पहीला पाउस
लेखनप्रकार
एक होता राजपुत्र.
त्याला पहील्या पावसाचे खुपच आकर्षण होते.
चाळीतल्या गजाच्या खिडकीवर उभा राहुन तो पहील्या पावसाची वाट बघायचा.
राजपुत्राचे शेजारी पंजाबी घर होते.
फाळ्णीत कराचीमधुन पळुन आलेले.
त्या घरात एक परी होती.
राजपुत्राची जिवलग मैत्रीण.
परीच्या आईच्या हातात एक जाड सोन्याचे कडे होते. राजपुत्राला ते फार आवडायचे.
परीच्या आईलासुद्धा राजपुत्रावर खुप लोभ होता. ११ इंच उंचीच्या चांदीच्या पेल्यात जाड जाड लस्सी मिळायची राजपुत्राला.
'जमाइ राजा' म्हणायची परीची आई.
आभाळ भरुन आले होते. ढ्ग एकमेकांशी मस्ती करत होते. भर दुपारचा अंधार. उल्हासीत करणारा गारवा. पण पहीला पाउस सुरु झालेला नव्हता.
राजपुत्र तयार होता पावसाच्या स्वागताला.
इतक्यात परी आली.
तीने पण पहील्या पावसात भिजायचा हट्ट सुरु केला.
मग पावसाची टोपी घालुन ती पण तयार झाली.
म्हणता म्हणता पाउस सुरु झाला.
धो, धो पडु लागला.
सुमारे एक तास परी आणि राजपुत्र मनसोक्त खेळली.
एका तासानंतर आईची हाक आली.
हुडहुडलेल्या अंगानी दोघेही वर आली.
जीन्यातुन वर येताना परीने राजपुत्राचा हात धरला आणि म्हणाली, '"भिगे हुए तुम कितने चंगे दिखते हो"
आणि परीने राजपुत्राचा एक गोड पापा घेतला.
घरी आल्यावर कोरड्या रुमालाने दोन्ही आयांनी मुलांना पुसले.
राजपुत्राच्या आईने गरम गरम कांदाभजी आणि आल्याचा चहा केला होता.
दोघाना बाजुबाजुला बसवुन भरपुर खायला दीली.
हे बघत असताना परीच्या आईच्या डोळ्यात पाणी का हे राजपुत्राला काही कळाले नाही.
हा कार्यक्रम दर पावसाला नक्की ठरला. आणि ३ पावसाळे चालला.
राजपुत्र ५ वीत असताना मे महीन्याच्या सुट्टीत गावाला गेला होता.
गावचे आपले गतवैभव बघुन चकित झाला.
गावावरुन आला तर परी कुठे दिसेना. राजपुत्राने खुप चौकशी केली. पण नीट उत्तर मिळेना.
राजपुत्राच्या आईने एकदा म्ह्टले, " खुप लांब गेली रे ती"
त्याच महीन्यात राजपुत्राच्या बाबानी घर बदलायचे ठरवले.
घर सोडायच्या दिवशी परीची आई राजपुत्राला पोटाशी धरुन ढसाडसा रडली.
"मेरे दोनो पुत्तड मुझे अकेला छोड रहे है"
_________________________________________________________
नविन घरी आल्यावर सुद्धा राजपुत्राने पहील्या पावसाचे तसेच स्वागत केले.
पण ह्या वेळी परी नव्हती.
दिवस जात राहीले. पहीला पाउस येत राहीला.
राजपुत्र तसाच पहील्या पावसात भिजायचा. आईच्या हातची कांदा भजी आणि आल्याचा वाफाळलेला चहा घेउन झाल्यावर दोन तास मस्त झोपायचा.
त्या झोपेत छान छान स्वप्ने पडायची.
ढगांच्या घोड्यावर स्वार होउन मोठ्या दौडीला निघायचा. अर्थात परी पण साथीला असायचीच.
नेहेमीच्या जगात राजपुत्राने परीची आठवण कधीच सोडली नाही. कुणा मुलीकडे ढूंकुनही बघायचा नाही.
सर्व गराड्यात तो परीला शोधायचा.
_________________________________________________________
म्हणता म्हणता राजपुत्र मोठा झाला. राजपुत्राला कुठलीही मुलगी पसंद पडेना. अगदी सुंदर असली तरी सुद्धा नाकारायचा.एकदा अशाच एका बघायच्या कार्यक्रमात मात्र माजघरातुन बाहेर आलेली मुलगी बघुन राजपुत्र आश्चर्यचकित झाला.
"अरे, ही तर माझी परी"
घरी आल्यावर त्याने सर्वांना स्प्ष्ट सांगितले, "हुंडा , जुळणारे गुण वगैरे गेले गाढवाच्या शेपटीत., लग्न करेन तर हीच्याशीच, नाहीतर केंव्हाही नाही"
__________________________________________________________ आजही राजपुत्र पहील्या पावसाचे जंगी स्वागत करतो. बघणारे म्हणतात, म्हातारा खुळावला. पण त्याला पर्वा नसते त्याची.
पावसात भिजुन आल्यावर तीच गरमागरम कांदा भ़जी, तोच आल्याचा वाफाळलेला चहा आणि वर परीची साथ. मग राहीलेल्या पुर्ण वर्षाची ३६३ दिवसांची लढाई लढायला हा पहील्या पावसाचा दिवस राजपुत्राला पुरतो.
वाचने
4108
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
वा! मस्त
एक दिवस
छान.......कथा आहे.
चलो
हल्ली कोणी
राजपुत्र
In reply to राजपुत्र by अनंता
वाटून झाला
काय मास्तर
वय निघुन गेले ...
सर ! लगे रहो.
म्हातारा राजपुत्र?
In reply to म्हातारा राजपुत्र? by प्रमोद देव
राजपुत्रा
In reply to म्हातारा राजपुत्र? by प्रमोद देव
तद्माताय!
In reply to तद्माताय! by पिवळा डांबिस
पटलं!
बरसते
आहु आहु ..