✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

निरोप

फ
फटू यांनी
Sat, 03/08/2008 - 17:41  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5135 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

L
llपुण्याचे पेशवेll Sat, 03/08/2008 - 21:11 नवीन

विंग्रजीचे काय म्होटे कवतिक नाय हो...

आवं सतिशराव त्या विंग्रजीचे मोठे काय कवतिक न्हाई वो. आम्हाला पूर्वी लई शमस्या व्हती की 'तू ते करशील का रे?' हे विंग्रजीत कशे बलावे. पन आवो आमच्या हापिसातली काही रत्ने(विशेषतः पोरी) अशी पाहीली की त्या हा प्रश्न असा विचारत 'are you doing that क्या?'. आम्ही तर चाटच पडलो. वाटले त्या तर्खडकरचे दिवस घालायची(मयती नंतरचे १०वा,१३वा असे) येळ आली हाये. आवो आनी आमच्या हीते एकदम येका पेक्षा येक नग हायेत विंग्रजीमधले. आवो या अमेरीकेतल्या गोर्‍याना कामाला मानूस मिळाल्याशी कारन हाये. बाकी तो ब्वालतो त्याचा निस्ता अर्थ कळला तरी चालते वो त्याला. येवढे स्वस्तात काम व्हत असेल तर त्ये पन करत्यात ४-२ सबुद 'compromise' पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 03/09/2008 - 07:37 नवीन

इंग्रजी न येताहि आपल्या ......

कामात आपले प्राविण्य आहे हीच गोष्ट सगळे सांगून जाते. फिरंग्याच्या भाषेची ऐशी तैशी. मस्त वाटले. फिरंग्याच्या या भाषेची हवी तशी वाट लावा. संदेश पोचवणे हेच भाषेचे काम आहे. व्याकरणाचे व शुद्धतेचे उगाच अवडंबर नको. फक्त या भाषेतील सौंदर्याला मुकाल. आणि मिराशीसाहेब, तर्खडकारांना नांव ठेवायचे काम नाही. मी त्यांच्याच चार पुस्तकावर शिकलो. पण कोणत्याहि पातळीवर प्रश्न येत नाही. भरीला व्रेन (रेन) अँड मार्टिन आणि नेस्फील्ड होतेच. पहिल्यांदा जेम्स हॅडली चेस वगैरे रहस्यकथा/थ्रिलर वाचायला घेतले. ते आपण खाली ठेवू शकत नाही. वाचत जातो व इंग्रजी सुधारते. मुख्य म्हणजे शिव्याहि येतात. फक्त क्रिकेट, हॉकी, टेनिस आणि फुटबॉल (सॉकर) च्या आणि इंग्रजी बातम्यांच्या चॅनलवरील उच्चार अभ्यासले की झाले. आता मी फिरंग्याच्या भषेत बोलतांना ऐकल्यावर मी मराठीतून शिकलो म्हटले तर कोणाला खरेच वाटत नाही.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 03/09/2008 - 08:14 नवीन

सहमत.. सहमत.. सहमत...!!

संदेश पोचवणे हेच भाषेचे काम आहे. व्याकरणाचे व शुद्धतेचे उगाच अवडंबर नको. कांदळकरसाहेब, तुमचे हात कुठे आहेत? जी चाहता है की उन्हे चूम लू! :) अगदी माझ्या मनातलं बोल्लात बघा साहेब! अहो मी तरी कानीकपाळी ओरडून सर्व लोकांना हेच सांगत आलो आहे की व्याकरणाचे आणि शुद्धतेचे फुक्कटचे अवडंबर नको! भाषा हे साधन आहे, साध्य नव्हे हेच या मूर्ख व्याकरणतज्ञांना आणि शुद्धलेखनतज्ञांना समजत नाही! आणि म्हणूनच मिसळपाववर 'शुद्धीचिकित्सक' हा आचरटपणा नाही!! काय शुद्ध नी काय अशुद्ध हे ठरवण्याचा कुणालाही अधिकार नाही. भाषा ही सगळ्यांची आहे!! चार सोकॉल्ड शुद्धलेखनतज्ञांची आणि व्याकरणतज्ञांची पोळी शेकली जावी म्हणून आमच्यासारखी आम जनता आता यापुढे त्यांच्या दावणीला बांधली जाणार नाही आणि अत्याचाराला बळी पडणार नाही! सतीशराव, अनुभवकथम छानच आहे. आम्हाला आवडले. अजूनही लिवा! आपला, (व्याकरण आणि शुद्धलेखनाच्या शृंखलांतून भाषेला स्वतंत्र करण्यास सज्ज) स्वातंत्र्यसेनानी तात्या अभ्यंकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर कांदळकर
क
कोलबेर Sun, 03/09/2008 - 08:27 नवीन

संदेश

संदेश पोचवणे हेच भाषेचे काम आहे. व्याकरणाचे व शुद्धतेचे उगाच अवडंबर नको.
कांदळकर साहेब, ह्या वाक्यामध्ये अवडंबर नको तसेच फाट्यावर मारणे*ही नको ..समतोल असावा..हे आपल्याला अभिप्रेत आहे असे गृहीत धरतो. -कोलबेर --- *हा मिसळपावरच ऐकलेला/ शिकलेला शब्द आहे.. चुकीचा असल्यास जनरल डायर समर्थ आहेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर कांदळकर
प
प्राजु Sun, 03/09/2008 - 10:06 नवीन

अहो..

तुम्ही फाड फाड कोकाटे क्लासेस ला नाही का गेलात?? मस्त इंग्रजी शिकवतात तिथे म्हणे. वॉकिंग ताड ताड स्ट्र्क टू भिंताड.... - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Sun, 03/09/2008 - 10:07 नवीन

आता बोला..

मी परदेशी लोकांना (समाजसेवा नव्हे, पैसे घेऊन) हिंदी शिकवते. एकाने विचारले हिंदी का शिकायचे.. मी सांगितले, भारत उद्याची महाशक्ती आहे, बाकीचे गोरे उद्या हिंदी शिकणारच आहेत, तुम्ही आज शिकून त्यांच्या पुढे जाणार.. द्या टाळी. उगाच इंग्रजीचे अवडंबर का माजवायचे? > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
  • Log in or register to post comments
ट
टिउ Mon, 03/10/2008 - 22:44 नवीन

खाली डोकं वर पाय

तात्यांचा प्रतिसाद वाचुन पाडगावकरांची एक कविता आठवली... भाषेच्या ज्ञानाने तर तुम्ही महा मंडित असता, व्याकरणाचे बारकावे त्याचे तुम्ही पंडित असता! ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता; ओठ हे सर्वनाम? त्याचा तुम्ही विचार करता!! तर काय तर काय? खाली डोकं, वर पाय!!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 03/10/2008 - 23:55 नवीन

एक झक्कास अनुभव मनमोकळेपणाने लिहिण्याबद्दल प्रथम तुम्हाला दाद!

आपल्याला एखादी गोष्ट येत नाही/नव्हती हे उघडपणे सांगायला धाडस लागते. ते तुमच्यात आहे. रहाता राहिली गोष्ट इंग्लिशची. अहो तुम्ही आहात त्या अमेरिकेत इतक्या वेगवेगळ्या देशातून लोक येतात त्यांना इंग्लिश अजिबात येत नसते किंवा मोडके-तोडके येत असते खच्चून बोलत जातात, लिहीत जातात, कशाचे शुध्द्लेखन अन कशाचे काय! काय म्हणायचे आहे ते समजले की झाले! (कित्येकवेळा आम्हाला चीन, जपान आणि कोरियाहून येणार्‍या इ-मेल्स चा नेमका अर्थ लावता-लावता मेंदूला घाम येतो!) थोड्या प्रयत्नांती हळूहळू सुधारणा होत जाते आणि ती ही आवश्यकच पण सुरुवातीलाच न बिचकणे जास्त गरजेचे! चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा