इथे सगळंच unplanned आहे, म्हणून फोटो आधी, मग पाककृती, आणि साहित्यसूची नाहीच! (का ते पुढे कळेलच!)
फक्त लक्षात घ्यायची गोष्ट एकच मंडळी - तयारीला वेळ जवळपास शून्य, प्रत्यक्ष पाककृतीचा वेळ १० मिनिटे!
आणखी एक आठवडाभर भरपूर काम केल्यानंतरची शुक्रवारची संध्याकाळ, ८ वाजता घरी एकटाच, बाहेर खाऊन कंटाळा आलेला. मि पा वाचता वाचता चावायला चिवडा काढायला गेलो तर microwave मध्ये भाजून ठेवलेले पांढरे स्वच्छ शेंगदाणे दिसले, म्हंटलं आज साबुदाण्याची खिचडी!
पण साबुदाणा भिजवायला निदान सहा-सात तास तरी हवेत. मि पा वर आणि जालावर इतरत्र उंडारत काढत जागरण नक्की असलं तरीही रात्री तीन-साडेतीनला जेवणं म्हणजे काही खरं नाही. मग विचार केला, साबुदाण्याची झाली काशी तर झाली, एक (अ)शास्त्रीय प्रयोग करून पाहू! साबुदाणा झटपट भिजवण्यासाठी त्याला आधिक hygroscopic कसं करता येईल? microwave-proof डब्यात दोन वाट्या साबुदाणा कोरडाच घातला, आणि ३० सेकंद हाय पॉवर वर गरम केला. छान कुड्कुडीत साबुदाणा बाहेर आला. अर्धी वाटी पाणी घातलं, त्या साबुदाण्याने दोनच मिनिटांत ते आधाश्यासारखं पिऊन घेतलं. उत्साहाने आणखी तीन वाट्या पाणी घातलं. (बहुतेक चूक क्र. १!) साबुदाणा तरंगायला लागला. परत डबा microwave मध्ये, यावेळी २ मिनिटांसाठी. (चूक क्र. २) तोपर्यंत दाण्यांचं कूट करावं म्हणून दाणे बाहेर काढले. चूक क्र. ३! लक्षात आलं, आपण नव्या घरात आल्यापासून निम्मं न लागणारं (????) सामान अजून बॉक्सेस मधून बाहेरच काढलेलं नाहीये, आणि deep down कुठेतरी त्यात आहे मिक्सर! Now what? Now बोंबला!! तोपर्यंत microwave ने चार छोटया शिट्या वाजवल्या - Your food is ready! साबुदाणा बाहेर काढला. हाय रे दैवा!! साबुदाणा व पाणी यांचा चकाकता लगदा झालेला! कडेला चमचा आत घातला तर पूर्ण slab च्या slab बाहेर यायला लागली! अब क्या करेंगे?
असू दे, situation salvage तर करायला लागणार. कोणत्याही परिस्थितीत केलेला प्रयोग वाया जाऊ द्यायचा नाही, त्यातून पुढे वापरता येईल असा निष्कर्ष तरी काढायचा किंवा काही तरी उपयुक्त तरी करायचं, हे Thomas Alva Edison ने सांगितलं नाही का? (असं म्हणतात की त्याने tungsten filament वापरून incandescent light bulb तयार केल्यावर एका खवचट पत्रकाराने त्याला 'तुम्ही या आधी शंभर एक चूकीच्या वस्तू वापरल्याबद्दल आणि ते सर्व प्रयोग फसल्याबद्दल खेद वाटत नाही का?' असं विचारलं तेंव्हा एडिसन म्हणाला 'ते प्रयोग फसले नाहीत, त्या शंभर प्रकारच्या filaments प्रकाश उत्पन्न करायला अयोग्य आहेत हे मी शोधलं, तेंव्हा no result is negative, we learn from everything.' - आता मी एडिसन च्या विधानाचा आधार घेतोय इतकंच, बाकी माझ्या-त्याच्यात साम्य शून्य! तो लई मोठा माणूस!)
मग एकीकडे कोरड्या frying pan वर तेलाचा स्प्रे मारून गरम करायला ठेवून मी त्या साबुदाण्याच्या लगद्यात बारीक चिरून कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या घातल्या. कूट न करता आल्याने दाणे तसेच घातले, म्हंटलं त्यामुळे कडकपणा वाढेलच. (हे मात्र चूक नव्हतं, कुरकुरीत पणा अखंड दाण्यामुळे वाढलाच.) दोन चमचे मीठ, किंचित साखर आणि ३ चमचे तेल घालून हे सर्व एकत्र कालवलं. तरीही चिकटपणा बराच होता. मग दोन चमचे रवा घातला. आता मात्र जरा हातावर गोळे करता येतील इतपत consistency आली. मग त्याचे दहा एक वडे करून shallow fry केले. वेळ ६-७ मिनिटे.
मग नॅपकिनवर काढून २-३ मिनिटे वाळवले. तयार झाले मस्त कडकडीत हिरवे-पांढरे साबुदाण्याचे अॅक्सिडेंटल वडे! [इथे या वड्यांना 'अॅक्सिडेंटल' म्हणायचं कारण हे unintended consequence होते, केला तुका अन् झाला माका! पण जे झालं ते चवीला फर्मास होतं राव!]
प्लेट मध्ये दही आणि लाल चटणी घालून फक्त एक फोटो घाईघाईने काढण्यापुरताच थांबलो, मग दहा मिनिटांत तयार झालेले हे वडे त्याहून कमी वेळात फस्त झाले!
(कोण रे तो तिकडे 'चिकट साबुदाण्याच्या थापट्या अंमळ जल्ल्या वाटतं' म्हणतोय??)
वाचने
10495
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहा!!!
+१,
In reply to हाहाहा!!! by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to +१, by छोटा डॉन
नाव एकदम फिट्ट
हा हा हा लै
सही...
हा हा हा!
चिकाटी
भन्नाट हो बहुगुणी!
आहाहा! काय
अरे बाप रे!
In reply to आहाहा! काय by रेवती
द्या इकडे पाठवून!
In reply to आहाहा! काय by रेवती
सह्ही!!! माझ
लै भारी
In reply to सह्ही!!! माझ by प्राजु
>>>मी पुन्हा
In reply to लै भारी by दशानन
व्हर्जन २...
In reply to सह्ही!!! माझ by प्राजु
जमलं
In reply to व्हर्जन २... by बहुगुणी
सुरेख रे!
भावना...
वा!
मस्त दिसत
सहमत
छान
व्वा