परिणाम एवढाच कीं नुकतीच संपलेली ऍशेस् सीरीज इंग्लंडने जिंकली याचा अतीशय आनंद झाला.
अगदी अगदी!!
पॉन्टिंग आउट होणे -- तेही अगदी स्वस्तात आणि मूर्खासारखा -- म्हणजे तर माझ्या आनंदाची परमावधी असते.
चीअर्स
आजच्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंबद्दल माझेही मत असेच आहे. धन्यवाद.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
एकाद्या व्यक्तीपुरते मी बोलत नाहीं. शरदभाऊ भारत सरकारचे मंत्री होते (आजही आहेत) व त्यांची इज्जत जाणे म्हणचे देशाची इज्जत जाण्यासारखे आहे असे मला तरी वाटते. (कांहीं लोकांना तसे नाहीं वाटत!) म्हणून मला त्या रिक्याचा राग आला. इतका कीं मी इथल्या ऑस्ट्रेलियाच्या राजदूताकडे तक्रारही नोंदविली. (अगदी जसवंतसिंग स्टाईल).
त्याच्या दुसर्या दिवशी रिक्याने शरदभाऊंना फोन करून रदबदली केली व त्याच्या दुसर्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या जकार्तातील राजदूताने पत्र पाठवून या रदबदलीचा उल्लेख करून हे प्रकरण मिटल्याचे जाहीर केले.
जसवंतसिंगांनी अजून उत्तर दिले नाहीं. तीन दिवसांचा वायदा होता, आता ६ दिवस झाले!
ते बोलणार तरी काय म्हणा?
मी त्यांना अनाहूत सल्ला दिला आहे की असा (गैर मार्गाने) मिळालेल पैसा पंतप्रधान रिलीफ फंडाला द्यायची त्यांनी घोषणा करावी कीं हीरो होऊन जातील. तसेही त्यांनी अद्याप केलेले नाहीं.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
सुधीरभाऊंनी लिहिलेले बरोबर आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शरदभाऊंचाच अपमान केला असे नाही तर सरकारच्या एका मंत्र्याचा! इंग्लंडमध्ये हा बक्षीस-समारंभ झाला असता तर असे करायची छाती होती का पोंटिंगची आणि त्याच्या पिलावळीची?
अगदी चूक आहे असे करणे. म्हणून तर लोक नाराज होऊन आता ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध झाले आहेत.
ते. रा.
प्रतिक्रिया
माकडचेष्ट
सहमत की असहमत?
परिणाम
१०० टक्के सहमत!
पवारान्चा अपमान कधीही होत नसतो
खरे आहे
बरोबर!