चट्टा मट्टा

Dipa Patil's picture
Dipa Patil in पाककृती
2 Jul 2009 - 1:34 pm

करायला व खायला सोपा प्रकार

साहित्य :- १ वाटी गव्हाचे पीठ, १/२ वाटी खिसलेला गुळ, १/४ वाटी साजुक तूप

क्रूती :- प्रथम ४-५ चमचे तूप गरम करुन त्यात गव्हाचे पीठ घाला. बारीक ग्यासवर लालसर भाजा. खाली उतरवून गुळ व उरलेले तूप मिसळा व खायला घ्या.

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

2 Jul 2009 - 1:37 pm | पर्नल नेने मराठे

सुरेख!!! पटकन करता येइल असा..
चुचु

कपिल काळे's picture

2 Jul 2009 - 1:59 pm | कपिल काळे

सुरेक!!पत्क्न कर्ता येइल असा..
शोर्त एन्द स्वीत

चिरोटा's picture

2 Jul 2009 - 2:06 pm | चिरोटा

मस्त गुळपीठ. करुन बघायला पाहिजे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

स्नेहल माझिरे's picture

2 Jul 2009 - 3:15 pm | स्नेहल माझिरे

नाव वाचुन तर वाटले कि कोनता तरि तिखट पदार्थ असेल

जागु's picture

2 Jul 2009 - 3:25 pm | जागु

मलाही तसच वाटल की तिखट चमचमीत पदार्थ असेल. पण छान आणि सोप्पा आहे.

विसोबा खेचर's picture

2 Jul 2009 - 4:26 pm | विसोबा खेचर

मस्त! :)

लवंगी's picture

2 Jul 2009 - 4:49 pm | लवंगी

पोर अगदि चट्टा मट्टा करतील

दिपाली पाटिल's picture

2 Jul 2009 - 9:52 pm | दिपाली पाटिल

पाकृ. :)

दिपाली :)

रेवती's picture

3 Jul 2009 - 7:49 am | रेवती

मस्त! खमंग आणि पौष्टीक!
फोटू चढवला असता तर मजा आली असती.

रेवती

राधा१'s picture

3 Jul 2009 - 12:45 pm | राधा१

तुम्हाला गुळपापडीच्या वड्या किंवा लाडु सांगायचे आहेत का?
त्याही अश्याच करतात.

सोनम's picture

11 Jul 2009 - 6:39 pm | सोनम

किती झटपट होणारी पाककृती आहे. आणी सोपी ही आहे. :)

"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

मिसळभोक्ता's picture

13 Jul 2009 - 8:03 am | मिसळभोक्ता

किती झटपट होणारी पाककृती आहे. आणी सोपी ही आहे.

खरे तर तुम्हाला सोपी, झटपट होणारी पाककृती नकोय. कारण तुमचे घोष वाक्यः

"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

लय भारी !

जियो !

आम्ही अनेक पाककृती उदा. "उकडलेले अंडे" असेच निकराने प्राणबाजीने, शर्थीने झुंजून करतो.

खि खि खि :-)

-- मिसळभोक्ता

टारझन's picture

13 Jul 2009 - 8:18 am | टारझन

श्श्शी बाबा .. काय ते सारखं "निकराने" "निकराने" लावलंय हो ?
दुसरा शब्द नाहिये का? की मराठी एवढी गरिब आहे ? ते मिभांचे शब्द आहेत ते वापरा ! दिलेत वाणगीदाखल !!!

- अ‍ॅस्टालाविस्टा