Skip to main content

जसवंत सिंग भाजपच्या विचारसरणीचा बळी ठरले असे आपल्याला वाटते का ?

लेखक शाहरुख यांनी गुरुवार, 20/08/2009 09:52 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 2175
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

In reply to by शाहरुख

तुम्ही होय ला मत दिले म्हणता पण Results (मराठी शब्द ?) काहीच का दिसत नाही ??? *** ह्म्म्म आता एक मत दिसत आहे !!! बाकी चालु ध्या... मदनबाण..... चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :) http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

ह्या तीनही पर्यायांपेक्षा वेगळ माझ मत आहे. (त्याला फार किमंत आहे अस नाही पण आहेच) माझ्यामते सगळ्या साठलेल्या गोष्टी एकत्र येवुन जसवंतसिन्ग यांचा पत्ता कापला गेलाय. त्यांनी अनेक वादग्रस्त विधान केली आजवर त्या सगळ्याचा एकत्र परिणाम असेल हा. बाकी राजकारण आम्हास कळत नाय.

भाजपची या बाबतीतली धोरणं काय आहे हे समजल्याशिवाय मत कसं देणार? मागे सोमनाथ चॅटर्जींचीही मा.क.प.मधून हकालपट्टी झाली होती, कारण त्यांनी पक्षाच्या कायद्याचा भंग केला होता. जसवंत सिंग यांना भारत देशातून हाकलेलं नसून भाजप या पक्षातून हाकललं आहे. भारत देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल असं घटनेने सांगितलं आहे, भाजप या पक्षात ते मिळेलच का नाही हे मलातरी माहित नाही. जसवंत सिंग यांना ते माहित असेल अशी आपण अपेक्षा करू शकतो. एकूण भाजपचा इतिहास पहाता जसवंत सिंग पुन्हा भाजपमधे आले तरीही मला आश्चर्य वाटणार नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मुलाखतीचा काही भाग वाचल्यानंतर जसवंत सिंगांचं भाजपमधे पुनर्वसन केलं नाही तरीही आश्चर्य वाटणार नाही. अदिती

नाही ला मत दिले आहे. दुसरा कुठचाही पक्ष असता तरी बहुदा हेच केले असते.अर्थात नेत्याचे पक्षातील स्थानही महत्वाचे.जसवंतसिंग पहिल्या फळीतले नेते असले तरी मास अपील्,वक्त्रुत्व्,गर्दी खेचण्याची क्षमता ह्यात बरेच कमी पडतात. पक्षातुन काढताना नक्क्कीच ह्याचा विचार केला असणार. हे अशा प्रकारचे पुस्तक लिहिल्यावर काय 'संकट' येवू शकते ह्याची जसवंतसिंगाना कल्पना नव्हती असे म्हणणे मुर्खपणाचे ठरेल. २००५ साली खुद्द अडवाणी ह्यांनी कराचीत जावून जिन्नाची स्तुती करुन वादळ ओढवून घेतले होते. जिन्ना हे मोठे व्यक्तिमत्व होते ह्यात शंकाच नाही.गोपाळक्रुष्ण गोखल्यांच्या शब्दात-'Jinnah is outstanding , brilliant and honest politician.People like him should lead India in future' पाकिस्तानच्या प्रतिश्ठित डॉन व्रुत्तपत्रात प्रसिध्ध झालेली सिंग ह्यांची मुलाखत वाचण्यासारखी आहे. फाळणीसाठी सिंग ह्यांनी अनेक लोकांना जबाबदार धरले आहे. अवांतर- समजा सोनिया गांधी ह्यानी असेच पुस्तक लिहिले असते तर कोण गहजब झाला असता.!!( पाकिस्तान्+इटाली ) x भारत असे स्वरुप आले असते. स्वराज्,उमा भारती ह्यांनी नकीच मुंडण करुन घेतले असते.!! भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

स्वराज्,उमा भारती ह्यांनी नकीच मुंडण करुन घेतले असते.!! :D मदनबाण..... चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :) http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

In reply to by चिरोटा

असेच म्हणतो. मी इथे भेंडीबाजार यांच्याशी सहमत आहे. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

जसवन्तसिन्गान्च्या पुस्तकातल्या एका वाक्याबद्दलच्या अनेकांच्या प्रतिक्रिया वाचल्या आणि पाहिल्या. माझ्या मते हे तात्पुरते, माहिती क्षेत्रामुळे हवेच्या झुळुकीचे वादळात झालेले व्रुत्त आहे.

काही कंपन्यांमधे हिणकस दर्जाच्या मालाबद्दल तक्रारी घेऊन गिर्‍हाईके आली तर त्यांचे शिव्या शाप खालमानेने ('जबाबदार व्यक्ती ' म्हणून) ऐकून घ्यायला एका विशिष्ट माणसाला नेहेमी बोलावतात. तो बिचारा सगळे बोलणे ऐकून घेतो आणि परत जातो. गिर्‍हाईकाला समधान मिळते की आपण आपल्या फसवणुकीचा पाठपुरावा केला आणि कंपनी सुद्धा हुश्श होते की ते गिर्‍हाईक पुन्हा भांडायला येणार नाही... "विशिष्ट" माणूस पण खूश - पगार मिळतो तर त्याबद्दल काही तरी काम केले :) जसवंत सिंगांचे तसेच काहीसे दिसते. निवडणुका हरल्या, पक्षश्रेष्ठी म्हणाले असतील - जसवंता, तू खाली मुंडी घालून कार्यकर्त्यांच्या शिव्या ऐकून घे... पक्षातून "बाहेर" जा... (आणि काही दिवसांनी मागच्या दाराने परत ये). आम्ही तुला तोवर मीठ-भाकरी साठी ६६ लाख देतो - पुस्तक लिहिण्या बद्दल. :)

