Skip to main content

मी मिपाकर कसा?

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी रविवार, 26/07/2009 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
राहून राहून वाटतं मी मिपाकर कसा? माझी प्रोफाईल जरी इथे माझं लेखन होई तिथे माझा जीव माझ्या ब्लॉगात मी बोलतो तिथे पद्यात चारोळ्यांची थप्पी एक आणि हायकूही अनेक माझ्या लिहिण्याची इश्टाईल वेगळी म्हणुन का केवळ असा उसासा? प्रतिसादार्जनाची हौस म्हणुन आलो एकदाचा मिसळपावात खवचटपणाची हौस म्हणून डोकावेन इतरांच्या खरडवह्यांत एक प्रतिसाद चालतात तर आवांतरालाच विरोध कसा? रोज खादाडीचे पदार्थ पाहतो घरात ते करण्याची फरमाइश करतो कथ्याकूटात रममाण होतो यथाशक्ति भाग घेतो मधुनच इतर संकेतस्थळं पाहतो येतो फिरून कसाबसा तरीही मी मिपाकर कसा? माझ्या खाद्यप्रेमाची का कुणी वांझोटी शंका घ्यावी माझ्या खाद्यनिष्ठेला, मायेला आणि का कुणी आव्हानं द्यावी? जेवणाआधीच खातो पान तरी माझा डाएट जास्त कसा?
लेखनविषय:

वाचने 1484
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

रोज खादाडीचे पदार्थ पाहतो घरात ते करण्याची फरमाइश करतो
जियो..! म्हणजे 'आजची खादाडी' हे सदर काम करतंय म्हणायचं! :) धन्यवाद, तात्या.

वा !! छाण !! - टारझन (सहि विडंबण सेवा बंद करण्यात आली आहे)