Skip to main content

तात्या अभ्यंकरानू.. आमचा एवढा आयकाच...

लेखक वि_जय यांनी मंगळवार, 01/09/2009 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
तात्या अभ्यंकरानू.. माझा एक सझेशन आसा ... तुमच्या मिसळपावान तर मराठी बेब दुनयेत चमचमीत मेजवानी दिलेली हाच.. आमच्या 'मालवण्यांसाठी' अशीच एक रसरशीत वेबसायट सुरु केलास तर बरा होयत.. नाव ठेवया 'वडे-सागोती'.

वाचने 4330
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

>>तुमच्या मिसळपावान तर मराठी बेब :O दुनयेत चमचमीत मेजवानी दिलेली हाच.. :D दिपाली :)

>>तुमच्या मिसळपावान तर मराठी बेब दुनयेत चमचमीत मेजवानी दिलेली हाच.. तात्यांच्या खवतला स्वागताचा मजकुर बघितलास काय रे? :)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

>>तुमच्या मिसळपावान तर मराठी बेब दुनयेत चमचमीत मेजवानी दिलेली हाच.. तुमचं नांव विजय मल्ल्या.....आय मीन वि_जय मालवणकर आहे काय हो :?

चांगला लेख, चांगले प्रतिसाद, चांगला काथ्याकुट. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

रामराम मंडली, म्या काय म्हनताय, जल्ला मराठी अन् मालवणी काय वायलं हायत काय? आम्ही चिपलूनचो, पन् सकाली हाटलात गेल्यावर मिसल-पाव हाणतो, दुपारला झुनका-भाकर अन् संद्याकालला पापलेट चा रस्साच भुरकतो ब्वा! मिसल-पाव काय अन् वडे-सागोती काय.. मराठी मातीचा स्वाद आला म्हंजी झालं, काय? एक सांगतो, भावकीत पयल नाव वेगलं असलं, तरी आडनावं सारखीच असत्यात! येवा कोकण आपलाच असा! - कोकणी फणस

In reply to by आशिष सुर्वे

>>एक सांगतो, भावकीत पयल नाव वेगलं असलं, तरी आडनावं सारखीच असत्यात! काय बोल्लास भावा! तोडलंस रे तोडलंस!! वि_जयभाव तुमचो वडे सागोती तयार झाला त आमका सांग हां, आमीपण येऊक होया. माका मालवनी आवडतां (बाझवला! कोकणी, मालवणी,कारवारी सगळ्यांची पार खिचडी करुन टाकली राव मी!! माप करा, माका मालवणी/कोकणी धड येत नसां रे!) - घाटी धमाल!

सागोती काय असते? तु कोब्रा आहेस ना?....मग तुला काही उपयोगाची नसते :-) (कॄपया ह.घेणे..)

एय मुलांनो समजेल असे बोला रे... ! म्हराठीत सांगा रे कुणीतरी ह्ये काय बडबडुन राहिलेत पोट्टे ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

अय नानाहोऽऽ कशाले इतका गिल्ला मचवून र्‍हायले बे? ते वि_जयभौंना नवी साईट काडायले मदत लागते ना... तुमाले काई येत असलं तं देऊन द्या ना बे! मदतीच्या नावाले चुना आन कशाले फजुल फुका करुन र्‍हायले तुमी? काय ड्रुपल गिपलची मदत देऊन द्या त्यांले :)

>>काय रे मुलांनो, काय गोंधळ चालु आहे? >> शाला चालू न्हाय झालीय अजून.. तात्या मास्तुर आलं की आम्ही सम्दी प्वारं गुमान बसताव बघा.. - कोकणी फणस