न्यास

क्रान्ति जे न देखे रवी...
या जिवाला एक ज्याचा ध्यास होता तोच की त्याचा खुळा आभास होता? भोगले आयुष्य, नव्हती कैद साधी, सक्तमजुरी आणि कारावास होता रंगलेल्या मैफली उधळून जाणे हा कुणाचा सांग अट्टाहास होता? चिंब भिजण्याचे ऋतू केव्हाच सरले, फक्त ओल्या पालवीचा वास होता राम सुटला, मात्र सीतेच्या कपाळी गोंदलेला आमरण वनवास होता हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे, जो दगा देऊन गेला, श्वास होता मी निषादाभोवती गुंतून गेले, हाय, त्याचा पंचमावर न्यास होता
वर्गीकरण
लेखनविषय:

16 टिप्पण्या 3,256 दृश्ये

Comments

हृषीकेश पतकी नवीन

रसायन छान जमून आलंय !! हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे | जो दगा देऊन गेला , श्वास होता || उत्तम!! आपला हृषी !! :)

अ-मोल नवीन

हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे, जो दगा देऊन गेला, श्वास होता मी निषादाभोवती गुंतून गेले, हाय, त्याचा पंचमावर न्यास होता चिंब भिजण्याचे ऋतू केव्हाच सरले, फक्त ओल्या पालवीचा वास होता सुरेख.

मदनबाण नवीन

झकास्स्स्स... :) मदनबाण..... चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :) http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

श्रावण मोडक नवीन

राम सुटला, मात्र सीतेच्या कपाळी गोंदलेला आमरण वनवास होता हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे, जो दगा देऊन गेला, श्वास होता या दोन अधिक भावल्या. एकूण रचना तुमच्या नेहमीच्या वजनातील.

अनिल हटेला नवीन

नेहेमी प्रमाणे उत्तमच.... हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे, जो दगा देऊन गेला, श्वास होता :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

दत्ता काळे नवीन

चिंब भिजण्याचे ऋतू केव्हाच सरले, फक्त ओल्या पालवीचा वास होता . . . . हे मस्तच.

दशानन नवीन

हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे, जो दगा देऊन गेला, श्वास होता वाह ! काय लिहू समजत नाही आहे.... खुप सुंदर कविता.. व वरील ओळी तर क्लास... एकदम नकळत डोळ्याच्या कडा ओलावून गेल्या... ! :S

बिपिन कार्यकर्ते नवीन

क्रांतिताई, मस्तच. हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे, जो दगा देऊन गेला, श्वास होता या ओळी खूपच आवडल्या. मी निषादाभोवती गुंतून गेले, हाय, त्याचा पंचमावर न्यास होता बर्‍याच नातेसंबंधात हे अगदी सामान्यपणे होत असते. बिपिन कार्यकर्ते

प्राजु नवीन

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मी निषादाभोवती गुंतून गेले, हाय, त्याचा पंचमावर न्यास होता सर्व गझलच अप्रतिम आहे.. या ओळी तर खासच! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सागर नवीन

क्रान्तिजी शब्दच नाहीत एकही ओळ कमी जास्त नाहिये. त्यामुळे आवडलेल्या ओळी देत नाहिये... सगळी कविताच अप्रतिम आहे... सुरुवातच एवढी सुंदर केली आहे की अहा हा हा... फारच सुंदर... अशाच सुंदर कविता अजून लिहा... :) (कविताप्रेमी) सागर

मनीषा नवीन

चिंब भिजण्याचे ऋतू केव्हाच सरले, फक्त ओल्या पालवीचा वास होता मी निषादाभोवती गुंतून गेले, हाय, त्याचा पंचमावर न्यास होता सुंदर !!!

उत्खनक नवीन

कोणता शेर खास म्हणून निवडावा? सर्वच एक से बढकर एक आहेत!