च्यामारी .. भयताडा ... लेखाचं नाव पाहुन म्हंटलं आत "सुक्कटची रेसेपी" आहे की काय ?
पण आत रायगडाचे फोटू ? वा .. कमाल फोटू !!
लाष्ट टायमाला पायी गड सर केला होता .. आता रोपवे ने जाऊ म्हणतो
आपला
खुप खुप गड चढलेला
ट्रेकी
पहिला शिलालेख थोडा मोठा आहे...तो मागाहुन बघु...दुसर्यात लिहिलय, "सेवेचे ठाई तत्पर, हिरोजी ईंदुलकर". हिरोजी ईंदुलकर हे रायगडाच्या शिल्प्कारांपैकी एक...रायगडाचे आर्किटेक्ट म्हणाना...त्यांची ही सही आहे. हिरोजी ईंदुलकराने महाराजांच्या आज्ञेवरुन हे निर्माण केलं असं लिहिलय. मोडी आहे कि नाही हे माहीती नाही, पण नीट वाचलं तर कोणालाही वाचता येइल अस लिहिलय.
रायगडावर, माझ्या संस्थळांवरील 'मनोगत' वयात, गेलो होतो. रायगड आहेच जबरदस्त.
ऑक्टोबर-नोव्हेंबर ह्या काळात २ रात्री राहायला जायचा विचार आहे. अजून तरी योग जुळून आलेला नाही. (ह्या वर्षीही शक्य नाही).
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
आता खरेच प्रभो शिवाजी राजे असे म्हणण्याचा मोह आवरत नाही..
साक्षात महाराजांच्या राजधानीचे दर्शन घडवलेत तुम्ही...
खूप सुंदर
तसे कोणतेही शिलालेख मला जास्त जवळचे.
पण धुक्यातील सह्याद्रीचे दर्शन आणि ढगांतील रोपवे अप्रतिमच आहेत छायाचित्रे...
एक विनंती:
निवेदन : रायगडाविशयी सर्वांना माहिती असल्याने जास्त महिती दिली नहिये.
असे करु नका हो... जी माहिती तुम्हाला असेन ती द्या. म्हणजे ज्यांना माहिती नाहिये त्यानाही ती माहित होईन. आणि माहितीमुळे या छायाचित्रांना एक विशिष्ट वजन येईन ... तेव्हा लिहित रहा..
फारच सुंदर काम केलेत प्रभो भाऊ :)
जय भवानी !!! जय शिवाजी !!! जय महाराष्ट्र !!!
(शिवभक्त) सागर
कितीही वेळा गेलो तरी प्रत्येक वेळी रायगडाचे वेगळेच रुप दृष्टीस पडते ! साक्षात राजांची पवित्र पावले अंगाखांद्यावर मिरवलेला पुण्यवान रायगड समृद्ध करुन जातो. पुनःप्रत्ययाच्या आनंदाबद्दल खुप खुप आभार !
श्री राजांच्या चरणी त्रिवार मुजरा !
अगदीच राहवत नाही म्हणुन ... रायगडावरचे मी काढलेले काही फोटो.
(प्रभोसाहेबांची क्षमा मागुन!)
!! राजे !!
गंगासागर तलाव
आई शिरकाई
शिवसमाधी
आऊसाहेबांची समाधी - पाचाड
टकमक टोक
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
फोटो जरी रायगडाचे बघत असलो तरी मनाने पन्हाळगडावरच होतो, पेठकरकाका म्हणुन प्रभोंच्या ऐवजी चुकुन तुमचेच नाव टाकले गेले तरी क्षमस्व! बदल केला आहे.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
वाह!!
त्या दुचाकींचा फोटु बघुन माझीया जातीचा ( अहो १०० सीसी गाडीवरुन अशी दुरची भटकंती हे खायच काम नाही) अजुन एक जण बघुन मन आनंदल. :)
फोटु छान आहेत.
वरती इशल्या भोने दीलेल्या फोटोतील पहीला फोटो हीट्ट एकदम. :)
आधी एकदा पण गेलो होतो गाडी(बाईक) वर रायगड ला तेन्वा पुण्याला होतो ईंजिनियरिंगला...तेंव्हा ३ दिवस २ रात्र मुक्काम केला होता.
तेंव्हा आम्च्यातल्या एकाला कोंबडी सोलायला याय्ची....तेंव्हा महाड वरुन ३ जिवंत कोंबड्या वर नेल्या होत्या आणी दगडाची चूल आणी सायकल चे स्पोक्स वापरून तंदूरी चिकन केलं होतं....आई ग..काय टेस्ट होती....संध्याकाळी फोटो टाकेन त्याचा...
प्रतिक्रिया
छान..............
मिपा
वाह सुंदर
च्यामारी ..
शिलालेख
रायगड दर्शन.....
अवर्णनीय आणि केवळ अवर्णनीय
ए१ फोटो.
भारी
धन्यवाद !
????
माझी क्षमा कशा करता बाबा?
वाह!! त्या
आधी एकदा पण गेलो होतो
मस्त!
गुड वन...
अप्रतिम!!!