सुख म्हंजे नक्की काय आसत

ब्रिटिश's picture
ब्रिटिश in जनातलं, मनातलं
15 Jul 2009 - 4:28 pm

सुख म्हणजे पैसा, श्रीमंती
वगैरे वगैरे .... ईती सर्व उद्योगपती ...

सुख म्हणजे आध्यात्म
ध्यान केल की मनशांती मीळते.
वगैरे वगैरे .... ईती सर्व सादूबाबा

"ये आये ! मी शिर्‍याबरूबर मूंबयला जाव ?"
शिर्‍याची थोरली भन मूंबयला दिल्ती. भावजी पोस्टमन व्ह्ते. खारपाड्यान त्यांचा लय रुबाब. शिर्‍या सुट्टीत दोन दिसांसाटी चाल्लावता. मीनी मूंबय कदीच बगीतली नवती. शिर्‍यान ईचारल तसा सूसाटलु.
"आर यकटा नको जाव त्या शिर्‍याबरूबर. तू ल्हान हाईस आजुन." आय
"ल्हान कना? ल्हान कना? आता त आटवी पास झालो न नव्वीत झेलो न?"

"म्हुन क झाला र ?तू जाव नको बाला. तीकर ट्रेन फिरतान जोरजोरात."
"आगं त्या कय रस्त्याव येतान आपल्यामाग ? त्या फिरतान रूलावरशी." मी
"तु माज डोक खाव नको. बा ला ईचार जा." आय.

हो नाय करता करता आयनी परमीशन दिल्ली. ५० रुपय हाताव टेकवल. दुसर्‍या दीवशी सकालची यस्टी पकरली. पयल्यांदाच जात व्हतो. आंगात कायतरी व्हईत व्हत.
चेंबुर क काय तीकर ऊतरलो न डबलबस पकरली. डायरेक ईक्रोली.
बस मदना ऊतरलो. शिर्‍या म्हनला चल वडापाव खाउ. टपरीव गेलू. शिर्‍यान दोन वडापाव सांगतले.

"शिर्‍या, मना ते हव."
"आर ते म्हंजे क र बाला?"
"ते रं , तो जाड्या खातोय त बग."
"तेला क म्हंतात र?"
"मना क म्हाईत?"
"तूला पायजेल ना ? मग मी मागवत बग."

"भैयाजी , वो देव." शिर्‍या.
"वो क्या ?"
"वो जाड्या खाताय ना वो पोला देव."
"ऊसको डोसा बोलते बाबा. किदरसे आया ?"
"तूमको क्या करनेका रं. वो डोसा देव दोन प्लेट चुपचाप". शिर्‍या वरडला.

डोसा खाताना लय मजा आली. मग वडापाव पन खाल्ला.पैशे शिर्‍यानच दिल्ल.

तीतना डायरेक कन्नमवार नगर मदे. रुम नं ३२३, तीसरा मजला. दरवाज्याव यक बटन व्हत ते शिर्‍यान दाबल. दार ऊगडल. हेमा व्हती. शिर्‍याची थोर्ली भन.
"आर मिथन्या बी आलाय रं ! ये ये आत ये."

आत गेलो. येक खाट, शो केस मदी टीवी आन प्ल्यास्टीक ची खूर्ची, दोन पावल फुड गेलो दूसरा रुम. आत ग्यासच टेबल, मोरी. घर संपल.
तिज्याआयला हा शिर्‍याचा भावजी खारपाड्याला आल्यावर फ्याक्टरी आसल्यासारका वागतो ? आसुदे. आपल्याला क त्याच. आपुन आज त्याजे कर आलेल हाव. त्याजेबद्दल वाईट्साईट बोल्ता कामा नय.

पोरांना पार्ले बीस्कीट चे पूडे आनलेवते ते दिल्ले. पोर खुश. पोरांशी खेलताना दूपार कदी झाली कल्लच नाय.
"या रे जेवाला या."

हेमा नी मटन केलवत नी चांदलाच्या भाकरी. मटन लय टेस्टी जालवत. जाम खाल्ल. उटाला पन जमत नवत. तोंड धवल न दोगांनी खाटेवर आंग टाकल.
मना क झोप येईना. सारकी कुस बदलत व्हतो. पन काय बी फरक पडत नवता. शेवटी शिर्‍याला ऊटवला. शिर्‍या, हागाला लागलीय. शिर्‍या धडपडत उटला.
" कना खाल्ल र येवड मटन ? चल भायेर. ते चींपाट झे पानी भरून."

मीनी पींपातल पानी चिंपाटात भरल. "ये हिकर" . शिर्‍या तिन चार खोल्या सोडून यका खोलीपाशी थांबला. ह्याच्यान जा आनी आटपुन ये.
"हे कोनाच घर हाय ?घरान कस बसाच?"
"आर ह्याला संडास म्हनतात. सगली लोका ह्याच्यानच हागतान."

हे आसल काय खारपाड्यान नवत. सरल सकाली ऊटाचा न खाडीवर पलाचा. चींपाट नाय न काय नाय.
बगाव ते नवलच व्हत. मीनी दरवाजा ऊगडला आन गेलो. वासान ऊलटीच आलीवती पन केली नाय. कसातरी बसलो. शिर्‍या गेला. पाच मीन्ट झाली पन कायव हुईना. कुंथाला लागलो. पोटाला त तडस बसलीवती. आता क कराच? थोडा जोर लावनार येवड्यात दरवाज्याव थाप पडली.
"कोण आहे रे आत ? शिचं किती वेळ झाला ?"
"मी हाय मीथन्या. " मी आतून बोल्लो.
"आरे कीती वेळ झाला ?आटप लवकर नाहितर परत भुक लागेल."

जल्ला काय कल्लाच नाय मना. पन दूसर्‍या कोनाला तरी जोराची लागलीय न तो बोंबलतोय यवड समझल. तसाच भायेर आलो.
पोटात आता कला माराला लागल्यावत्या.
आयझवली लागोपाट तीनदा गेलो संडासात पन कायव हुईना (सोताशिच : सारक सारक क र बाझवला ? आन तो बी यकटाच ? ).

रात झालीवती. शेवटी शिर्‍यान बॅटरी झेतली मना म्हनला चल. तेच्या पाटोपाट नींगालो पोट धरून. जीना ऊतरलो बिल्डिंगच्या पाटीमागे गेलो. नाला लागला. अंदार व्हता. शिर्‍या म्हनला बस हीत आन कर. बसलो.
दोन मीन्टात फॉककन आवाज आला न मी मोकला झालू.
तूमाला सांगतो स्वर्गसुख, आत्मशांती वगैरे कायकाय म्हन्तात ना ते सगल मना येकाच टायमाला झाल. सगल मानन्यावर हाय की.

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

15 Jul 2009 - 4:43 pm | चतुरंग

जबराट रे ब्रिटिसभाऊ! क लिवलंय क लिवलंय!! लई दिसानी जोराची येंट्री मारली कं!!!
मंग तुजं नाव 'शौचानंद म्हाराज' ठिवलं कारं शिर्‍यान!! ;)

(मोकळा)चतुरंग

बेसनलाडू's picture

16 Jul 2009 - 12:58 pm | बेसनलाडू

जबराट रे भाव! रंगाशेठचा परतिसाद पन जबर्‍या!
(जबर्‍या)बेसनलाडू

लिखाळ's picture

15 Jul 2009 - 4:43 pm | लिखाळ

मस्त ! :)
चांगले आहे.
सुखाचा मार्ग 'पोटातून' असतो असे मान्यवर म्हणतात ते खोटे नव्हे ! ;)

-- लिखाळ.

सुनील's picture

15 Jul 2009 - 4:55 pm | सुनील

बर्‍याच दिवसानी लिहिलत? मस्त कथा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सूहास's picture

15 Jul 2009 - 6:20 pm | सूहास (not verified)

क लिव्हलय र !!!
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
~X( ~X( ~X(

हाण तिच्यामायला....

वेलकम बॅक...

सुहास

विनायक प्रभू's picture

15 Jul 2009 - 6:31 pm | विनायक प्रभू

पोटाला कलचरल शॉक झाला.

ब्रिटिश's picture

17 Jul 2009 - 11:03 am | ब्रिटिश

>>>पोटाला कलचरल शॉक झाला.
नंतर सर्गसुखाचा फॉक झाला

यंदाची गटारी सगल्यांना नशेची, धूंदीची , फुल टु टून करनारी जावदे.
नशापती मिथयनराजे भोईर

प्रकाश घाटपांडे's picture

15 Jul 2009 - 6:35 pm | प्रकाश घाटपांडे

माला सांगतो स्वर्गसुख, आत्मशांती वगैरे कायकाय म्हन्तात ना ते सगल मना येकाच टायमाला झाल. सगल मानन्यावर हाय की.

व्हॉट अ रिलिफ! कस मोकळ वाटत. लईच घाईची लाग्ली आन अदुगर कुनी आतम्दी असन तर श्रीकृष्नावानी पावा वाजवताना पाय कर्तो त्यावानी हुभ -हायच.कवा यकदा दार उघडतय आन आत जातुय. यकदा का दार उघाडल कि मंग आत गेल्यावर व्हॉट अ रिलिफ
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मदनबाण's picture

15 Jul 2009 - 6:52 pm | मदनबाण

बाल्या लयं दिसान लिवलस रं तु,पन यकदम झ्याक लिवलय बघ,
मला बी एक चित्र गावल हाय तुझ ह्यो समद वाचुनश्यान,


(फोटु जालावरुन साभार)
मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

हरकाम्या's picture

15 Jul 2009 - 10:41 pm | हरकाम्या

<strong>लेका मदन्या लै झ्याक, ह्यो फोटु तुले कुट गावला ??????

घाटावरचे भट's picture

15 Jul 2009 - 7:32 pm | घाटावरचे भट

हा हा हा.... जबराट!!
लै दिवसानी मिथुन काशिनाथ भोईरांचे कारनामे वाचून मजा आली.

टारझन's picture

15 Jul 2009 - 8:01 pm | टारझन

=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))

मस्त रे !

धमाल मुलगा's picture

15 Jul 2009 - 8:03 pm | धमाल मुलगा

परत इलंस? बरां वाटलां रं! मना वाटला तू आता काय लिवायचा नायस! आमच्यावर भरकून ग्येला :)

तूमाला सांगतो स्वर्गसुख, आत्मशांती वगैरे कायकाय म्हन्तात ना ते सगल मना येकाच टायमाला झाल. सगल मानन्यावर हाय की.

=)) =)) =))

च्यामायला,
हे जग आहे हे असं आहे बघा, कुणाला कुठं, कसा, कधी काय दृष्टांत/साक्षात्कार घडेल काऽऽही सांगता येत नाही!!!

चींपाटधारी मिथन्याबाबा क्की.....(फॉक्कन) ज्जय!! :D

----------------------------------------------------------------------------------------
एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी ||
रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी ||
ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!

प्राजु's picture

15 Jul 2009 - 10:31 pm | प्राजु

तुफ्फान!!!
लई दिसानं उगवला रं बाला..!
कं लिवलंय! कं लिवलंय!!!
लई भारी!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

15 Jul 2009 - 10:37 pm | धनंजय

उच्च दर्जाचे विनोदी लिखाण!

(मिरासदारीची आठवण आली.)

अवलिया's picture

15 Jul 2009 - 11:08 pm | अवलिया

लई दिसानं उगवला रं बाला..! :?

कं लिवलंय! कं लिवलंय!!!
लई भारी!
:)

--अवलिया
=============================
रामायण महाभारत घडायला स्त्रीची गरज आहे असे नाही, आजकाल सही ते काम करते. ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Jul 2009 - 11:14 pm | बिपिन कार्यकर्ते

जबरा!!!!!!!!!! टार्‍याच्या भाषेत.... के व ळ अ प्र ति म !!!!!

मिथन्या, वेलकम ब्याक!!!!

बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

16 Jul 2009 - 12:50 am | विसोबा खेचर

जबरा..! :)

आपला,
(ब्रिटिशचा जबरदस्त फ्यॅन)
तात्या अहिरे,
अंजूर फाटा.

स्वाती२'s picture

16 Jul 2009 - 2:22 am | स्वाती२

भन्नाट!

सहज's picture

16 Jul 2009 - 9:46 am | सहज

किती दिस अडकला होता मिथन्या.

:-) वेलकम बॅक.

अन आल्या आल्या एकदम समाधीच
लय झ्याक.....
कं लिवलंय! कं लिवलंय!!!
लई भारी!

वेताळ

मुक्तसुनीत's picture

16 Jul 2009 - 10:12 am | मुक्तसुनीत

एकदम सुपडा साफ ! :))
लय भारी !

दिपक's picture

16 Jul 2009 - 10:15 am | दिपक

बाला कयं होता तू इतकं दिस?

तूमाला सांगतो स्वर्गसुख, आत्मशांती वगैरे कायकाय म्हन्तात ना ते सगल मना येकाच टायमाला झाल. सगल मानन्यावर हाय की.

=)) जबरा रे !

घाशीराम कोतवाल १.२'s picture

16 Jul 2009 - 10:39 am | घाशीराम कोतवाल १.२

कशाला एवरा मटण खायचा बे !
नंतर हाजमोला घ्यायचा ना बाला!! ;)
पण साला तुला मोकला झाल्यावर बरा वाटला आसल नं
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

शक्तिमान's picture

16 Jul 2009 - 12:21 pm | शक्तिमान

अतिशय उत्तम लेख लिहीला आहे ब्रिटीश भाऊ!
रात्री जागून आपले पूर्वीचे सर्व लिखाण वाचून काढले बुवा आम्ही.. मस्त धमाल आली.. रात्रभर झोपेत हसत होतो :P

दोन मीन्टात फॉककन आवाज आला न मी मोकला झालू

=)) =)) हे वाक्य तर कल्लाच!

अशीच फटके बाजी चालू ठेवावी!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jul 2009 - 6:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाल्या.............कं लिवलंय! कं लिवलंय!!! =))
सुख म्हंजे काय, लै सोप्पं करुन सांगितलं...!

ऋषिकेश's picture

16 Jul 2009 - 9:41 pm | ऋषिकेश

=)) =))
=))
=)) =))

भन्नाट! भन्नाट!! त्रिवार भन्नाट!! (सौजन्य श्री.टारझन :) )

वेलकम ब्याक

(मोकळेपणाने पोट धरून हसणारा)ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

दशानन's picture

16 Jul 2009 - 10:21 pm | दशानन

भयानक !!!!

नंदन's picture

17 Jul 2009 - 2:12 pm | नंदन

ब्रिटिशभौ, एकदम 'सुपडा साफ' लेख :). रामनगरीतला असाच प्रसंग आठवला.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

कपिल काळे's picture

17 Jul 2009 - 6:14 pm | कपिल काळे

आयला हा लेक कसा दुरल्क्षीत रायला रं?
लय भारी रे!!

एकदम साफ!!

शिल्पा ब's picture

1 Sep 2010 - 11:49 am | शिल्पा ब

=)) जबरा...
लै भारी... लै भारी...

सुहास..'s picture

27 Feb 2012 - 2:32 pm | सुहास..

रेझींग हायर !!

संपत's picture

27 Feb 2012 - 4:01 pm | संपत

वेस्टर्न कमोड वापरताना झालेली कुचंबणा आठवली :)

सूड's picture

27 Feb 2012 - 6:05 pm | सूड

हा हा हा :D...झकास लेख !!

सौंदाळा's picture

13 May 2013 - 11:37 am | सौंदाळा

ब्रिटीश साहेब,
मिथन्याची आतुरतेने वाट बघत आहे.

भडकमकर मास्तर's picture

14 Aug 2013 - 8:50 pm | भडकमकर मास्तर

अहा हा हा .. स्वर्गसुख :)

देवांग's picture

14 Aug 2013 - 10:20 pm | देवांग

महारष्ट्र समितीने केलेल्या चाचणीत त्यांनी ५० विविध स्खेत्रातील लोकांवर हा अभ्यास केला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जे लोक अतिशय व्यस्त असतात तीच जास्त वेळ शौचास बसतात. जेव्हा त्या लोकांना जुलाब होतात तेव्हा ती कमी वेळ शौचास बसतात. संडास झाल्यांनंतर १०% लोक अश्या अपेक्षेने बसतात कि पोटातील प्रक्रिया आपण बसल्या मुले अजून तीव्र गतीने काम करून पुन्हा काहीतरी निघेल. ५ % लोक शी धुतल्यानंतर उभे राहतात तेव्हा त्यांना पुन्हा कळ येतात.
५ ० % लोकांना हि कळ सिगारेट, तंबाखू किंवा चहा पिल्यानंतर येते, ह्या कळला ते प्रेशर असे म्हणतात. ३० % लोक खाली किती पडली हे बघून समाधान मानतात तर ७ ० % लोक वारंवार पाणी टाकत राहतात. भारतात जवळपास ४ ० % लोक बाहेर शी करतात. हे लोक तांब्या किवा ह्याण्डले असलेले चंबू नेणे पसंद करतात व बाहेर बसले कि २ ते ३ वेळा स्वताची जागा बदलतात. जे लोक विटेवर बसून शी करतात ते सहसा जागा बदलत नाहीत. ५% लोक पाणी नसले कि दगड, कागद किंवा झाडाच्या पानाचा वापर करतात आणि ह्यातून ८ ० % लोक पुन्हा घरी जावून घुवून घेतात.
६ ० % लोकांना आजूबाजूला कोणी आवाज आला तर शी काढता येत नाही. असली लोक फारच कोन्शनियस असतात. अश्या वेळी ते नळाचा आवाज मोठा करून आतून निघणारा आवाज हि दाबायचा प्रयत्न करतात. माणूस ९ ० % वेळ (जेव्हा फक्त १ ० % शी निघते ) घालवतो कसा ह्याचा सुद्धा अभ्यास करण्यात आला आहे. जेव्हा मानून आत शिरतो, तेव्हा त्याला थोड्यावेळ घाण वास येतो मात्र स्वतः शी केल्यावर त्याला घाण वास बिलकुल येत नाही. २ ० % लोक बकेट मधल्या पाण्याशी खेळत बसतात, त्यामध्ये मुंगी किंवा किडा टाकून बघतात. २ ० % लोक समोरच्या भिंतीवर विविध आकारात चित्र बघण्याचा प्रयत्न करतात. ५ ० % लोक नुसता विचार करत बसतात. विशेष म्हणजे शौचालयात ते जो वचार करतात तो बाहेर आलेकी पूर्ण पाने विसरून जातात. १ ० % लोक फक्त दिवस भर काय करायचे हा उपयुक्त विचार करतात.
जोरात आलेली शी काढताना जो आनंद होतो. तो आनंद कशातच नाही असे ३ ० % लोक म्हणाली. ३ ५ % लोक म्हणाली कि बाहेर बसून शी करण्यात जो अत्यानंद आहे तो कशातच नाही. ३ ५ % लोकांनी उत्तर देण्यास नकार दिला.

अनेक लोकांचा असा गैरसमज आहे कि नाभीला थुक्का शी जर लागली असेल तर ती चालली जाते, परंतु शी येणे ह्या मागे सुद्धा मानसिक विचारशक्तीचा प्रभाव आहे . एखाद्या व्यक्तीला जर जोरात शी लागली असेल आणि तो घराकडे निघाला असेल तर त्याची तीव्रता आणखी वाढत जाते . . . . . जसा जसा तो घराकडे पोहचतो तशी तीव्रता अजून वाढते आणि शौचालयात घुसताच ती तीव्रता शिगेला पोहचते आणि तो नीकर काढून बसे पर्यंत शी सुद्धा जोरात बाहेर निघते. ह्याचे कारण म्हणजे जसा जसा बाहेरून तो घरी पोहचतो तसा तसा त्याला विश्वास होतो कि आपण आता शी करणार आहोत. जर घरी पोहचल्यावर शौचालयात आधीच कोणीतरी बसला असेल तर तीव्रता आपोआप कमी होतो. शीची तीव्रता हा एक मानसिक खेळ आहे

