Skip to main content

सकाळ वृत्तपत्राचे अनेक आभार..

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 18/07/2009 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मायबाप मिपाकरहो, आजच्या सकाळ वृत्तपत्रातील कवडसा या सदरात मेधा कुलकर्णी यांचा आपल्या मिपाबद्दल विस्तृत माहिती देणारा लेख आला आहे. सकाळसारख्या आघाडीच्या वृत्तपत्राने मिपाची आवर्जून दखल घेतली, त्याकरता पत्रकार मेधा कुलकर्णींचे आणि सकाळ वृत्तपत्राचे मी व्यक्तिश: तसेच समस्त मिपा परिवारातर्फे आभार मानतो.. तात्या.

वाचने 25031
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

मिपा स्थापक तात्या अभ्यंकरांचे आणि ते चालवण्यात हातभार लावणार्‍या संपादक/प्रशासक/तंत्रज्ञ मंडळींचे!! हे संस्थळ उत्तरोत्तर अधिक बहरो, अधिक सुजाण होवो ही सदिच्छा :) (मिपा प्रतिष्ठानाची उत्सुकतेने वाट पाहणारा मिपाकर) विंजिनेर

तात्या,निलकांत आणि संपादक मंडळाचे हार्दिक अभिनंदन. तात्या तुमचे आभार - स्वतःची पदरमोड करून आम्हाला मिपा उपलब्ध करुन दिल्या बद्दल. फादर्स डे, मदर्स डे सारखा तात्याज डे सुरु करायला हवा मिपावर :) मोहन जाता जाता- आण्णा चिंबोर्याच्या सुचनांचा जरा विचार करा. अशा शिव्या आल्या की मिसळीत खडा आल्यासारख वाटत. #:S

अरे वा!!!!! तात्या व समस्त मिपाकरांचे हार्दिक अभिनंदन! (आनंदीत) ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

अभिनंदन तात्या आणि निलकांत आणि मिपा परिवाराचे!

तात्या, नीलकांत आणि समस्त मिपा परीवाराचे मनःपुर्वक अभिनंदन! ही बातमी वाचून खूप आनंद झाला! "ऐनी वे यु डिसर्व धिस ऑलवेज" मिसळाभिमानी.....

तात्या, नीलकांत तुमचे हार्दिक अभिनंदन.... :) (मिसळपावप्रेमी)सागर

=D> तात्या , समस्त मिपा मंत्रिमंड्ळ आणि मिपा सदस्यांचे मनापासून अभिनंदन

व्वा तात्यासाहेब. एकदम सिक्सर मारली कीं तुम्ही! या बातमीचे कटिंग कृपया मला स्कॅन करून पाठवाल का? धन्यवाद, सुधीर काळे