Skip to main content

दुर्गा भागवतांचे 'वॉल्डनकाठी विचारविहार' ह्या पुस्तकाविषयी चौकशी

लेखक राकेश वेंदे यांनी शुक्रवार, 17/07/2009 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मला दुर्गा भागवतांचे 'वॉल्डनकाठी विचारविहार' हे पुस्तक वाचायचे आहे. हे पुस्तक कुठल्या ग्रंथालयात किंवा दुकानात मिळेल? ह्या विषयी माहिती हवी आहे. धन्यवाद.

वाचने 3104
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

In reply to by नंदन

मि पुण्यालाच राहतो, रसिक मध्ये ते पुस्तक नाही आहे. पुस्तकाचे योग्य नाव 'वॉल्डनकाठी विचारविहार' आहे हे सांगितल्याबद्द्ल हि धन्यवाद.

पुणे मराठी ग्रंथालयातून आणून मी हे पुस्तक वाचायचा प्रयत्न केला होता :) (पुणे मराठी ग्रं. पत्र्या मारूतीजवळ आहे.) पुस्तकातले विचार मननीय ! -- लिखाळ.

राकेश,नंदन व लिखाळ ह्या पुस्तकाबद्दल अजुन माहिती वाचायला आवडेल. कोणत्या विषयावर आहे वगैरे.. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

In reply to by अभिज्ञ

हेन्री डेविड थोरो ह्यांच्या ‘वॉल्डन; लाइफ इन वूड्स’ ह्या कांदबरीचा मराठी अनुवाद आहे. ह्या विषयी अधिक माहिती येथे वाचू शकतात

In reply to by राकेश वेंदे

ओरिजिनल वॉल्डन माझ्याकडे आहे, नितांतसुंदर पुस्तक आहे. ते लॅंड्मार्कमधे २ महिने आधी बघितल्याचे स्मरते. गेल्या दिवाळी अंकात (कुठल्या ते आठवत नाही, बहुदा मौज) अनिल अवचट ह्यांनी ह्या पुस्तकावर लिहिले होते.

थोरो हा एकोणिसाव्या शतकातला विचारवंत. वयाच्या तिशीत, शहरापासून दूर वॉल्डन नावाच्या तळ्याकाठी काही वर्षे जाऊन राहिला होता. तिथल्या रहिवासाचे, चिंतनाचे त्याचे 'वॉल्डन' हे पुस्तक दुर्गाबाईंनी मराठीत आणलं.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी