Skip to main content

तू इथे नाहीस...

लेखक सचिन यांनी गुरुवार, 13/03/2008 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
तू इथे नाहीस सखये साङ्ग कसे पटणार मला गालान्वरती श्वास तूझा भासतो हळुवार मला पौर्णिमेचा चन्द्र हा की लाजरा चेहरा तुझा चान्दणे की हासणे हे ना कधी कळणार मला स्वप्नात तू भासात तू श्वासात उछ्वासात तू नसणे तुझे असणे जणू होउनी छळणार मला

वाचने 2985
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

मस्त कविता आहे. आणखी कविता येऊन द्यात तुमच्या.... काही चुका आहेत.. सांग=saaMg पण सुधारतील नक्कीच.

प्रतिसादासाठी आणि सांग=saaMg साठी !!!