Skip to main content

हे पुस्तक कोणाकडे मिळेल का??

लेखक नानबा यांनी शुक्रवार, 17/07/2009 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. फार फार वर्षांपूर्वी जी. ए. कुलकर्णींनी लिहीलेलं "बखर बिम्मची" हे पुस्तक माझ्याकडे होतं. एकदा कुणीतरी सहज म्हणून वाचायला नेलं ते परत आणून दिलंच नाही. अतिशय अप्रतिम आणि मनःस्पर्शी पुस्तक आहे. आणि दुर्दैवाने सध्या कोणत्याही विक्रेत्याकडे ते उपलब्ध नाही. कोणाकडे ते आहे का? मी छायांकित करून घ्यायला तयार आहे. अथवा मला pratham.phadnis@gmail.com वर आपली माहिती पुरवल्यास मी संपर्क करेन.

वाचने 2028
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

मध्यंतरी जी.एं. च्या पुस्तंकांच्या नवीन आवृत्ती निघाल्या होत्या. त्यावेळी 'बखर बिम्मची' हेही बघितल्यासारखे वाटते. पुण्यात अप्पा बळवंत मधे 'पाटिल एंटरप्राइझ' मधे चौकशी करुन बघा. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर

माझ्याकडे आहे. मी तुम्हाला देईन. माझे ऑफिस नवी पेठ, पुणे येथे आहे. तुम्ही कसे येऊ शकाल ते कळवा, त्याप्रमाणे मी माझा संपूर्ण पत्ता देईन.