मन्या हा साधासरळ गृहस्थ व निर्व्यसनी म्हणून सर्वांना परीचित वयाच्या एकविसाव्या वर्षीच वडिलांनी त्याचे लग्न लावून दिले.कामाला जाणे तिथून घरी येणे हे त्याचे नित्याचेच. पण या मन्याला घरच्यांना न सांगता अचानक सच का सामना मध्ये जायची दुर्बुध्दी होते आणि टिवी वर त्याचे दृश्य झळकू लागतात १) डान्स बार मे जाते थे क्या ? २) आपने कभी वेश्या के साथ शारीरीक संबंध बनाये है क्या? घरच्यांना टिव्ही वर मन्याला पाहून धक्का बसतो सतत मन्याचे दृश्य टिवी वर दिसत असल्याने आणि नको त्या प्रश्नाला मन्या सामोरा गेल्याने मन्याची बदनामी तर होतेच मन्याचा बाप मन्याला बदड बदड बदडतो बायकोही नाही नाही ते बोलते मन्याला वाटते झक मारली नि तिथे गेलो. चाळीमध्ये,नाक्यानाक्यावर , ऑफीसमध्ये मन्याला तोंड दाखविणे मुश्कील होते. अखेरीस टिवीवर सच का सामना हा शो सुरू होतो आणि मन्या निवेदका समोरील सीट वर बसतो आणि सुरू होते मन्यावर प्रश्नांची सरबत्ती प्रश्न पहीला - मन्याजी आपकी हिंदी और इंग्लिश भाषा बहुत ही खराब है ? मन्या म्हणतो “हा ” निवेदक विचारतो क्यो ? मन्या खरखर सांगतो लहानपणापासून मराठी माध्यमात शिकल्याने व पुढे फक्त मराठी मराठी केल्याने इतर भाषेत मागे पडलो प्रश्न दुसरा - क्या आप कभी सिगारेट और दारू पीते है ? मन्या म्हणतो जी “ हा ” , निवेदक विचारतो लेकीन आपने ये बात अपने घरवालोसे क्यो छुपाई यावर मन्या म्हणतो लहानपणासूनच माझ्यावर घरच्यांचा प्रचंड विश्वास ते सर्वांना सांगत की आमचा मन्या खुप सभ्य ,देवमाणुसच हो त्यामुळे माझी तशी प्रतिमा बनत गेली आणि मी माझी व्यसने लपुनछ्पुन करू लागलो सिगारेट पिउन झाल्यावर तिचा वास न येण्यासाठी मी मिंटच्या गोळ्या खाऊ लागलो दारूची तलफ भागविण्यासाठी पिकनिकच्या नावाने बाहेर जाऊ लागलो निवेदक त्याला थांबवतो अब तिसरा प्रश्न आपने अभी पिकनिक के बारे मे कहा उसीसे जुडा हुआ एक प्रश्न क्या आप पिकनिक के नाम पर डान्स बार मे जाते थे क्या ? मन्या चे उत्तर “हो ” निवेदक विचारतो क्यो मन्या म्हणतो मला कॉलेजमध्ये मुलींशी बोलायला मैत्री करायला खुप वाटायचे पण हिंम्मत तर व्हायचीच नाही शिवाय मामाच्या मुलीशीच लग्न करायचे यामुळे घरच्यांची माझ्यावर करडीनजर पुढे मी मित्रांकडून डान्सबारबाबत ऐकले तिथे गेलो या मुली पटकन कोणाशीही मैत्री करतात हातात पैसे असले की बस झाले नाही तर कॉलेजात एखादा मुलीपुढे मैत्रीचा हात पुढे करून बोलायचे कसे या कल्पनेनेच मला दरदरून घाम फुटायचा. निवेदक मन्याला चौथा प्रश्न विचारतो क्या आप ने कभी वेश्या के साथ शारीरीक संबंध बनाये है क्या? मन्या म्हणतो नही निवेदक म्हणतो क्यो ? मन्या भडकतो म्हणतो तुझ्या तर तुला अजुन दुसरे प्रश्न विचारेवेसे वाटत नाही काय साला मगासपासून हेच प्रश्न. निवेदक म्हणतो मन्याजी तुम्हाला कळणार नाही माणुस जे धंदे आपल्या घरच्यांना न सांगता चोरून करतो तेच प्रश्न आम्ही विचारतो शेवटी सत्याला सामोरे जाणे कठीणच असतो पाहा तेवढ्यात मन्याला स्वतःच्या बापाची,बायकोची,चाळीतील आपल्या प्रतिमेची आठवण येऊ लागते त्याला दरदरून घाम फुटू लागतो पाहतो तर………. मन्याची बायको त्याला झोपेतून उठवत असते आणि मन्या उठतो मनातल्या मनात बोलतो काय नको तो सच का सामना आपला झुठ का सामनाच बरा.
वाचने
5569
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम
मन्याच्या
मिसळभोक्त
धन्यवाद
सध्या खुप
In reply to धन्यवाद by विकि
पुन्हा एकदा बोळा तुंबलेला दिसतोय!
आमच्यातील
In reply to पुन्हा एकदा बोळा तुंबलेला दिसतोय! by चतुरंग
सामना
मस्त!
आभार
आवडला..