Skip to main content

तुम्ही तुमचा मोबाईल फोन सतत बदलत राहता काय? आणि का?

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 17/08/2009 09:49 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1697
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

मी मोबाईल बदलत नाही. मी तो बदलू शकतो पण मला तो वायफळ खर्च वाटतो याला मत दिले आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

माझे मत पहिल्या पर्यायाला.. यात अजून एक पर्याय वाढवता येईल काय? "माज... दुसरे काय?" ;) मी जरी पहिल्या पर्यायाकरिता माझा मोबाईल बदलत असलो तरी माझ्या संपर्कातील काही जणांना असेच वाटते ... हा हा हा (भ्रमणध्वनी प्रेमी) सागर

In reply to by सागर

वरून दुसर्‍या पर्यायात मला हेच अभिप्रेत होते पण एवढे स्पष्ट कसे लिहीणार? अवांतर: १० /११ वर्षे झालीत गोष्टीला. मी एका ४ चाकी वाहन बनवणार्‍या कंपनीत कामानिमीत्त जात असे. एकदा कँन्टीनमध्ये चहा घेत असतांना काही अधिकारी असणार्‍या लोकांची त्यांनी अंगात घातलेल्या शर्टाच्या किंमतीवरून चाललेली चर्चा एकू आली. त्यात एकाने तो स्वता:ने रू. ९००/- चा शर्ट घातलेला सांगीतला व "Yes, I can afford it" हे वाक्य जोर देवून म्हटलेले आठवते. त्या काळी रु. ९००/- शर्टसाठी म्हणजे फारच होते. बाकीचे लोक पण जरासे आश्यर्यचकीत झाल्याचे त्यांच्या चर्येवरून वाटले. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

मी मोबाईल बदलत नाही. मी तो बदलू शकतो पण मला तो वायफळ खर्च वाटतो. पण वरिल फोन पाहिला कि मोह आवरत नाहि :S चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

बाईग या मोबाईलची तपशीलवार माहिती सांगितली तर बरे होईल.

मी मोबाईल बदलत नाही. मी तो बदलू शकतो पण मला तो वायफळ खर्च वाटतो>>> ह्याला मत दिल आहे. माझा आताचा मोबाइल आहे तीन वर्ष सहा महिन्यापुर्वी विकत घेतलेला नोकिआचा. त्याचा नम्बर आठवत नाही. तो अजुन ठिक ठाक सुरु आहे. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

मी मोबाईल बदलत नाही. मी तो बदलू शकतो पण मला तो वायफळ खर्च वाटतो. --अवलिया

माझे मत: मी मोबाईल बदलत नाही. मी तो बदलू शकतो पण मला तो वायफळ खर्च वाटतो. सद्ध्या माझ्याकडे 'नोकिया-६२७०' आहे जो माझ्या खास मित्राने २००६ मद्ध्ये माझ्या वाढदिवशी दिला होता.. हा सोडून दुसरा 'भ्रमणध्वनी' घेणे कठीन जातेय.. - कोकणी फणस Me and my girlfriend broke off over religious differences. She thought she was God and I didn't...

माझे मत: मी मोबाईल बदलत नाही. मी तो बदलू शकतो पण मला तो वायफळ खर्च वाटतो. सद्ध्या माझ्याकडे 'नोकिया-६२७०' आहे जो माझ्या खास मित्राने २००६ मद्ध्ये माझ्या वाढदिवशी दिला होता.. हा सोडून दुसरा 'भ्रमणध्वनी' घेणे कठीण जातेय.. - कोकणी फणस Me and my girlfriend broke off over religious differences. She thought she was God and I didn't...

माझा मोबाईल :B :B :B बाकरवडी :B :B :B खाव खाव खाव ! फक्त मिसळपाव !!

हरवतो किंवा कुठेतरी विसरतो किंवा चोरीला जातो म्हणून नवीन घेणे याला बदलणे म्हणतात काय?

पाषाणभेदा , वेळ जात नाहीये का लेका तुझा ? ;) -(गॅजेटप्रेमी) टारोबा पेजर

ईतर कारण/णे : (क्रुपया विस्त्रूत सांगणे) शेवटचा पर्याय. :) कारण मोबाईल बदलण्याची वेळच कधी येत नाही , त्याअगोदर मोबाईल कधी तरी हरवून गेलेला असतो. विसरभोळेपणामुळे मोबाईल हारवणे हे आता नित्याचे झाले आहे. त्यामुळे आता फोनचा वापर काही काळापर्यत बंद करण्यात आला आहे. :( "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

नाविन्यतेची आवड. नवे फिचर्स आवडतात म्हणून बदलतो. *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

मी गेल्या बारा वर्षांत दोनच वेळा बदलला आहे. प्रथमत: एकदा चोरीस गेला म्हणून आणि नंतर व्यवसायात आवश्यकतेअनुसार अद्ययावत संयंत्रे वापरता यावी म्हणून. हैयो हैयैयो!

पहील्यान्दा मला आठवतय, एका माणसाला रस्त्यातून जोरात जोरात बोलत , हातवारे करत माझ्या दिशेला येताना पाहीलेला. तो बराच बेफाम आणि जोशात येत होता. मी खरच घाबरले होते @) ....... त्याला वेडा समजून तिथून सूम्बाल्या कर्अनार तोच लक्शात आल की त्यानी कानाला छोटस यन्त्र बसवलय ...... त्याल निळा दात म्हणतात हे खूप दिवसानी कळल. #:S *************** आम्ही काय कुणाचे खातो तो र्आम अम्हाला देतो