In reply to by विंजिनेर

सहमत. कालही टी.व्ही. वर बोलताना काही पत्रकारांनी जसवंतसिंगांचा 'थोड्यावेळासाठी गेम' केलेला असण्याची शक्यता वर्तवली. पुस्तक दोन वर्षापुर्वीच लिहुन झाले होते असे वाचले.शोधुन शोधुन ह्या लोकांना पुस्तक लिहायला जिन्नाच का सापडतात हे न उलगडणारे कोडे आहे.लिहिणारा इतिहासकार,संशोधक असेल तर भाग वेगळा पण राजकिय पक्षाच्या नेत्याने शत्रु राश्ट्र मानलेल्या ,फाळणीसाठी(आणि नंतर झालेल्या नरसंहारास ) जबाबदार असलेल्या नेत्याची भलामण करावी हे रुचले नाही. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

राजकिय पक्षाच्या नेत्याने शत्रु राश्ट्र मानलेल्या ,फाळणीसाठी(आणि नंतर झालेल्या नरसंहारास ) जबाबदार असलेल्या नेत्याची भलामण करावी हे रुचले नाही. यात काय चूक आहे? एखाद्या नेत्याच्या चांगल्या गुणाना चांगले म्हणाले तर त्यात काय वाईत आहे. शत्रुच्याही चांगल्या गुणांचे कौतुक करणे हे सुशिक्षीतपणाचे लक्षण आहे. वाजपेयी ही इंदीरागांधींच्या धडाडीपणाचे नेहमीच कौतुक करत. हिटलर हा नरराक्षस होता असे म्हणणारे ब्रिटीश इतिहासकार हिटलर॑च्या नेतृत्वगुणांचे नेहमीच कौतुक करतात. फाळनीनन्तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे जिन्ना च्या हातातून पाकिस्तानची सूत्रे निसटली अन्यथा पाकिस्तान आज वेगळा असता. जिन्ना हे ध्येयवादी निश्चीतच होते. त्यानी एक राष्ट्र निर्माण केले हे त्यांचे कार्य तर सर्वानाच मानावे लागेल पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

In reply to by विंजिनेर

तू खाली मुंडी घालून कार्यकर्त्यांच्या शिव्या ऐकून घे... पक्षातून "बाहेर" जा... (आणि काही दिवसांनी मागच्या दाराने परत ये).
संपूर्ण सहमत. म्हातार्‍यांचे खेळ चाललेयत, कुणी फारसे मनावर घेऊ नये.

In reply to by प्रदीप

त्यांच्या टीव्हीवरील मुलाखती बघता तसे नाही वाटले मला....किंवा मग ते ऑस्कर मिळवायच्या लायकीचे नट असले पाहिजेत. जर नाटक असेल तर त्याचा भाजपला काय फायदा ? हिंदूत्ववादी प्रतिमा अजुन मजबूत करणे हा ??

In reply to by शाहरुख

अगदी अथपासून इतिपर्यंत हा सगळा बनाव घडवून आणला आहे, असे मी म्हणत नाही. पण सर्वसाधारणपणे दिल्लीस्थित नेते सदासर्वदा एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्नात असतात. पक्ष, विचारधारा वगैरे राहू दे बाजूला. आपलेच खेळ खेळण्यात त्यांची सर्व शक्ति जात असते. इथेही तसेच काहीतरी असावे. हे त्यांचे पक्षातून विलंबन किती दिवस टिकते आहे, ते पहायचे.

जसवंत सिंग भाजपच्या विचारसरणीचा बळी ठरले असे आपल्याला वाटते का ?
भा ज प मध्ये काही विचारसरणी शिल्लक आहे असे वाटत नाही, म्हणून 'नाही' असे उत्तर दिले आहे. म्हातार्‍यांचे एकमेकांना धक्के द्यायचे खेळ कुणी 'विचारसरणी' समजत असेल, तर गोष्ट निराळी. वरील उत्तर माझ्या शैलीत दिले आहे. जसवंत सिंगांच्या शैलीत उत्तर द्यायचे तर: "Having considered the various aspects of the issue at hand, and havinng given due weightage to the various idealogical trends and the threats to the trends from positive thinkers that dominate the national scenario which has, of late, been marred by more instances of incoherence than one, for which we should collectively blame those who do not seek to invoke the inner feelings of nations at large, and then having dwelt on this subject matter for as much as three months, during which various aspects of the issues at hand were given an in depth consideration, depite serious opposition from some elements within the colglomerate that we consider our political vehicle, it seems certain that ....." Go figure ........

डॉन ह्या प्रसिध्ध व्रुत्तपत्राला मुलाखत देताना सिंग ह्यानी खालील तारे तोडले आहेतः Mr Jinnah was a great man because he created something out of nothing He single-handedly stood against the might of the Congress Party and against the British who didn’t really like him ... Gandhi himself called Jinnah a great Indian. Why don’t we recognise that? Why don’t we see (and try to understand) why he called him that?’ He was a self-made man. Mahatma Gandhi was the son of a Diwan. All these (people) — Nehru and others — were born to wealth and position. Jinnah created for himself a position जसवंत सिंग ह्यांचा द्वेष कोणाबद्दल आहे हे समजायला आता हरकत नाही. http://www.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/news/worl… परत जरासे अवांतर- हेच तारे एखाद्या काँग्रेस्/जनता दल्/कम्युनिस्ट नेत्याने तोडले असते तर? बापरे विचारच करवत नाही.!!एव्हाना भारत बंदची हाक दिली गेली असती.!! सामनावाले ठाकरे तर फूल टु 'सुटले' असते.!! ह्या देशद्रोह्याचे तुकडे करण्याचे आदेश एव्हाना बाळासाहेबानी मावळ्यांना दिले असते!! भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

>>He was a self-made man. Mahatma Gandhi was the son of a Diwan. All these (people) — Nehru and others — were born to wealth and position. Jinnah created for himself a position जसवंत सिंग ह्यांचा द्वेष कोणाबद्दल आहे हे समजायला आता हरकत नाही. भेन्डि यांच्याशी सहमत. पण त्याद्वेषात भाजपच्या विचारसरणीविरोधात काही नाही. बहुतेक वेळा गांधी नेहरूंना ठोकण्याचे निमित्त म्हणूनच लोक सावरकरवादी, पटेलवादी, सुभाषवादी, भगतसिंगवादी, आंबेडकरवादी, (आणि कधीकधी जिनावादीसुद्धा) वगैरे असतात. अन्यथा कम्युनिस्ट विचारसरणीचे भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस लोकांना अ‍ॅक्सेप्टेबल झाले नसते. . नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)

In reply to by नितिन थत्ते

बहुतेक वेळा गांधी नेहरूंना ठोकण्याचे निमित्त म्हणूनच लोक सावरकरवादी, पटेलवादी, सुभाषवादी, भगतसिंगवादी, आंबेडकरवादी, (आणि कधीकधी जिनावादीसुद्धा) वगैरे असतात. अन्यथा कम्युनिस्ट विचारसरणीचे भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस लोकांना अ‍ॅक्सेप्टेबल झाले नसते. . :| Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चांगला चर्चाविषय. कौलाचे पर्याय त्रोटक आहेत म्हणून मत दिलेले नाहि. (यापेक्षा वेगळे मत असा पर्याय हवा होता असे वाटले) जीना - टिळक, जीना -गांधी , जीना -सरोजीनी बाई नायडु, जीना - पटेल, जीना-आंबेडकर व जीना-नेहरू यांची नाती परस्परांपासून कैक योजने दूर आहेत. यांच्यातील जीनांवरोबर उल्लेख केलेल्या व्यक्तींनी आपापसात जीनांचा उल्लेख केलेला आढळातो आणि त्यावरून जीनांबद्दल वेगवेगळ्या काळच्या नेत्यांमधे मतांतर दिसते. इतकेच नव्हे तर एकाच नेत्यांची जीनांबद्द्लची मते वेगवेगळ्या काळात बदलेली दिसतात. पुण्याच्या एका सभेत (बहुदा १९३९/१९४० चुभुद्याघ्या) आंबेडकर म्हणाले होते "आता राजकारणात ती वेळ आली आहे जेव्हा भारतीय राजकीय पटलावर फक्त दोनच ध्रुव आहेत. एक हिंदुचे नेते गांधी तर दुसरे मुसलमानांचे नेते जीना" (पुढे त्यांच्या भाषणाचा रोख दलितांवर होणार्‍या अन्यायाविषयी होता जे हे दोन्ही नेते रोखु शकत नाहि आहेत वगैरे वगैरे तर ते असो.) प्रत्येकांने जीनांचे उल्लेख पत्रांत वेगवेग़ळ्या पाश्वभूमीवर केलेले आढळतात. विकांताला ते पुस्तक शोधून इथे काहि वक्तव्ये/उतारे देता येतील तर बघतो. कोणा मिपाकरांकडे जीनांची पत्रे/लेखन असेल तर त्यांचा दृष्टीकोन समजू शकेल. बाकी मुळ विषयाबद्दल, सिंगाची हकालपट्टी का झाली हे सांगता येणार नाहि किंबहूना, वाजपेयीच्या विचारसरणीशी जवळीक असणार्‍यां सदस्यांना मिळणारी ही वागणूक फारशी सुखावह वाटत नाहि इतकेच म्हणावेसे वाटते ऋषिकेश ------------------ दुपारचे १ वाजून ५९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक भजन "वैष्णव जन तो तेणे कहिए जे पीड पराई जाने रे...."

मागे एकदा अडवाणींनी पण जिन्नांना सेक्युलर म्हटले होते. त्यांना का बरे नाही काढले ? -- मिसळभोक्ता

In reply to by मिसळभोक्ता

मागे एकदा अडवाणींनी पण जिन्नांना सेक्युलर म्हटले होते. त्यांना का बरे नाही काढले ? सहमत आहे.

In reply to by मिसळभोक्ता

मागे एकदा अडवाणींनी पण जिन्नांना सेक्युलर म्हटले होते. त्यांना का बरे नाही काढले ? या प्रश्नाऐवजी त्यांच्या वक्तव्यावरील इतके वादळ का झाले ते मला समजले नाही. ते (वादळ) जेंव्हा झाले, तेंव्हा मी त्यांचे पाकीस्तानातील संपुर्ण भाषण वाचले. आता काही भाग येथे देत आहे. आणि हो, हे सांगताना मी अडवाणींची बाजू घेण्यासाठी अथवा त्यांच्या विरोधकांवर टिका करण्यासाठी म्हणत नाही आहे फक्त मूळ वाचल्यावर हा प्रश्न पडला इतकेच म्हणत आहे, हा विषय निघाला म्हणून येथे लिहीले इतकेच: Swami Ranganathananda passed away in April this year. The last time I met him was in Kolkata last year. He was 96 but still very agile in mind and radiant in spirit. Our talk, among other things, turned to his years and my years in Karachi. He asked me, 'Have you read Mohammed Ali Jinnah's speech in Pakistan's Constituent Assembly on August 11, 1947? It is a classic exposition of a Secular State, one which guarantees every citizen's freedom to practice his or her religion but the State shall not discriminate between one citizen and another on the basis of religion.' He asked me to send him the full text of the speech, which I did. The reason for my recounting Jinnah's historic speech in the Constituent Assembly is two-fold. Firstly, as I said, it is associated with my last conversation with the Swamiji, who was one of the towering spiritual personalities in India. The second reason is that its remembrance was triggered by my visit to the ancient Katas Raj Temples in Chakwal district four days ago. The Government of Pakistan was kind enough to invite me to lay the foundation stone for a project to restore these temples, which are now in ruins but whose legend is rooted in the epic story of the Mahabharata. I feel it appropriate to read out the relevant portion from Jinnah's speech.
'Now, if we want to make this great State of Pakistan happy and prosperous we should wholly and solely concentrate on the wellbeing of the people, and specially of the masses and the poor. If you will work in cooperation, forgetting the past, burying the hatchet, you are bound to succeed. If you change your past and work in a spirit that every one of you, no matter to what community he belongs, no matter what relations he had with you in the past, no matter what is his colour, caste or creed, is first, second and last a citizen of this state with equal rights, privileges and obligations, there will be no end to the progress you will make. 'I cannot overemphasise it too much. We shall begin to work in that spirit and in course of time all these angularities of the majority and minority communities, the Hindu community and Muslim community,… will vanish. Indeed, if you ask me, this has been the biggest hindrance in the way of India to attain its freedom and independence and but for this we would have been free people long ago. Therefore, we must learn a lesson from this. You are free, you are free to go to your temples. You are free to go to your mosques or to any other places of worship in this State of Pakistan. You may belong to any religion or caste or creed; that has nothing to do with the business of the State.…You will find that in course of time Hindus will cease to be Hindus and Muslims would cease to be Muslims, not in the religious sense, because that is the personal faith of each individual, but in the political sense as citizens of the State.'
What has been stated in this (वर उल्लेखलेल्या भाषणात) speech -- namely, equality of all citizens in the eyes of the State and freedom of faith for all citizens -- is what we in India call a Secular or a Non-Theocratic State. There is no place for bigotry, hatred, intolerance and discrimination in the name of religion in such a State. And there can certainly be no place, much less State protection, for religious extremism and terrorism in such a State. I believe this is the ideal that India, Pakistan as well as Bangladesh -- the three present-day sovereign and separate constituents of the undivided India of the past, sharing a common civilisational heritage -- should follow. I hope that this ideal is implemented in its letter and spirit. The restoration of the Katas Raj Temples is a good beginning. Esteemed friends from Karachi, people often ask me: 'Does this mean that you want to undo the Partition?' My answer is: 'The Partition cannot be undone, because, as I said in Lahore at the SAFMA function, the creation of India and Pakistan as two separate and sovereign nations is an unalterable reality of history. However, some of the follies of Partition can be undone, and they must be undone.' ह्यात त्यांनी जिनांना सेक्युलर म्हणले म्हणून टिका झाली तर समजू शकते पण त्यात त्यांनी जिनांचे कौतुक केले असे मला वाटत नाही फक्त ज्या माणसाने पाकीस्तान तयार केले त्याचे त्याबद्दलचे काय विचार होते आणि तुम्ही कसे वागत आहात या संदर्भात सभ्यपणे केलेल्या कानपिचक्या वाटल्या.

In reply to by विकास

तुम्ही महत्त्वाचा मुद्दा पुढे आणला आहे. आडवाणींच्या (न केलेल्या) विधानाविषयी हे ज्यामुळं झालं तो घटक कोणता? त्यातही त्याविषयी नेमकेपणाने सांगू शकाल का?

In reply to by श्रावण मोडक

आडवाणींच्या (न केलेल्या) विधानाविषयी हे ज्यामुळं झालं तो घटक कोणता? त्यातही त्याविषयी नेमकेपणाने सांगू शकाल का? "न केलेल्या" असे मी म्हणले नाही आणि तसे म्हणणे योग्यदेखील होणार नाही. ते म्हणले आणि त्यांनी त्यांचे वक्तव्य कधी नाकारले देखील नाही. म्हणूनच म्हणले की त्यांनी जिनांना सेक्युलर म्हणल्याबद्दल टिका झाली तर समजू शकते. मात्र प्रसारमाध्यमांनी त्याच्यावर उड्या मारून लगेच त्यांना हवे तसे त्याचे विश्लेषण केले म्हणून गोंधळ सुरू झाला. त्या संदर्भात आपण बीबीसी, हिंदू इथपासून ते रिडीफ पर्यंत सर्वत्र पाहू शकता. बाकी, जिनांच्या संदर्भात अधिक माझे म्हणणे खालील प्रतिसादात दिले आहे.

ऋषिकेशप्रमाणे मी देखील मत दिलेले नाही. सर्वप्रथम पुस्तक अथवा त्यातील संबंधीत भाग न वाचता त्यावर भाष्य करणे उचीत नाही असे वाटते. मात्र काही गोष्टी या निमित्ताने वाटल्या त्या येथे लिहीतो:
  1. जसवंतसिंगांसारख्या पक्षातील मोठ्या नेत्यास काढायला कदाचीत हे कारण देखील मिळाले असेल. पक्षांतर्गत भांडाभांडीत जसवंतसिंग काही मागे नव्हते असे वाचल्याचे आठवते.
  2. अरूण जेटलींनी म्हणल्याप्रमाणे, जेंव्हा पक्षातील ज्येष्ठ व्यक्ती, केवळ माझे हे व्यक्तीगत विचार आहेत असे म्हणत पक्षाच्या मुळ विचारांशी फारकत दाखवणे हे अयोग्य आहे. इथेच नाही कुठल्याही पक्षात. शहाबानो खटल्यानंतर घटना बदलण्याच्या वेळेस काँग्रेसचे अरीफ मोहंमद खान (मला वाटते तेंव्हा ते मंत्री होते)यांनी हे अयोग्य आहे असे म्हणत आवाज उठवला. वास्तवीक त्यांचा मुद्दा बरोबर होता तरी देखील पक्षाच्या मुळ विचारांशी फारकत म्हणत त्यांना काढून टाकण्यात आले.
  3. त्यांना (जसवंतसिंगांना) परत घेतले अथवा न घेतले तरी भाजपाला काही फरक पडणार नाही. राजकारणात आणि स्वयं(पक्ष)प्रतिमेच्या संदर्भात ते (पक्ष) जर कमी पडत राहीले तर "दिल्ली बहौत दूर है" असेच म्हणायची वेळ येत राहील.
  4. त्यांचे म्हणणे आहे की: "If writing, thinking, debating, discussing, disagreeing is an offense, we are making very poor India." या संदर्भात असे म्हणेन की ह्याबाबतीत त्यांच्या इतक्या (३०-३५) वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी ही वक्तव्ये आधी केली होती का? नसली तर का नाही? आणि आता नव्याने काही अभ्यासू माहीती मिळाली असली तर त्यांनी ती त्यांनी (पक्षातील) इतरांना दाखवली होती का?
आता फाळणी आणि जिनांसंदर्भात मला काय वाटते ते:
  1. जर जिना खरेच धर्मनिरपेक्ष होते, तर त्यांनी "पाकीस्तान" का तयार केला? त्यांची वर अडवाणींनी उर्धृत केलेली वाक्ये ही जर प्रामाणिक होती तर इतक्या मोठ्याप्रमाणावर संहार होताना ते गप्प कसे बसले? गांधीजींवर फाळणीसंदर्भात अनेक ठिकाणी अनेक वेळेस टिका होते. ती तुर्त बरोबर/चूक याचा विचार लांब ठेवूया पण त्यांनी जिनांसारखे दुटप्पी वर्तन केले असे वाटत नाही. पटेलांमुळे फाळणी हा तर विनोदच वाटतो.
  2. जिनांना राजकीय महत्वाकांक्षा होती आणि नेहरू-गांधींमुळे ते जमू शकले नाही असेही म्हणले जाते. मग त्या एका कारणापोटी असले आजचे "failed state" तयार करण्याचे पितृत्व त्यांना घेताना फक्त स्वतःच्या बाहेर काही दिसले नाही असेच म्हणावे लागते.
  3. तरी देखील एक गोष्ट राहून राहून वाटते, की जिनांना टिळक अथवा गोखले यांच्या सारख्या (दोन वैचारीक टोकांच्या) विभूती जर नंतरच्या स्वातंत्र्यचळवळीत हयात असत्या तर नक्कीच सांभाळून आपल्यात ठेवू शकल्या असत्या...काँग्रेसमधे टोकाचे मवाळ नेते आणि टिळक तुरूंगात अशी अवस्था असताना जे वेगवेगळे मतदार संघ तयार झाले त्यात पुढची फाळणीची बिजे रुजली. जिनांनी टिळकांचे वकीलपत्र तर घेतले होतेच पण टिळकांच्या मृत्यूनंतरचा जिनांचा लेख पण तसेच वाटायला लावतो. (या व्यतीरीक्त इतिहासाची पाने चाळली तर अनेक संदर्भ मिळतील).

In reply to by विकास

विकासराव तुम्ही कट्टर भगव्या आघाडीतले हे माहित आहे हो!! पण तेवढा तो भगवा टॅग बंद करा ना... ;)

In reply to by विकास

जीना धर्मनिरपेक्ष नव्हते का ? आणि बॅ.जीना हेच पाकिस्तान निर्मितीला जवाबादर आहेत, असे आपल्याला (का)वाटते का ? जिनांना राजकीय महत्वाकांक्षा होती आणि नेहरू-गांधींमुळे ते जमू शकले नाही असेही म्हणले जाते. हेच मान्य केले पाहिजे, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जीना धर्मनिरपेक्ष नव्हते का ? आणि बॅ.जीना हेच पाकिस्तान निर्मितीला जवाबादर आहेत, असे आपल्याला (का)वाटते का ? जीना हे कर्मठ मुसलमान नव्हते अथवा धार्मिक मुसलमान नव्हते हे सत्य आहे. मात्र त्याचा अर्थ ते धर्मनिरपेक्ष होते, म्हणजे दुसर्‍या अर्थी सर्वधर्मसमभाव मानत होते असा घेतला तर तो योग्य अर्थ वाटत नाही. काही झाले तरी ते धर्माधारीत राष्ट्राचे प्रथम राष्ट्रप्रमुख (गव्हर्नर जनरल) होते. फाळणी झाली ती धार्मिक तत्वावर झाली हा देखील इतिहास आहे. जर ते खरेच धर्मनिरपेक्ष होते तर धर्माधारीत राष्ट्र तयार करायला नुसता हातभार नाही तर तसे होण्यासाठी स्वतःचा प्रभाव कसा वापरला? म्हणून म्हणले की जीना हे जसे धार्मिक मुसलमान नव्हते, तसेच ते निधर्मी पण नव्हते... जिनांना राजकीय महत्वाकांक्षा होती आणि नेहरू-गांधींमुळे ते जमू शकले नाही असेही म्हणले जाते. हेच मान्य केले पाहिजे, असे वाटते. विचार करा, आज पवारांना महत्वाकांक्षा आहे. त्यांनी उद्या महाराष्ट्र नुसता फोडायचा ठरवला (ते जमले नाही तर बारामती/प. महाराष्ट्र हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करायचे ठरवले) तर काय होईल? असे म्हणणे योग्य आहे का की नाही पवारांना महत्वाकांक्षा आहे आणि सोनीया आणि तिची पिलावळ ह्यांच्यामुळे त्यांना जमू शकत नाही म्हणून ते असे मागत आहेत. म्हणून चू़क ही केवळ सोनीयाचीच... इथे एक लक्षात घ्या मी सोनीयाची बाजू घेत नाही आहे. जागे पणी लेख लिहीत आहे :) तसेच नेहरू-गांधींच्या चुका मी इतरवेळेस पण बोलतो. पण म्हणून जीनांनी जी फाळणी घडवून आणली त्याला फक्त या द्वयींना जबाबदार धरणे अयोग्य वाटते. अजून एक उदाहरण. आंबेडकर ३५ साली (का त्या काळात) म्हणाले की "हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही". त्याचे कारण जसे जातीयवाद होता तसाच गांधींनी पुणे करार करवून एका अर्थी दलीतांना राजकारणात मागेच ठेवले ही भावना देखील होती. तीच अवस्था घटना दुरूस्ती होत नाही हे पाहून स्वतंत्र भारतात कायदामंत्री म्हणून राजीनामा देताना झाली. सगळीकडे नेहरू-गांधी-काँग्रेसमुळे त्यांना त्रास झाला. पण त्यांनी काही स्वतंत्र दलीतस्तान मागितले नाही. देश फोडला नाही. धर्म बदलला पण तो जाणीव आणि संस्कृती जपतच... अर्थात जीनां हे केवळ महत्वाकांक्षीच नव्हते तर सत्ताग्रहणाच्या आत्यंतिक तहानेने सत्ता मिळायच्या आधीच सत्तांध झाले होते. गांधी नेहरूंच्या चुका ह्या केवळ त्या आगीत तेल ओतल्याप्रमाणे ठरल्या आणि त्यांचा (दोघांचा) या संदर्भात मुत्सद्दीपणा कमी पडला म्हणून ४७च्या आधीपासूनच, फाळणी हळूहळू होत गेली...

In reply to by विकास

सर्वप्रथम आपले प्रतिसादाबद्दल आभार..! द्विराष्ट्रवादाची बीजे बॅ.जिनाच्याही अगोदर रुजत होती. लाला लजपतरायांपासून ते राजगोपालचार्यापर्यंत अनेक नेत्यांनी मुसलमानांना वेगळे राज्य देऊन टाकून जातीय समस्या सोडवण्याचा आग्रह धरलेला दिसतो. थिओडेर बेक नावाच्या प्राचार्याने आणि सईद अमिर अली या बॅरिष्टर मुसलमानांनी मुसलमान समाजात विभक्त स्वार्थाचे बीजारोपन केले. काँग्रेस ही हिंदूची संघटना नव्हती पण हिंदू पुढार्‍यांचा वाटा पाहता, भारतात लोकशाही प्रस्थापित झाली तर ही संघटना मुसलमानांना बाधक ठरेल असा विचार बॅ.जिनाच्या राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीही असा होता. दादाभाई नौरोजी- फिरोजशहा मेहता यांच्या मवाळ विचारांनी प्रभावित होऊन बॅ. जिना काँग्रेसमधे दाखल झाले होते, तरीसुद्धा लो.टिळकांचा जहाल मार्ग त्यांना पूर्णपणे अमान्य नव्हता. ब्रिटीशांच्या दुटप्पी न्यायनितीवर ते अवलंबून राहू इच्छित नव्हते. गणेशोत्सव किंवा शिवाजी उत्सव साजरा करण्याच्या जो उपक्रम टीळकांनी सुरु केला होता. तेव्हढ्यावरुन त्यांना फक्त हिंदूचाच नेता मानावे आणि राष्ट्रीय आंदोलनात ते मांडीत असलेला विचार पूर्णपणे चुकीचा ठरवावा असे जिनांना वाटत नव्हते. रायगडावर शिवजयंतीचा उत्सव साजरा करीत असतांना अफजलखानाच्या वधाचे तात्विक समर्थनही केले होते. बॅ. जिनांना त्यात आक्षेपार्ह काही वाटत नव्हते, उलट बॅ. जिनांना त्यांच्याबद्दल आदर वाटायचा. पुढे बॅ. जिनांनी टीळकांची वकिलीही एका प्रकरणारत केली होती. मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते. सांगायचा मुद्दा असा की, बॅ. जिना सुरुवातीच्या राजकारणापासून राष्ट्रहिताला महत्व देतांना दिसतात. माझं वयक्तीक मत असं आहे की, म. गांधीच्या छुप्या हिंदूत्ववादी विचारसरणीमुळेच बॅ. जिनांना आपणही मुस्लीमांच प्रतिनिधित्व केलं पाहिजे असे वाटले असावे. आणि आपण म्हणत आहात नेहरु-गांधीं मुत्सदीपणात कमी पडल्यामुळे आणि मी म्हणत आहे, दोघांच्याच काही चुकीमुळे पुढे फाळ्णीचा विचार पक्का झाला. असो, बॅ.जिनावरील 'कायदे आझम' हे आनंद हर्डीकर नावाच्या लेखकाने [रास्वसंचा कार्यकर्ता आहे] लिहिलेले पुस्तक खूप सुंदर आहे. कधी मिळाले तर नक्की वाचा..! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुर्त वेळे अभावी जास्त लिहीत नाही. फक्त एका मुद्यावर वेगळी चर्चा होणे गरजेचे आहे असे आपल्या खालील वाक्यावरून वाटले: (चर्चा जर पुढच्या आठवड्यात कधी तरी चालू झाली तर सविस्तर भाग घेता येईल): म. गांधीच्या छुप्या हिंदूत्ववादी विचारसरणीमुळेच बॅ. जिनांना आपणही मुस्लीमांच प्रतिनिधित्व केलं पाहिजे असे वाटले असावे. महात्मा गांधी हे छुपे हिंदूत्ववादी नव्हते तर उघड सनातनी हिंदू होते. हिंदूत्ववाद आणि सनातनी हिंदू यात जमीन अस्मानाचा फरक आहे. ("जमीन-अस्मान फरक" हा एक वाक्प्रचार आहे, त्यात एक वर एक खाली दाखवण्याचा उद्देश नाही हे वेगळे सांगणे न लगे :) ) म्हणूनच बर्‍याचदा जे स्वतःला केवळ हिंदू समजतात ते हिंदुत्ववादी नसतातच. तसे जर ते स्वतःला म्हणाले तर तो "सुडो हिंदूत्ववाद" झाला :-) दुर्दैवाने हिंदूत्ववाद ह्या शब्दाचा अर्थ धर्माधारीत घेऊन एकीकडे सुडोसेक्युलर्स त्याला स्वतःच्या स्वार्थासाठी बदनाम करत राहीले तर दुसरीकडे सप्र सारखे (विप्र नाही!) संकेतस्थळ, त्यांची वृत्तपत्रे वाटेल ते लिहून त्यात हिंदूत्ववाद हा शब्द घालून बदनाम करत राहीले. असो. अति अवांतरः बॅ.जिनावरील 'कायदे आझम' हे आनंद हर्डीकर नावाच्या लेखकाने [रास्वसंचा कार्यकर्ता आहे] लिहिलेले पुस्तक खूप सुंदर आहे. माहीती बद्दल धन्यवाद. मिळाले तर नक्की वाचेन. मात्र मी केवळ संघातील व्यक्तींची अथवा तत्सम विचारांनी प्रभावित पुस्तके वाचत नाही. किंबहूना ते मी कमीच वाचले असेन. माझ्याकडे साम्यावादी, समाजवादी आदी विचारवंतांची देखील पुस्तके आहेत. एखादा विचार पटला नाही अथवा विरोधी असला तरी फरक पडत नाही, पण प्रामाणिक नसला तर मात्र पडतो. त्यामुळे जी काही पुस्तके वाचतो ती अभ्यासू असली आणि माहीतीपुर्ण पण प्रामाणिक हेतूने लिहीलेली असली तर वाचायला आवडतात आणि वाचतो.

In reply to by विकास

मी केवळ संघातील व्यक्तींची अथवा तत्सम विचारांनी प्रभावित पुस्तके वाचत नाही. संघाच्या व्यक्तीचे पुस्तक आहे म्हणून वाचा असे म्हणायचे नव्हते, नाही. कृपया तसा अर्थ घेऊ नये. तसे लिहिण्यामागे उद्देश असा की, पुस्तक प्रामाणिक असले तरी लेखक कोणत्या विचारांचा आहे, त्या अंगाने पुस्तक लिहिले की काय अशी शंका चोखंदळ वाचकाला येऊ शकते. आनंद हर्डीकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि पत्रकार असले तरी अतिशय प्रामाणिक, माहितीपूर्ण आणि संदर्भासहीत लिहिलेले पुस्तक आहे. एवढेच सांगायचे होते आणि हे स्पष्टीकरण तिथेच लिहायला हवे होते असे आता वाटते. -दिलीप बिरुटे

होय, नाही, माहीत नाही या निवडीत "देशद्रोह" ही एक निवड घालायला हवी. प्रणवबाबू कांहींही म्हणोत, पण मला वाटतं कीं ते इतर कुठल्याही पक्षात असते तरी त्या पक्षाने हीच कारवाई केली असती. जसवंतसिंगांनी केलेलं कुठलाचा निष्ठावान भारतीय सहन करणार नाही. सुधीर काळे ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

In reply to by सुधीर काळे

जसवंतसिंगांनी केलेलं कुठलाचा निष्ठावान भारतीय सहन करणार नाही.
दुसर्‍याचं विधान पटलं, आवडलं नाही म्हणून त्याचं विधान "सहन न करणं" म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे? आणि आम्ही ठरवतो ती निष्ठा असा काहीसा वास या विधानाला येत आहे, तो आवडला नाही. विधान आणि कृती यांमधे फरक आहे तो आपण समजून घेतलाच पाहिजे. घटनेने त्यांना त्यांची मतं मांडण्याची मोकळीक दिली आहे. एकवेळ वाट्टेल ती वाईट, विसंगत, देशद्रोही विधानं चालतील पण तरीही अभिव्यक्तीस्वातंत्र्य नसणं खूपच वाईट आहे. जसवंत सिंगांची विधानं जर बहुसंख्य भारतीयांना पटली नाहीत तर ते पुस्तक स्वतःच्याच मरणाने मरेल, जे उत्तम होईल. मिपावरही अनेक धागे असतात, तिथे अनेक लोकं न पटतील अशी विधानं करतात त्यांना कोणी देशद्रोही म्हणून देशाबाहेर काढत नाहीत. अनेक दुर्लक्ष करण्याजोगे धागे आपल्या मरणाने मरतात. उगाच त्यांना जास्त भाव देण्यात अर्थ नसतो. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जसवंत सिंगांची विधानं जर बहुसंख्य भारतीयांना पटली नाहीत तर ते पुस्तक स्वतःच्याच मरणाने मरेल, जे उत्तम होईल.
हे एकदम आवडले...तसे झाले तर खरेच उत्तम. पुण्याच्या श्री. रा. पुरंदरे यांनी सिंगांना या पुस्तकासाठी ६६ लाख मिळालेत असे सकाळला पत्र लिहून कळवले आहे :-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

खरं तर श्री शहारुख यांनी तो एक पर्याय मतदानात अजूनही घालावा! उगीच वादविवाद घालण्यात काय अर्थ आहे? मला असे वाटते कीं ज्यांनी त्यांच्या चलतीच्या काळी प्रचंड अत्याचार केले त्यांच्यावर १० टक्के उलट अत्याचार झाले तर कांहींही बिघडले नाहीं. "साधनशुचिते"च्या घोळात अडकू नये असे मला वाटते! "जीनांना थोर माणूस ठरवायचं" असं गृहीत सत्य समोर ठेवून तर नाही ना लिहिलं हे पुस्तक? असं मी म्हटलं असतं, पण मी ते पुस्तक अद्याप वाचले नाहीं म्हणून म्हणत नाहीं. नोव्हेंबरमध्ये भारतात येईन तोपर्यंत अनधिकृत प्रत मिळाली तर घेईन व वाचेन. पण शत्रूची भलावण करणे सपशेल चूक. जीना खरंच थोर असतील तर असू देत, आपण गप्प बसावे. पण आपल्याच श्रेष्ठ नेत्यांना असे हीन ठरवू नये हे माझे मत कायम आहे. सुधीर काळे ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

जसवन्तसिंग हे भाजपच्या विचारसरणीचे बळी ठरले हे विधानच विनोदी आहे. भाजपची विचारसरणी नक्की कोणती ते त्यानाच माहित नाही. गांधीना आंधळा विरोध करायचा पण सार्वजनीक /राजकीय जीवनात आम्ही गांधीवादीसमाजवाद अंगिकारतो असे म्हणायचे. संजय दत्त सारख्याचा विरोध्/निषेध करायचा पण त्याची वकिली करणाराला पक्षाचे उपाध्यक्षपददेखील बहाल करण्याइतपत मोठे म्हणायचे. काँग्रेस नेत्यांचा समजदुतदारपणा हा की त्यानी कंदहारप्रकरणाचे राजकीय भांडवल केले नाही ( त्या जागी भाजप असता तर त्यानी हे प्रकरण नक्की बरीच वर्षे तापवत ठेवले असते) बाबरी मशीद प्रकरणी घडल्या प्रकरणाची जबाबदारी घ्यावी की नाकारावी हेच अजूनही त्याना उमजत नाही भाजपला कोणत्याच प्रकरणत स्वतःची निष्चीत भूमिका ठरवता येत नाही त्यांची विचारसरणी सध्याच्या घटकेला तरी शून्यवत झालेली आहे. पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

In reply to by विजुभाऊ

भाजपची विचारसरणी नक्की कोणती ते त्यानाच माहित नाही
कालच सरसंघचालक भागवत ह्यांची Times Now वर मुलाखत ऐकली. विचारलेल्या कुठल्याही प्र्श्नाला थेट सरळ उत्तर नाही. 'मला राजकारण कळत नाही पण आम्ही अडवाणींना सल्ला देतो'. असे एक विधान. 'भाजपाने नेत्रुत्व बदल केले पाहिजेत.' असे एक विधान.मग ह्यावर मुलाखतकाराने 'कुठचा नेता तुम्ही सुचवाल?' ह्या प्रश्नाला परत 'तो भाजपाचा प्रश्न आहे. आमचा नाही.ते बघुन घेतील' असे उत्तर. 'मी तुमच्याशी(मुलाखतकाराशी) अतिशय मोकळेपणाने बोलत आहे' असेही विधान त्यानी केले. @) भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

संघाला स्वतःवर काही आले तर ते नको असते पण सगळे श्रेय तर सगळ्याचे हवे असते. पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे