ही पाक कृती http://misalpav.com/node/8968 या पेठकरकाकांच्या पाककृतीचे एक व्हरायन्ट आहे
लालबुंद टोमॅटो ४ मध्यम आकाराचे.
चण्याचे पिठ (बेसन) मावेल इतके.
कांदे २
आलं १ "
कोथिंबीर आवडीनुसार.
काश्मिरी तिखट १ टीस्पून
मीठ चवीनुसार.
चटणी साठी:
चिरलेली कोथिंबीर १ वाटी
चिरलेला पुदीना १ वाटी
हिरव्या मिरच्या ३
मीठ चवीनुसार
लिंबू रस १ टेबलस्पून
इतरः
पोळ्या ,टोमॅटो केचप
अमूल बटर
कृती:
चटणीसाठीचे साहित्य मिक्सरमध्ये फिरवून मुलायम वाटून चटणी करून घ्या.
कांदे बारीक चिरुन घ्या.
आल्याचे बारिक तुकडे करून घ्या.
टोमॅटोची प्यूरी करून गाळून घ्या. त्यात मावेल इतके चण्याचे पीठ (बेसन) घाला.थोडेसे पातळच करावे त्यात एक कांदा (बारीक चिरलेला), आले (बारीक चॉप केलेले), बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची ,मीठ इत्यादी साहित्य घालून नीट मिसळा. आवश्यकता भासल्यास थोडे पाणी घाला.
फ्राय पॅन मध्ये एक चमचा तेल घालून तापवा. तेल तापले की त्यावर पोळी टाकावी. पोळीच्या वरील बाजूस वरील मिश्रण घाला. फ्रायपॅन फिरवून ते नीट पसरवून घ्या. फ्रायपॅनवर झाकण ठेवून शिजवल्यास फ्रॅन्कीज लवकर तयार होईल परन्तु पोळी जळण्याची किंवा फार कडक होण्याची शक्यता असते. थोडे शिजले की पोळी रोल करावी.आणि व्यवस्थित शेकावी.
मायक्रोवेव्ह ओव्हन मध्येही फ्रॅन्कीज उत्तम प्रकारे करता येतात. तसे करायचे असल्यास पोळीला मिश्रण लावीन रोल करावी आणि ओव्हन मध्ये ठेऊन द्यावी.
वाढताना सोबत केचप आणि हिरवी चटणी द्यावी. फ्रॅन्कीज गरम असतानाच खाणे योग्य.
वाचने
7298
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाककृतीला
मस्त
सहमत....
पाककृतीला
पाककृतीला
फोटो हवाच
खरंच,
+१
In reply to खरंच, by चकली
सहमत
In reply to +१ by सागर
पेठकरकांच
श्रावण संपला!!
In reply to पेठकरकांच by विजुभाऊ