✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एका वाक्यात उत्तर द्या

प
प्रेमसाई यांनी
Wed, 03/12/2008 - 17:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17539 वाचन

💬 प्रतिसाद (39)

प्रतिक्रिया

इ
इनोबा म्हणे Wed, 03/12/2008 - 17:32 नवीन

किती गुण?

ह्या प्रश्नाला उत्तर मिळाल्यास तुमचे नशिब. अवांतरः या प्रश्न्नाला किती गुण मिळणार याचा उल्लेख असावा.(ह. घ्या. किंवा कशाला घेता?) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 03/12/2008 - 17:43 नवीन

हात्तीच्या इतकच ना

रोज आपण ज्या लेन मधून ड्राईव्ह करु तीच अडकून राहीली आणि बाकी सगळे लोक पुढे जाताना दिसले की समजावं हेच आपलं नशीब (ट्रॅफिकला कंटाळलेली) वरदा
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Wed, 03/12/2008 - 18:05 नवीन

वरदा,

इंडिकेटर लावून त्या लाईनमधे जायचं(घुसायचं). हे तुझे नशीब नाही का?:)))) ह. घे.
  • Log in or register to post comments
व
व्यंकट Wed, 03/12/2008 - 18:55 नवीन

luck

लक ला मराठीत नशीब असे म्हणतात. व्यंकट
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 03/12/2008 - 18:59 नवीन

??????

बरं झालं आम्हाला सांगीतलं ते! (ह. घ्या. :) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: व्यंकट
व
व्यंकट Wed, 03/12/2008 - 19:02 नवीन

पंजाबीत मात्र ..

लक म्हणजे कंबर व्यंकट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
छ
छोटा डॉन Wed, 03/12/2008 - 19:03 नवीन

नशिब म्हणजे ....

या प्रश्नाचे उत्तर घेण्याची तसदी आम्ही घेतली हे तुमचे नशिब व हे उत्तर देण्यासाठी मला २ तास विचार करावा लागला हे माझे (फूटके) नशिब ..... अजून "डांबिसकाकांनी " येऊन तुमची काढली नाही हे तुमचे अजून एक नशिब .... "प्राजू" ने अजून "चारोळी" लिहून नशिब म्हणजे काय याचे उत्तर दिले नाही हे अजून एक नशिब ... "स्वाती-राजेशने किंवा पेठकर काकांनी " यावर "नशिब कसे बनवतात्/घडवतात" याची रेसिपी दिली नाही हे पण एक नशिब .... "सर्कीट" ने "मी नशिब मानत नाही व बाकीचे मानत असल्यास मला माहित नाही " असा अभिप्राय दिला नाही, हे पण एक नशिब ... "धमु" ने "हाण तिच्यायला नशिबाच्या , जे होईल ते बघू "असा प्रतिसाद दिला नाही हे नशिब ... "केशवसुमारां" नी "कशी नशिबाने थट्टा मांडली" या गाण्याच्या विडंबनातून प्रतिसाद दिला नाही हे नशिब ... "धोंडोपंतकाकांनी " तुमच्या नशिबासाठी "तुमची कुंडली मांडली नाही हे नशिब .... "संजोपरावांचा कशी नशिबाने थट्टा मांडली " हा लेख तुम्ही वाचला नसल्यास फुटलेले तुमचे नशिब .... "इनोबांनी" नशिब म्हणजे काय आहे याचे उत्तर दिले आहेच .... "तात्यांनी " असेच नशिब घडवत रहा , आम्ही बघतो आहोत असा अभिप्राय दिला नाही, हे पण एक नशिब ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 03/12/2008 - 19:08 नवीन

हा हा हा!

असला जबरा प्रतिसाद मिळावा हे एक नशिब. डॉन्या लेका मस्तच रे! (ह. ह. पु. वा.) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
प
पिवळा डांबिस Wed, 03/12/2008 - 21:40 नवीन

नशीब!

अजून "डांबिसकाकांनी " येऊन तुमची काढली नाही हे तुमचे अजून एक नशिब .... अरे बाबा, त्या प्रेमसाईंची मी कशाला काढू? त्यांनी बिचार्‍यांनी माझं काय घोडं मारलंय? बाकी डॉन्या तू दूर बंगळूरात असल्याने तुला पायाचे अंगठे धरून उभा करता येत नाही हे माझं (फुटकं) आणि तुझं (चांगलं) नशीब!! :)) थांब, आता कन्नड वेदिकेच्या लोकांचीच ओळख काढतो!! :)) आणि प्रेमसाई, तुमच्या प्रश्नाला आमचे म्हातार्‍याचे एका वाक्यात उत्तरः "नशीब म्हणजे, जे ओळखण्यात चूक होऊ शकते, पण जे कधीही बदलता येत नाही ते!" आपला, डांबिसकाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन Wed, 03/12/2008 - 22:04 नवीन

हा हा हा ... मग आम्हालाही ....

"थांब, आता कन्नड वेदिकेच्या लोकांचीच ओळख काढतो!! :)"" काका जर यात प्रादेशिकवाद आणताल तर आम्हालाही "विनोबा ठाकरे" यांची मदत घ्यावी लागेल. तसे झाल्यास फुकट बेंगलोरमध्येही "राडा" होईल ... बाकी अंगठे धरण्याचे म्हणताल तर मला आता त्याचे काही वाटत नाही [ कारण मास्तरची नजर फिरल्याफिरल्या लगेच खाली कसे बसायचे ह्याचा आम्ही लहानपणीच "क्र्याश कोर्स " केला होता .... ह. घ्या किंवा घेऊ नका ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 03/13/2008 - 00:45 नवीन

काका जर

काका जर यात प्रादेशिकवाद आणताल तर आम्हालाही "विनोबा ठाकरे" यांची मदत घ्यावी लागेल. तसे झाल्यास फुकट बेंगलोरमध्येही "राडा"होईल ... का नाही होणार?,च्यायला मराठी माणसाला मारायला जर कन्नड वेदीका येणार असेल तर आम्हालाही आमचे हत्यार बाहेर काढावे लागेल. पुण्यातली कर्नाटक शाळा फोडून टाकतो रात्रीच्या रात्री. बाकी पार्टीवाले घटना घडल्यानंतर निषेध करतात आपण च्यायला आधी करायचा नवा पायंडा पाडू. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
प
पिवळा डांबिस गुरुवार, 03/13/2008 - 10:18 नवीन

अहो पण ऐकून तर घ्या!

आम्हाला बंगळूरमधले दुसरे कुठले गुंड माहिती नाहीत हो!!!:(( हेच एक माहिती होते जे लोकनियुक्त प्रतिनिधींचा अपमान करतात ते! :)) प्रादेशिकता नको असेल तर इनोबा, तुम्हीच चार मराठी माणसे पाठवून द्या बंगळूराला, ह्या डॉन्याला ठीकठाक करायला!! :)) आमची हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 03/13/2008 - 10:41 नवीन

अंगासं......

प्रादेशिकता नको असेल तर इनोबा, तुम्हीच चार मराठी माणसे पाठवून द्या बंगळूराला असं काहीतरी बोला ना! च्यामारी चार लोकांना तेवढाच रोजदार मिळणार असेल तर आपली ना नाही.आत्ता बंदोबस्त करतो. (एकमेका साह्य करु | अवघे होऊ श्रीमंत) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
छ
छोटा डॉन गुरुवार, 03/13/2008 - 15:43 नवीन

आजच या ....

"असं काहीतरी बोला ना! च्यामारी चार लोकांना तेवढाच रोजदार मिळणार असेल तर आपली ना नाही.आत्ता बंदोबस्त करतो." आम्हाला यश देण्यास व ते मिळवण्यासाठी ताकद देण्यास "आई जगदंबा" समर्थ आहे. तेव्हा आमच्या बंदोबस्तास जत तुम्ही माणसे पाठवणार असताल तर आम्ही एवढेच म्हणू ... "ऊदयीक येणार असाल तर आजच या" बेंगरूळ शेर चंद्रराव छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 03/13/2008 - 19:56 नवीन

नक्की कोण?

आम्हाला यश देण्यास व ते मिळवण्यासाठी ताकद देण्यास "आई जगदंबा" समर्थ आहे आई जगदंबा आहे की समर्थ आहेत? एकदाच काय ते बोला राव! परत परत डोक्याची मंडई नको. "ऊदयीक येणार असाल तर आजच या" आज नाही जमणार राव.आज माझ्या 'डूडूंबगाटूंगा' या झूलू भाषेतील कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आहे. उद्या सकाळीच मी सनी सिंगापूरच्या जत्रेला निघालो आहे.यायला दोन तीन दिवस तरी लागतील.परत आल्यानंतर संपर्क करतो. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन गुरुवार, 03/13/2008 - 20:58 नवीन

तुम्ही पण झुलु ????

"आज माझ्या 'डूडूंबगाटूंगा' या झूलू भाषेतील कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आह" आहाहा .. ऐकुन लैच मस्त वाटलं बघा .... शेवटी कोणीतरी झुलु जाणणारा .... आमच्या त्या कार्यक्रमास शुभेच्छा .... अवांतर : आम्ही कधी काळी लिहलेले एक गीत आज झुलु लोकात फार फेमस आहे .... आम्ही तर असे ऐकले आहे की तेथिल लहान मुले संध्याकाळी "शुभंकरोती कल्याणम्" च्या जागी म्हणत असतात ... असो. डुडुंबा झुब्मा गन्त्ता. चामुंडा कुम्बा डुंगडुंग .... [ म्हणजे आता बास झाले. नंतर भेटू ...] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 03/13/2008 - 04:33 नवीन

मस्त !!!

खूपच मस्त ! - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ध
धमाल मुलगा गुरुवार, 03/13/2008 - 15:45 नवीन

भले बहाद्दर..

"धमु" ने "हाण तिच्यायला नशिबाच्या , जे होईल ते बघू "असा प्रतिसाद दिला नाही हे नशिब ... घ्या..आता ह्याच्यावर आम्ही काय "हाण तिच्याआयला" म्हणणार ? आयला ह्या डॉन्याचा खर॑च ब॑दोबस्त करायला पायजेल, लैच मोकाट झालाय हल्ली. तू भेट रे एकदा, मग सा॑गतो तुला नशिब म्हणजे काय ते! ओ प्रेमसाई, हे वरच॑ वाक्य तुमच्यासाठी नव्हत॑ बर॑ का..ते डॉन्यासाठी. नशिब म्हणजे काय हे एव्हढ॑ ठाऊक नाही पण ते दिसायला फुटक्या खापरासारख॑ असाव॑ असा आमचा अ॑दाज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
प
प्राजु Wed, 03/12/2008 - 19:08 नवीन

झालं...

अरेरेरे...... छोटा डॉन ने याचे इतके मोठे उत्तर द्यावे.. छ्या... नशिब .. दुसरं काय?? (ह्.घ्या.) - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 03/12/2008 - 19:11 नवीन

हेच आमचे नशिब ....

"प्राजूने व इनोबांनी " लगेच २ मिनिटात प्रतिसाद देऊन मला "टोला" हणावा हेच आमचे नशिब .... ह.घ्या . छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
स्वाती राजेश Wed, 03/12/2008 - 19:34 नवीन

रेसिपी..

अरे छोटा डॉन, नशिब आपले आपणच घडवतो म्हणजे ही एक प्रकारची रेसिपीच... ही तुला समजली नाही हे.....नशिब
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 03/12/2008 - 20:37 नवीन

अगं स्वाती

इंडिकेटर लावून त्या लाईनमधे जायचं(घुसायचं). हे तुझे नशीब नाही का?:)))) मी शिफ्ट झाले की नेमकी ती दुसरी लेन स्लो जायला लागते गं...:(
  • Log in or register to post comments
व
व्यंकट Wed, 03/12/2008 - 20:42 नवीन

ऑफ़ीस स्पेस?

ऑफ़ीस स्पेस? व्यंकट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
व
वरदा Wed, 03/12/2008 - 21:24 नवीन

ऑफ़ीस स्पेस?

हे हे हे :))))) अहो ती मिळवण्यासाठी किती आटापिटा करावा लागतो हेही नशिब......
  • Log in or register to post comments
व
व्यंकट Wed, 03/12/2008 - 21:34 नवीन

ऑफिस स्पेस

>>मी शिफ्ट झाले की नेमकी ती दुसरी लेन स्लो जायला लागते गं...:( असा सीन आहे ऑफिस स्पेस नावच्या सिनेमात. व्यंकट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
व
वरदा गुरुवार, 03/13/2008 - 00:41 नवीन

असा सिनेमा आहे?

चला आज जरा ज. न. मधे भर पडली....
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 03/13/2008 - 01:06 नवीन

नशिब...

बाकी काही नाही पण आज नशिबाचंच 'नशिब' जोरावर दिसतंय..... बिपिन.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 03/13/2008 - 02:49 नवीन

नशिब.....

नशीब म्हणजे स्वत:चे अपयश आणि दुसर्‍याच्या यशाला श्रेय देण्याची जागा....... उदा : केशाच्या विडंबनाला एवढे प्रतिसाद कसे बॉ ? -> (दुसर्‍याच्या कविता वापरुनही)सालं त्याचं नशीबं चांगलं. अन् माझ्या लिखाणाला प्रतिसाद कसे नाही बॉ ? -> (मी एवढा प्रतिभासंपन्न असुनही)सालं आमचं नशीबच XX. काय समजलं ना? आपला, ('नशीब'वान) छोटी टिंगी ;)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/13/2008 - 06:45 नवीन

मिश्रण..

आयुष्यातले योग आणि भोग यांच्या सरमिसळीला नशीब म्हणतात! आपला, (योगापेक्षा भोग मोठे आहेत हे मानणारा!) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 03/13/2008 - 09:42 नवीन

गुड लक आणि बॅड लक

लायकी नसताना प्रोजेक्ट मॅनेजर बनणे - हे पीएमचे गुड लक आणि तो पीएम आपल्याला येणे हे आमचे बॅड लक मनस्वी
  • Log in or register to post comments
म
मुकुल१ गुरुवार, 03/13/2008 - 09:57 नवीन

जानी..

जानी ये नसिब नसिब खेलना बंद करो, देखो बकार्डी तुम्हे बुला रही हैं, कहां हो तुम..
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/13/2008 - 10:09 नवीन

:)

मस्त! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुकुल१
च
चतुरंग गुरुवार, 03/13/2008 - 10:59 नवीन

येता जाता थट्टा करते ते नशीब!!

चतुरंग
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित गुरुवार, 03/13/2008 - 11:33 नवीन

नशीब म्हणजे मांजर..आपण उंदीर

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
  • Log in or register to post comments
प
प्रेमसाई गुरुवार, 03/13/2008 - 12:43 नवीन

नशिब कशाला म्हणतातचे एका वाक्यात उत्तर

घडुन गेलेल्या गोष्टिना नशिब म्हणतात
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 03/13/2008 - 13:03 नवीन

पण मग,

पण मग, 'नशिबात असेल तर मिळेल अस॑ आपण जे म्हणतो', ते तर भविष्यकाळाबद्दल असत॑ ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रेमसाई
व
विजुभाऊ गुरुवार, 03/13/2008 - 13:01 नवीन

नशीब म्हणजे मांजर..आपण उंदीर

नशीब म्हणजे मांजर..आपण उंदीर मांजरा पासून सुटका हवी असेल तर उंदीर मारायचे औषध उपयोगी ठरेल.... मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 03/13/2008 - 13:12 नवीन

नशिब....

एखादे यश सहज प्राप्त झाले तर ते आपले 'कौशल्य'; पण तेच यश दुसर्‍याने कौशल्याने मिळविले तर ते त्याचे 'नशिब'.
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला गुरुवार, 03/13/2008 - 13:22 नवीन

माझ्या मते..

एका डोळ्यात आसू आनि एका डोळ्यात हासू देते ते नशीब...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा