Skip to main content

(कविता हवी आहे)

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 28/07/2009 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी पुन्हा एकदा मि.पा. वर स्वतंत्र लिहीत आहे, अपेक्षा आहे की तुम्हाला आवडेल. गेले काही दिवसापासुन मी नियमित मि.पा. वाचत आहे. त्यातला कविता हा प्रकार मला खुप आवडला खाली जे विडंबन आहे ते माझे आहे.मला ह्या वरती कविता करुन हवी आहे. माझ्या माहिती प्रमाणे बर्‍याच मिपाकरांची नावे कवितांसाठी प्रसिद्ध आहेत अस लक्षात आले आहे. कृपया अवांतर तज्ञांसाठी.......हा धागा वापरा.... (जड घेणे) कोसळणारा तो टवाळ-पाऊस, चांदणी मिळेल तु नको जाऊस.. ही&ही करती मिपावाले चांदण्यांमागे वेडे झाले तुझ ते अवांतर हसणं माझ्याकडे +१ करत बघणं आणि हळुच इशारा करणं आणि माझ मन चांदण्या होणं झालय नेहमीचच अवांतर नेहमीच अस +१ करत बघतोस आणि मला चांदण्या मिळवून देतोस तुझ बघण आणि माझा चांदण्या मिळवणं झालय आता नेहमीचच मिपाला कधी कळणार रे माझ्या मनातील संपादकीय हेतू तुला?
लेखनविषय:

वाचने 2932
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

सुंदर जमलंय; क्लास!!!

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आज पेटलेत सगळे.... सुहास

आहाहा !! किती सुरेख !! हॄशीकेशा .. लेका इनोचा ग्लास दे रे बाबा

खणखणीत!!! ऋष्या जबरी लेका. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कृपया अवांतर तज्ञांसाठी.......हा धागा वापरा.... (जड घेणे)
हीहीहीहीही ... कवितेत & नसता तरी चाललं असतं! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

& क्रिप्टिक का कायसं म्हणतात तसा असावा.

मस्त रे... =D> हे विडंबन आपल्याला लय आवडलं भांचोत.... -चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?

भन्नाट विडंबन! लय लय भारी! विडंबनाला कविता हवी! ती पण बिनचांदण्याची! :)) :)) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी

मस्त. आमच्या गल्लीत एक कविता आहे. तुझे नाव सांगू का? झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड

तुझ ते अवांतर हसणं माझ्याकडे +१ करत बघणं ए ऋष्या, संपलो रे...! '+१'चा प्रयोग तर लैच भारी... :) (चांदण्या वाटणारा) तात्या.