प्रतिक्रिया द्यावी की नाही याचा निर्णय होत नाहिये. :|
पण देतोच. :)
विकास यांच्या प्रतिसादात समाजवादी (लोहियावादी व त्यांचे वंशज आणि कम्युनिस्ट(सर्व प्रकारचे) यांना एकाच मापाने तोलले आहे.
लोहियांना आम्ही पाहिले नाही, जयप्रकाशांविषयी नुसते वाचले. आमच्यापुढे समाजवादी चेहरा म्हणून एसेम, ना ग गोरे, वसंत बापट, दंडवते, नरहर कुरुंदकर, मृणाल गोरे आणि मधु लिमये इत्यादि आले (नवलोहियावादी यादव कंपनीविषयी न बोललेले बरे). यातले कुणीच समाजाशी फटकून वागणारे होते असे म्हणायला अजिबात वाव नाही. किंवा ते कुठली तरी परकी विचारसरणी तशीच्या तशी लोकांवर लादत होते असे म्हणता येणार नाही.
कम्युनिस्ट हे मात्र काही प्रमाणात लोकांशी फटकून वागणारे म्हणता येईल. ते सुद्धा लोकांच्या प्रश्नांविषयी फटकून वागत नसून ते सोडवण्याच्या मार्गासाठी 'बाहेर' पहात असत. त्यातही धर्माविषयीचे त्यांचे धोरण सोडले (आणि त्यांच्यात अंतर्गत चालणारे कम्यून वगैरे प्रयोग सोडले) तर जनतेला आवडत नाही असे त्यांच्याकडेही काही नव्हते. देशनिष्ठा हा एक कच्चा दुवा त्यांच्यात असू शकेल.
असे असूनही समाजवादी राजकारणात यशस्वी झाले नाहीत. याची दोन कारणे मला जाणवतात. त्यातले एक कारण म्हणजे त्यांच्याकडे धोरणात्मक आणी वैचारिक पातळीवर काँग्रेसपेक्षा वेगळे* काही नव्हते. घोषणा काँग्रेसही समाजवाद आणण्याच्याच देत होती.
दुसरे कारण फार महत्त्वाचे आहे आणी त्याचे परिणाम आपण आजही भोगत आहोत. ते म्हणजे काँग्रेसशी मुकाबला करण्यात येत असलेल्या अपयशाला कंटाळून 'कोणीही चालेल' या धोरणाची अंमलबजावणी चालू झाली. त्यात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतले व्हिलन मोरारजी देसाई, निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलणारे जगजीवन राम वगैरे मंडळी आलीच पण मुख्य म्हणजे इतकी वर्षे भारतीय राजकारणात मार्जिनवर असलेल्या संघ-जनसंघाची मंडळी पण आली. त्यामुळे जनसंघाचा उंट विरोधी पक्षाच्या तंबूत आला नंतर त्याने तंबूच बळकावला आणि पुढे सत्ताही मिळवली
साम्यवाद्यांचे तत्त्वज्ञान अधिक परके असूनही त्यांना अधिक यश मिळाल्याचे दिसते.
नितिन थत्ते
आमच्यापुढे समाजवादी चेहरा म्हणून एसेम, ना ग गोरे, वसंत बापट, दंडवते, नरहर कुरुंदकर, मृणाल गोरे आणि मधु लिमये इत्यादि आले (नवलोहियावादी यादव कंपनीविषयी न बोललेले बरे). यातले कुणीच समाजाशी फटकून वागणारे होते असे म्हणायला अजिबात वाव नाही. किंवा ते कुठली तरी परकी विचारसरणी तशीच्या तशी लोकांवर लादत होते असे म्हणता येणार नाही.
