"निवेदन -
"अमूक अमूक प्रतिसाद हा पूर्णत: अवांतर असून मूळ विषय भरकटवणारा आहे"
असे दुव्यानिशी सर्वप्रथम दाखवून देणार्या कुणाही सभासदाला (मिपा संपादकांव्यतिरिक्त!) एक चांदणी (स्टार) बक्षिस देण्यात येईल. दर आठवड्याला कुणी किती चांदण्या मिळवल्या याचा हिशोब होऊन सर्वाधिक चांदण्या मिळवणार्या सभासदाला एक वेगळा धागा काढून त्याचा/तिचा "आठवड्याचा/ची मानद संपादक/संपदिका!"अशी पदवी देऊन गौरवण्यात येईल."
********
आँ!!! ह्यी म्हनजे पंचाईतच हाये!!!
काय हो? कसली पंचाईत?
आरंच्चा!! कोन हो तुमी? काय वळख नाय देख नाय आनी लागले सवाल-जबाब कराया!!! काय रामराम वगैरे करायला येतं का न्हाय?
हो, हो, चुकलं! राम राम!!!
हां आंगाश्शी!! आमचा बी जय म्हाराष्ट्र!!! आता बोला...
बोला काय बोला? अहो कसली पंचाईत झालीये तुमची?
पंचाईतच नाय तर काय? एकीकडं कुनी जरा णिषेध क्येला तर त्याला चपल्या घाल आन चालू पड म्हनायचं आनी दुसरीकडं आसले आगलावे बोर्ड लावायचे, ह्ये काय बराबर हाय काय?
आगलावेपणा कसला? साधी सरळ घोषणा आहे ती!!!
साधी आन सरळ? मिपावरच्या आमच्या भगिनींना चांदन्या म्हनायचं हे काय आपल्याला पसंद पडल्यालं न्हायी!!
अरेच्चा, अहो पण त्यांनी मिपावरच्या स्त्रियांना कुठं चांदण्या म्हटलंय? ते अवांतर प्रतिसाद पकडून देणार्यांना चांदण्या देणार असं म्हणतायत!
त्ये खरं, पन कोनत्या भगिनीनं सर्वात जास्त चांदण्या मिळवून आपलं मुख मिपाच्या पृष्ठावर चमकावलं तर इतर मिपाकर तिला काय म्हननार सांगा की!!!
अहो पण त्याला त्या स्त्रीची हरकत नसेल तर?
तुमी शहराकडले वाटतं? आवो तिची लाख हरकत नसेल, पन आमची हाय ना!!! आमच्यात आसल्या गोष्टी बायकांना विचारून ठरवायची रीत न्हाय!!! व्हटावर या मिशा काय वगीच बाळगल्यात काय?
असं होय! पण बघा आपल्या मिपावर किती बर्यापैकी साहित्य येतं...
बर्यापैकी? आयला तुमी छुपे नमोगती तर नाय ना? च्यामारी मला सौंशय व्हताच!!!
अहो नाही, मी अस्सल मिपाकरच आहे हो!!!
न्हाय, "बर्यापैकी" हा शब्द वापरलांत म्हनून इचारलं!!! हिथं मिपावर काहीच "बर्यापैकी" नसतं राव!! हिथं समदं कसं हुच्च आनि गगनभेदी तरी आस्तंय नायतर येक्दम रंपाट इनोदी म्हंजी ठ्यांऽऽऽ करून काफी उडीवनारं आस्तंय!!!!
बरं, आणखी काही?
हां, तसं थोडं हीन आणि हिनकस पन आस्तंय...
खी, खी,खी!!!!
उगीच दात काढून हासू नका, हिनकसराव दात उपटून हातात देत्याल!! आवो म्हेनत करून मिळवल्याली शैली हाय ती!!!! सवता मालकांनी लंगुटी आन ताडगोळा देऊन सत्कार केलाय त्येंचा, काय समजलांत!!!
बरं, बरं नाही हसत! पण ते जाऊद्या, तुमची काय पंचाईत झालिये ते सांगा ना राव?
पंचाईत नायतर काय? हिथं अवांतर मेंबरं पण शेकडोंनी हायेत तर अवांतर प्रतिसादांना काय तोटा?
तेच म्हणतो मी!! अहो अगदी सोपं आहे. येणारे सगळे प्रतिसाद वाचायचे (मूळ लिखाण वाचलं नाहीत तरी चालेल!!), त्यातले अवांतर प्रतिसाद बाजूला काढून ते मालकांना गुपचूप कळवायचे आणि लग्गेच चांदणी मिळवायची!!! आहे काय त्यांत!!! आता लागा बघु कामाला....
आमाला जमनार नाय.....
का जमणार नाही?
आमाला पावर नाय....
तुम्हाला पॉवर नाही? म्हणजे तुम्हीच मिपाकर नाही?
तुझ्या आयला तुझ्या!!! म्या मिपाकर न्हाय तर काय उपक्रमी वाटलो काय रं तुला फोकलीच्या? आयला, हा बिल्ला बघ लंबर ४०१ हाय आपला!!! तुला तव्हां ल्ह्या-वाचाया तरी येत व्हतं का रं फोकलीच्या!!!!
मग तुमचा प्रॉब्लेम तरी काय आहे?
सांगिटलं ना, आमाला पावर नाय!!!!
अहो पण का?
आमी आदीच घरात येक चांदनी आनून ठेवल्याली हाये. आता नवीन चांदन्या गोळा कराया लागलो तर ती आमाला घरात ठिवून घील का? आन भुकेचं सोडा, कट्ट्यावर मिसळपाव खाता यील, पन रातच्याला निजायला काय तात्या तेच्या घरात जपानी गादी घालून देनाराय का?
अस्सं होय!!
मंग! न्हाय ते पालथे धंदे कराया कुनी सांगिटलेत? आपल्याच्यानं जमायचं न्हायी!!
बरोबर आहे तुमचं!
तर काय!! आपुन जातो बाबा आपल्या घरला!! आलो गं शेवंत्ये, आलो बिगीबिगी.......
:)
(संपूर्ण)
(आभारः पुलंचे पावरबाजपणासाठी!)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6235
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहो अगदी
खुर्चीवरून पडलोय
काका दंडवत!!
हास्यकल्लोळ!!!
लेख मस्त!
'चांदण्यात
In reply to लेख मस्त! by रेवती
काकानु,
+१
In reply to काकानु, by घाटावरचे भट
_/\_
In reply to काकानु, by घाटावरचे भट
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
असेच.
In reply to काकानु, by घाटावरचे भट
हा हा हा
++++++++++१
In reply to हा हा हा by केशवसुमार
हा हा हा लई ब्येस!!
निवेदन
वा छान...
In reply to निवेदन by पिवळा डांबिस
वा...
In reply to निवेदन by पिवळा डांबिस
काका,
लै
हा
हेहेहेहे
अरे आज काय
एक नंबर
श्रावण
(विषय दिलेला नाही)
झकास!!
:)
___/\___ आपण
सवता