लक्ष्मणसुत उवाच्
"आपण सहलीला आलो आहोत. आपला इतरांशी काहीही संबंध नाही. ट्रीप संपली. संबंध संपला. घरी बोलवा वगैरे संबंध अजीबात वाढवायचे नाहीत. पुन्हा चूकुन माकून पुढच्या ट्रीपला भेटलो तर पाहू. नाहीतर नाही."
अशा वृत्तीच्या लोकांचा मला भयंकर राग येतो. बाकी लेखाची भट्टी उत्तम जमली आहे.
एकदम वंटास लिहिलाय लेख. खूपच आवड्या. माणूसघाण्या लोकांमुळे फिरायला जाण्याचे तुम्ही नका थांबवू. ते लोक बदलणार आहेत का तुमच्यासाठी? नाही ना? मग तुम्ही का बदलणार? असेच भरपूर फिरा आणि लिहित जा मनापासून. आणखीन येऊ द्या असेच लेखन.
वेदश्री
माणूसघाणी मंडळी बदलणार नाहीत हे तर खरंच आहे. पण माझे दु:ख आहे ते हे कि, ही असली माणसे माझ्याच वाट्याला का येतात? माणूस हा "सोशल" प्राणी आहे असे म्हणतात. पण हे असे "न-सोशल" प्राणी वाट्याला यायला लागले तर मग त्या सहलीची मजाच निघून जाते. मस्तपैकी जमलेली पुरणपोळी खात असताना दाताखाली आलेल्या पोळीत चुकून पडलेल्या मिठाच्या खड्यासारखी. फक्त हा मिठाचा खडा माझ्याच दाता खाली का? हा विचार चपलेत शिरलेल्या खड्यासारखा बोचतो. आणि तो खडा निघतही नाही.
छान लेख.. काका फोटोही जरूर टाका... प्रवासवर्णनही छान..
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
काका... भारीच लिहिलंय. लेखनशैली चांगलीच आहे तुमची. मजा आली वाचायला. वेलकम टू मिपा. नेहमी लिहित जा. वाचायला आवडेल. तुम्ही कविता करता असा उल्लेख आहे. तुमच्या नातींचा उल्लेख आहे. ते सगळं येऊद्या.
आयुष्यात आपल्यासाठी कुणाचे तरी डोळे ओले होण्याचे दिवस आता इतिहासजमा झाल्याचा हा इशारा होता. त्यालाच ज्येष्ठ नागरिकत्व म्हणायचं का?
तुमची एकटेपणाची खंत हेलावून गेली.
यावरून आठवलं, आमच्या शेजारी एक आजोबा होते. ते नेहमी म्हणायचे, "डोअरबेल वाजली की (म्हणजे घरी भेटायला वगैरे येणारे लोक) ती माझ्यासाठी नसून माझ्या मुलासाठी आहे हे मला उमगले आणि मी ते आनंदाने स्वीकारले तेव्हाच माझे म्हातारपण आणि इतरांचे आयुष्य सुखकर झाले."
बिपिन कार्यकर्ते
अनुभव नेटक्या आणि नेमक्या शब्दांत मांडला आहे. लेख आवडला. अजून लिहा वाचायला आवडेल
ऋषिकेश
------------------
सकाळचे ९ वाजून ५५ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "जपत किनारा शीड सोडणे नामंजूर..."
आम्ही चर्चा करत होतो की ट्रीपनंतर भेटले पाहीजे. फोटो एकमेकांना दिले पाहिजे.
तुमची ही अपेक्षा काही फारशी वावगी नव्हे, किंवा तुमच्या जागी ती योग्य असेल परंतु,
त्यांनी आपल्या सौं. ना ताकिद दिली की "तू भलते सलते बडबडू नकोस. नंतर भेटायचे जमणार नाही." तरीही मी थोडासा नेट लावून म्हणालो की लगेचच्या रविवारी भेटूया. पण नाही. त्या कवळीने आपल्या अर्धांगीला झापले. मी ऐकतोय याकडे लक्षही दिले नाही. किंबहुना मी ऐकवे अशीच इच्छा असावी असे आता मला वाटते.
करेक्ट! त्याने एकदा आपल्या 'सौ'ला ताकीद दिली आहे त्या अर्थी त्याला संबंध पुढे वाढवायचे नाहीत हे तेव्हाच तुमच्या लक्षात यायला हवे होते. तरीही तुम्ही त्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करताय म्हटल्यावर तो आपल्या सौ ला झापेल नायतर काय करेल? वास्तविक पाहता, त्याला तुम्हाला डायरेक्ट खणखणीत नकार देऊन तुमचा पाणउतारा न करता स्वत:च्या बायकोला झापवे लागले! राईट?
" घरी बोलवा वगैरे संबंध अजीबात वाढवायचे नाहीत. पुन्हा चूकुन माकून पुढच्या ट्रीपला भेटलो तर पाहू. नाहीतर नाही."
असा जर त्या कवळीचा व्ह्यू असेल तर त्यात त्याचं फारसं काय चुकलं सांगा पाहू? प्रत्येकाने तुमच्या अपेक्षे इतकं 'सोशल' असलंच पाहिजे हा अट्टाहास का? नाही जमत एखाद्याला! की जो सोशल नाही किंवा माणूसघाणा आहे त्याने सहलीलाही यायचं नाही आणि सहलीचा आनंद घ्यायचा नाही असं म्हणणं आहे तुमचं? निदान सूर तरी तसाच दिसतो आहे!
भले असेल तो माणूसघाणा, पण निसर्गप्रेमी तर असेलच ना? किंवा काही नाही तर गेलाबाजार बायकोच्या आग्रहाखातर तर आला असेल ना? काय माहिती आहे आपल्याला त्याच्याबद्दल?
पेंडसे साहेब, सगळी माणसं सारखी नसतात -जो तो आपल्या परीने आपल्या पद्धतीने वागत असतो हे तुमच्यासारख्या काही पावसाळे जास्त पाहिलेल्याला मी सांगायला नको..
तो सहलीला आला होता, त्याने त्याच्या परीने सहलीचा आनंद लुटला आणि सहल संपल्यानंतर आपल्या घरी गेला यात काय चुकलं त्याचं??
मला कळत नाही की ही असली माणसे ट्रीपला का येतात? माणसात मिसळायचे नसेल तर गुपचूप घरी बसा की. किंवा फिरण्याची इतकीच हौस असेल तर स्वतंत्ररीत्या ट्रीपा काढा!
अरेच्च्या! हे सांगणारे तुम्ही कोण??
त्यावेळी मग मी दोन गोष्टी केल्या. एक म्हणजे त्या ज्येष्ठ नागरिकांशी पुण्यात येईपर्यंत एक अक्षरही संवाद साधला नाही. माझ्या मेंदूच्या कॉम्पुटरमधून त्यांची उपस्थिती पूर्णतया "डिलिट" केली. आणि दुसरे म्हणजे ही मंडळी आपल्यापासून दूर राहणार नसतील तर पुन्हा मी कधीतरी "इन सर्च आउटडोअर्स" बरोबर गेलो तर हे ज्येष्ठ नागरिक नसतील त्याच ट्रीपला फक्त जायचे असे मनोमन ठरवून टाकले.
ठरवून टाकलंत ना? मग झालं तर! मग आता इतका त्रागा कशासाठी? अहो या क्षणी तुम्ही त्या कवळीच्या खिजगणतीतही नसाल! आणि तुम्ही मात्र इथे 'तो माणूसघाणाच आहे', 'मी त्याला डिलिटच केले!' असं म्हणून त्याचा राग राग का करताय? एवढं काय घोडं मारलं त्यानं तुमचं?
असो,
बाकी, सहलवृत्तांत मात्र हेवा वाटण्याजोगा!
तुम्ही हातावर पोळीचा तुकडा, बिस्कीट वगैरे ठेवले तर ते पक्षी तुमच्या हातवर येउन बसतात. अगदी बिनधास्त पणे. आणि खातात. अजिबात घाबरत नाहीत. खूप मजा वाटते पाहताना. अक्षरशः दोन तीन पक्षी एकाचवेळी हातावर येउन बसतात.
तात्यासाहेब नमस्कार,
सर्वप्रथम त्या लेखात न सांगितलेली पण जी सांगणे गरजेचे होते असे आता मला वाटते, ती गोष्ट आधी सांगतो. ती म्हणजे या लेखात व्यक्त झालेली मते ही पूर्णतया माझी वैयक्तिक मते आहेत. त्यामुळे चुकून कुणाच्या धोतराला हात लागला असल्यास मी सर्वप्रथम बिनशर्त माफी मागतो.
सर्वप्रथम मी असे गृहित धरले आहे की जेंव्हा तुम्ही सहलीला एखाद्या ग्रूपबरोबर जाता तेंव्हा तुम्ही ग्रूपबरोबरीने राहणे असणे हे सहाजीकच अपेक्षित आहे. त्यामुळे मी जर तशी अपेक्षा केली तर त्यात फारसे चूक नाहिये असे मला वाटते. माणूसघाणेपणा हा दोष नसला तरी तो ग्रूपच्या मानसिकतेला मारकच असतो. तुम्ही घरात शर्ट आत आणि त्यावर बनियन घालून हिंडणार असाल तर कोणी विचारणार नाही. पण तेच जर तुम्ही बाहेर करू पहाल तर तुम्हाला लोक वेड्यात काढतील. जसे दूध नासलय हे माहित असेल तर आपणत्या दृष्टीने तयारी करतो. त्याचे पनीर करू या असे म्हणतो.पण चहा करून झालाय आणि त्यात दूध घालण्याच्यावेळी ते नासले असे दिसले तर जी होणारी माफक चिडचीड तसे माझे झाले होते. त्यामुळे ते दूध नासलय असे निघतानाच कळले असते तर बरे झाले असतेअसे वाटून हॉणारी ही चिडचीड आहे. ही गोष्ट मी घरातही बोललो नव्हतो. फक्त इथे ती शब्दरूपात बाहेर आली इतकेच. तुम्हाला काय अनुभव आहे मला माहित नाही. पण कधी कधी काही व्यक्ति "अरे हा इथे नसता आला तर बरे झाले असते" असे वाटण्यासारख्या असतात. आणि मग त्यांची उपस्थिती ही त्रासिक ठरू शकते. जसे दोन एकाच क्षेत्रात काम करणार्या अनोळखी व्यक्ती समोरासमोर आल्यावर सहाजीकच संवाद जुळतो. पण एक मेडिकल चा आणि दुसरा साहित्यातला यांचे कदाचित जुळणार नाही. तसे झाले असेल. असो. हेच जर पुणे इथून निघतानाच झाले असते तर मग वर माझ्या लेखातली आपण संदर्भ दिलेली मते आली नसतीही.
मला वाटते इतके स्पष्टीकरण पुरेसे आहे. माणूसघाणेपणा हा विषय माझ्यामते फारसा चर्चा करण्याचा विषय नाही. माझ्या लेखात निर्मळ आणि वैचारीक चर्चा करण्यासारखे विषय सापडू शकतीलही. त्यामुळे माझ्यापुरता तरी मी हा विषय इथे संपवत आहे. इतर सन्माननिय वाचकांना यावर मतप्रदर्शन करायचे असेल तर ते करण्यास हरकत नाही. माझ्याकडून त्यावर स्पष्टीकरणाची अपेक्षा करू नका.
धन्यवाद.
यो न संचरते देशान, सेवते नच पंडिता: |
तस्य संकुचिता बुद्धि:, घृतबिंदुरिवाम्भसि ||
म्हणजे
जो न विहरे देशात सार्या, संग शहाण्यांचा ना धरी |
बुद्धी त्याची बद्ध अगदी, पाण्यातील तुपाच्या थेंबापरी ||
दृष्टीस विशाल करणार्या प्रत्ययदायी प्रवासाचे उत्तम वर्णन तुम्ही लिहीले आहेत. निसर्गात काय पाहावे हे तुम्हाला कळले आहे. जे पाहिलेत ते सुरेख सांगितले आहेत.
आम्हालाही आता मेवाडला जायचे आहे. रणथंभोरही पाहायचेच आहे. कदाचित आता काय पाहायचे ते आम्ही नीट पाहू शकू.
टकाचोराचे प्रकाशचित्र आणि प्रत्ययदायी वर्णन आवडले.
काका,
लेख थोडासा वाचला. छान आहे. पण इतका मोठा लेख म्हणजे वाचायचा कंटाळा येतो. रोज एक, असे दहा भाग करा लेखाचे, रोज क्रमशः टाकून. म्हणजे निवांतपणे सगळेच जण वाचतील.
(वाटल्यास "रणथंभोर लाईफ", अशी सिरीज करा.)
-- मिसळभोक्ता
शैलेंद्र
साथीचा रोग मी पसरवला नाही. साथीचा रोग "चला आता अमुक अमुक रोग पसरवू या" असे म्हणून पसरवता येत नाही. तो आपोआप पसरतो. आपल्या नकळत. म्हणून तर त्याला साथीचा रोग म्हणायचं. मी त्यात अलगद सापडलो. माझ्या नकळत. मला माहीत असतं तर मी शंभर हात दूर नसतो का राहिलो? म्हणून मी फक्त माझी उत्स्फूर्त प्रतिक्रीया लिहिली.
रणथंबोर अभयारण्याचे वर्णन अगदी छान आहे. किंचित पाल्हाळीक झाल्यासारखे वाटते. तरी पण एकूण वर्णन रसभरीत आहे. अभिनंदन.
दुसर्यांमध्ये न मिसळणार्या जेष्ठ जोडप्याबद्दलची आगपाखड अनाठायी आणि वाचकांचा रसभंग करणारी वाटली.
तात्यांच्या प्रतिक्रियेशी सहमत.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
प्रतिक्रिया
लेख आवडला
नमस्कार फो
छान लिहिलं
यशोधरा हो
तात्या
काका,
हो. अनघाबद्
सहमत
फोटो टाकले
लक्ष्मणसु
व्वा.
छान लिहीलं
३_१४ विक्षिप्त अदिती
म्हणजे ते
फोटो टाकले
काका फारच
लेख छान
लेख आवडला
अरे व्वा!!
वा..
उत्तम वर्णन
वंटास!
+१
वेदश्री मा
रणथंभोर वर्णन आवडले.
आवडला
मस्त लिहिले आहे
मस्त
छान लेख..
प्रकाटाआ..
फार छान
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
काका...
छान!
पेंडसे
तात्यासाह
रणथंभोरला काय पाहायचे ते आम्ही नीट पाहू शकू!
एक विनंती
साथीचे रोग
शैलेंद्र स
छान प्रवासवर्णन (अभयारण्यातले).