पाककृती : सांझ सवेरा...
गेल्या वर्षी ऑरलॅन्डो ,फ्लोरिडा ला गेलो होतो तेव्हा तिथे एका भारतीय हाटेला त खाल्लेला हा पदार्थ... तशी पाहता अगदी सामान्य पंजाबी डिश आहे पण प्रेझेंटेशन एकदम मस्त होतं म्हणुन मला जास्त आवडलं. :) , यातल्या पालक पनीर कॉम्बिनेशन मुळे सांझ सवेरा म्हणतात. :)
फोटो तसा यथा-तथा च आला आहे .. :)
वाढणी: ५-६
साहीत्यः
३-४ लवंगा
१ वेलदोडा
१ छोटी दालचीनी ची काडी
२-३ मिरे
सांझ सवेरा
१ जुडी पालक , फ्रोझन पालक पण चालेल पण मी ताजा पालक वापरला होता.
१ वाटी किसलेले पनीर (घरी करत असाल तर किसायची गरज पडणार नाही.)
२-३ टेस्पु. कॉर्नफ्लोर
१ छोटा चमचा तिखट पण लाल तिखट ही चालेल.(मी हिरवं तिखट वापरते कारण त्यामुळे रंग फार बदलत नाही. त्यासाठी एका चाळणी त तिखट हिरव्या मिरच्या घेउन त्यावर उकळतं पाणी ओतायचं आणि मिरच्या वाळवून तिखट बनवायचं. )
चवीनुसार मिठ
तेल
ग्रेवी:
१/२ वाटी तेल
२ टोमॅटो
१ कांदा
२-३ लसुण पाकळ्या
१ १/२ इंच आलं
१ -२ टेस्पू तिखट
१ टीस्पू गरम मसाला
१ टेस्पू धणे-जीरे पावडर
३ टेस्पू काजु
२-३ टेस्पू क्रिम /बटर(नसल्यास काही फरक पडत नाही.)
२ टेस्पू पनीर
२-२.१/२ कप गरम पाणी (ग्रेवी च्या घट्ट्पणावर अवलंबून आहे)
कृती:
१) किसलेल्या पनीर मधे मिठ टाकुन त्याचे मध्यम (अंदाजे लिंबाएवढे)आकाराचे गोळे बनवुन घ्या. १ वाटी पनीर मधे ८-१० बनतात.
२) पालक स्वच्छ धुवुन घ्यावा. एका पातेली त पाणी तापत ठेवावे. पाणी उकळले की त्यात थोडे मिठ टाकुन पालक टाकावा.
३) पालक ५-७ मि. उकळवावा, मग चाळणीत ओतुन त्यावर थंड पाणी सोडावे त्यामुळे पालकाचा रंग सुंदर हिरवा राहतो.
४) पालक हाताने घट्ट पिळुन घ्या (हे पाणी नंतर कशातही वापरता येतं.)आणि बारिक चिरुन घ्या.
५) आता पालक + कॉर्नफ्लोर्+तिखट+ मिठ एकत्र करुन घ्यावे.
६) एका कढल्यात तेल तापत ठेवावे.
७) पालकाचा एक गोळा हातावर घेउन त्याला जरा चपटवावे (पालकाची पारी फार पातळ नसावी, माझी पारी थोडी पातळ झाली आहे) मग त्यात पनीर चा गोळा ठेवुन पनीर पुर्णपणे झाकुन टाकावे. हे काम अगदी हलक्या हाताने करावे.
८) आधी एक कोफ्ता तळुन पहावा जर पालक सुटत असेल तर अजुन कॉर्नफ्लोर टाकावे.
९) असे सगळे कोफ्ते छान कुरकुरीत तळुन घ्यावे. (रंग बदलु देऊ नये...)
१०) कोफ्ते अलगद हाताने अर्ध्यातुन कापुन बाजुला ठेवावे.
११) मिक्सर मधे टोमॅटो + कांदा + लसुण पाकळ्या+इंच आलं+ काजु ची बारिक पेस्ट करुन घ्यावी.
१२) आता गरम तेलात (जास्त रिच डिश हवी असल्यास बटर ही वापरु शकता) लवंगा,वेलदोडा,दालचीनी ची काडी, मिरे टाकावे.
१३) त्यात बारिक केलेली पेस्ट,गरम मसाला, धणे-जीरे पावडर,तिखट टाकावे आणि तेल सुटेपर्यंत सारखे हलवत रहावे नाहीतर कांद्याचा कच्चा वास येतो.
१४) तेल सुटले की गरम पाणी टाकावे आणि कमी आंचेवर २ उकळ्या येऊ द्याव्यात.
१५) गॅस बंद करुन किसलेले पनीर टाकावे.
सर्व्ह करताना वाटीत ग्रेवी टाकुन मग वरुन कापलेले कोफ्ते ठेवावे, फार सुंदर दिसतात. ही ग्रेवी फार पातळ नसते.
वाचने
7550
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
मस्त
छान
झक्कास!
फोटो तसा
चला लन्चला
In reply to चला लन्चला by पर्नल नेने मराठे
ती लाळ आवर
मस्त आहे
आकर्षक...
पाकृ
संजिव कपूर
भारी
अहा!
In reply to अहा! by ऋषिकेश
असेच
व्वा! एकदम
ही सांझ
धन्यवाद लोकहो....
In reply to धन्यवाद लोकहो.... by दिपाली पाटिल
माझ्ह्या
मार डाला!!!
In reply to मार डाला!!! by प्राजु
धन्यवाद
मस्तच.............