगळे पुन्हा एकदम टेन्शन मध्ये.. एकदम सीरियस म्युझिक. शेवटी अकबर एकांतात तिला भेटायला जातो.ह्या टेन्स वातावरणात, 'हमे कुछ नही चाहिये बारतियोंका स्वागत पान परागसे होना चाहिये' अशी अट तर जोधा घालणार नाही ना? असा एक अविचार मनात डोकावून जातो. पण नाही जोधाच्या दोन शुल्लक अटी अकबर कबूल करतो आणि धूमधडाक्यात लगीन लावून तिला घेऊन जातो.
इथं एक 'ख्वाजा मेरे ख्वाजा' नावाचे गाणे येते त्याच्या शेवटी ह्रीतीकने केलेला नाच अगदी बघण्यासारखा आहे. त्यावेळेस त्याच्या चेहर्यावर असणारे मतिमंद भाव खरंच दाद देण्यासारखे आहेत (दुवा बघुन खात्री करा!). पांढरे वेष घातलेल्या जपानी रेस्टॉरंटातल्या आचार्यां सारख्या दिसणार्या कलाकारांनी केलेली कवायत देखिल पहाण्या सारखी आहे. (तुमच्या संगणकाचा आवाज बंद करुन एकदा ही कवायत बघाच!) इथून पुढे मात्र गोवारीकरांनी दिग्दर्शन एकता कपूरच्या कुशल नेतृत्वाकडे सोपावाले आहे. प्रेम करणारा पती कजाग नसणारी सासू असे सगळे असूनही एकता कपूरने तिचे टॅलंट दाखवले आहे अकबराच्या दाईचे पात्र रंगवण्यात. अकबराचा सांभाळ आईपेक्षा म्हणे ह्या दाईनेच केलेला असतो. आणि सासू मवाळ असली तरी ही उपसासू मात्र महा कजाग असते. त्यांतून एक समज गैर समजांची मानवी नाते संबंध दाखवणारी घरेलू घर घर की कहानी सुरू होते जी पडद्यावरच बघावी..कारण मी तो पर्यंत झोपून गेलो होतो आणि मधून मधून 'किती घोरतोयस?' असं बायकोच्या आवाजात कुणीतरी म्हणत असल्याच पुसटसं आठवतंय! शेवटी काहीतरी ढढँ ढढँ वाजते आणि चित्रपट एकदाचा संपतो इतकेच आठवते आहे!!
वाचने
35819
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
खो खो
हाहाहाहा........
खरंच ???
हा असा
In reply to खरंच ??? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
काय सांगता
In reply to हा असा by कोलबेर
काय
नाही
In reply to काय by चित्रा
ठीक आहे
In reply to नाही by कोलबेर
हृतिक
In reply to ठीक आहे by चित्रा
सुक्ष्म निरिक्षण
In reply to हृतिक by कोलबेर
सही
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हाहाहा
सहमत
In reply to हाहाहा by धनंजय
खुश
काय लावलंय काय?
In reply to खुश by व्यंकट
सार्कास्टीक
In reply to काय लावलंय काय? by इनोबा म्हणे
असहमत..
घोडचूक
In reply to असहमत.. by प्राजु
आम्हाला वाटते...
In reply to असहमत.. by प्राजु
चुकीचे?
In reply to असहमत.. by प्राजु
प्राजुशी सहमत
In reply to असहमत.. by प्राजु
होय
In reply to प्राजुशी सहमत by आनंदयात्री
धन्यवाद
In reply to होय by आजानुकर्ण
माझेही मत असेच!
चित्रपट/धोनी
In reply to माझेही मत असेच! by चतुरंग
चित्रपटाच्या कथानकाला
In reply to चित्रपट/धोनी by बेसनलाडू
शंका
In reply to चित्रपट/धोनी by बेसनलाडू
सुरेख. मजा आली.
आजकाल
कोलबेरा मस्त रे :)))
हाण
मस्त रे..:)
अवांतर-
असहमत
In reply to अवांतर- by विसोबा खेचर
कबूल आहे..
In reply to असहमत by बेसनलाडू
सहमत
In reply to कबूल आहे.. by विसोबा खेचर
सहमत आहे..
In reply to सहमत by बेसनलाडू
भन्नाट?
In reply to सहमत आहे.. by प्राजु
असहमत
In reply to भन्नाट? by विसोबा खेचर
सहमत आहे
In reply to असहमत by बेसनलाडू
असहमत
In reply to भन्नाट? by विसोबा खेचर
अगदी बरोबर..
In reply to असहमत by चतुरंग
हृषिकेशदा
In reply to भन्नाट? by विसोबा खेचर
असहमत
In reply to कबूल आहे.. by विसोबा खेचर
सुरवातीला नव्हता!
In reply to असहमत by आजानुकर्ण
छोटीसी बात
In reply to अवांतर- by विसोबा खेचर
जोधा
मतिमंद
सुरेख परीक्षण!!!!
:)
In reply to सुरेख परीक्षण!!!! by धम्मकलाडू
खोजा मेरे खोजा
In reply to :) by विसोबा खेचर
खपवून घेणार नाही
In reply to सुरेख परीक्षण!!!! by धम्मकलाडू
सहमत आहे.
In reply to खपवून घेणार नाही by मनस्वी
असं कसं
In reply to खपवून घेणार नाही by मनस्वी
आणि
In reply to असं कसं by जुना अभिजित
प्रेक्षक नाही
In reply to आणि by मनस्वी
आणि
In reply to प्रेक्षक नाही by आजानुकर्ण
पुढच्या जन्मी?
In reply to आणि by मनस्वी
आत्ता..
In reply to पुढच्या जन्मी? by आजानुकर्ण
सहमत
In reply to खपवून घेणार नाही by मनस्वी
.
हो.
नक्की
In reply to हो. by सृष्टीलावण्या
धूम २
In reply to हो. by सृष्टीलावण्या
हम्म
In reply to धूम २ by एक
मै प्रेम
ह ह मु
In reply to मै प्रेम by धमाल मुलगा
आभार
'हा देश
कोलबेरराव