महोदय,
आपल्यकडे गाडी आहे,मायक्रो. नोटबुक बरोबर घ्या व गूगल सर्च मध्ये रत्नागिरि विभागात शोधा. देशी उत्पादनावर विश्वास असेल तर एल्.जी कंपनी कडे विचारणा करा.नाहीच तर केसरि कडे माहितिसाठी जा.
ते सर्व झाले करून. गूगल तुम्हाला रस्ता कसा आहे ते सांगत नाही. मला गूगल कोलाड मार्गे सांगत आहे जायला. कारण टेक्निकली सगळ्यात जवळचा रस्ता आहे. पण तिथे पोचायलाच तीन घाट आहेत त्याचा काय?
तरीही प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
१] पुण्याहून पौड रोड वरुन थेट निजामपूर मार्गे माणगावला उतरायचे,
आता आपण ' मुंबई - गोवा ' मार्गावर आलो आहोत. सरळ हात खंबा, रत्नागिरी , पावस.
२] पुणे - कोल्हापूर - पन्हाळ गड करीत कोकणात उतरायचे. नाणिज मार्गे आपण पाली [ सुधागड नव्हे] येथे येतो. तिथून एक तर ६ कि.मि. उजवीकडे येऊन हात खंबा गाठायचे .पुढे रत्नागिरी - पावस. नाहितर पाली वरून लांज्याकडे जायचे . साधरण ४/५ कि.मि. वर उजवीकडे पावस फाटा लागतो. तिथून सुमारे २० कि.मि. पावस्.पण हा रस्ता अरुंद आहे. मी दरवर्शी याच मार्गाने जातो. कारण, वाटेत माझे 'चांदोर ' हे गाव आहे.
पुणे - कोल्हापूर - रत्नागिरी - पावस हा मार्ग उत्तम.
पुणे - कोल्हापूर ( जास्ती जास्त ५ तास - विश्रांती थांबा गृहीत धरुन )
कोल्हापूर रत्नागिरी ( ३.५ तास )
रत्नागिरी - पावस - ३० मिनिटे
वयस्कर व्यक्ती सोबत असल्याने याच मार्गाने गेलेले उत्तम.
कोकण मार्गे गेल्यास जास्त घाट लागत असल्याने त्रास आणि वेळ ज्यास्त लागण्याची शक्यता.
आपला प्रवास सुखाचा होवो हीच स्वरुपानंदांचरणी प्रार्थना
अमोल केळकर
(स्वरुपानंद भक्त )
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
जर पुणे - कोल्हापूर - रत्नागिरी - पावस हा प्रवास करनार असाल तर
कोल्हापूर - रत्नागिरी रोडवर राजापुर म्हनुन गाव येते तिथुन डायरेक्ट
पावस रस्ता आहे सधारण ८५ किलोमिटर ,म्हनजे रत्नागिरिला जावे लागणार नाहि
कोल्हापूर-राजापुर - पुर्णगड- पावस
पुण्याहून तम्हाणी घाट मार्गे निजामपूर मार्गे माणगावला यावे तेथुन
मुंबई - गोवा ' मार्गावरावरुन रत्नागिरी व पावसला जाता येते, पावसलाही काही चांगली होटेल आहेत.
अजुन एक चांगला रस्ता, पुणे- सातारा- कोयना- कुम्भार्ली घाट- चिपळुन- रत्नागीरी- पावस.
जातच आहात तर जवळच्याच अडीवर्याच्या देवीलाही जावुन या.
Think twice before you speak, and then you may be able to say something more insulting than if you spoke right out at once.
प्रतिक्रिया
कोकण
एक तप्शील
मार्गदर्शन
?
१]
पुणे -
पावस
रस्ता
पावस रस्ता
अजुन एक
माहीत नाही ..
ढन्यवाद!!