६ ० % लोकांना आजूबाजूला कोणी आवाज आला तर शी काढता येत नाही. असली लोक फारच कोन्शनियस असतात.
माझे तिर्थरुपांचे मित्र दामले काका यांची अशी काहीशी गंमत आहे.हे दोघे एकदा वाडीला चालले होते.तेव्हा ट्रेनमधल्या संडास मधे दामले गेले आणि पटकन आले !
तिर्थरुपः- काय हो... इतक्यात आलात ?
दामले :- हो,गाडी फार हालते आहे.

बरं वाडीला पोहचल्यावर तिथल्या संस्थानच्या धर्मशाळेत देखील वेगळाच प्रकार !
तिथरुपः- दरवाजावर टकटक करुन दामले काय हो झोप लागली का ?
दामले:- लगेच बाहेर आले.
तिर्थरुप :- हे काय लगेच आलात.
दामले:- टकटक केल्यामुळे लिंक तुटली.

कपिलमुनी's picture

16 Aug 2013 - 4:08 pm | कपिलमुनी

>>हे दोघे एकदा वाडीला चालले होते

म्हणजे नरसोबाची वाडी का ?
तुमी सांगली -कोलापूरचे आहात क ?

मी कोल्हापुरचा पण आहे आणि वाडीचा पण, सध्या ठाणेकर ! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Aug 2013 - 6:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मेलो =))

काय अभ्यास आहे.

-दिलीप बिरुटे

रामदास's picture

16 Aug 2013 - 1:09 pm | रामदास

करून लिहीलेला प्रतिसाद वाचल्यावर अभ्यासाची व्याप्ती वाढावी म्हणून एक दुवा देतो आहे.
http://bogpeople.com/funny/content/shit.html

दत्ता काळे's picture

16 Aug 2013 - 2:08 pm | दत्ता काळे

लेख एक नंबर..
"आरे कीती वेळ झाला ?आटप लवकर नाहितर परत भुक लागेल." हा.. हा..

केदार-मिसळपाव's picture

8 May 2014 - 9:00 pm | केदार-मिसळपाव

विस्मरणात जाउ देणे इश्ठ नाही. तस्मात वर काढला.

हा लेख कितीही वेळा वाचला तरीही फॉक्कन आवडतोच. *ROFL*

अवांतरः यो ब्रिटीश दादुस कया गायब झाला कं माहीत? सगले लेख जाम भारी हान, बोल.

पॉइंट ब्लँक's picture

23 Apr 2015 - 5:11 pm | पॉइंट ब्लँक

लै भारी लेखन आहे. आवड्ले!

प्रकाश घाटपांडे's picture

30 Apr 2016 - 9:18 am | प्रकाश घाटपांडे

'मोकळ' होण्यातल सुख हेच खर स्वर्गसुख. ह्या गुरु वा लघु शंका निरसनात सुखाचा शोध घेतला तर बाकी सुख फिकी!

जव्हेरगंज's picture

18 Sep 2016 - 3:16 pm | जव्हेरगंज

______///\\\______

श्रिपाद पणशिकर's picture

20 Dec 2022 - 2:03 am | श्रिपाद पणशिकर

असले साहित्य पुन्हा होणे नाहि.

वामन देशमुख's picture

20 Dec 2022 - 8:31 am | वामन देशमुख

सुख म्हंजे नक्की काय आसत

मराठी बेब् सिरीज्, मिपावरील लेखांच्या शीर्षकांतून प्रेरणा घेतात हे पाहून सुख म्हणजे नक्की काय असतं हे कळलं.

----

लेख फॉककन आवडला हेवेसांन.