तांदुळाच्या पीठाची थालिपीठे
परवा गणपतीसाठी मोदक केल्यानंतर थोडी पीठी उरली होती. त्याचे काय करावे असा विचार केल्यानंतर सुचले की याची थालिपीठे करुन पहावीत. तशीही इथे आल्यापासून थालिपीठे खाल्लीच नव्हती आणि अशी कशी आपण थालिपीठ भाजणी आणायची विसरलो हा विचार करणंही एव्हाना सोडून दिलेलं होतं. त्यामुळे आता या उरलेल्या पीठाची थालिपीठे करण्याचं पक्कं केलं. हा पदार्थ खूपच छान चविष्ट लागला. म्हणून खास मिपाकर खवय्यांसाठी इथे देत आहे-
साहित्यः-
१ वाटी तांदुळाचे पीठ
१ गाजर किसून
थोडी कांद्याची पात (ऐच्छिक)
२ चमचे मुगाची डाळ
२ हिरव्या मिरच्या
पुदीन्याची ४-५ पाने बारीक चिरुन (ऐच्छिक)
बारीक चिरलेली कोथिंबीर
१ इंच आलं किसून
४-५ लसूण पाकळ्या बारीक चिरुन
हळद
चवीनुसार मीठ
तेल
कृती:-
मुगाची डाळ अर्धा तास भिजवून ठेवावी.
एका परातीत तांदुळाची पीठी घ्यावी. त्यात भिजवून ठेवलेली मुगाची डाळ, किसलेले गाजर, बारीक चिरलेली कांद्याची पात, पुदीना, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, थोडी हळद आणि चवीनुसार मीठ घालावे. थोडे पाणी घालून थालिपीठांसाठी पीठ मळून घ्यावे.
गॅसवर तवा गरम करायला ठेवावा.
तयार पीठाचा एक गोळा घेऊन बटर पेपरवर किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीवर तेलाचा हात लावून थालिपीठ थापावे. गरम तव्यावर तेल घालून दोन्ही बाजूंनी थालिपीठ खरपूस भाजावे. सॉस, चटणी किंवा लिंबाच्या लोणच्याबरोबर गरमागरम चापावे. :)
टीपः- मी यात गाजर आणि कांद्याची पात घातली होती. परंतु इतर कोणत्याही भाज्या घालून ही थालिपीठे करुन वैविध्य आणता येईल.
थालिपीठ भाजणी घरात नसताना दुधाची तहान ताकावर आणि तेही हिंग, जिरेपूड घातलेल्या आंबट गोड ताकावर भागवता येईल. ;)
--शाल्मली.
तांदुळाच्या पीठाची थालिपीठे

वाचने
14790
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
वॉव ...भुक
खल्लास!
छान!
छानच...
रविवारच्या स्पेशल मेनूची सोय
अ फ ला तू
सह्ही!!
फोटो
भारी!!!
लाजवाब
आहाहा! काय
क्लास!!
In reply to क्लास!! by चकली
+१
मस्तच थालीपिठे!
In reply to मस्तच थालीपिठे! by चतुरंग
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्त
सिरिअसली,
In reply to सिरिअसली, by शाहरुख
इज द पिठी
In reply to इज द पिठी by शाल्मली
:)
In reply to सिरिअसली, by शाहरुख
पिठी
In reply to पिठी by स्वाती दिनेश
तांदळाच्या पीठात
In reply to सिरिअसली, by शाहरुख
नो...
In reply to नो... by प्रभाकर पेठकर
अॅज अ
फोटो छान .........
In reply to फोटो छान ......... by विकि
प्रश्न -
आजच करुन...
In reply to आजच करुन... by किट्टु
किट्टू, धन्
मस्त फोटो.
अरे हो
धन्यवाद शाल्मली,
धन्यवाद!