धान्दल.. गडबड ......आणि सुटका (भाग १ ??)

आपला आभि's picture
आपला आभि in जनातलं, मनातलं
10 Mar 2008 - 7:42 am

१४ सप्टेबर २००२ ..महाविद्यालयीन जीवनातिल दुसर वर्ष.. (वेळ आणि वर्ष दिल्यामुले लेखास भारदस्त पणा येतो .. तुम्ही टेन्स होऊ नका ..वाचा .वाचा ) आम्हि नेहमीप्रमाने काही बोधपर (? जाणकार लोकास अधिक सान्गणे नलगे..)चित्रपट पहात आमच्या सन्गनकासमोर बसलो होतो. चित्रपट अगदी रन्गात (अनुस्वार कसा द्यायचा हो ? ) आला होता. आमच्या काहि मित्रानि चित्रपटापासुन प्रेरित होऊन सुचक हालचालि चालु केल्या होत्या. आत आत शिरणार्‍या गुदगुल गप्पा चालू होत्या.. सर्वजन आपापले ज्ञान भाण्डार उघडून बसला होते. (काय ज्ञान असत एकेकाच हो .. !!!!)
आणि अचानक घात झाला.( चु़क! चुक!! करू नका .. गुदगुल गप्पा डिटेल मध्ये लिहायला काहि माझी ना नाही ..पण काय करनार मराठी लेख आहे.. विन्ग्रजी नावेल नाहि ...ठिक आहे लेखास नाट्यपुर्ण वळन देतो...हे घ्या ) कुणितरी दरवाजा उघडाच ठेवला होता. त्या दरवाज्यातुन आमचे दुश्मन खानावळी 'फेमस' मामा नी प्रवेश केला. आणि आमची लागली. (खानावळीचे बिल महिने न महिने न भरता तुडूम्ब जेवून मामाच्या खान्द्यावर हात टाकुन बोलन्या इतके अजून आम्हि अजून काही सराईत झालो नव्हतो.. ) मामा आत प्रवेश करत होते. आणि काहिजण सन्गनकाच्या कळफलक शोधायला धावले. पन आम्ही कशाला मध्ये कटकट म्हणून बाजुला कोपर्‍यात सारला होता. उन्दिर नियंत्रकाचि धान्दल उडाली. तेवढ्यात कुनाच्यातरि रिकाम्या डोक्यात कल्पना सुचली आणि रणांगनात बाजिप्रभुनी तलवार फिरवली त्या चपळाइने त्याने संगनकाचा (अनुस्वार सापडला रे ..ओबो .बो..बो.) वीजपुरवठा तोडला (काय ? माहित नाहि वीज पुरवठा कसा तोडतात ते ? बिल न भरून बघा मराविमचे ..बघा कसे येतात घर शोधत शोधत ..) ...शांतता .. सगळे चुपचाप.. सगळे बन्द झालेल्या मॉनिटर कडे डोळे भरून (कौतुकाने!!!) पाहताहेत..मनामध्ये त्या वीरबद्दल अतीव भावना दाटुन आलेल्या.. आला प्रसंग त्याने निभावुन नेला होता ...
मामा आता पूर्ण आतमध्ये..सगळे पुन्हा एकदा मॉनिटर कडे टक लावून बघत आहेत.
मामा येवून चांगली पाच मिनीटे झाली. कुणी मामांना ओळख दाखवायला तयारच नाहि ..सगळे अगदी समोर बघतायेत...
आणखी दोन मिनिट थांबून मामा फुटले...
" कारे पोरानो..... ह्या साठी तुम्हाला इथे शिकायला ठेवलं आहे का ? एकतर अभ्यास करत नाहि आणि मेसचं बिल पण भरत नाहि" (काय संबंध ?)
... अरे बापरे कळल कि काय ? तरी मी शक्य तितका मामा आणि मॉनिटर च्या मध्ये यायचा प्रयत्न केला होता.
एकजण म्हणाला " कुठ काय मामा .. ह ह ह्ह (असच काही तरी हसतात अशावेळी) ..असच्च..बसलोय .. गप्पा मारत ".
"आणि बन्द टि व्ही समोर बसून काय करताय ?? "(हात्तिच्या..एवढच ना ..थांबा कारण फेकतो..म्हनजे सान्गतो).
आता ह्याना किती वेळा सांगायच की हा टि व्ही नाहि...जाउदे... मरूदे...आधि कारण फेकतो..(हाण सावळ्या .. लढ ..लढ..)
"अरेच्च्या बंद झाला काय? कळलच नाहि बघता बघता....थांबा पुन्हा चालु करतो... अरे टिव्ही लाव रे .. मामांना टिव्ही बघायचाय.. बसा मामा.."
"बर बर ..मी बसायला आलो नाहि .. बिल कुणि कुणि भरल नाहि इथे ते सांगा लवकर मला सगळी कडे चक्कर मारायची आहे.."

आणि एकदाचे मामा कटले.. पुढे पुढे मामा आमच्या कडे येऊन आमचा टिव्ही (??) बघन्या इतकी आमची सलगी झाली.
पण हा प्रसन्ग आठवला कि अजून हसू येत ..(असं म्हणायच असत लेखाच्या शेवटी. --पु ल नावाच्या एका होतकरू लेखकाला पण मी हाच सल्ला दिला होता .. हुश्य करू नका अजून लेख बाकि आहे...)

मंडळी तुमच्या पण आयुष्यात असे प्रसन्ग आले असतिल.. तुमची पण अशीच लागली असेल कधीतरी.. तुमच्या प्रतिसादांची वाट बघतो आहे.. (दुसर काम काय आम्हाला..ही ही)

मिपा वर प्रवसवलेल हे पहिलच लाडकं लेकरू .. (म्हणजे पहिला लेख हो..).. तुमच प्रेम आनि कवतिक मिळाल तर दुसरा भाग उपसायला आम्ही मोकळे...इथे नियोजन नाही..

हा लेख या ओळीपर्यन्त वाचनार्‍या वाचकांच्या सहनशक्तिचे कौतुक करून माझे लाडके कवतिक इथेच संपवतो ...(बघा ...इथपर्यन्त वाचाल तर फुकट कौतुक मिळेल....)

आपला
आआआभि...

प्रतिक्रिया

स्वाती राजेश's picture

10 Mar 2008 - 6:25 pm | स्वाती राजेश

पहिल्या लिखाणाच्या मानाने फार छान लिहिला आहेस.
एकजण म्हणाला " कुठ काय मामा .. ह ह ह्ह (असच काही तरी हसतात अशावेळी) ..असच्च..बसलोय .. गप्पा मारत
असे गमतीदार प्रसंग आपल्यावर खूप वेळा ओढवतात.

मी पाचवीत असताना एक दिवस शाळेला दांडी (खोटे सांगून)मारली होती आणि माझ्या भावाने शाळेत टीचरना सांगितले की, बहीणीला ताप आला आहे ती शाळेला येणार नाही.
त्याच वेळी दुपारी मस्त पैकी हिंडत होते तेव्हा सरच रस्त्यावर भेटले आणि विचारले ताप आला आहेस तर कशाला हिंडतेस? मग माझी पंचाईत झाली पण मी( त्यावेळी सुचले ते) सांगितले कि औषध आणायलाच निघाले आहे..हुश...
काय प्रसंग होता..

भाग २ ची वाट पाहात आहे....

सुधीर कांदळकर's picture

10 Mar 2008 - 9:29 pm | सुधीर कांदळकर

तीर्थरूपांची अति कडक शिस्त असे. हसणे, वायफळ बोलणे नाही. विनोद पूर्णपणे वर्ज्य. त्यामुळे आम्ही त्यांना अयूबखान (पाकिस्तान्चे ६५ च्या युद्धावेळीचे अध्यक्ष)नाव ठेवले. आजुबाजूची मुले घरात घुसण्यापूर्वी अयुबखान आहे का म्हणून विचारीत. एकदा संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास चुकीच्या मुहूर्तावर एक मूर्ख आला व विचारले अयूबखान आहे का? दुर्दैवाने त्याच्या मागोमाग अयूबखान येऊन उभे होते. काही वर्शांनी नंतर हे नाव बदलून खोमेनी असे ठेवले.

इनोबा म्हणे's picture

11 Mar 2008 - 1:26 am | इनोबा म्हणे

एकदा संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास चुकीच्या मुहूर्तावर एक मूर्ख आला व विचारले अयूबखान आहे का? दुर्दैवाने त्याच्या मागोमाग अयूबखान येऊन उभे होते. काही वर्शांनी नंतर हे नाव बदलून खोमेनी असे ठेवले.
अयूबखान आणि खोमेनी ही दोन्ही नावे आवडली बरं का!

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

छोटा डॉन's picture

10 Mar 2008 - 10:00 pm | छोटा डॉन

तर आ आ आ भी [ आली का आठवण ? कुणाची ते सांगण्याची गरज नाही ....]

चांगले लिहले आहे. चालू दे. मला वाटते की आपण आपापले अनुभव "डिस्कस" करून एक नविन लेखमालाच बनवावी ....
लै लिहण्यासारखे आहे ...
भाग २ लवकरच येऊ दे .........

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

वरदा's picture

10 Mar 2008 - 10:07 pm | वरदा

मला तर एकदा दांडी मारल्याची चिठ्ठी लिहून आईची सही करताना पकडलं सरांनी..मग मारल्या बर्‍याच बंडला..आई मावशीकडे गेलेय बाबा लवकर ऑफिसला गेले वगैरे वगैरे..आणि संध्याकाळी बाजारात जात होते आईसोबत तर सर समोर दत्त म्हणून हजर... नशीब मी आईला आधीच माझी थाप सांगितली होती ती म्हणाली मी आत्ताच आले म्हणून पण मी तोपर्यंत असली घाबरले होते.....

भडकमकर मास्तर's picture

11 Mar 2008 - 1:13 am | भडकमकर मास्तर

बाप रे... चांगलय.... :))

आपला आभि's picture

11 Mar 2008 - 5:48 am | आपला आभि

माझा लेख पुर्ण वाचन्याचे धाडस करनार्‍या वीरांना आणि वीरांगनांना (मिपा वाले तात्या बरोबर आहे ना शब्द ?... आणि 'ladies first' का नाहि ? म्हणून समस्त आखिल भारतीय भगिनि वर्ग मिपा शाखेने डाफरू नये!!! इवलासा जीव घाबरतो ना.. तुम्हाला पहिल्यांदा लिहीन पुढच्या वेळी.. ) माझा साष्टांग नमस्कार!!!
.. काय धाडस आहे तुमच. मी पण लिहून झाल्यावर वाचला नाही परत.. ''आता त्यावेळी तुम्ही वाचन्याच्या अवस्थेत होता का ?' असे म्हणून आमचे काहि हितशत्रु आमच्या पायात पाय घालायला पुढे धावतिल ..पण आम्ही फिकीर करत नाही.. काय करायचय तुम्हाला.. आम्हि चालन्याच्या पण अवस्थेत नव्हतो. झाल समाधान? काही काही लोकांना दुसरा किती 'out' होतो आणि आपण किती 'control' मध्ये असतो यातच लै म्हन्जी लै 'interest'.. यावर कधीतरी चर्चा घडवून आणूयात.. मि पा वर सुध्दा या विषयात बरेच जातिवन्त लोक आहेत..हे आमच्या चाणाक्ष नजेरेने बराबर वळखलंय बरका!! (लब्बाड कुठले..)

तर हा पाहिला थेंब पचला ..मग आता पाण्याची धार लावायला हरकत नाहि. धार म्हणजे 'पहिली धार' नव्हे.. लेखनाचि धार हो...धार वरून डॉन आणि समस्त मंडळींच्या डोळ्यात आलेली चमक आम्हाला इथून पण दिसली पण तुर्तास आम्ही ती तहान काही भागवू शकत नाहि....

तर असो ..
आपल्या सेवेशी
सदैव आपलाच
आआआभि..

विजुभाऊ's picture

11 Mar 2008 - 11:29 am | विजुभाऊ

आम्ही एकदा दहावीत असताना(एकदाच होतो) कोणालातरी एका सरानी बेदम बदडला म्हणुन आम्ही संप केला होता.
शाळेच्या बाहेर सगळेउभे होतो...कोणीच शाळेत आत जायला तयार नव्हते.
शाळेचा शिपाइ सर्वाना बोलावुन गेला....मग एन्ग्लिश चे सर येउन गेले..कोणी ऐकत नव्हते.
मुख्याधापकंनी मग रामबाण उपयवापरला....शेव्टी त्यानी आण्णा कंग्राळकराना पाठवले....त्यानी त्यांच्या खास कमावलेल्या अवाजात सर्वाना बोलावले....तरिही आम्ही सारे बाहेरच ......मग त्यानी चन्दु नावाच्या मुलाला पकडले...त्याला वैयक्तिक विचारले..........शाळेत का आला नाहीस म्हणुन ....चन्दु ...फट्कन म्हणाला...मी आज शाळेत आलोच नाही...घरी झोपुन आहे"..............