अगदी खरे आहे. माझे मत पण यातील (कुठल्याही) आदरणीय व्यक्तीविषयी वेगळे नाही. दंडवते म्हणले असल्याने मी दंडवते दांपत्य असे गृहीत धरतो. मात्र असे नेते जो पर्यंत जनतेला दिसत होते, तो पर्यंत त्यांच्यामुळे समाजवाद हा पण जनतेला जवळचा/जिव्हाळ्याचा वाटत होता (जरी निवडणूकीच्या राजकारणात त्याला यश आले नसले तरी). मात्र कालांतराने त्यातील समाजवादी एकतर बदलत गेले, अंतर्गत मतभेद होऊ लागले अथवा जे नवीन आले त्यांनी "प्रतिमा आणि प्रत्यक्ष" हे दोन्ही भयंकर केले. ज्या मधू दंडवत्यांबद्दल मला आदर होता त्यांनी जेंव्हा, "मुसलमान हा हिंदू पेक्षा देशाशी जास्त इमान राखतो, कारण मेल्यानंतर ही तो मातीत राहतो" असल्याप्रकारचे विधान केले, तेंव्हा वाईट वाटले की यांनाच आपण निरपेक्ष आणि स्वतंत्र समजत होतो का? (यात आक्षेप इतकाच होता की अशापद्धतीने कोणाचे इमान ठरवणे आणि तसे अशा व्यक्तीने बोलणे ठिक आहे का?). कुरुंदकर हे एक वेगळेच व्यक्तीमत्व होते. त्यांच्याबद्दल कधीतरी वेगळ्या लेखात (प्रतिक्रीयेत नाही ;) ).
एक काळ असा होता की लालू प्रसाद यादव एक आदर्श लोहीयावादी आणि समाजवादी म्हणून गणले जायचे. मात्र सत्तेचा स्पर्श झाला आणि काय झाले ते इतिहास आहे आणि अजून वर्तमानही आहे...अशा वेळ पासून चांगला समाजावादी मार्ग चुकू लागला असे म्हणावेसे वाटते.
बाकी समाजवाद्यांबद्दलचा मूळ लेख हा केवळ निवडणूक हा निकषावर नव्हता तर समाजवादी चळवळीवर होता. निवडणूक आणि त्यातील यशापयश हे त्यातील एक फळ होते. त्यामुळे माझा वरील प्रतिसाद पण त्याच संदर्भात होता.
त्यामुळे जनसंघाचा उंट विरोधी पक्षाच्या तंबूत आला नंतर त्याने तंबूच बळकावला
संघ आणि जनसंघालाच जनता पार्टीच्या अपयशाला जबाबदार ठरवणे हे हास्यास्पद होते. जनता पार्टीची मोट कशी मोडता येईल हे इंदिरा गांधींना हरवणार्या (बाकी राजकीय विदुषक म्हणून ओळखले जाणार्या) राजनारायण यांना चांगले माहीत होते. त्यांच्या महत्वाकांक्षावर त्यांना मोरारजी पंतप्रधान झाल्याने पाणी सोडावे लागले होते त्यामुळे सुरवातीपासूनच ते नाराज होते. तरी त्यांनी चरणसिंग या दुसर्या नाराज नेत्यास पाठींबा दिला होताच. अशा राजनारयण यांनी, वाजपेयी-अडवाणी यांना राजकीय जनता पार्टीशी संबंध ठेवण्यासाठी, अराजकीय संघाशी काडीमोड घ्यावा म्हणून मागणी केली. ते होणार नव्हते आणि तसे केले असते तरी खोटेच ठरले असते. मग त्यांनी बाहेर पडणे श्रेयस्कर ठरवले. तिथपर्यंत ठिक आहे. पुढे काय झाले? याच राजनारायण यांना देखील पक्षातून बाहेर काढले. यात अजून एक (खर्या अर्थाने) विद्वान व्यक्ती पण भरकटलेली होती - सुब्रम्हण्यम स्वामी...त्यांच्या बरोबर चरणसिंग, रामविलास पासवान, आदी पण आवाज करू लागले आणि शेवटी संघ/जनसंघ विरहीत आणि समाजवाद्यांनी भरलेली जनता पार्टी फुटली. पंतप्रधानासाठी परत क्लेम केला गेला तो उपपंतप्रधान चरणसिंग म्हणजे परत संघाशी संबंध नसलेल्या राजकारण्याकडून. त्यांचे सरकार सहा+ महीने संसद न चालवता चालले आणि संसदेच्या पहील्याच दिवशी पडले ते देखील इतर समाजवाद्यांनी पूर्ण पाठींबा न दिल्याने (केवळ ६४ खासदारांचा पाठींबा) ही वस्तुस्थिती शिल्लक राहतेच...
