Skip to main content

कांगारु

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 04/03/2008 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
कांगारूंचा संघ | मस्तीत तो दंग| भलतेच रंग | उधळीसे || भारताचा संघ | होतातरी दंग | खेळण्यात भंग | रिकी करे|| अँड्र्यूचे मर्कट | लढवी तर्कट | त्यालाही सपोर्ट | रिकी चा ह्या|| भज्जी तोही चिडे | काढता वाभाडे | तरीही तो नडे | रिकी बाळ || नसते आरोप | करती ते खूप || दिला मग चोप | खेळामाजी || वामन सचिन | करतो हैराण | घरचे मैदान | कुठे जाशी?|| एकदिस क्रिकेट | कांगारु ते धीट | बोले फटाफट | संपवूया || धोणीनेही मग | बांधला तो चंग | पाजली ती भांग | कांगारुंना || दोन्ही सामन्यात | लाविली ती वाट | रहावे चड्डीत | कांगारूंनी || पुरे तरी आता | बाष्कळह्या बाता | म्हणे बोध देता| 'चतुरंगे'||

वाचने 10504
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

सुंदर.. अगदी मनातले बोललात... अनिकेत

रहावे चड्डीत | कांगारूंनी || हा हा हा

'दोन्ही सामन्यात | लाविली ती वाट | रहावे चड्डीत | कांगारूंनी |' हे बाकी मस्त. बरेच दिवसानी चड्डीत रहा शब्दप्रयोग ऐकला. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

'दोन्ही सामन्यात | लाविली ती वाट | रहावे चड्डीत | कांगारूंनी |' हे बाकी मस्त. बरेच दिवसानी चड्डीत रहा शब्दप्रयोग ऐकला. चालू द्या.. (लुग्गीवाला)केशवसुमार

ओव्या आवडल्या....:) रंगा, तुझ्या प्रतिभेला आपला सलाम रे....! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

हेच म्हणतो.

चतुरंग, मानलं तुम्हाला.... अप्रतिम. एकदमच सह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हि................ - (सर्वव्यापी)प्राजु

भारीच ... वामन सचिन | करतो हैराण | घरचे मैदान | कुठे जाशी?|| मस्त !!

दोन्ही सामन्यात | लाविली ती वाट |
रहावे चड्डीत | कांगारूंनी ||

लै भारी,
सारेच अभंग जब्रा हायेत, असेच लिव्हित राव्हा :)


अँड्र्यूचे मर्कट | लढवी तर्कट | त्यालाही सपोर्ट | रिकी चा ह्या|| या ओळीत आपण वांशिक टीका केलीत. आता कांगारू काय म्हणेल? गेला जगातील सर्वात मोठ्या विभागात, ज्यात सर्व त्याज्य वस्तु आपण पाठवतो. पण चड्ड्या आपणच पुरवाव्या लागतील. सगळ्या धोनी आणि मंडळींनी काढून घेतल्या. माझे चार आणे जाहीर. संत चतुरंग जी , मज्जा आली. अशाच प्रसंगानुरूप शानदार जानदार ओव्या येऊ द्यात. आचरटाचार्य.

आणि शिघ्र काव्य

आजच मिपावर २-३ दिवसंनी आलो आणि ही कविता वाच्ली.. सुंदर!!! आवडली :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

मस्त काव्य रचले आहे.

मी तर चड्डीत रहाणे पहिल्यांदाच ऐकलं...मस्तच आहेत ओव्या....

मस्त! भारताने मॅच जिंकली हे मला जरा उशीराच कळाले:) छान चालू द्या.

भाषान्तर करून "डाउन अण्डर " पाठवून द्या !! पॉण्टिङ्गच्या ऑस्सी की तैसी !!

भाषान्तर करून "डाउन अण्डर " पाठवून द्या !! पॉण्टिङ्गच्या ऑस्सी की तैसी !!