हिंदु मॅरेज अॅक्ट चे कलम सात हिंदु पद्धतीने केलेल्या विवाहात कोणते विधी झाले तर ते वैध ठरेल याबाबत आहे. ते असे:
7. Ceremonies for a Hindu marriage.- (1) A Hindu marriage may be solemnized in accordance with the customary rites and ceremonies of either party thereto.
(2) Where such rites and ceremonies include the Saptapadi (that is, the taking of seven steps by the bridegroom and the bride jointly before the sacred fire), the marriage becomes complete and binding when the seventh step is taken.
या विषयावर एव्हढी चर्चा सुरु आहेच तर जाणकारांकडुन याचाही उहापोह व्हावा.
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
याच कलमावर विवाहपुर्व समुमदेशच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो त्यावेळी यावर अॅड सरवटे यांनी चर्चा केली होती. हिंदी पिक्चरमधे या सप्तपदी ने किती भांडवल पुरवलय! सप्तपदीला या अॅक्ट मध्ये अनन्य साधारण महत्व आहे असे त्यांनी नमुद केले. 'कोर्ट मॅरेज' मधे काही वकिल महाभाग जोडप्याला कोर्टाच्या इमारतीच्या समोर नेउन स्वतः काळा गाउन घालुन जोडप्याच्या मागे मधे उभे राहायचे व फोटो काढुन द्यायचा . झाल तुमच कोर्ट म्यारेज.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
विवाह झाला आहे, पण पुरावे देता येत नसतील पण स्त्री-पुरुष दीर्घकाळ एकत्र राहिले असतील तरीही तो विवाह झाला असे मानन्यात येईल. असे सर्वोच्च न्यायालय म्हणते...वाचा बातमी ...दीर्घ काळापासून एकत्र राहणारे स्त्री-पुरुष वैध पती-पत्नी
-दिलीप बिरुटे
<<<<<<<<<<<
२५० रु मे भविष्य लेलो. २५० रु मे भविष्य लेलो. हम्म्म्म्म अडीच किलो तूरडाळ की भविष्य???/ मोठा गहन प्रश्न आहे >>>>>>>>>>>>>
तुरडाळीचच भविष्य बघा की मग ....!! :)
माझी भूमिका अधिक स्पष्ट व्हावी अशी काही जणानी मागणी केल्या मुळे मूळ लेखातील भूमिके संदर्भातील उतारा परत एकदा येथे देतो.
"४. एखादे लग्न परिचयोत्तर होत असेल तर ते पूर्ण विचारांती होत आहे असे मानून एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणे तर्क-सुसंगत ठरते पण जेव्हा 'स्थळे बघून' विवाह जुळवले जातात तेव्हा आपण ज्या मुलीबरोबर सात जन्म एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणार आहोत ती मुलगी, विशेषत: कायदे एकतर्फी असताना, आपल्या जबाबदार्या पूर्ण पाडेल याची कोणतीही खात्री नसताना, पुरुषाने अशी शपथ घेणे हे आत्मघातकीपणाचे निदर्शक आहे, असेच माझे स्पष्ट मत आहे."
>>पण जेव्हा 'स्थळे बघून' विवाह जुळवले जातात तेव्हा आपण ज्या मुलीबरोबर सात जन्म एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणार आहोत ती मुलगी, विशेषत: कायदे एकतर्फी असताना, आपल्या जबाबदार्या पूर्ण पाडेल याची कोणतीही खात्री नसताना, पुरुषाने अशी शपथ घेणे हे आत्मघातकीपणाचे निदर्शक आहे,<<
पुरूष आपल्या जबाबदार्या पार पाडेलच याची कुठली खात्री असते? तरीही आपला सगळा कम्फर्ट झोन सोडून अनोळखी पुरूषाच्या घरात रहायला जातेच की बाई. तुमच्या वरच्या लॉजिकने हा पण बाईचा आत्मघातकीपणाच म्हणायला लागेल.
कायदे बाईच्या बाजूने असले तरी किती घरगुती अत्याचार खरोखर नोंदवले जातात? किती ठिकाणी मानसिकरीत्या गुलामीत आहेतच की अजून बाया. नवर्याने बडवलं दारू पिऊन तरी कुंकवाचा धनी म्हणून त्याला पाठीशी घालतातच की बाया अजून.
द्वीभार्याप्रतिबंधक कायदा असला तरी घरात सवतीला सहन करणार्याही बाया आहेतच की.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
युयुत्सु यांचे असे मत आहे की कायदा हा एकतर्फी आहे म्हणजे स्त्रियांच्या बाजूने आहे.
जर तो तसा आहे तर का आहे ह्याचा विचार युयुत्सु यांनी केला आहे का?
पुरूषप्रधान संस्कृती मध्ये स्त्रियांना नेहमीच दुय्यम वागणूक मिळालेली आहे. नीधप यांनी म्हटल्याप्रमाणे घरगुती अत्याचार (मारहाण, अपमानास्पद वागणूक) क्वचितच नोंदवले जातात.
माझ्याच माहितीतील एका जोडप्याचे उदाहरण देतो - नवरा बायको उच्चशिक्षीत. अमेरिकेत नोकरी. किरकोळ कारणावरून भांडणास सुरवात , नवर्याची मजल बायकोवर हात उगारेपर्यत गेलेली. चायनीज शेजार्याने आपल्या शेजारच्या घरात रात्रीचा काहीतरी गोंधळ चालू आहे म्हणून ९११ डायल करून पोलीस बोलावलेले. बायकोने बरीच गयावया केली तरी तिचे रडून लाल झालेले डोळे आणि एकंदर अवतार पाहून पोलिसांनी लगेच नवर्याला ताब्यात घेऊन त्या रात्री आत टाकलेला. (का मारले , खरेच मारले का , नक्की कोणाची चूक वगैरे काहिहि चौकशी न करता.) सकाळी त्याच्या एका मित्राचा (जो माझा ही मित्र होता) मदतीसाठी (सोडवण्यासाठी वकील वगैरे)फोन आला त्यावेळी वरील प्रकार मला समजला. आता बोला?
कायदा स्त्रियांच्या बाजूने आहे तर त्याला पुरूषच जबाबदार आहेत. काही चांगल्या पुरषांना कायद्याचा त्रास सहन करावा लागला असेल/लागत असेल पण त्याला नाईलाज आहे ..वाईटाबरोबर काही वेळेस चांगले ही भरडले जाते .
बाकी तुमच्या ब्लॉग वर जाऊन अजून तरी तुमचा लेख वाचला नाहि. ईथे तुम्ही जे काही म्हणताय त्याला अनुसरून च हा प्रतिसाद दिला आहे. आम्हाला बुवा मिसळपाव सोडून दुसरीकडे जायची इच्च्छाच होत नाहि. त्यामुळे जे काही म्हणायचे आहे ते इथेच म्हणा. (तेच तेच मांडायला नको आहे तर कॉपी पेस्ट मारू शकता की)
प्रतिक्रिया
कायदा असा आहे
बरोबर
कोर्ट
महाभाग
तरीही माणूस अडचणीतच !
आता हे
>>आता हे
woman is to be protected at
<<<<<<<<<<< २५०
माझी भूमिका
>>पण जेव्हा
युयुत्सु
काय !!
Pagination