धर्मादाय आयुक्तांकडे नोंद असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीची स्थापना वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात झाली. >>>>>>>>
स्थापनेनंतर त्या निधीच्या रेकॉर्ड वर अजुन पर्यंत मुख्यमंत्री म्हणुन वसंतराव नाईक यांचेच नाव होते.
ह्याला म्हणतात सरकारी कारभार :)
बघा त्यानंतर किती मुख्यमंत्री झालेत ते मोजा आता.
संदर्भ : लोकसत्ता मध्ये आलेली बातमी.
आता बातमी महिन्याभरापुर्वी आली असल्याने लिन्क शोधता शोधता सापडेना.
आणि कुत्रं पीठ खातंय! असला सगळा कारभार आहे. देणार्यांना तर लाज नाहीच आहे पण आपल्याच पोळीवर तुप ओढणारेही तितकेच निर्लज्ज आहेत.
काय बोलणार ह्यापेक्षा जास्त!
मुख्यमंत्री सहायता निधीमधला पैसा नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या गरजू नागरिकांना दिला जात नाही, च्यायला अशा लोकांना भर चौकात जोडे मारले पाहिजे, बाकी काय !!!
देणार्यांना तर लाज नाहीच आहे पण आपल्याच पोळीवर तुप ओढणारेही तितकेच निर्लज्ज आहेत.
सही !!!
असाच एक निधी वीरगतीप्राप्त झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाना मदत व्हावी म्हणुन वेगवेगळ्या संस्थेंच्या बरोबर, महाविद्यालयातही विद्यार्थ्यांकडून जमा केला जातो. तो निधी जरी सैनिक कार्यालयात जमा होत असला तरी , तो निधी तरी सैनिकाच्या कुटूंबापर्यंत पोहचत असेल की नाही याबाबत शंका येत आहे ?
विकासभाऊ,
चांगले आमचे डोळे उघडणारी बातमी दिलीत. तुमचं वाचून झाल्यावर म.टा. वर जाऊन मूळ बातमी सुद्धा वाचली.
वर लोकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांच्याशी आम्ही सहमत असलो तरी यावर काहीतरी ठोस उपाय करावा अशा विचाराचे आम्ही आहोत.
आज आम्ही निदान २० वर्षे तरी परदेशांत आहोत. अनेक (जवळजवळ सर्वच!) नैसर्गिक आपत्तींच्या वेळेस (आणि काही अनैसर्गिक आपत्तीच्या वेळेस, उदा. अणुस्फोट) आम्ही मदत केली आहे आणि इतरांकडून मदत जमा करण्यास हातभार लावला आहे. निदान आमचा कॉन्शन्स क्लिअर करण्यासाठी तरी त्या दात्यांना असे सांगणे भाग आहे की बाबांनो तुमच्याकडून आम्ही जी मदत गोळा केली होती, आणि जी तुम्ही मोकळ्या हाताने दिली होतीत ती सर्वच मदत आपत्तीग्रस्तांना पोचली असेल याची खात्री नाही. सबब, तुम्हाला गळ घातल्याबद्द्ल आम्ही तुमचे दिलगीर आहोत! आमच्या नेत्यांना लाज नाही पण आम्ही शरमिंदे आहोत!!
म्हणूनच आम्हाला माहिती असलेल्या यच्चयावत मराठी लोकांना व मुख्य करून यु.एस. ए. व यु. के. मधील सर्व मराठी मंडळांना ही बातमी पाठवण्याचा आमचा विचार आहे. म्हणजे यापुढे मदत करण्यापूर्वी ते दहा वेळा विचार करतील. मदत जर सत्पात्री होत नसेल तर ती व्यर्थच आहे!!
-डांबिसकाका
म्हणजे डांबिस काका, तुम्ही एकंदरीत परदेशातील मदत कमी करता आहात.
चूक चूक चूक..
भारतात भ्रष्टाचार होतो हे माहिती असून देखील आमची मदत चालूच आहे..
तुम्ही देशद्रोही आहात, हे नक्कीच..
- सर्किट
म्हणजे डांबिस काका, तुम्ही एकंदरीत परदेशातील मदत कमी करता आहात.
ती शक्यता आम्हीही ध्यानात घेतली आहे. नाईलाज आहे.
इथे मदत करणारे लोकं मेहेनतीचे (व पांढरे) पैसे देतात, चिंचोके नव्हेत.
भारतात भ्रष्टाचार होतो हे माहिती असून देखील आमची मदत चालूच आहे..
तुम्ही देशद्रोही आहात, हे नक्कीच..
हा भ्रष्टाचार होतो हे माहिती असून देखील तुमची मदत चालू आहे म्हणता, म्हणजे भ्रष्टाचाराला अप्रत्यक्ष मान्यता देता नाही का!
मग खरे देशद्रोही आम्ही का तुम्ही?
आम्ही फक्त या मुख्यमंत्री फंडाबद्दल बोलत आहोत. महाराष्ट्रात समाजसेवा करणार्या इतर अनेक प्रामाणिक संस्था आहेत त्यांना मदत करायला कोणाची काही हरकत असायचं कारण नाही.
परदेशस्थ भारतीयांनी केलेलि मदत ही लाभार्थींपर्यंत पोहोचते की नाही? पोहोचत असल्यास किती प्रमाणात? हा प्रश्न देशस्थ (ब्राह्मण नव्हे) भारतीयांच्याही मनात असतो. आपले दान सत्पात्री पडावे असे वाटणे स्वाभाविक आहे. एनजीओ तेच करतात. तसा दिलासा ते परदेशस्थ भारतीयांना देतात.
शासकीय कारभारात कागदावर दाखवलेला खर्च हा प्रत्यक्षात त्याच कामासाठी वापरला थोडाच जातो. कागदावर दाखवलेली वस्तुस्थिती आणि वस्तुस्थिती दर्शवणारा कागद यात १८० अंश आउट ऑफ फेज इतका फरक असू शकतो. सहानुभूतीच्या लाटेत अशा शंका मनात येणे हे स्वतःलाच अमानवी वाटतं. मग मदत दिली जाते ती स्वतःचा अपराधगंड दूर करण्यासाठी.
पाच टक्के कर्ज बुडवे लोक असतात म्हणुन बँकांनी कर्जे द्यायची थांबवावे काय? असाही प्रतिवाद केला जातो.
प्रकाश घाटपांडे
परदेशस्थ भारतीयांनी केलेलि मदत ही लाभार्थींपर्यंत पोहोचते की नाही? पोहोचत असल्यास किती प्रमाणात? हा प्रश्न देशस्थ (ब्राह्मण नव्हे) भारतीयांच्याही मनात असतो.
होय पोचते. आता परदेशस्थांचा एक त्रागा (फ्रस्ट्रेशन) असतो की बर्याचदा रिपोर्टींग वगैरे आपल्याकडून (म्हणजे भारतातून) जसे होणे महत्वाचे आहे तसे होत नाही. मग कधी कधी जे कोणी भारतात जेथे जेथे जात असतील तेथे तेथे त्या प्रोजेक्ट्सना भेट देतात आणि माहीती घेतात.
अशा बर्याच भारतीय संस्था आहेत ज्यांचा व्यवस्थापकीय खर्च (ऑर्गनायझेशनल ओव्हरहेडस) हे अगदी २-४% असतात. (रेड क्रॉसचे ते ७५% वगैरे असतात!). आपली परदेशस्थ माणसे स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून फावल्या वेळात ही कामे तयार करतात आणि बर्यापैकी यशस्वीपण करतात. दुर्दैवाने कधी कधी त्यात आपलेच भारतीय त्यांच्या वैचारीक विरोधातील संस्थांच्या विरुद्ध जाऊन चांगल्या कामाचे "वाटोळे" करण्याचा प्रयत्न करतात. तसे करण्यात त्यांना यश जरी मिळत नसले तरी स्वतःच्या निगेटीव्ह एनर्जीबरोबर जी लोकं चांगल्या पद्धतीने (पॉझिटीव्ह) स्वतःची एनर्जी वापरत असतात त्यांना पण त्याचा त्रास होतो आणि वेळेचा आणि मनःस्थितीचा अपव्यय होतो.
या संदर्भात मला बरेच काही लिहीता येईल पण विषय भरकटू शकेल आणि तसले निगेटीव्ह मला वागायची इच्छा नाही. अनेक चांगल्या संस्था, अनेक चांगले कार्य माहीत आहे. यात जसे आमच्या सारखे स्थलांतरीत भारतीय आहेत, तसेच येथे जन्मलेले अथवा लहानाचे मोठे झालेली पुढची भारतीय पिढी देखील आहे. ज्याला "सामाजीक उद्यमशिलता" (social entrepreneurship) असे म्हणता येईल असे अनेक उपक्रम आहेत. त्यावर येथे वाचण्यास लोकांना आवडत असेल तर अवश्य लेख लिहीन.
प्रतिक्रिया
अहो त्यापेक्षाही मोठी गम्मत वाचा खाली
आंधळं दळतंय...
जोडे मारले पाहिजेत.
भ्रमनिरास झाला!
म्हणजे
नाईलाज!
शंका
परदेशस्थांची मदत