विसोबा खेचर's picture

11 Mar 2008 - 11:53 am | विसोबा खेचर

अजूनही येऊ द्या...

तात्या.

धमाल मुलगा's picture

11 Mar 2008 - 12:01 pm | धमाल मुलगा

>>मग त्यानी चन्दु नावाच्या मुलाला पकडले...त्याला वैयक्तिक विचारले..........शाळेत का आला नाहीस म्हणुन ....चन्दु ...फट्कन म्हणाला...मी आज शाळेत आलोच नाही...घरी झोपुन आहे"..............

हा हा हा...आयला, इब्लीस न॑बर वन दिसतोय च॑दू. मग आण्णाची पार भि॑गरी का?

आआआभि,
काही कारणा॑मुळे प्रतिसाद देण्यास उशीर घडला, पण तोपर्य॑त वेळ निघून गेली होती, पण बेष्ट लिवलय भौ! आमचे जुने दिवस आठवले.

सुधीरकाका,
आयुबखान आणि खोमेनी का? वा वा...
आमच्या घरी जिल्ले-इलाही, आलमपनाह, खावि॑द इ.इ. मुघली अ॑मल असतो :) आणि मी अगदीच आबा॑ना छळायच्या मुडमध्ये असलो की 'तात् '...लै भडकतात.

विसोबा खेचर's picture

11 Mar 2008 - 12:11 pm | विसोबा खेचर

आआआभि,
काही कारणा॑मुळे प्रतिसाद देण्यास उशीर घडला, पण तोपर्य॑त वेळ निघून गेली होती, पण बेष्ट लिवलय भौ!

हेच म्हणतो...

तात्या.

ईयत्ता ८वी अ........इतिहासाचा तास (तास म्हणजे ४५ मि.) आल्या आल्या गुरुजींनी सगितलं की शास्त्राचे जोशी सर येणार नाहीत, आणि मीच सलग दोन तास घेणार आहे..............आता लागली का.........आमची गृहपाठाची वही घरी विसरलेले, (दप्तरात असूनही) अर्थत गृहपाठ न केल्याने. कुणास ठाऊक काय झालं आणी सुर्य पश्चिमेला ऊगवला, सरांनी काहिही शिक्षा न करता सोडून दिलं व सांगीतलं पुढच्या तासाला घेऊन या. ते जाम शिकवायच्या मुड मधे होते.

तास सुरु झाला. मी पुस्तकातली चित्र रंगवुन झाल्यावर पेंगायला सुरवात केलेली पण्.........मागच्या बाकावर खसखस पिकत होती. झोप खाडकन ऊडाली, पुढं लक्ष लागेना, मग हळूच बाक बदललून ईष्ट मित्रांच्यात गेलो.
खरा घोळ तर पुढे चालू होता, सरांना ऐका वाक्यात ४/५ वेळा 'की' म्हणायची सवय होती आणि आम्ही ते मो़जत होतो. सेंच्युरी झाल्या वर दि़क्षितांना (वर्ग-मित्र) आवरलच नाही..........हात वर करुन मला सांगीतलं " १०० वेळा झालं". ईथेच सरांनी पाहीलं................त्यांनी मागेयेऊन आम्हाला सदिछा भेट दिली, थोडा सत्कारही झाला.
सरांनी आमच्या वह्या तपासल्या, त्यात मागच्या पानावर रोमन गणन पध्द्तीने (चार उभ्या रेघांवर ऐक आडवी रेध) आशा फक्त रेघोट्या होत्या. या वर त्यानी प्रश्ण केला " काय कैदी आहात काय ? हे काय चाललंय ? काय, कसले दिवस मोजतय ? " आमच्यावर काय गुजरली होति हे सांगायला नको. पण बाकावर ऊभेराहून आम्ही ऊत्तराच्या विचारांनीही हसतच होतो.

खोडसाळ (आर्य)