जसवंत सिंग यांचे नवे पुस्तक

गोगट्यांचा समीर's picture
गोगट्यांचा समीर in काथ्याकूट
20 Aug 2009 - 1:58 pm
गाभा: 

जसवंत सिंग यांचे नवे पुस्तक २ दिवसांपूर्वी प्रकाशित झाले.
बहुतेक जणांनी ( मी ही) वाचले नसेल, पण भाजपा ने त्यांना प़क्षातुन बरखास्त केले.
गुजरात मध्ये पूस्तकावर बंदी आली, हि प्रतिक्रिया फारच आडमुठी वाटते .
आधी त्यांनी पूस्तक तरी नीट वाचावे.
आपल्याला काय वाटते?

प्रतिक्रिया

कवटी's picture

20 Aug 2009 - 2:04 pm | कवटी

अत्यंत उत्क्रुष्ठ धागा.
विचार वाचुन डोळयात पाणी आले.
सुंदर विवेचन.....
उत्तम मांडणी.....
विषयाच्या अभ्यासाला पैकीच्या पैकी मार्क....
मुद्देसुद लिखाण.....
जिंकलस मित्रा.... तोडलस....
येउदे आजुन.....

टार-कवटी

सुनील's picture

20 Aug 2009 - 2:05 pm | सुनील

आधी त्यांनी पूस्तक तरी नीट वाचावे.
आपल्याला काय वाटते?

पुस्तके, नाटके, चित्रपट, चित्रे इत्यादींवर हल्लाबोल करण्यापूर्वी ते समजून घेण्याची प्रथा स्वतंत्र भारतात कधी सुरू झाली?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सागर's picture

20 Aug 2009 - 2:09 pm | सागर

पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी भाजपा आणि जसवंतसिंह यांच्या मित्रवर्यांमध्ये हे पुस्तक अगोदरच वितरित झालेले होते. तसे बहुतेक सर्व पुस्तकांच्या बाबतीत होत असते ....अभिप्रायासाठी... आडवाणी हे देखील पट्टीचे वाचक असल्यामुळे त्यांनी पुस्तक वाचले असेनच आणि त्यांची जसवंतसिंहांना बरखास्त करण्या मागे निर्णायक भूमिका असल्याचे तर्क हिंदी पत्रकार व्यक्त करत आहेत. (मी बंगळूरात राजस्थान पत्रिका वाचतो. त्यात आजच्याच अंकात यावर लेख आला आहे.)

खरेखोटे देवच जाणे..

पण जसवंतसिंहांच्या पुस्तकामुळे 'जीनांमुळे' पाकीस्तानची निर्मिती झाली हे सत्य खोटे ठरु शकत नाही. भारताच्या फाळणीचा सखोल अभ्यास करुन विदेशी लेखकांनी लिहिलेल्या सुप्रसिद्ध 'फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट' या पुस्तकातही हेच सांगितले गेले आहे. या पुस्तकावर तर पाकीस्तानात बंदी आहे. त्यात जीनांविषयी अनेक सत्य बाबी लिहिलेल्या आहेत. जीज्ञासूंनी हे पुस्तक अवश्य वाचावे.

(पूर्वीच्याच अखंड भारताचे स्वप्न पाहणारा) सागर

गोगट्यांचा समीर's picture

20 Aug 2009 - 2:24 pm | गोगट्यांचा समीर

ठीक आहे , जरी पुस्तक आधी वितरीत झाले असले, तरी एक ज्येष्ठ नेता ५ वर्षे अभ्यास करून एक पुस्तक लिहितो , आणि ते प्रकाशित होताच तुम्ही त्याला बरखास्त करता.. नाय बा पटत.एक तर तुम्ही आधी पराव्रुत्त करा त्याना लिहिण्यापासून ,ह्याचाही प्रयत्न झाला असेलच.
जमत नसेल तर सोडा.
पक्षात असलात म्हणुन तुम्ही तुमचे वरिष्ठ सांगतात म्हणुन लिहायचचं नाही ?
आणि जसवंतसिंहां स्वत: म्हणाले, की जिनांवर एकही पुस्तक भारतात लिहिलेले नाही, त्यांचा हा एक प्रयत्न आहे , ही भूमिका चुकीची वाटत नाही.

सागर's picture

20 Aug 2009 - 2:36 pm | सागर

कोणावर पुस्तक लिहायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे

आणि प्रकाशित पुस्तकावर गुजरातेत बंदी आणली गेली हे मलाही नाही पटले. आपण भारतीय मन मोकळे ठेवून कोणत्याही स्फोटक विचारांना प्रकटण्याची संधी देत नाही हे खरे आहे.

जसवंतसिंहावरील पुस्तकावर बंदी हा व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला आहे.
अर्थात त्यांना बरखास्त करण्याचा विषय तुमचा आमचा नाही. पार्टीला वाटले त्यांनी केले. पुन्हा कधीतरी पार्टीला वाटेल तेव्हा ते परत घेतील.. ह्या फक्त राजकारणातल्या टिपिकल टीआरपी च्या गोष्टी आहेत. आपण त्याला भाव देण्याचे काहीच कारण नाही.

आपण आपली पुस्तकाची वाट पहावी... स्वतः वाचावे आणि मग पुस्तकपरिक्षण करण्यास हरकत नाही.

पण शेकडो लेखकांनी , इतिहासकारांनी जे लिहिले ते कोणा एका जसवंतसिंहांनी लिहिले म्हणून काही खोटे ठरत नाही एवढेच म्हणायचे आहे मला.. :)

सागर

चिरोटा's picture

20 Aug 2009 - 2:34 pm | चिरोटा

जीनांमुळे पाकिस्तान निर्मिती झाली हे सत्यच आहे. आक्षेप जीनांची स्तुती करण्याला आहे. दुसर्‍या धाग्यात सिंग ह्यानी जे तारे तोडले आहेत ते वाचा. ते सत्य असेलही पण जी व्यक्ती फाळणीस(आणि नरसंहारास) बर्‍याच अंशी कारणीभूत होती त्या व्यक्तीचे भारतात उदात्तीकरण करण्याची गरज आहे का? हा प्रश्न आहे.
जीना हे बाँबे डाइंगचे नसली वाडिया ह्यांचे आजोबा. आजोबांचा पुतळा मुंबईत(जीना मुंबईत अनेक वर्षे होते) उभारला जावा अशी नसली वाडिया ह्यांनी उद्या मागणी केली तर ?
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

सागर's picture

20 Aug 2009 - 2:38 pm | सागर

क्या मार्रा है... :)
१००% सहमत

गोगट्यांचा समीर's picture

20 Aug 2009 - 2:59 pm | गोगट्यांचा समीर

पुस्तक लिहिल्याने उदात्त्तीकरण होणार नाही , लेखकाने आपलं मत मांडल आहे. तुम्ही तुमचं बनवायला मोकळे आहात.
अणि वर म्हट्ल्याप्रमाणे, 'फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट' मध्ये तर सगळा दोष जिनांवर आहे. ते पुस्तक चांगलच आहे, पण म्हणुन कोणी दुसरं मत मांडु नये?
एकाच प्रकारचे विचार पसरवून , जनमत बनवायची ही पद्ध्त कोणती?
एवढे तरी विचारस्वांतत्र्य पाहिजेच. हे म्हणजे तुम्हाला विचारस्वांतत्र्य आहे, फक्त ह्याचा विचार करू नका असं म्हणण्यासारख आहे.

चिरोटा's picture

20 Aug 2009 - 3:30 pm | चिरोटा

एकाच प्रकारचे विचार पसरवून , जनमत बनवायची ही पद्ध्त कोणती

सहमत.पुस्तक वाचुन मग त्यावर मत व्यक्त करणे ईष्ट. कदाचीत फाळणी,पाकिस्तान वगैरे विषय नको तेवढे नाजुक असल्याने सर्वजण आपली मते आधीच बनवत असावेत.अजुनतरी केंद्र सरकारने काहीच मत व्यक्त केलेले दिसत नाही आहे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

सागर's picture

20 Aug 2009 - 4:33 pm | सागर

अहो समीरभाऊ वाचत जा की आधी प्रतिसादाच्या अगोदर

माझ्या वरच्या ह्याप्रतिसादात मी हेच म्हटले आहे...
विचार स्वातंत्र्यावर गदा आणण्याबद्दल मी पण सहमत नाहिये... आपल्या भारतात लोकशाही आहे. तेव्हा प्रत्येकाला स्वतःचं मत मांडायचा हक्क आहेच की... आणि तुम्हाला जे पटेल ते तुम्ही घ्या..

कोण तो फडतूस जीना ... ज्याचा आपल्या देशाच्या स्वातंत्र्यातही काडीचेही योगदान नाही... त्याच्यासाठी आपण का काथ्याकूट करायचा? विश्वास ठेवायचाच असेन तर स्वातंत्र्यकालीन लेखकांचे साहित्य जास्त विश्वसनीय नाही का? ... जसवंतसिंहांनी त्यांच्या तारुण्यात जीनांना असे ते किती पाहिले? त्यापे़आ नथुराम गोडसेंची कोर्टातील सा़क्ष आणि त्यांचे बंधु गोपाळराव गोडसे यांचे साहित्य मला तरी जास्त विश्वसनीय वाटते

सागर

ऋषिकेश's picture

20 Aug 2009 - 4:46 pm | ऋषिकेश

कोण तो फडतूस जीना ... ज्याचा आपल्या देशाच्या स्वातंत्र्यातही काडीचेही योगदान नाही... त्याच्यासाठी आपण का काथ्याकूट करायचा?

हे मात्र चुकीचे आहे. जीनांचे स्वातंत्र्यासाठीचे कर्तृत्त्व आहेच आणि बरेच आहे (जरा गुगलून बघा).

एका दुसर्‍या धाग्यावर म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या काळात जीना वेगवेगळ्या रूपात आपल्यासमोर येतात. आणि त्यांची ती सारी रूपे खरीच आहेत..

ते त्या त्या परिस्थितीत तसे तसे वागले.. इतिहास इतकेच सांगतो. लेखक त्यावर आपली मते बनवून पुस्तके लिहितात इतिहास लिहित नाहित.

बाकी चालु द्या

ऋषिकेश

भोचक's picture

20 Aug 2009 - 5:04 pm | भोचक

ऋषीकेशच्या मतांशी सहमत. फाळणीत जीनांचे योगदान मोठे आहे हे नक्कीच. पण म्हणून त्या आधी जीनांनी भारताच्या (अखंड) स्वातंत्र्यासाठी केलेले प्रयत्नही दुर्लक्षिता येणार नाहीत. जीना आधी टिळकांच्या होमरूल चळवळीशी संबंधित होते. शिवाय टिळकांवर झालेल्या खटल्यात जीनांकडेच त्यांचे वकिलपत्र होते. टिळक सुटल्यानंतरही होमरूल चळवळीच्या प्रचारासाठी टिळक, एनी बेझंट आणि जीना देशभर फिरत होते. पुढे टिळक गेले. आणि गांधींचा उदय झाला. गांधीच्या नेतृत्वाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आणि कुणी न ठरवता स्वातंत्र आंदोलनाची धुरा त्यांच्याकडे गेली. सहाजिकच बडे नेता बनलेले जीना बाजूला पडले. दुखावले गेले. यातच ते मग मुस्लिम लीगकडे झुकले गेले. लीगमध्ये गेल्यानंतरही त्यांनी आधी कॉंग्रेसच्या 'हिंदू' नेत्यांसमवेत समझौत्याचाच प्रयत्न केला होता. पण पुढे लीगचा रेटा आणि काही हिंदू नेत्यांचा आडमुठेपणा यामुळे त्यांच्यात स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची बीजे पक्की पेरली गेली.

कॉंग्रेसमध्ये असताना जीनांनी लीगच्या विभक्तवादी मुस्लिम नेत्यांपासून स्वतःला दूर राखले होते. कॉंग्रेसच्याच राष्ट्रवादी पुढार्‍यांसमवेत त्यांचा वावर असायचा. मुस्लिम समाजाशी त्यांचा संपर्क असला तरी ते स्वतः कडवे मुसलमान (निदान सुरवातीला तरी) नव्हते. मुस्लिम लीगच्या नेत्यांशी ते फटकूनच होते. १९१३ च्या आसपास ते गोपाळकृष्ण गोखल्यांसोबत युरोप दौर्‍यावर गेले. तिथे त्यांचा मुहम्मद अलींशी संबंध आला. त्यावेळी त्यांनी मुस्लिम लीगमध्ये येण्यास तत्वतः मान्यता दिली. मात्र प्रत्यक्ष लीगमध्ये प्रवेश बराच उशीरा म्हणजे तीसच्या दशकात झाला.लीगमध्येही त्यांनी सुरवातीला मुस्लिमांच्या हक्कांची भूमिका मांडली, पण स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली नव्हती. ती 'सारे जहॉं से अच्छा लिहिणार्‍या' इक्बालने ठामपणे लीगच्या १९३७ च्या अधिवेशनात केली. १९४० मध्ये लाहोर की कराची येथील लीगच्या अधिवेशनात पाकिस्तान व्हावे असा ठराव मांडण्यात आला. पण तत्पूर्वीच्या म्हणजे साधारण १९३५ च्या आधीपर्यंत जीना पक्के राष्ट्रवादी असल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. नंतर त्यांची मते बदलली. कडवी झाली.

(ता. क. जीनांचे वडिल मुस्लिम होते. पण त्यांचे आजोबा हिंदू होते. ते खोजा मुसलमान बनले. जी जात इराणातून भारतासह इतर काही देशांत गेली. हे तुलनेने कमी कडवे होते. यातले काही तर हिंदूही झाले. किंवा उलट काही पंजाबातील हिंदूंनी कमी कडवा मुस्लिम म्हणून खोजा संप्रदाय अंगीकारला.त्यांची पहिली बायको वारल्यानंतर पेटीट नावाच्या तत्कालीन बड्या पारशाची मुलगी रतनबाई यांच्याबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला. पण तो फार यशस्वी ठरला नाही. आयुष्यात हा माणूस एकाकीच राहिला. शेवटपर्यंत त्यांची फातिमा ही बहिण तेवढी बरोबर होती. तिच्यावर त्यांचे खूप प्रेम होते.)
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/

चिरोटा's picture

20 Aug 2009 - 5:31 pm | चिरोटा

भोचक ह्यांची बरीच उपयुक्त माहिती. सुरुवातीला व्ययक्तिक जीवनात जीना आधुनिक मुस्लिम होते.ते पोर्क(डुकराचे मांस ज्याचे भक्षण ईस्लामला मंजूर नाही),दारुचे ही सेवन करत.कुराणही वाचत नसत असे वाचले होते.
सुरुवातीच्या काळात धर्मानुसार वेगळा देश काढण्याच्या कल्पनेची त्यांनी चेष्टा केली होती. गोखले ह्यांना राजकिय गुरु मानणार्‍या जीना 'I want to be Muslim Gokhale' असे मुलाखतीत म्हंटले होते.
शेवटच्या काळात त्यांना कँसर झाला होता. व हे केवळ डॉक्टर्,त्यांची बहिण ह्यांनाच ठावूक होते.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

सागर's picture

20 Aug 2009 - 5:34 pm | सागर

भोचकराव आणि ऋषिकेशा...

असे आहे होय? हे काय आपल्याला कुठे वाचायला मिळाले नाही....
कुठे ही माहीती वाचायला मिळेल सांगता येईल का? ... (खास करुन मराठी पुस्तक) गुगलून मला फक्त माहितीचा ढिगारा मिळाला. त्यात खरी माहिती कशी शोधायची?

गोविंदराव तळवलकरांचे "सत्तांतर" पुस्तक खूप वर्षांपूर्वी वाचले होते. १५ वर्षे झाली असावीत. भारताचे स्वातंत्र्य आणि फाळणीवर बराच सत्य प्रकाश टाकणारे म्हणून या पुस्तकाचा नाव लौकीक आहे . त्यात भेटेल का ही माहिती?.... परत एकदा हे पुस्तक वाचले पाहिजे हे मात्र नक्की...

- सागर

गोगट्यांचा समीर's picture

20 Aug 2009 - 5:46 pm | गोगट्यांचा समीर

अवांतर :Freedom at midinight या पुस्तकात जिनांच्या व्यक्तिमत्त्चाबद्दल बरिच माहिती देण्यात आली आहे , त्यात तुम्हाला बरीच माहिती मिळू शकते.

सागर's picture

20 Aug 2009 - 5:53 pm | सागर

या माहितीबद्दल धन्यवाद समीरभाऊ

माझ्याकडे हे पुस्तक आहे. पण गेले कित्येक महिने वाचायचा कंटाळा केला आहे ... आता हेच पुस्तक घेतो वाचायला..

१-२ आठवड्यात वाचून पूर्ण करतो, मग माझ्या मेंदूत जास्त खाद्यनिर्मिती होईन :)

चिरोटा's picture

20 Aug 2009 - 6:01 pm | चिरोटा

ऑक्स्फर्ड विद्यापिठाने प्रकाशीत केलेले-JINNAH OF PAKISTAN by STANLEY WOLPOERT चांगले आहे.३५० रुपयांना आहे.
http://www.sapnaonline.com/MoreInfoBK.aspx?lcID=EBK0136091
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

भोचक's picture

20 Aug 2009 - 6:05 pm | भोचक

Understanding The Muslim Mind in India हे राजमोहन गांधी यांचे अतिशय छान पुस्तक आहे. याचा मराठीत अनुवाद आहे की नाही हे माहित नाही. यात मुस्लिम मानस उलगडून दाखवले आहे. प्रमुख आठ-दहा मुस्लिम नेते, त्यांची विचारसरणी आणि कार्य यांचा उहापोह यात केला आहे. खूप अभ्यास करून पुस्तक सिद्ध झाले आहे. केवळ जीनच नव्हे तर इतरही अनेक मुस्लिम नेत्यांविषयी यात छान माहिती आहे.

(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/

भोचकराव, भेन्डि बाजार आणि पुणेरी...

दिलेल्या माहितीबद्दल आणि दुव्यांबद्दल आभार.

ही पुस्तके मिळवून नक्की वाचेन... माझ्या वाचनात आलेली सर्व पुस्तके एकतर्फी लिहिली गेलेली असावीत असे दिसतेय. असले अर्धवट ज्ञान पाजळण्यात अर्थ नाही.. दुसरी बाजू अभ्यासून मगच या 'जीना' नावाच्या जीनकडे लक्ष देईन..

हो उगाच माझा जसवंतसिंह नको इथे काय? ;)

(सध्यातरी जीनाद्वेषी) सागर

प्रसन्न केसकर's picture

20 Aug 2009 - 7:17 pm | प्रसन्न केसकर

भारतातील स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भातील मुस्लीम समाजाची इतिहासाचा मराठी अनुवाद प्रकाशित केलेला आहे. त्यात जिनांबाबत बरीच माहिती आहे.

---

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

प्रसन्न केसकर's picture

20 Aug 2009 - 7:15 pm | प्रसन्न केसकर

भारतातील स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भातील मुस्लीम समाजाच्या इतिहासा बाबतच्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रकाशित केलेला आहे. त्यातही जिनांबाबत आणि अन्य मुस्लीम नेत्यांबाबतही बरीच माहिती आहे.

---

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

प्रदीप's picture

20 Aug 2009 - 7:56 pm | प्रदीप

जसवंत सिंग जे काही टी. व्ही. साठी अथवा पत्रकार परिषेदत बोलायचे त्याचा अर्थ त्यांना तरी कळत असेल, असे म्हणून मी त्यांचा अपमान करणार नाही.

वर्षा भोसलेने रीडिफवरील तिच्या एका लेखात लिहीले होते-- Speaking of unintelligible constructions, kindly tell me what this sentence, about the arrest of jihadis in Pakistan, means: "My hope is that in their areas the professed aim of the exercise to crop terrorism in Pakistan is not lost sight of."

असे काहीतरी क्लिष्टच नव्हे तर अर्थशून्य बोलणार्‍या ह्या एकेकाळच्या आपल्या केंद्रीय मंत्र्याने लिहीलेले पुस्तक कसे असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. कुणी मिपा सभासदाने ते धाडस केल्यास नंतर डोके शांत झाल्यावर कृपया येथे त्याविषयी जरूर लिहावे.

("जे-ते" म्हणजे कोण असा काही संदर्भ पुस्तकात असेल.)

"ज्यांचे" घोषित ध्येय पाकिस्तानातील दहशतवादाला छाटणे आहे, त्या ध्येयाला नजरेतून ढळू दिले जाणार नाही अशी माझी आशा आहे.

मलातरी वाक्य फारसे क्लिष्ट वाटले नाही. संदर्भातील "ते" कोण आहेत? (तेवढ्यामुळेच अर्थ मला कळलेला नाही. पण पुस्तकामध्ये तो/ते/ती/त्या वगैरे सर्वनामे वापरण्यास माझा काहीच विरोध नाही.) वर्षा भोसलेंच्या संदर्भावरून "पाकिस्तानामध्ये जिहादींना अटक करणारे, ते" असा संदर्भ असावा. तसा संदर्भ असल्यास, वाक्याचा अर्थ बर्‍यापैकी स्पष्ट आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी छोटीछोटी वाक्ये करतात (किंवा बाळाला भाजी-पोळीचे छोटे-छोटे तुकडे करून देतात) तशा इंग्रजीत वाक्ये अशी :
"(The authorities want to arrest jihadis in Pakistan.) They have professed an aim. The aim is to crop terrorism in Pakistan. They should not lose sight of their aim. This is my hope."
जसवंत सिंग यांच्या उद्धृत वाक्याची लेखनशैली सुधारली जाऊ शकते, याबाबत सहमत आहे. पण तेवढ्यावरून वाक्य अनाकलनीय आहे असा आकांत करणे (आणि बहुधा पुस्तकातले मुद्दे निरर्थक आहेत असे ध्वनित करणे) म्हणजे जरा जास्तच वाटले. वर्षा भोसले यांच्या स्वतःच्या वाक्यावरून, त्यांना इंग्रजीमधील लांब वाक्ये लिहिण्या-वाचण्याचा अनुभव असावा असे मला वाटते. (पण तशी त्यांच्या लेखनाची ओळख नाही.)

निमीत्त मात्र's picture

20 Aug 2009 - 11:13 pm | निमीत्त मात्र

मागे अडवाणींना देखिल पाकिस्तान भेटीत जिनांचा बराच पुळका आला होता. तेव्हा त्यांची भाजपातून हकलपट्टी का झाली नाही?

माझे हे मतप्रदर्शन जरा लांबलचक झाले आहे. तरी माफ करावे.

मी हे पुस्तक अद्याप वाचलेले नाहीं. कारण या पुस्तकाची अनधिकृत आवृत्ती येईपर्यंत मी ते घेणार नाहीं. माझा एक पैसाही जसवंतसिंग यांच्या खिशात मी जाऊ देणार नाहीं. या पुस्तकाची अधिकृत प्रत (officially edition) कुणीही विकत घेऊ नये असे मला वाटते. मी असे का म्हणतो हे पुढे वाचल्यावर कळेलच. मी ज. परवेझ मुशर्रफ यांचे "In the line of fire हे पुस्तकही मी त्याची अनधिकृत आवृत्ती आल्यावरच घेतले व वाचले. उगीच शत्रूला कशाला श्रीमंत करायचे? जसवंतसिंगांबद्दलही माझ्या मनात आज तीच भावना आहे. तेंव्हा त्यातल्या मजकुराबद्दल कांहींही न लिहिता फक्त "अशी पुस्तकें लिहिणे औचित्त्यपूर्ण आहे का" याबद्दलच मी हे लिहीत आहे.

भारतीयांच्या "आ बैल मुझे मार" स्वभावाची मला खरं तर कींव येते. पाकिस्तानची निर्मिती कुणामुळेही झाली असेल, पण एका भारतीय माणसाने आपल्याच नेत्यांना खुजे सिद्ध करून काय मिळविले?

"अल घारिब" या इराकमधील तुरुंगात अमेरिकन फौजेने इराकी कैद्यांवर अत्याचार केले ज्याबद्दल नंतर खूप टीका व आरडाओरड झाली त्याबद्दलची माहिती जगाला कुणी दिली? अमेरिकन वृत्तपत्रांनी! कां दिली? आपले वृत्तपत्र किंवा नियतकालिक जास्त खपावे म्हणून! अमेरिकन सेनेच्या या निंद्य कृत्यांचा निषेध कुणी केला? जगातील सर्व वृत्तपत्रांनी व नियतकालिकांनी! मग माझ्या मनात हा प्रश्न येतो कीं अत्याचार खरे असोत वा नसोत, पण आपल्याच देशाच्या सेनेने केलेली दुष्कृत्ये जगाला आपणच का सांगायची?

इराकचे एकेकाळचे सर्वेसर्वा सद्दाम हुसेन, इराणचे शहा, इराणच्या शहानंतरचे सत्ताधीश (अमजदीनेजादांच्यासह) यांनी काय कमी अत्याचार केले? भरपूर केले. अलीकडेच निवडणूक "चोरली" म्हणून केलेल्या निदर्शकांवरही अत्याचार झाले हेही आपण वाचले आहे. त्यांच्याविरुद्ध आरडाओरडा इराकी, इराणी वृत्तपत्रांनी केला? मुळीच नाही. का नाहीं केला? कारण? भीती, फक्त भीती! थोडाफार आरडाओरडा केला तो पाश्चात्त्य वृत्तपत्रांनी! त्या वृत्तपत्रांना तर एकदा decadent western press असे म्हटले कीं झाले.

जेम्स क्लॅव्हेललिखित "Whirlwind" किंवा त्या पुस्तकाची संक्षिप्त आवृत्ती "Escape" ही पुस्तके ज्यांनी वाचली आहेत त्यांना हे पटेल. त्यातल्या आयातुल्ला खोमेनींच्या अनुयायांनी केलेल्या अत्याचारांना व "न्यायदाना"ला Decadent Western Media ने हेतुपूर्वक केलेले विकृतीकरण म्हणायचे असेल त्यानी म्हणावे, पण ५० टक्के खरे असले तरी ते शहारे आणणारे वर्णन आहे.

"काँचकी गुडिया" या जुन्या हिंदी सिनेमातील वेश्याव्यवसाय करणारी नायिका सयीदा खान तिच्या दलालाला (रूपकुमार) म्हणते कीं "तू तो पैसेके लिये तेरी अम्मीकोभी बेचेगा!" (चित्रपटाबद्दलची माहिती आठवणीवर आधारित आहे व चूक असल्यास दुरूस्ती सुचवावी.) जसवंतसिंगांचे पुस्तक प्रसिद्ध झाल्यापासून मला तर या वाक्याचीच सारखी आठवण येत आहे.

अमेरिकेप्रमाणे आपल्याही देशात निर्भेळ लोकशाही आहे, भाषणस्वातंत्र्य आहे, मतस्वातंत्र्य आहे म्हणून आपलेच लोक आर्थिक फायद्यासाठी असली पुस्तके लिहितात. चार पैसे नक्कीच मिळतात. पण हा तर आईला पैशासाठी विकण्यातला प्रकार नाहीं का? जसवंतसिंगांनी लिहिलेले खरे आहे असे क्षणभर धरून चालू. पण असे लिहिणे औचित्त्यपूर्ण आहे का? बरोबर आहे कां? अजीबात नाहीं. पैशाखेरीज जसवंतसिंग यांना काय मिळाले?

कुठल्याही देशभक्ताने असे लेखन मुळीच करता कामा नये. हे करणे म्हणजे मातृभूमीशी प्रतारणा करण्यासारखे आहे. केवळ मतस्वातंत्र्य आहे म्हणून असे स्वतःच्या देशाविरुद्ध लिहिणे पूर्णपणे चूक आहे.

म्हणून केवळ अनौचित्याच्या एकाच परिमाणावर (norm) मी या प्रवृत्तीचा निषेध करतो. जसवंतसिंग एक राजकाराणी आहेत, त्यांच्या गाडीची चारी चाके पहिल्यापासून जमीनीला टेकतात, तेंव्हा हा "धर्मराजा"चा किंवा "हरिश्चंद्री" पवित्रा त्याना शोभत नाहीं. त्यांनी लिहिलेले खरे आहे कीं खोटे आहे याचा निवाडा तज्ञांना करू दे. पण देशद्रोह व देशभक्ती यातला फरक समजायला तज्ञांची गरज नाहीं.

तेंव्हा "आ बैल मुझे मार" तत्वावर लिहिलेले हे पुस्तक केवळ औचित्त्यभंगाच्या एकाच मुद्द्यावरून निंद्य आहे.

------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

शाहरुख's picture

22 Aug 2009 - 11:33 am | शाहरुख

सिंगांनी पैसे मिळवण्यासाठी पुस्तकात सनसनाटी वाक्यं लिहिली असतील तर आपले थोडे म्हणणे नक्कीच मान्य करीन मी..

पण जर एखाद्या इतिहासकाराने जो काही त्याचा अभ्यास आहे त्यावर त्याला जसा इतिहास वाटतो तो लिहिला, तर तो देशद्रोही कसा काय ठरतो ???
( इथे सिंग सच्चे इतिहासकार आहेत असा माझा दावा नाहीय )

आणि इराणी, इराकी वृत्तपत्रांनी खर्‍या गोष्टी लोकांसमोर आणल्या नाहीत त्या फक्त भितीपोटी असे जे आपले म्हणणे आहे ते तर मला इथे उदाहरण म्हणून पूर्ण गैरलागू वाटते.

<<पण जर एखाद्या इतिहासकाराने जो काही त्याचा अभ्यास आहे त्यावर त्याला जसा इतिहास वाटतो तो लिहिला, तर तो देशद्रोही कसा काय ठरतो >>
जे देशाच्या हिताच्या विरुद्ध आहे ते करणे म्हणजे देशद्रोह नाहीं तर काय?
<<आणि इराणी, इराकी वृत्तपत्रांनी खर्‍या गोष्टी लोकांसमोर आणल्या नाहीत त्या फक्त भितीपोटी असे जे आपले म्हणणे आहे ते तर मला इथे उदाहरण म्हणून पूर्ण गैरलागू वाटत<<>>
व्यक्ती तितकी मते! आपल्या मते दुसरे काय कारण असू शकेल? देशप्रेम?

सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

ऋषिकेश's picture

22 Aug 2009 - 1:33 pm | ऋषिकेश

पण आपल्याच देशाच्या सेनेने केलेली दुष्कृत्ये जगाला आपणच का सांगायची?

कै च्या कै!!!!
भारत काय किंवा अमेरिका काय हे लोकशाहि देश आहेत. लोकशाहिचा पत्रकारिता हा एक आधारस्तंभ आहे. पत्रकारांनी असे वाईट व्यवस्थेचे, होणार्‍या अन्यायाचे, माजलेल्या अनाचाराचे असे बुरखे फाडायचे नाहित तर काय "अमिताभला थंडी वाजली" दाखवत फिरायचे काय?

आपल्या देशांत एखादे दु:ष्कृत्य घडते आहे हे इतर जगाला समजेल म्हणून काणाडोळा करणे म्हणजे तद्दन मुर्खपणाचे लक्षण आहे. आपला नेता, आपले सैन्य आहे म्हणून त्यांनी काहिहि करावे का?

दुसरी गोष्ट अशी एखाद्या पुस्तकावर बंदी घालण्याइतका / अनधिकृत प्रती घेण्याइतके दुर्दैवी विचार अन्य नसावा असे मला वाटते. अनधिकृत प्रत घेणे म्हणजे उघड उघड चोरीचे (व चोरांचे) समर्थन झाले. वर कर्क म्हणतात त्याप्रमाणे ग्रंथालयातून पुस्तक घ्यावे अथवा वाचुच नये. चोरीस प्रोत्साहन व त्यायोगे देशांतील नियमांशी/कायद्याशी प्रतारणा का?

ऋषिकेश
------------------
दुपारचे १ वाजून ३२ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "गोली मार भेजेऽ मेंऽऽ...."

नंदन's picture

24 Aug 2009 - 11:05 am | नंदन

चूक झाली. माझा प्रतिसाद काढून टाकला आहे. धन्यवाद.

नंदन साहेब,
आपण माझ्या बाजूने इतके परिणामकारक लिखाण केले आहे कीं कदचित ते मलाही जमले नसते!
हिटलरच्या नाझी अनुयायांनी, स्टॅलिनच्या अनुयायानी, शहांच्या "सावाक" अनुयायांनी, सद्दामच्या "रिपब्लिकन गार्ड्स्"नी, पोल पोटच्या अनुयायांनी ज्या हीन पातळीवर जाऊन त्यांच्या कैद्यांवर अत्याचार केले त्याची दहा टक्के "झलक" का त्यांना दाखवू नये? निष्पाप लोकांच्या विरुद्ध केलेले अत्याचार निंद्य आहेत, पण आज सोमालियात, रवांडात अत्याचार करणार्‍यांना त्यांना समजेल अशा भाषेत जरा ठोकले तर काय चुकले? निवडणुकीतील गैरप्रकाराबद्दल निदर्शने करणार्‍या सामान्य माणसावरही अलीकडे इराणमध्ये अत्याचार झाले असे वाचतो. ते कुठल्या इराणी वृत्तसंस्थेने दिले आहे?
म्हणूनच मी वारंवार म्हणतोय कीं मीडियाने व ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी ताळतंत्र सोडू नये.
हिटलरसाहेब, स्टॅलिनसाहेब, शहासाहेब, सद्दामसाहेब, पोल पोटसाहेब किंवा अगदी "आमचे" सुहार्तोसाहेब यांच्याविरुद्ध ब्र काढायची कुणाची हिंमत नव्हती, पण जरासे भाषणस्वातंत्र्य मिळाल्यावर वृत्तसंस्थांनी व जसवंतसिंगांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी बेजबाबदारपणे लिहायला लागणे साफ चूक आहे.
नंदन-जी, मला (नकळत) टेकू दिल्याबद्दल धन्यवाद.
सुधीर काळे
<<याच न्यायाने, जर्मनीतील मुलांना हिटलरबद्दल, रशियन जनतेला स्टॅलिनच्या 'पर्जेस'बद्दल किंवा कंबोडियन जनतेला पोल पॉटबद्दल काही सांगणे म्हणजे त्या त्या देशाविरूद्ध द्रोहच ठरेल, नाही का?>>

------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Aug 2009 - 1:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आता मात्र मला हसू का रडू हे समजत नाही आहे.

अदिती

सुधीर काळे's picture

25 Aug 2009 - 1:58 pm | सुधीर काळे

काहीही केलं तरी चालेल
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

१. अनधिकृत प्रतीबद्दल आपले मत वाचले व ते अनुकरणीयच आहे. आतापर्यंत फक्त ज. मुशर्रफ यांच्या पुस्तकाची अनधिकृत आवृत्ती मी घेतली व त्याचे कारणही सांगितले. जसवंतसिंगांच्या पुस्तकाबद्दलही माझी तीच भावना त्याच कारणासाठी आहे.
२. श्री पवनकुमार वर्मा यांनी लिहिलेले "Being Indian" हे एक सुरेख पुस्तक मी वाचले आहे (अधिकृत आवृत्ती). ते पुस्तक सगळ्यांनी वाचावे असे मला वाटते.
३. माझ्या मतप्रदर्शनातील अनौचित्त्याबद्दलच्या मुख्य मुद्द्याबाबत आपले काय मत आहे?
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Aug 2009 - 11:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

३. माझ्या मतप्रदर्शनातील अनौचित्त्याबद्दलच्या मुख्य मुद्द्याबाबत आपले काय मत आहे?

आणीबाणीमधे अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालत होते त्याबद्दल आपलं काय मत आहे?

आपल्यासमोर कुणा निरागस माणसाला अत्याचार सहन करावे लागले तर आपण औचित्याचा विचार करणार का त्याच्या जीवाचा, त्या माणसाच्या मूलभूत हक्कांचा?

आपल्यावर जर ही वेळ आली असती (उदा: अबू घारेब किंवा ग्वांटानामो बे तुरूंगात जाण्याची) तर आपण अमेरीकन वृत्तपत्रांना माहिती दिली असतीत का फक्त अमेरिकेच्या बाहेरच्याच वृत्तपत्रांना याची माहिती दिली असती?

अमेरिकन करदात्यांच्या पैशावर (खरंतर बर्‍याच जगाच्या, पण अर्थकारण हा इथला विषय नव्हे!) अबू घारेब किंवा ग्वांटानामो बे चालतात, त्यांना हक्क नाही का तिथे काय चालतं हे समजून घेण्याचा? यावर आपलं काय मत आहे??

अदिती

आधी लिहिल्याप्रमाणे आपल्याच देशाची इज्जत आपणच काढण्याच्या मी अगदी विरुद्ध आहे. समजा एकादा माणुस किंवा स्त्री वाईट मार्गाला लागला/ली आहे. ती त्याची/तिची चूक आहेच, पण त्याबद्दल त्या माणसाच्या किंवा स्त्रीच्या मुलांनीच वाच्यता करणे बरोबर आहे का?
माझ्या मते जी कोणी व्यक्ती आपल्या आई-वडिलांबद्दल असे बोलेल त्या व्यक्तीचे असले कृत्य निंद्यच आहे.
तसेच अमेरिकन सेनेने ज्या इराकी कैद्यांवर अत्याचार केले ते कैदी "कासोट्याचं तीर्थ घेण्याच्या" लायकीचे नसून अगदी "पोचलेले" दुष्ट लोक होते. तसेच ग्वांटानेमो बे मधील कैदी आपल्यासारखे (चारचौघांसारखे) होते कां? नाहीं. त्यातले बरेच लोक अतिरेकी होते. सद्दाम सत्तेवर असताना अमेरिकन लोकांनी केले त्याच्या दसपट अत्याचार केलेले हे लोक होते. त्यांना त्यांच्याच भाषेत जरा सुनावले तर त्यात काय चुकले?
सद्दामने आपल्या जावयाला (जो थोडे दिवस जॉर्डनला defect झाला होता) गोळ्या घालून मारले! केस नाही, खटला नाही, काहीं नाही. सगळ्या जगाला सांगितले की त्याच्या नातेवाइकांनीच त्यांना मारले. असे होते सद्दाम राज्य आणि त्याचे गुंड! त्याना कसली सहानुभूती दाखवायची!
सद्दाम जेंव्हा सगळ्या जनतेचा कर्दनकाळ झाला होता तेंव्हा कोण बोलले? का नाही बोलले? भीती नाहीं तर काय? मी इंडोनेशियात गेली २५ वर्षे येऊन-जाऊन आहे. सुहार्तो सर्वेसर्वा असताना मीडियाला तोंड उघडायला बंदी होती. भीती म्हणजे काय असते ते मी स्वतः पाहिले आहे. ऐकीव गोष्टीवरून नाही बोललो मी.
जसे काल मी बाळासाहेबांबद्दल लिहिताना म्हटले होते की राजकीय व्यक्तीने सावांशी साव व बदमाशांबरोबर बदमाशासारखेच वागले पाहिजे.
कॉर्पोरेट जगतातही अशी नीती असतेच. जर कुणी आपल्या कंपनीला दिवाळखोरीत घालत असेल त्याला कुठली कंपनी सज्जनपणे वागवते?
तरी असल्या गोष्टींबद्दल मीडियाने तारतम्य बाळगलेच पाहिजे. स्वातंत्र्य असावे, पण जबाबदार स्वातंत्र्य असावे.
तसेच राजकीय नेत्यांनी आपण काय बोलतोय/लिहितोय व त्याचे देशावर काय परिणाम होतील याचे भान ठेवलेच पाहिजे. अन्यथा एकाद्या मठात जाऊन देव-देव करत बसावे.
आपल्या देशात संरक्षणमंत्री-परराष्ट्रमंत्री-अर्थमंत्री अशी उच्च पदे "भूषविलेल्या" माणसाने असे लिहिणे मूर्खपणाचे व बेजबाबदारपणाचे आहे. अशा माणसाविरुद्ध पुरावे शोधून व त्या पुराव्यानुसार कायद्याच्या चौकटीत बसत असेल तर देशद्रोहाच्या आरोपाखाली केस केली पाहिजे. म्हणजे "मोठे" लोक भविष्यकाळात असे बेजबाबदारपणे वागणार नाहींत.
मला जसवंतसिंगांच्याबद्दल खूप आदर होता, पण या एका कृत्याने ते माझ्या मनातून पार उतरले आहेत. मला त्यांच्याबद्दल अजीबात सहानुभूती नाहीं.
सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

अदिती,
अल घारिब वा ग्वांटानेमो बे मधले कैदी निरागस होते असे तुला खरोखर वाटते कीं वादासाठी वाद चालू आहे?
इंदिराबाईंनी सरसकट साव व चोर सगळ्यांना कैदेत टाकले. ते बहुतेक सर्व राजकीय कैदी होते. त्यांची तूलना अल घारिब वा ग्वांटानेमो बे मधल्या कैद्यांबरोबर करणे तुला पटते का?
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

विकास's picture

23 Aug 2009 - 8:08 am | विकास

माझे जसवंतसिंगांच्या संदर्भातील मत दुसर्‍या धाग्यात देऊन झाल्याने त्याची पुनरावृत्ती करत नाही. फक्त वर चालू असलेल्या उपचर्चेसंदर्भात थोडेसे:

अल घारिब वा ग्वांटानेमो बे मधले कैदी निरागस होते असे तुला खरोखर वाटते कीं वादासाठी वाद चालू आहे?

काळे साहेब, ते कैदी विशेषतः ग्वांटानोमो बे मधील कैदी निरागस आहेत का अतिरेकी ह्यातील काहीच माहीत नाही अशी अवस्था आहे. केवळ ते मुसलमान अथवा इराक-अफगाणीस्थानातील आहेत म्हणून ते गुन्हेगार असलेच पाहीजेत असे काहीसे हे मत वाटले. (ग्वांटानोमो बे:) बुश असे पर्यंत आणि अजूनही सर्वांवर साध्या केसेस पण दाखल झालेल्या नाहीत. ते २००१/२००२ पासून त्या तुरूंगात खितपत पडले आहेत. त्यात काही अतिरेकी नक्कीच असतील. पण त्याच बरोबर सुक्या बरोबर ओले जळते म्हणत इतरांना डांबून ठेवून एका अर्थी अमेरिकेने त्यांच्यातील शत्रूत्वाला खतपाणी घातले आहे.

आणिबाणीच्या काळात इंदीरा गांधींनी जे काही केले ते पूर्ण चुकीचे होते. त्यांनी स्वतंत्र भारतात प्रथमच (आणि होपफुली शेवटची) हुकूमशाही आणली. मात्र एक लक्षात असुंदेत की सुदैवाने ते एकाच निवडणूकीत निघून गेले आणि तसेही व्यक्तीधारीत असल्याने, ते त्यांच्यापुरते मर्यादीत राहीले. आज अमेरिकेने जे काही केले ते शीतयुद्धपश्चात जगातील एकमेव महासत्ता या नात्याने केलेली एक मोठी दादागिरी ठरू शकते. त्यात इतर अनेक देशांनी त्यांना विविध प्रकारे सहाय्य केले. अशी दादागिरी ही व्यक्तीधारीत नसून राष्ट्राधारीत म्हणून राष्ट्राचे धोरणच होते. ज्याचा परीणाम निव्वळ इतर दुर्बल राष्ट्रांनाच नाही तर अमेरिकन नागरीकांना पण भोगावा लागू शकतो. बुश असताना हा तुरूंग उघडला. ओबामा बंद करणार म्हणाले पण आजही ते तसा तो बंद करू शकले नाहीत. का केला नाही ह्याला विविध कारणे असली तरी बंद केला गेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.

असो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Aug 2009 - 5:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रश्न कोण निरागस आहे का नाही याचा नाही आहे, पण तुरूंगात, तुरुंगाधिकार्‍यांनाच या बंदींना शिक्षा देण्याचा अधिकार कोणी दिला? त्यांना जर न्यायालयामार्फत शिक्षा मिळाली नाही तर जावयाला गोळी घालणार सद्दाम आणि अमेरिका यांच्यात फरक तो काय? काही अमेरिकन लोकांना स्वतःच्या देशाची अशी बदनामी होऊ नये असं वाटतं म्हणून ते ग्वांटानामो बे आणि अल घारेबमधल्या कैद्यांवरच्या अत्याचाराला वाचा फोडतात.
शिवाय आपला तो स्वातंत्र्यसैनिक आणि दुसर्‍याचा तो दहशतवादी हे खोटं आहे का?
आपल्याकडेही कैद्यांना मानवी अधिकार दिले आहेत. अलिकडेच न्यायालयाने येरवडा तुरूंग प्रशासनाला फटकारलं होतं, एका एड्स झालेल्या कैद्याच्या औषधोपचारकडे दुर्लक्ष केलं म्हणून ...

समजा एकादा माणुस किंवा स्त्री वाईट मार्गाला लागला/ली आहे. ती त्याची/तिची चूक आहेच, पण त्याबद्दल त्या माणसाच्या किंवा स्त्रीच्या मुलांनीच वाच्यता करणे बरोबर आहे का?

पुराणं तुम्ही माझ्यापेक्षा जास्त वाचली असतील... हिरण्यकश्यपूला मारायला नरसिंहाची प्रार्थना कोणी केली?
चूक ती चूकच, ती माझ्या मुलांनी केली असेल नाहीतर दुसर्‍याच्या मुलांनी, तसंच माझ्या वडीलांनी चूक केली असेल नाहीतर दुसर्‍याच्या वडीलांनी! माझी मतं तुम्ही मान्य कराच असं नाही, पण (माझ्यासकट) काही लोकांनातरी चूक आहे का नाही एवढंच दिसतं, ती करणारा दिसत नाही. तसं दिसत नसतं तर न्यायदेवतेच्या डोळ्यांवर (रूपकात्मक) पट्टी दाखवली नसती.

अमेरिकेतला तो पैशांचा घोटाळा करणारा कोण, (पॉन्झीच ना?) त्याच्या मुलांनी जर वडीलांचा गैरव्यवहार उघडकीस नसता आणला तर किती सामान्य लोकांचे पैसे बुडले असते?

त्यातून भले सरकारने कुकर्म केली तर त्यात देशाचा अपमान होईल त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त अपमान एका गटाने किंवा माणसाने अत्याचार केले आणि बाकीच्यांनी ते डोळे मिटून दुर्लक्षित केले तर होईल. हिटलरच्या उदयाला जेवढा हिटलर स्वतः जबाबदार होता तेवढाच जबाबदार होता तेव्हाच सुशिक्षित वर्ग, ज्याने या घटनांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं. आपल्या देशातलाच आहे म्हणून आज एक मनमानी सहन केली आणि पुढे त्याच लोकांना, ज्यूंना, त्याच हिटलरने क्रूरपणे मारलं.

गुन्हा करणार्‍याएवढाच दोष तो पाठीशी घालणार्‍याचा असतो. आईचा कान चावणार्‍या चोराची गोष्ट तुम्हाला माहित असेलच. मग आई चूक करत असेल तर तिला पाठीशी का घालावं?

अदिती

मन's picture

23 Aug 2009 - 5:32 pm | मन

समजुन घ्यायचा प्रयत्न करतोय.

आपलाच,
वाचक
मनोबा

अमेरिकन सेनेने जे केले त्याची मी कधीच पुष्टी केलेली नाहीं. अमेरिकन वृत्तपत्रांननी ते वृत्त फोडले हे चुकले असेच मी म्हणत आलो आहे आणि माझे तसे ठाम मत आहे. ते त्यांनी केवळ खप वाढावा म्हणून केले असे ही मला वाटते. ज्यांनी त्यांना फोटो पुरविले त्यांना किती पैसे मिळाले हे शोधले पाहिजे. "अल-घारिब" येथील सैनिकांनी अत्याचाराचे फोटो अमेरिकन वार्ताहारांना विकण्याऐवजी आपल्या अधिकार्‍यांवर गोळीबार केला असता तर मी ते क्षम्य मानले असते. कारण ते कृत्य एक जुलमाविरुद्ध घेतलेले पाऊल ठरले असते. हे सैनिक शस्त्रधारी होते व त्यांना अधिकार्‍यांना मारणे अगदी सहज शक्य होते. पण एवढी हिंमत फार थोड्यांना असते. पण हळूच फोटो विकून पैसे मिळविणे सोपे पण हीन कृत्य आहे.
महंमद अली जीना चांगले होते कीं नव्ह्ते, फाळणीला जबाबदार कोण याविषयी मला पुरेशी माहिती नाहीं त्यामुळे त्याविषयावर मी अधिकारवाणीने बोललो नाहीं व बोलणारही नाहीं. पण जसवंतसिगांनी या विषयावर भारतविरोधी लिखाण केले ते माझ्या मते देशद्रोहाचे कृत्य आहे. आपल्यापैकी कांहीं जणाना माझे हे मत पटत नाहींय हे उघड आहे व माझे मत सगळ्यांना पटले पाहिजे असा माझा आग्रहही नाहीं. माझे मत मांडले इतकेच. (Freedom at Midnight हे पुस्तक मी खूप वर्षांपूर्वी वाचले आहे)
अदिती, प्रह्लादाची पूर्ण कथा संधी मिळाल्याबरोबर वाचेन व मगच लिहीन. सध्या लहानपणी वाचलेली ही गोष्ट मला नीट आठवत नाहीं. मुख्यतः प्रह्लादाने असे कां केले, त्यात त्याच्या प्रियजनांवर संकट आले होते कां हा भाग नीट आठवत नाहीं.
A Splendid Thousand Suns या खालेद हुसेनीलिखित (Khaled Hosseini) पुस्तकात जुलमी नवर्‍याला त्याच्या दोन बायका ठार मारतात व त्याला पुरतात. कारण तो अत्याचारी असतो. त्या बायका नवर्‍याचे अत्याचार उघड्यावर सांगत न बसता शिक्षा देऊन मोकळ्या होतात. अल घारेबच्या सैनिकांनीही असे केले असते तर ते मला पटले असते.
याउलट सुहार्तो, सद्दाम, शहांची राजवट, खोमेनींची राजवट व त्यांचे अनुयायी, आताच्या राजवटीने अलीकडे निदर्शकांवर केलेले अत्याचार याविषयी त्या देशातल्या वृत्तपत्रांनी गौप्यस्फोट केला का? का केला नाहीं? मग अमेरिकन मीडियाने हे "हरिश्चंद्री" रूप का धारण केले? याचे मला तरी समाधानकारक उत्तर मिळत नाहीं. जे संपूर्ण युद्धच चुकीच्या माहितीवर आधारित होते व अमेरिकन नियोकाँझर्वेटोव्ह (neoconservative) लोकांनी ते अमेरिकन जनतेवर लादले या मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून किरकोळ गोष्टींना काय महत्व द्यायचे असेही मला वाटते. (सध्या मी The Fall of the House of Bush हे Craig Unger यांनी लिहिलेले अतीशय चित्तवेधक पुस्तक वाचत आहे)
असो. याबाबत आपण दोन ध्रुवांवर उभे आहोत त्यामुळे मतैक्य अशक्यच दिसते. म्हणून हा शेवटचा प्रयत्न.
जसवंतसिंगांबद्दल मला असलेला उच्च प्रतीचा आदर आता शून्य झाला आहे हे मत्र खरे. त्यातून खडकवासल्याच्या नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमीत शिकून नंतर जे भारतीय सेनेच्या भूदलात (Army) ऑफिसर होते अशा माणसाने असे करणे तर अक्षम्य आहे? हर हर!!
सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

चिरोटा's picture

24 Aug 2009 - 11:29 am | चिरोटा

जीनांना मोठे करण्याच्या नादात त्यांनी त्यावेळच्या भारतिय नेत्यांना कमीपणा आणला असेल तर ते निंदनीय आहे. फाळणीला जीनांबरोबर पटेल्/नेहरु(गांधी आलेच!!! ) ही तेवढेच जबाबदार आहेत असा जसवंतसिंग ह्यांचा सूर असावा.
सत्य उघडकीला आणण्यात काहीच गैर नाही पण त्याने देशहितास बाधा येत असेल तर ते अयोग्य आहे. सैन्याचे अत्याचार,राजकारणी लोकांचा भ्र्ष्टाचार उघड करण्यात काहीच गैर नाही.पण इकडे मुद्दा वेगळा आहे.
अवांतर-काश्मिरमध्ये परदेशी पत्रकारांना मज्जाव आहे. काश्मिर विषयी कुठच्याही बातम्या भारतिय व्रुत्तपत्रांनी देशहीत लक्षात घेवून छापल्या पाहिजेत असा अलिखीत नियम आहे.
सत्य आणि देशहित प्रत्येकवेळी जुळतीलच असे नाही.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

सुधीर काळे's picture

26 Aug 2009 - 12:16 pm | सुधीर काळे

अदिती,
खालील माहिती जकार्तास्थित माझ्या एका "धार्मिक" मित्राने दिली आहे. बरोबर असावी, पण चूक असेल तर निदर्शनास आण.
प्रह्लादाने आपल्या वडिलांच्या विरुद्ध कुठलेही काम केले नाहीं! त्याचा व त्याच्या वडिलांचा मदभेदाचा मुद्दा होता तो म्हणजे प्रह्लाद देवाची पूजा करी व देवालाच सर्वश्रेष्ठ मानी. हिरण्यकश्यपू स्वतःला देवापेक्षा श्रेष्ठ समजायचा व प्रह्लादाला छळायचा. पण प्रह्लाद मुकाट्याने सर्व अत्याचार सहन करत असे.
त्याला एकदा जिवंत जाळायची शिक्षा हिरण्यकश्यपूने दिली. त्यावेळी होलिका नावाच्या प्रह्लादाच्या आत्याने त्याला वाचवायला धरून ठेवले, तर तिच्यासकट दोघांना जाळले गेले. त्यात होलिका जळून मेली पण प्रह्लादाला देवाने पुन्हा वाचवले. (या होलिकेवरूनच होळी पौर्णिमा साजरी करतात).
शेवटी देवाला वाटले कीं enough is enough व त्याने नृसिंहावतार घेऊन हिरण्यकश्यपूला मारले.
हे जर बरोबर असेल तर या बाबतीतले तू दिलेले उदाहरण इथे लागू होत नाहीं असे वाटते.
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

सुधीर काळे's picture

26 Aug 2009 - 3:37 pm | सुधीर काळे

प्रदीप-जी,
आपण दिलेली लिंक उघडून मी तो लेख वाचला व त्याखाली असा कॉमेंटही लिहिला.
"Jaswant Singh's new book on JinnahBy: K B Kale | Wednesday , 26 Aug '09 12:33:39 PM Reply | Forward I don't want a single naya paisa of my hard-earned money to go into Mr Jaswant Singh's (deep) pockets. So I have to wait till the pirated edition of this book appears.Then only I will read it and comment.I have only done it once before, when I bought the book "In the line of fire" by Musharraf."
धन्यवाद
सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.