प्रस्तुत लेखकाचा--- स्त्री जात ही नतद्रष्ट, पुरुषांना छळायला टपलेली, कांगावे करणारी, (उठसुट) पुरुषांना कोर्टात खेचणारी, कधी पुरुष चुक करतात नी कधी त्याला सप्तपदीच्या फेर्यांत अडकवून घटस्फोट घेते असे मांडे रचणारी आहे ----असा समज/अनुभव आहे असे मला वाटले.
तेव्हा जर लेखाचा अर्थ समजावून घ्यायचा असेल तर त्या दृष्टीकोनातून हा (हे) लेख वाचावा (वाचावे) ही नम्र विनंती
(एका कोनातून समंजस)ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ९ वाजून ४२ मिनीटे झालेली आहेत. काहिहि न कळल्याने सध्या रेडियो बिघडला आहे.
त्या दृष्टिकोनातून वाचली तरच लेखमाला नीट समजेल, हे पटते आहे.
पण हा लेखमालेतून असे कळले की वरील दृष्टिकोन प्रामाणिकपणे असलेले लोक भारतात आहेत. हा दृष्टिकोन मला चुकीचा वाटला तरी तो दुर्लक्ष करण्यायोग्य नाही. कायद्याविषयी धुमसणारे लोक समाजात असले, तर ते दीर्घकाळात घातक होऊ शकते. परंतु या विषयी काय करावे ते कळत नाही. कारण हा दृष्टिकोन तथ्यचर्चेने बधणारा नसावा. :-(
>>गेले काही दिवस 'मिसळपाव'वर मी सप्तपदी विषयी जी चर्चा सुरू केली होती, तीचा मी आता समारोप करू इच्छितो.
अत्यानंद झाला.
मला वाटतंय आपण कुठल्यातरी मानसिक आजाराने पछाडलेले आहात. त्यामुळे आपल्याला सर्व आधुनिक स्त्रिया नतद्र्ष्ट, कपटी, कजाग ....वाटत आहे. देव आपल्या बायकोचे (असल्यास)रक्षण (आपल्यापासून ) करो.
>>मला वाटतंय आपण कुठल्यातरी मानसिक आजाराने पछाडलेले आहात. त्यामुळे आपल्याला सर्व आधुनिक स्त्रिया नतद्र्ष्ट, कपटी, कजाग ....वाटत आहे. देव आपल्या बायकोचे (असल्यास)रक्षण (आपल्यापासून ) करो.<<
याबद्दल अनुमोदनाचे ताटभर मोदक.. (वरच्या मानसिक आजारी लेखकाने केलेलेच!)
३ लेखांचं दळण वाचून एवढंच कळलं की लेखकाच्या डोक्यात सडक्या गोष्टी नको इतक्या भरल्यात. आणि बायकांच्याबद्दल कमालीचा तिरस्कार..
होतं असं.. ज्याला आपण गुलाम समजत होतो तो आपल्या बरोबरीचा किंवा कुठे कुठे वरचढही आहे ह्याच्या जाणीवेने भले भले गारद होतात.. तुमच्या डोक्यावर परिणाम झाला असेल तर नवल काय?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
मला वाटतं की तुमच्या या न्यायाने मी वर उल्ले़ख केलेले सुप्रिम कोर्टाचे न्यायधीश सुद्धा मानसिक आजाराचे रूग्ण म्हणावे लागतील, कारण कारण मुक्त स्त्रीयांनी केलेलेया कायद्याच्या गैरवापराबद्द्ल त्यांनी ताशेरे ओढले आहेत.
त्यांनी मान खाली घालून पति परमेश्वर म्हणेल ती गोष्ट निमूट न स्वीकारणार्या सगळ्याच स्त्रियांबद्दल ताशेरे ओढले असतील तर त्यांनाही म्हणावं लागेल.
केवळ गैरवापर करणार्यांच्याबद्दल ओढले असतील तर त्यांचं काही चुकलं नाही.
तुम्हाला मात्र मानसिक समुपदेशनाची प्रचंड गरज आहे.
तिकडे जा.. आमचं डोकं खाउ नका.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
स्त्रीयांवर अनेक तर्हेने अन्याय होताना आपल्याला दिसतो. अनेक घरांमध्ये स्त्रीयांच्या विचित्र वागण्याने पुरूषालाही त्रास भोगायला लागत असतो. अश्या वेळी त्याला कायद्याचे संरक्षण/सहानुभूती नसते असे युयुत्सुंना म्हणायचे असावे असे मला सुरुवातीला वाटले होते. तसे त्यांना म्हणायचे असेलही कदाचीत.
पण तीन भाग आणि त्यातील मतमतांतरे, सप्तपदी आणि हिंदू विवाह कायद्याचे उल्लेख आणि त्यातून काहीच निष्पन्न निघणारा संवाद वाचून मला काहीच उमगले नाही. कायद्याची पुरेशी सहानुभूती नाही असे मत असेल तर त्यातून सावध कसे राहावे या बद्दल कुठेच चर्चा नाही. या चर्चेतून मला काही बोध झाला नाही.
-- लिखाळ.
आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !
आमच्या मते लेखकाने त्याला हवे ते साध्य केले आहे अन्यथा ही चर्चा एवढी कुणी चघळली असती? कायद्याचा दृष्टीकोन असा कि शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराध्यास शिक्षा होता कामा नये. याचा अर्थ शंभर निरपरांध्यांना न्याय मिळाला नाही तरी चालेल पण एका निरपराध्यावर अन्याय होता कामा नये असा घ्यावा काय?
अवांतर - कोण तिकडे कुजबुजतय रे दिली काडी लाउन! जाउ दे बहुतेक भासच तो. नाही तर काढा धागा नवीन
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
इथे लिन्क द्याल का ? मी तुमची वेब साऐट पाहिली... हिन्दु विवाह कायदा आणि स्पेशल मॅरेज अअॅक्ट हे दोन वेगळे आहेत, हे इथे कुणालाच माहीत नव्हते.... ते सान्गून जर हिन्दु मॅरेज कायद्यापेक्षा दुसरा कायदा कसा सुसह्य आहे , हे सान्गितले असते तर तीन धाग्यान्चे दळण एकाच लेखात सम्पले असते की !
प्रतिक्रिया
पोलीस
विनंतीवजा सुचना
पटते आहे
"स्त्री जात"
>>गेले काही
>>मला
मला वाट्तं
त्यांनी
स्त्रीयां
सहमत आहे
आमच्या मते
आजच्या सकाळ्च्या मुक्त् पीठ पुरवणीतील
इथे लिन्क
Pagination