याचे वाचन करणाऱ्या सर्वच लोकांना उद्देशून मी म्हणतोय, नाडी ग्रंथांचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला का नाकारता आहात?
मला नाडीग्रंथाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला आवडेल. परदेशातील लोकांच्या नाड्या कुठेशी असतात ?
-- मिसळभोक्ता
परदेशातील लोकांच्या नाड्या कुठेशी असतात ?
परदेशातील लोक आपल्या लेंग्यांना नाड्यांऐवजी बटणे-झिप लावून घेतात, सबब त्यांच्या नाड्या उपलब्ध नाहीत. ;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
अरे वा, मी फारच फेमस झालेली दिसत आहे. माझी 'येन-केन प्रकारेण' युक्ती सफल संपूर्ण झाली तर ...
चतुरंगस्टाईल खुद के साथ बाता: ओकसाहेब आता मला पत्र लिहीणार का काय? :?
अदिती
मी स्वतः या नाडीपट्टीच्या प्रयोगासाठी गिनीपीग व्हायला तयार आहे.
ओकसाहेब,
मला पुण्यात येणे शक्य आहे. अगोदर वेळ ठरवून यासाठी मी कितीही वेळा पुण्यात येईन.
येणारे सर्व अनुभव मिपावर टाकूयात.
यासाठी तुम्हा-आम्हावर काही अटी असाव्यात त्या मिपाकरांनी ठरवाव्या.
उदा.
१. प्रश्नोत्तराचे रेकॉर्डींग.
२. कोणत्या प्रश्नांची उत्तरे मिळणे अपेक्षीत आहेत?
३. साक्षीदार असावेत का ? कोण असावेत ?
वगैरे वगैरे
त्यासाठी गरज लागल्यास वेगळा धागा काढावा.
काय म्हणता मग ?
.................
अजून कच्चाच आहे.
(असे होईल का ते कळायला पण नाडीपट्टी पहावी लागेल काय?)
एवढ्या कोट्यावधी नाड्या ठेवल्या कुठं आहेत? या एका साध्या प्रश्नाचे उत्तर द्या. जमत नसेल तर "हे खोटे आहे" हे कबूल करा आणि घरला पळा. बाकी महर्षी, नाडीकेंद्र वगैरे गेले तिकडं... (कुठं कळलं ना?)
ओकसाहेब बास करा की आता. असे शिकले सवरलेले ( तुम्ही आणि तिकडे ते उपाध्येसाहेब ) लोक जेव्हा या अशा वायफळ प्रकाराचा पुरस्कार करतात आणि लोकांच्या गळी त्यांना उतरवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात तेव्हा आधी हसू येते, मग जरा राग येतो , आणि शेवटी अशा विचारांची कीव येते.
(अ-नाडी) शब्देय
ओकसाहेब,ज्यांना तसा अनुभव घ्यावासा वाटत असेल ते घेतील, ज्यांना घ्यावासा वाटत नाही ते नाही घेणार...तुम्ही का उगाच लोकांच्या मागे लागताय?
ज्याच्या त्याच्या आयुष्यात जे काही घडायचे असेल(विधिलिखित म्हणा) ते घडणारच आहे...मग ते तुम्हाला माहित असो अथवा नसो.
तुमच्या नाडीत लिहिलेले तुम्हाला माहीत झाले म्हणून अभद्र असे काही टाळता येऊ शकेल काय? आणि नाडीवाचन केल्यामुळे झालाच तर त्या नाडीकेंद्रवाल्यांचा उदरनिर्वाह चालेल..बाकी जातकाला काय फायदा?
आणि एखाद्या नाडीपट्टीवर समजा एखाद्या जातकाचे नाव दिसले(किंवा दाखवले) म्हणून असा काय मोठा चमत्कार होणार आहे?
अवांतर: माझ्या इमारतीत राहणार्या एका इसमाने मला सांगितले की त्याच्या घरात तो वर्षभर एका तांब्यात पाणी घालून त्या तांब्यावर एक श्रीफल ठेवत असतो. सतत गेली तीन वर्ष त्या त्या श्रीफलांवर गणपती साकारलाय. त्याचा पुरावा म्हणून त्याने मला एक छायाचित्रही दाखवले...पूजेत ठेवलेले.
खरं सांगायचं तर मला तसे काहीही दिसले नाही...पण त्याची श्रद्धा/अंधश्रद्धा आहे..असू द्या. मला त्याच्याशी काही देणेघेणे नाही....मात्र मला जे पटत नाही ते मी पटवून घ्यावे असे जर तो म्हणाला तर ते मला आवडणार नाही.
तुम्हीही इथे असेच करत आहात.....जे तुम्हाला पटले ते माना....कुणाला त्याच्याशी काही देणेघेणे नाही...पण उगाच दुसर्यांना पीडू नका...इतकेच सांगतो.
तुम्ही सुखात राहा आणि इतरांनाही राहू द्या.
विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
अहो ओकसाहेब काय लावलय हे?
ठीक आहे. मी पुण्यातच आहे सध्या. तुम्हाला नाडीपरिक्षेसाठी exactly काय माहिती लागते ते सांगा. मी देईन.
पण सर्व प्रश्नोत्तरे मिसळपाव वर जाहीरपणे व्हायला हवीत. कुठलेही personal calls नकोत.
सध्या जे पुण्यात असतील त्यांन विनंती. तुम्ही पण चला. एकदाचा सोक्षमोक्ष लावूया. निदान या लेखांपासून तरी सुटका मिळेल.
अरे हाय काय न नाय काय
- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
खडूसजी,
माझी खव चालू झालेली नाहीय.
त्यामुळे मी तुम्हाला इथेच विनंती करतो की तुम्ही सिनीयर आहात तेंव्हा या प्रयोगासाठी काही नियम ठरवून घेवूयात तेही जाहीर पणे मिपावरच.
सर्व मिपाकरांच्या सम्मती साठी वेगळा धागा काढा की.
.................
अजून कच्चाच आहे.
(पिकणार कधी ते कळायला नाडीपट्टी पहावी काय?)
एक कच्चा आणि एक खडूस दोघे तयार आहेत ओकसाहेब.
नियम ठरवा, वेळ ठरवा........ होउन जाऊदेत.
कळेल तरी कौन कितने पानीमे
.................
अजून कच्चाच आहे.
(पिकणार कधी ते कळायला नाडीपट्टी पहावी काय?)
प्रतिक्रिया
परदेशातील लोकांच्या नाड्या
नाड्या - झिप
कसली नाडी?
नाही, त्यांच्या कासोट्याच्या निर्या मोजाव्या लागतात
फोटो
मात्र नाडी
अरे वा, मी
प्रयोगासाठी तयार आहे
ओ बोलके पत्र नाडीवाले..
ओकसाहेब बास करा आता..
नाडीची अनाडीगिरी!
ओकसाहेबांना मिसळपाव वर जाहीर आव्हान
नियम
घ्या दुसरा मेंबर