तोच जुलै महीना, तेच पालक, तोच मी ,तेच तेच प्रश्न.
एक शिक्षण सम्राटांनी माझ्या सर्व अटी मान्य करुन १० वी पास विद्यार्थी आणि त्यांच्या पालका़करता २० कार्यक्रम ठेवले आहेत. कुठल्याही प्रकारची जाहीरात बाजी न करता हे कार्यक्रम होणार होते. सुमारे १ तासाचा कार्यक्रम, दिवसाला पाच्(ऑफिस संभाळुन).
असाच एक कार्यक्रम.
नेहेमी विचारला जाणार एक प्रश्न.
चांगले कॉलेज कोणते?
शक्यतो मी 'असा काही प्रकार माझ्या बघण्यात आला नाही' असे उत्तर देतो.
पालक चक्रावतात.
मग सुरु होते ते तेच तेच संभाषण.
" असे कसे, मागच्या वेळी अमुक तमुक कॉलेज मधे कट ऑफ ९२% होता"
त्याचा कॉलेज चांगले असण्याशी काय संबंध.
"असे कसे, सर्व म्हणतात की"
सांगोसांगी वडाला वांगी
"अहो, परवाच गोल्डन ज्युबीली झाली"केवढा मोठा कार्यक्रम झाला"
मॅनेजमेंट कोटा चे पैसे वाढणार.
हल्ली जरा वेगळ्या प्रकाराने उत्तर देतो.
"यम. बी. ये. केलेले ४ सुशिक्षित बेकार ह्या कामावर लावले आहेत. त्यांचा रिपोर्ट आला की कळवतो".
ह्या उत्तराने पुढचा प्रश्न आपोआप थंडावतो.
"मुलांनी यम.बी.ये. कशात करावे", कुठल्या लाईनीला स्कोप जास्त आहे"? यच. आर का बँकींग, का फायनान्स.
सुत ना भोवरा आत्ताच 'गुंय' सुरु.
मग सुरु होते ते 'वोकेशनल'
लय भारी फॅड पसरले आहे ह्या वोकेशनल चे.
१२ वी ला काय होणार ते माहीत नसताना पालक आधीच स्कोप कुणातरी समुपदेशकाला विचारुन किवा न विचारता ठरवुन मोकळे झालेले असतात. इलेक्ट्रॉनिक्स, टेलीकम्युनिकेशन, कंप्युटर इंजिनियरीग ह्या शाखा आधीच निवडल्या जातात. आणि मेरीट नसताना मॅनेजमेंट सोटा डोक्यात घालुन घेतात.
ह्या सर्व प्रचाराना बळी पडू नका हे मी सागितले तर मलाच "खरबुड्या "ठरवतात.
१०० मधे ५ जणाना जरी कळाले तर त्यात मी आनंद मानतो.
कार्यक्रम संपवुन निघणार इतक्यात एक आई आणि मुलगी ची जोडी कोपर्यात वाट बघत असलेली दिसली.
"सर, फक्त पाचच मिनीटे"आई
आता अर्थ्या तासाने वेळापत्रक कोलमडणार होते.
आणि आईने हातात गुणपत्रिका दिली.
९५.५% मार्क होते मुलीला.
मुलीच्या चेहेर्याकडे बघितल्यावर न सांगता सर्व काही कळाले.
'बोर्डात पहीली 'काही मार्काने चुकले होते.
" मला आणि हीला त्याचे फारसे विषेश काही नाही हो, पण निकाल लागल्या पासुन बाबा हिच्याकडे एक शब्द सुद्धा बोलले नाहीत. फक्त दगा झाला असे म्हणतात. एवढ घवघवीत यश मिळुन सुद्धा आमच्या घरात सुतकी वातावरण आहे. बाबा पहिल्या मुलीच्या मुलाखतीची, फोटोची , आणि सत्काराची कात्रणे गोळा क्ररत आहेत. ऑफिस मधुन आल्यावर परत परत बघत बसतात. पोरीच्या डोळ्यातले पाणी थांबले नाही हो.
काय करु सांगा" आई भडाभडा बोलत होते. मुलगी मान खाली घालुन उभी होती.
**^$%#&((*^*%%*^%%***&%^&^)&(^^%$@!%%^&(**)))_)*))))))_))___))^%
(सर्व शिव्या मनातल्या मनात)
" माझ्या संग्रहात पहीलीचा माझ्याबरोबरचा एक लॅमिनेट केलेला मोठा फोटो आहे. तो त्यांना द्यायचा आहे मला.मला फोन करायला सांगा."
जाता जाता: पिवळ्या डांबीसाने अशा वाकड्या करता पाठवलेला पेशल अमेरिकन चिंचेचा फोक तयार ठेवला आहे. ये साल्या, तुझी आतुरेतेने वाट बघतो आहे. नाही वळ उठवला तर बापाचे नाव नाय सांगणार.
वाचने
7931
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
जास्त मार्क्स
फोटो
९५%
+१
In reply to ९५% by यशोधरा
फोक
९५% टक्के
माझ्या
आमच्या
In reply to माझ्या by विजुभाऊ
फोक डान्स
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
ज्याला फोकाने बडवतात
In reply to फोक डान्स by नंदन
पेशल
प्रकाटाआ
९५.५ समवन
फोकलुन काढा त्या सु*****च्याला!!!
लोकांच्या
कसली
काय एकेक
In reply to कसली by विनायक प्रभू
>>मास्तर ,
In reply to काय एकेक by पक्या
त्या
लेकीला ९५ %....
मास्तर ! एस
२२ वे शतक
सर त्या
खूप बदलाची गरज आहे
लेख आवडला,
>>आपल्याकडे
बरोबर आहे.
In reply to >>आपल्याकडे by स्वाती२
>>आपल्याकडे
In reply to बरोबर आहे. by रेवती
खुलासा
In reply to >>आपल्याकडे by स्वाती२
विचित्र
स्वतःची क्षमता
In reply to विचित्र by लिखाळ
मास्तराशी सहमत!!!
फोकाचा फटका जाणवला!
अशा शाळेत जायला मुलांना का आवडणार नाही ?
In reply to फोकाचा फटका जाणवला! by चतुरंग
क्या बात है!!
In reply to अशा शाळेत जायला मुलांना का आवडणार नाही ? by रामदास
+१
In reply to क्या बात है!! by चतुरंग
वा!!!
In reply to क्या बात है!! by चतुरंग
>>पुढे
In reply to फोकाचा फटका जाणवला! by चतुरंग
पालकशिक्ष
In reply to >>पुढे by यशोधरा
बालवाडी?
In reply to >>पुढे by यशोधरा
बालवाडीत ?
In reply to बालवाडी? by विनायक प्रभू
त्या
(विषय दिलेला नाही)
In reply to त्या by विसोबा खेचर
सही बोला तात्याने
In reply to त्या by विसोबा खेचर
:(
फफोक! काय हा बाप! :( ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहेबंगाली