मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा ठाणे कट्टा.. दिनांक १ ऑगस्ट २००९

विसोबा खेचर · · काथ्याकूट
राम राम मिपाकरहो, शनिवार दिनांक १ ऑगस्ट २००९ रोजी मिपाचा ठाणे कट्टा आयोजित करण्यात आला आहे. एकमेकांना भेटणे, ओळखी करून घेणे, गाणी-गोष्टी-मनमुराद गप्पा, शाकाहारी-मांसाहारी हास्यविनोद इत्यादी हेतूने हा कट्टा भरवला जात आहे... कट्टा संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल आणि रात्री ११/१२ च्या आसपास संपेल.. मिपाचेच एक सभासद श्रीयुत संतोष जोशी यांनी या कट्ट्याच्या आयोजनाची जिम्मेदारी स्विकारली आहे. कट्टा स्थळ - लक्ष्मी-केशव कार्यालय कोलबाड रोड, प्रताप चित्रपटगृहाजवळ, खोपट, ठाणे. जेवणाचा खर्च - शाकाहारींकरता ७५ रु प्रती इसम मांसाहारींकरता १०० रु प्रती इसम दारूचा खर्च वेगळा...! चकण्याचा खर्च तात्या अभ्यंकरांकडून प्रायोजित केला जाईल.. (केवळ चणे-फुटाणे-भाजलेला पापड!) :) सबब, कट्ट्याला येऊ इच्छिणार्‍यांनी आपण शाकाहारी की मांसाहारी, दारू पिणार की पिणार नाही या माहितीसह आम्हाला शुक्रवार दि ३१ जुलै २००९, रात्रौ १२ च्या आत व्य नि करून अथवा ९८२०४९४७२० या भ्रमणध्वनीवर कळवावे.. धन्यवाद, आपला, (कट्टा प्रस्तावक) तात्या.

वाचने 20269 वाचनखूण प्रतिक्रिया 61

टारझन Wed, 07/29/2009 - 11:14
मी येणार आहे :) मांसाहाराचे ३०० रुपये पोष्टाणे पाठवण्यात येतील :) चकणा फ्री आहे म्हंटल्यावर काही हरकत नाही :) वेळेच्या एक तास आधी पोहोचू !! - टारझन (सदस्य , मिसळपाव कट्टा मंडळ )

In reply to by टारझन

संजय अभ्यंकर गुरुवार, 07/30/2009 - 11:32
ह्याला म्हणतात आधुनीक भीम! जय भीम! नोंदः तात्या, कृपया टारझन साठी तिप्पट चकण्याची व्यवस्था वेगळी करणे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

आम्ही पण येणार आहोत. ************************************************************** "मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा" सौजन्य अदिती

टारझन Wed, 07/29/2009 - 11:27
ऐन वेळी गोळी देणार्‍याचे एका मनापासून लिहीलेल्या लेखाचे एक हिण आणि हिणकस विडंबण पाडण्यात येईल .. मग त्यानंतर चपल्या घालाव्या लागल्या तरी बाहत्तर त्र्याहत्तर !! - (माजी हिणकस विडंबक) टारझन

In reply to by टारझन

अरे बापरे आता तर जायचे का नाही विचार करावा लागेल त्या निमित्याने तरी हि& हि विडंबन वाचायला मिळेल बाकी टारु शेठ मागच्या वेळेस तुम्हीच गोळी दिली होती आता कोण करणार तुमच्या लेखाचे विडंबन

विनायक प्रभू Wed, 07/29/2009 - 12:02
ठाणे कट्टा आहे म्ह्णजे मास्तर येणारच. मास्तरकडुन खारे काजू प्रायोजीत करण्यात येतील. मास्तर मांसाहारी आहे. मांसाहार करुन मांसाहारी (नॉन्वेज) चर्चेत भाग घेण्याची इच्छा असेल त्यानी आधी कळवावे. (घा.को ने नोंद घ्यावी)

आशिष सुर्वे Wed, 07/29/2009 - 12:13
असेच म्हणतो! >> ''कट्ट्याला शुभेच्छा... नंतर फोटो सकट वृत्तांत वाचायला मिळेल अशी आशा..'' तात्या आणि समस्त मिपाकरांना शुभेच्छा!! (शाकाहारी पदार्थांमध्ये 'मिसळ-पाव' असेलच ना?) - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

नीलकांत Wed, 07/29/2009 - 12:18
ठाण्याच्या मिपा कट्ट्याला हजेरी लावतो... :) अट्टल मांसाहारी असून सुध्दा सध्या शाकाहार करणार आहे. :( - नीलकांत

सुनील Wed, 07/29/2009 - 12:24
कट्ट्याचा प्रस्ताव उत्तम आहे. काही किरकोळ अडचणी आहेत पण त्यावर मात करून उपस्थिती लावता येईल असे वाटते. (कोंबड्या-बकरे पाळत नसला तरी श्रावण पाळणारा) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

काजुकतली Wed, 07/29/2009 - 13:52
फक्त पुरूष मिपा सभासदांकरताच आहे का हो हा कट्टा?? एकाही स्त्री मिपा सभासदाने अजुन 'मी ही आहे हो' असे म्हटले नाहीये वर...... (मांसाहारी हास्यविनोद......... रात्री ११/१२ च्या आसपास संपेल.......दारू........ हे शब्द वाचुनच पळाल्या वाटते...)

In reply to by काजुकतली

नम्रता राणे Wed, 07/29/2009 - 17:22
(मांसाहारी हास्यविनोद......... रात्री ११/१२ च्या आसपास संपेल.......दारू........ हे शब्द वाचुनच पळाल्या वाटते...) ह्या असल्या कार्यक्रमास मिपा वरचे किती पुरुष सभासद आपल्या बायकोला /बहीणीला/ मुलीला परवानगी देतील याचा उहापोह जरुर व्हावा हि नम्र विनंती!

In reply to by नम्रता राणे

विसोबा खेचर Wed, 07/29/2009 - 18:40
ह्या असल्या कार्यक्रमास मिपा वरचे किती पुरुष सभासद आपल्या बायकोला /बहीणीला/ मुलीला परवानगी देतील याचा उहापोह जरुर व्हावा हि नम्र विनंती!
उहापोह करण्याची काहीच गरज नाही. कट्ट्याची रूपरेषा स्पष्टपणे लिहिलेली आहे.. ज्यांना यायचं ते येतील. न येऊ इच्छिणार्‍यांना कोणताही आग्रह नाही... कुणीच नाही आलं तर कट्टा होणार नाही.. शिंपल...! आपला, (स्पष्ट) तात्या.

In reply to by विनायक प्रभू

विसोबा खेचर गुरुवार, 07/30/2009 - 00:44
बायकोला घेउन येइन म्हणतो.
मास्तर, जियो..! ह्याला म्हणतात maturity and that always counts..! तात्या.

In reply to by विनायक प्रभू

काळा डॉन गुरुवार, 07/30/2009 - 07:17
ओ मास्तर नको...तिच्यायला ते नॉन्वेज जोक कोण सांगणार मग ? ;)

In reply to by सखाराम_गटणे™

विजुभाऊ Wed, 07/29/2009 - 21:51
नवीन प्रेषक विनायक प्रभू ( बुध, 07/29/2009 - 18:43) . बायकोला घेउन येइन म्हणतो. » उत्तर द्या मी पण येईन प्रेषक सखाराम_गटणे™ ( बुध, 07/29/2009 - 14:26) . मी पण येईन शक्यतो. अभिनन्दन गटणेमामा.....

ऋषिकेश Wed, 07/29/2009 - 17:45
अरेच्या! नेमके ह्या विकांताला मुंबईबाहेर असल्याने येणे शक्य नाहि :( डु मज्जा! (ती तर करालच...) फोटो पाहून जळवा मात्र नक्की! (जळका)ऋषिकेश ------------------ चांदण्या शिंपीत जाशी लिहिता अवांतरे!

In reply to by ऋषिकेश

प्रदीप गुरुवार, 07/30/2009 - 19:11
नेमके ह्या विकांताला मुंबईबाहेर असल्याने येणे शक्य नाहि
चला रे, कट्टा ऋषिकेश मुंबईत असेल त्या वीकांताला त्याला विचारून ठेवा! बघू या, काय एस्केप रूट मिळतो त्याला ते :)

In reply to by प्रदीप

ऋषिकेश गुरुवार, 07/30/2009 - 19:22
पूढील विकांताला दिनांक ८-९ मी (चक्क) मुंबईतच आहे. (तोही मोकळा!) तेव्हा भेटायचं का बोला? नाहितर त्यापुढील विकांत पुणे! (अर्थात पूर्ण मोकळा नाही ;) ) प्रदीपराव, तुमची वारी कधी आहे इथे? नक्की वेळ काढून ठेवतो :) (वक्तशीर)ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ७ वाजून २१ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी...."

नितिन थत्ते Fri, 07/31/2009 - 20:06
नाशिकला गेलो नाही तर नक्की येईन. (कट्टा माझ्या घरापासून चालत ५-७ मिनिटांवर आहे. त्यामुळे ठाण्यात असलो तर येणारच). लेटेस्ट अपडेट. नाशिक क्यान्सल. कट्ट्यावर येणार ...येणार्...येणार. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)

In reply to by नितिन थत्ते

हरकाम्या Sat, 08/01/2009 - 01:47
आलो असतो, पण सध्या 2 nd. shift चालु आहे. शिवाय मुंबैतल्या गटारांच काही खर नाही राव, फुल्ल लोड झाल्यानंतर समजा एखाद्या गटारगंगेला मला भेटावस वाटल तर २ तारखेची सकाळ एखाद्या नरकातच उगवायची.

In reply to by हरकाम्या

विसोबा खेचर Sat, 08/01/2009 - 08:46
शिवाय मुंबैतल्या गटारांच काही खर नाही राव, फुल्ल लोड झाल्यानंतर समजा एखाद्या गटारगंगेला मला भेटावस वाटल तर २ तारखेची सकाळ एखाद्या नरकातच उगवायची. खरंय बॉ तुमचं! नकाच येऊ कट्ट्याला... आपला, (मुंबैप्रेमी) तात्या.

विजुभाऊ Wed, 07/29/2009 - 21:55
टारोबा पुण्याचा नाही तो बेलापूरहून येणार आहे. (बेलापूर का दो रुपया और रामगड का एक रुपया. पुछो पुछो क्युं? क्योकी टांगा भी रामगड का और बसन्ती भी रामगड की. चल धन्नो)

In reply to by टुकुल

प्रअका१२३ गुरुवार, 07/30/2009 - 03:27
माझ्यापण शुभेच्छा(च)..... जमणार नाही यायला. इथे आल्यापासून प्रथमच पाहतोय कट्ट्याचा बेत. पुणेकर मंडळी.... पुण्यात कधी करताय कट्टा? नायतर फुकट स्काइपवर तरी हाणूया गफ्फा आणि आखुया बेत.

*&#%$@*#)@$%#!(#&% अवांतर: कट्ट्याला मनापासून शुभेच्छा!!! मजा करा लेको. फोटोगिटो टाका. वृत्तांत लिवा नीटपणे. :D बिपिन कार्यकर्ते

घाटावरचे भट गुरुवार, 07/30/2009 - 01:05
कट्ट्यास माझ्याही हार्दिक शुभेच्छा. धमाल करा आणि झकासपैकी वृत्तांत लिव्हा कोणीतरी.

काळा डॉन गुरुवार, 07/30/2009 - 07:15
वावावा! कट्ट्याला शुभेच्छा. आमाला दारू पेयल्यावर जेवन लागत नाही. त्यात चकना फुकट असल्यावर कामच संपला!! तेवड दारुचं किती द्यायच सांगा तात्या...म्हणजे आमी हजेरी लावलाय मोकळे. काळू

In reply to by ब्रिटिश टिंग्या

घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 07/30/2009 - 11:58
टिंग्या मी येतो टेशनात न्यायला तुला कोणत्या गाडीने येशील येताना धम्याला पण आण बरोबर ;) ************************************************************** "मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा" सौजन्य अदिती

mamuvinod गुरुवार, 07/30/2009 - 11:22
चालु द्या पन टारुभाउसाटी एक मोट्टा ??????????? मारावा लागेल फोटो पाटवा मिपावर

In reply to by mamuvinod

घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 07/30/2009 - 12:05
पन टारुभाउसाटी एक मोट्टा ??????????? मारावा लागेल काय मारावा बा? :? ह्या टार्‍या साठी कोंबडा बकरा कि आणखी काही जरा ईस्काटुन सांगा राव ************************************************************** "मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा" सौजन्य अदिती

चिरोटा गुरुवार, 07/30/2009 - 16:57
मिपावर बेंगळुरुचे किती पब्लिक आहे? ईथेही कट्टा करता येइल. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

दिनेश५७ गुरुवार, 07/30/2009 - 19:10
यायची खूप इच्छा आहे, पण.... कट्टा संपल्यावर घरी सोडायची काही व्यवस्था आहे का?

In reply to by दिनेश५७

डॉ.प्रसाद दाढे Fri, 07/31/2009 - 22:47
तात्या, ते कुठलंसं कलम विसरू नका हो ! नायतर कोणीतरी मिपाकर उर्वरीत रात्र पोलीस टेशनात काढायचा.. मिपा कट्ट्यास (ग्लास) भरभरून शुभेच्छा!

धमाल मुलगा गुरुवार, 07/30/2009 - 20:01
करा तिच्यामारी मज्जा! फुल्टू दंगा करा दोस्ताहो :) आम्ही काय येऊ नाय शकत ह्या टैमाला. पुढच्या वेळी जमवायलाच हवं. लक्ष्मी-केशवमधला चुकलेला हा दुसरा कट्टा :( आता कायतरी करायलाच पायजे..इजा बिजा तिजा नको व्हायला. अवांतरः आमच्या नावानं तिर्थ शिंपडायला आणि चखण्याचे चार दाणे काढून ठेवायला विसरु नका बरं ;)

आनंद घारे Fri, 07/31/2009 - 17:27
नेमक्या त्याच दिवशी आमच्याकडे वाशीला एक वेगळी जत्रा भरणार आहे. अनेक जुने दोस्तयार तिथे भेटणार आहेत, त्यामुळे मिपाच्या कट्ट्याला येता येणार नाही. माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

अजय भागवत Sat, 08/01/2009 - 07:58
कट्ट्याला शुभेच्छा. कट्ट्याच्या स्नेहसंमेलनातील मेन्युला दारु वर्ज्य असा नियम करावा अशी एक नम्र सुचना

In reply to by अजय भागवत

विसोबा खेचर Sat, 08/01/2009 - 08:48
कट्ट्याच्या स्नेहसंमेलनातील मेन्युला दारु वर्ज्य असा नियम करावा अशी एक नम्र सुचना चांगली सूचना आहे. विनादारूचे कट्टेही भरवता येतील... तात्या.