पालेभाजी कोथिंबीर चार चार रुपये ... भाजीवाला अगदी उत्साहात ओरडु लागणे हे ही पावसाळ्याचे एक लक्षण...पावसाळा आला की पालेभाज्या छान मिळतात.
त्यातही खास म्हणजे कोथिंबीर. एरवी ७-८ रुपयाना एवढीशी मिळणारी कोथिंबीरीची जुडी पावसात कशी छान जाडजुड होऊन येते. हिरवीगार आणि स्वस्त
मिळालेल्या कोथिंबीरीची मोठी जुडी घरी आणली जाते. आणि बेत बनतो कोथिंबीर वडीचा.. मग ती कोथिंबीर एक तास बसुन साफ करता करता आपण कशी
एवढ्या ढिगातुन एकदम छान आणि न फुललेली जुडी आणली या बद्द्ल चर्चा करणे आलेच...

पाककृती अगदी सोपी आहे..
कोथिंबीर नीट धुवुन निथळत ठेवा. पुर्णपणे कोरडी करुन बारीक चिरुन घ्या. त्यात जीरे, लाल तिखट (मिरची पुड), हळद, मीठ, सफेद तीळ,साखर, बेसन घालुन अलगद एकत्र करा.
पावसात कोथिंबीरीत पाणी जास्त शोषलेले असते म्हणुन जरा मिश्रण ओलसर असेल. या मिश्रणाचे रोल बनवुन मोदकपात्रात किंवा कुकरात वाफवुन घ्या . नाही रोल बनत असतील तर
थाळीत घालुन ढोकळ्या सारखे उकडा. थंड झाले की तुकडे करुन, तव्यावर थोड्या तेलात तळुन घ्या. टॉमेटो सॉस सोबत छान लागतात.
वाचने
9010
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच......... च
हम्म्म्म!!!
ए वन...!
धन्यवाद
In reply to ए वन...! by विसोबा खेचर
.
ही स्माईली
In reply to . by दिपक
स्मायली
In reply to ही स्माईली by मितालि
जबरा.....
अहो
ह्म्म्म
मस्तच..
पानी सुट्ल तोन्डाला...........
पाणी सुटले तोंडाला......
मासे तळले
In reply to पाणी सुटले तोंडाला...... by खादाड_बोका
मासे तळले
खादाड
व्वा.