मात्र माध्यमांमधे सातत्याने जनसंघ म्हणून ओरड केली आणि तीच कालांतराने खरी वाटू लागली. (आता लोकसत्ता संपादक - आणिबाणी कशी योग्य होती आणि जयप्रकाश/समाजवादी नेते कसे देशविघातक गोष्टी करत हे सांगण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. त्याना राज्यसभेत जाता येवो वा न येवो, पण आशा करतो त्यांच्या या विचारांना प्रसिद्धीचे यश येणार नाही...)
साम्यवाद्यांचे तत्त्वज्ञान अधिक परके असूनही त्यांना अधिक यश मिळाल्याचे दिसते.
हा लेख/चर्चा समाजवाद्यांसंदर्भात असल्याने तुर्तास या लाडक्या विषयावर लिहायचे टाळतो. ;)
चार ओळींपेक्षा मोठ्या प्रतिक्रिया आम्ही वाचत नाही, म्हणून अशा प्रतिक्रियांना लेखाचे स्वरूप देण्याचा अत्यंत निंदनीय प्रयत्न ! निषेध !
(विकी, वरील प्रतिक्रिया वाचून बघ रे !)
-- मिसळभोक्ता
विकास यांच्या प्रतिक्रिया म्हणजे च लेख असतात हे एव्हाना आपणा सर्वांना माहित झालेलेच आहे. आता समजले असेल कि कुठल्याही गोष्टीचा विकास होणे का अवघड असत. ;)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
विकास यांचे लेखनापेक्षा प्रतिक्रियाच अधिक विचारार्ह वाटतात.
अगदी सहमत आहे. त्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे मिपावर मेजवानीच असते.
पण ते समाजवाद्यांना का झोडतात ते कळत नाही. :)
अवांतर : फाळणीचे गुन्हेगार डॉ. पी.सी. अलेक्झांडर यांचा लेख वाचलाय का ?
-दिलीप बिरुटे
त्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे मिपावर मेजवानीच असते.
मिपा हीच एक मेजवानी आहे. मी फार तर तर्रीतील एक सहस्त्रांश भाग ;)
पण ते समाजवाद्यांना का झोडतात ते कळत नाही.
तसा अजिबात उद्देश नव्हता आणि नाही. मला अनेक समाजवाद्यांबद्दल आदर होता आणि राहील.वरील प्रतिसाद/लेख हा त्या विषयाशी संदर्भात होता (समाजवाद्यांचे अपयश) म्हणून तसे वाटले असावे.
संघ आणि जनसंघालाच जनता पार्टीच्या अपयशाला जबाबदार ठरवणे हे हास्यास्पद होते
सहमत. अपयशाला जॉर्ज फर्नाडीस ,मधु लिमयेही काही प्रमाणात कारणीभूत होते.माझ्यामते जनता पार्टीची स्थापनेचा उद्देशच कॉंग्रेसला हरवणे,मुख्य म्हणजे इंदिरा गांधीना वाटेल त्याप्रकारे नेस्तनाबूत करणे हा होता. म्हणूनच आणीबाणीला पाठिंबा देणार्या बाबु जगजीवन राम ह्यानाही जनता पार्टीत पावन केले गेले आणि उपपंतप्रधान बनवण्यात आले.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
जनता पार्टीच्य अपयशाला संघ जवाबदार होता असे मी मुळीच म्हटलेले नाही. जनता पार्टीच्या अपयशाला ते स्वतःच जवाबदार होते.
संघाला समाजवाद्यांनी (वेळोवेळी) जवळ करून क्रेडिबिलिटी मिळवून दिली तिचा संघाने पुरेपूर फायदा घेतला. त्यालाही संघ जवाबदार नसून त्यांना जवळ करण्याचा समाजवाद्यांचा करंटेपणाच जवाबदार म्हणावा लागेल.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
मीसुद्धा एसेम, दंडवते, ना. ग. गोरे, मृ. गोरे (पाणीवाली बाई), मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस वगैरे उत्तुंग व्यक्तिमत्वाचे नेते समाजवादी पक्षात पाहिले. पण या सर्व नेत्यांचे आपापसात कधीच १०० टक्के मतैक्य नव्हते. प्रत्येक नेत्याने कुठल्याही विषयावर जाहीरपणे मतभेद बोलून दाखविणे हे फारच रोजचे होते. त्याखेरीज "साधनशुचिता" हे अस्त्र फारच "सोयिस्करपणे" वापरल्यामुळे ज्याला अमेरिकेत "wishywashy" म्हणतात तसे त्यांचे झाले.
केवळ याच आरोपामुळे जॉन केरी हा डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार बुश ४३ बरोबर २००४ साली हरला. व्हिएतनाम युद्धातला एक योद्धा (war veteran) या नात्याने त्याची प्रतिमा फारच उज्ज्वल होती. पण सिनेटमधल्या त्याच्या धरसोडीच्या मतदानाच्या इतिहासावर बुश४३ ने हल्ला चढवला व अगदी अटीतटीच्या या लढतीत "कुठल्याच विषयावर एक पक्के मत नसल्याचा" भास निर्माण करून बुश्४३ने केरीला हरविले. परिणमतः बुश४३ ची (आणि चेनी नावाच्या त्याच्या 'बोलवित्या धन्याची') आणखी चार वर्षे अमेरिकन लोकांना व इतर जगातील लोकांना सहन करावी लागली.
माझ्या मते बहुतेक सर्व समाजवादी नेते असेच wishywashy होते त्यामुळे त्यांच्याकडे कुणीच गांभिर्याने पाहिले नाही व ते "पक्ष" म्हणून कधीच निवडणूक जिंकू शकले नाहीत. फक्त वैयक्तिक पातळीवर कधी दंडवते, कधी नाथ पै, कधी "पाणीवाली बाई (मृ. गोरेबाई) दिल्लीमें और दिल्लीवाली बाई (इंदिराबाई) पाणीमें", कधी (बिहारमधून) मधू व जॉर्ज निवडून येण्याचे चमत्कार जरूर घडले!
पहा पटते का!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
घाटपांडेजी सांभाळून.
विकासच्या प्रतिसादातील उतारे जसेच्या तसे देणे अथवा त्यावरूनच चर्चा टाकणे बंद केलेत तर बरे होईल.ऐकले जाईल असे समजू नका. तुमच्यावर वैयक्तिक चिखलफेक करण्यात येईल.
मला नुकतीच अशी धमकी मिळालेली आहे.
संघाच्या मुशीतुन आलेल्या ह्या लोकांचे विचार कसे हिंसक असतात पाहा. मुद्दे संपले गुद्यांवर उतरायला ह्यांना वेळ लागत नाही. बाकी तुम्ही जाणताच.
वरील प्रतिसादातील वाक्यनवाक्य वैयक्तिक आहे. मी जरी संपादक असलो तरी माझ्याविरुद्धचे कुठलेही लेखन मी कधी काढत नाही. म्हणून हे उत्तरः
प्रकाशरावांनी माझ्याशी सल्लामसलत करून झाल्यावरच तो लेख टाकला आहे. "वैयक्तिक चिखलफेक" हे माझे शब्द नाहीत मात्र तुम्ही मनाला येईल ते माझ्या नावावर घालत आहात. माझ्या त्या प्रतिसादातील खालील वाक्ये आता "फॉर द रेकॉर्ड" येथे सांगतो:
मग (साभार म्हणत पण) माझ्या लेखातील उतारे जसेच्या तसे देत प्रतिसाद देणे अथवा त्यावरूनच चर्चा टाकणे बंद केलेत तर बरे होईल. सुरवात मी करत नाही. पण म्हणून उगाच काहीतरी लिहीणे चालू केले तर ऐकले जाईल असे समजू नका. जे होईल ती माझ्या दृष्टीने रास्त टिकाच असेल तुम्हाला चिखलफेक वाटली तरी.
-----------
संघाच्या मुशीतुन आलेल्या ह्या लोकांचे विचार कसे हिंसक असतात पाहा. मुद्दे संपले गुद्यांवर उतरायला ह्यांना वेळ लागत नाही. बाकी तुम्ही जाणताच.
असे आपण वागत आहात. मी नाही.
विकासराव आपल्या भुमिकेशी आग्रही असले तरी दुराग्रही नाहीत. असा आमचा पुर्वानुभव आहे. समजा त्यांची या धाग्यास अनुमती नसती तरीही मी हा धागा टाकला असता. कारण तो 'यावरुन आठवले" अशा सदरात तो मोडतो. संघाच्या हिंदुत्ववादी विचारश्रेणीचा फेरविचार हा हिंदुत्ववादी विचारवंत स.ह.देशपांडे यांनीच मांडला होता. त्यांनी यावर तीन दिवसाची व्याखानमाला घेतली होती. हे मुद्दे न संपणारे असल्याने गुद्द्यावर येतील असे वाटत नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
घाटपांडे,
नथुराम आणि हिटलर ह्या चर्चेवरचे विकासचे प्रतिसाद संपादित होण्यापूर्वी पाहायाला हवे होतेत. म्हणजे तुम्हाला कळले असते मुद्दे संपले की गुद्द्यावर येणे म्हणजे काय आणि तोल सुटून वैयक्तिक पातळीवर घसरणे म्हणजे काय.
त्यावर आलेला कालिंदी मुधोळकरांचा प्रतिसादही पुरेसा बोलका होता (जोही आता संपादित झाला आहे).
आणि अजूनही माझ्या विचारांचा प्रतिवाद न करता मी बाकीचांच्या लेखावर काय प्रतिक्रिया देतो, पाचलगला मी काय सांगीतले, त्यावरुन मी विकृत कसा असल्या हिणकस गोष्टीतच विकासला इंटरेस्ट आहे असे दिसते. तो प्रतिसाद अजून तसाच आहे. त्यावर तुम्हाला काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल.
काही बोलायचे नाही असे ठरवले होते. पण आज राहवले नाही. शिवाय, एक हद्द ओलांडल्यासारखे वाटले म्हणून लिहित आहे.
नथुराम आणि हिटलर ह्या चर्चेवरचे विकासचे प्रतिसाद संपादित होण्यापूर्वी पाहायाला हवे होतेत. म्हणजे तुम्हाला कळले असते मुद्दे संपले की गुद्द्यावर येणे म्हणजे काय आणि तोल सुटून वैयक्तिक पातळीवर घसरणे म्हणजे काय.
विकासना मी आज बरीच वर्षे मराठी जालावर बघत आहे, त्यांचे लेखन आणि प्रतिसाद वाचत आहे. त्यांनी आजपर्यंत कोणत्याही वादात वैयक्तिक पध्दतीने टीका केल्याचे मला आठवत नाही. किंबहुना, त्यांचे ज्यांच्या ज्यांच्याशी वाद झाले त्या सगळ्यांना जरी विचारले तरी वैयक्तिकरित्या संबंध सुहृदाचेच राहिले असतील हे नक्की. तुम्ही ज्या एक दोन चर्चांचे उल्लेख केले आहेत तिथेही विकासनी व्यक्तिगत उल्लेख केल्याचे मला तरी जाणवलेले नाही.
त्यावर आलेला कालिंदी मुधोळकरांचा प्रतिसादही पुरेसा बोलका होता (जोही आता संपादित झाला आहे).
खरं तर तुमच्या या ओळीमुळे मी हे सगळे लिहायला उद्युक्त झालो. ज्या प्रतिसादाला तुम्ही 'संपादित झाला' असे म्हणत आहात, तो का, कसा, कोणामुळे संपादित झाला या बद्दल तुम्हाला काही ठोस माहिती आहे का? की उगाच अनमानधपक्याने पुडी सोडलेली आहे? माझ्या माहितीप्रमाणे कालिंदि मुधोळकर यांचा त्या चर्चेवरील एकच प्रतिसाद संपादित झाला आहे आणि तो मी केला आहे. त्यामागे काय कारण आहे हे केवळ मी, विकास आणि स्वतः कालिंदि मुधोळकर यांना माहित आहे. स्वतः कालिंदि मुधोळकरांना त्याबद्दल तक्रार नसावी असे माझ्याकडे उपलब्ध लिखित संदेशांवरून मला वाटते. खरं तर, मला कालिंदि मुधोळकरांचे, त्यांनी हा प्रकार ज्या रितीने हाताळला त्याबद्दल कौतुक वाटले. तुमच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत बर्याच वेळा मला हे जाणवलेले आहे की तुम्ही एक पूर्वग्रह करून घेतला आहे आणि त्या आधारेच सगळ्या घटनांकडे बघत आहात. तुमच्या इतर काही सदस्यांबरोबर खवमधून झालेल्या गप्पांमधून हे स्पष्ट जाणवले. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे आणि ते चूकही असू शकते.
असो. एकच विनंती, यापुढे एखादी (तुम्हाला) अप्रिय अशी घटना मिपावर घडली आणि तुमचा त्यात प्रत्यक्ष संबंध असला तर आधी तात्या अथवा संपादकांपैकी कोणाशी तरी संपर्क करून नक्की काय घडले आहे ते जाणून घ्यावे. तुमच्याशी खटके उडून सुध्दा आत्तापर्यंत कोणत्याच संपादकांनी तुमच्याशी संवाद बंद केला नाहीये. उलट तुमच्याशी संवाद करून तुमचे म्हणणे समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे. कमीत कमी एवढे तरी श्रेय संपादकांना द्या की...
बिपिन कार्यकर्ते
काही बोलायचे नाही असे ठरवले होते. पण आज राहवले नाही.
हेच म्हणतो...
निमीत्त मात्र (चुकीची दुरुस्तीसाठी प्रतिसाद संपादित ;)) विकासरावांची सगळी मते आम्हालाही पटतात असे नाही पण त्यांना हिंसक म्हणण्याचा विकृतपणा आपण करता आहात.
आणि राहता राहली बात मुद्यांवरून गुद्यांवर यायची. विकासरावांच्या बस की बात नाहीच ती. काहीवेळ मुद्यांची भाषा न करता गुद्यांचीच भाषा करावी लागते यावर माझा तरी विश्वास आहे.
शब्दच्छलच करायचा तर माझा हा प्रतिसाद म्हणजे मी मुद्दे सोडून गुद्यावर येतो आहे असा काढल्यास त्याला सरळसोट विकृतपणा असे लेबल मी लावणार नाही पण त्याला विकृतपणा का म्हणू नये असा प्रश्न सुजाण जनांनी स्वतःच्या मनाला विचारावा असे नक्की म्हणेन.
चीअर्स!
विकासरावांची सगळी मते आम्हालाही पटतात असे नाही पण त्यांना हिंसक म्हणण्याचा विकृतपणा आपण करता आहात.
कालिंदी ताईंचा संपादित झालेला प्रतिसाद, माझ्या आठवणीप्रमाणे काहीसा 'विकास भाऊ आता काय त्रिशुळ वगैरे काढणार की काय?" असा होता. मुद्दे सोडून गुद्यांवर उतरण्याचे स्पष्टीकरण सध्या इतके पुरेसे असावे..
काहीवेळ मुद्यांची भाषा न करता गुद्यांचीच भाषा करावी लागते यावर माझा तरी विश्वास आहे.
विकासना मी आज बरीच वर्षे मराठी जालावर बघत आहे, त्यांचे लेखन आणि प्रतिसाद वाचत आहे. त्यांनी आजपर्यंत कोणत्याही वादात वैयक्तिक पध्दतीने टीका केल्याचे मला आठवत नाही. किंबहुना, त्यांचे ज्यांच्या ज्यांच्याशी वाद झाले त्या सगळ्यांना जरी विचारले तरी वैयक्तिकरित्या संबंध सुहृदाचेच राहिले असतील हे नक्की. तुम्ही ज्या एक दोन चर्चांचे उल्लेख केले आहेत तिथेही विकासनी व्यक्तिगत उल्लेख केल्याचे मला तरी जाणवलेले नाही.
"तुम्हाला आक्षेप असेल तर इथून निघून जा!", "बाकीच्यांच्या लेखावर तुम्ही कसले प्रतिसाद देता?" "तुमची विकृत विचारसरणी आहे"...इ.इ. गोष्टी बोलून विकासने माझ्यावर वैयक्तिक टीका केली आहे. असे मी तरी मानतो. असे केल्याचे तुम्हाला जाणवले नाही ह्याला काही वेगळे कारण असू शकते. मला त्याची कल्पना नाही.
राहता राहिला मुद्दा कालिंदी ताईंचा प्रतिसाद संपादित होण्याचा. तो संपादित झाला ही फ्याक्ट आहे. आणि मी तो प्रतिसाद संपादित झाला इतकेच म्हणालो आहे. कारण आधी तो प्रतिसाद दिसत होता आता तो नाहिसा झाला आहे, सिंपल! ह्यात अनमानधपक्याने पुडी सोडण्याचा काय संबंध? तुमचे हे शब्द नक्कीच खटकले. ह्यावर तुमचे स्पष्टीकरण अपेक्षीत आहे.
आता तो कशामुळे संपादित झाला, त्यावर तुमचा आणि कालिंदी ताईंचा काय पत्रव्यवहार झाला हे जाणून घेण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही. तो का संपादित झाला ह्याविषयी माझी कसलीही तक्रार नाही. असे असताना त्यावरुन तुम्ही मला ही अनावश्यक माहिती का पुरवत आहात?
तुमच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत बर्याच वेळा मला हे जाणवलेले आहे की तुम्ही एक पूर्वग्रह करून घेतला आहे
असे तुम्हाला वाटते. मला मात्र माझी मते पटत नसल्याने काही संपादकांनीच माझ्याविषयी पूर्वग्रह करुन घेतलेला आहे असे वाटते. नाण्याची दुसरी बाजूही लक्षात घेत जा.
तुमच्याशी खटके उडून सुध्दा आत्तापर्यंत कोणत्याच संपादकांनी तुमच्याशी संवाद बंद केला नाहीये. उलट तुमच्याशी संवाद करून तुमचे म्हणणे समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे. कमीत कमी एवढे तरी श्रेय संपादकांना द्या की...
माझ्या खरडवहीत चतुरंग ह्यांची आलेली शेवटची खरड पाहा..
"बाकी तुमची मर्जी. असो. ह्या विषयावर माझ्याकडून पुढे चर्चा होणे शक्य नाही. धन्यवाद!"
संपादक हे कसलेही स्पष्टीकरण द्यायला बांधील नाहीत हे तात्यांचे धोरण मला मान्य आहे त्याविषयी कसलीही तक्रार नाही हे आधीच नमूद करुन ठेवतो. तुम्ही संवाद सेवा बंद वगैरे उल्लेख केलात म्हणून एक उदाहरण दिले इतकेच. कसलीही तक्रार नाही.
असो. एकच विनंती, यापुढे एखादी (तुम्हाला) अप्रिय अशी घटना मिपावर घडली आणि तुमचा त्यात प्रत्यक्ष संबंध असला तर आधी तात्या अथवा संपादकांपैकी कोणाशी तरी संपर्क करून नक्की काय घडले आहे ते जाणून घ्यावे.
मी वेळोवेळी संपादकांना/तात्यांना प्रश्न विचारुन माझे शंका निरसन करत असतो. तरीही सल्ल्या बद्दल आभारी आहे.
विकासना मी आज बरीच वर्षे मराठी जालावर बघत आहे, त्यांचे लेखन आणि प्रतिसाद वाचत आहे. त्यांनी आजपर्यंत कोणत्याही वादात वैयक्तिक पध्दतीने टीका केल्याचे मला आठवत नाही. किंबहुना, त्यांचे ज्यांच्या ज्यांच्याशी वाद झाले त्या सगळ्यांना जरी विचारले तरी वैयक्तिकरित्या संबंध सुहृदाचेच राहिले असतील हे नक्की. तुम्ही ज्या एक दोन चर्चांचे उल्लेख केले आहेत तिथेही विकासनी व्यक्तिगत उल्लेख केल्याचे मला तरी जाणवलेले नाही.
बिपिनशी सहमत आहे. तुमचे व विकासराव यांचे मतभेद असले तरी विकासराव तुमच्याशी मुद्दाम वाईट वागत असतील असे अजिबात वाटत नाही. मिपासदस्य विकि यांना विचारा किंवा खरडवह्या चाळा. त्यांच्यासारखी संयत, सभ्य माणसे मसंवर फारच कमी आहेत.
निमित्तमात्र, संपादक हे एकंदर सगळ्यांच्या "सोयीसाठी" आहेत, फक्त "सेवेसाठी" नाही असे मला वाटते.
जसेकी तक्रार नाही पण
मला मात्र माझी मते पटत नसल्याने काही संपादकांनीच माझ्याविषयी पूर्वग्रह करुन घेतलेला आहे असे वाटते.
संपादकांच्या अमुक तमुक खरडी.
मी वेळोवेळी संपादकांना/तात्यांना प्रश्न विचारुन माझे शंका निरसन करत असतो..
असेच अजुन शोधले काही तर सापडेल. पण आपण संपादकांचा बराच वेळ घेताय असे दिसतेय खरे.
मिपावर दंगा करायचा, सतत चर्चेत रहायचा असा आपला काही अजेंडा आहे का? (कृपया खुलासा मागु नका. आधीच ह्या धाग्याचे तुम्ही स्व:तासाठी अवांतरकुरण केले आहे , हे कोणीही वाचक समजेल. सबब हा माझा शेवटचा प्रतिसाद.)
प्रतिक्रिया
प्रतिक्रि
माप
चार ओळी
प्रतिक्रिया म्हणजेच लेख
विकास
गैरसमज
सहमत
जनता
साधनशुचिता
हम्म...मजा आहे तर...
घाटपांडेज
वैयक्तिक
आग्रही
घाटपांडे, न
निमित्त मात्र,
काही बोलायचे नाही असे ठरवले होते. पण आज राहवले नाही.
विकासरावा
स्वागत!
आदरणीय
बिपिनशी सहमत
निमित्तमा
बरेचदा उल्लेख
जसेकी