✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्वर्ग

स — सृष्टीलावण्या, Tue, 03/04/2008 - 20:45

प्रतिक्रिया द्या
5877 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ध
धनंजय Tue, 03/04/2008 - 21:45 नवीन

अत्यंत आवडलेली ओळ

अन् माझ्या हातातल्या गुलाबाची प्रत्येक पाकळी थरथरली, कल्पक आणि भावुक. विनोदी नसलेल्या भावपूर्ण कवितेतही सुंदर वाटावी.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 03/04/2008 - 21:49 नवीन

अगदी खरं..

कल्पक आणि भावुक. विनोदी नसलेल्या भावपूर्ण कवितेतही सुंदर वाटावी. -सहमत. बाकी शेवट मात्र अगदी मजेदार.. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 03/04/2008 - 21:59 नवीन

मस्तच

अन् माझ्या हातातल्या गुलाबाची प्रत्येक पाकळी थरथरली, कल्पक आणि भावुक. विनोदी नसलेल्या भावपूर्ण कवितेतही सुंदर वाटावी. १००% सहमत्...कविता छान विषय नेहेमीचा असुनही मस्त वाटलं वाचुन....
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Tue, 03/04/2008 - 22:13 नवीन

झकास......

एव्हढ्यात तिची सुंदर सावली रस्त्यावर पडली अन् माझ्या हातातल्या गुलाबाची प्रत्येक पाकळी थरथरली, हृदयाचे दरवाजे लागले धडधडू, या ओळी आवडल्या. प्रेमात पडल्यावर सावली पण सुंदर वाटते. हातातील गुलाबाची पाने थरथरतात आणि हृदयाचे दरवाजे धडधडतात. वाहवा. अप्रतिम कल्पना. आपल्या नावातील लावण्य कवितेत उतरले सृलाताई. आणि नंतर अनपेक्षित विनोदी वळण. विनोदी कविता एवढी सुंदर क्वचितच असते. येथे मला परसाईंच्या एका हिंदी कविता आठवली. ते प्रियेच्या सौंदर्याची अभिजात शब्दात तारीफ करतात. सात आठ ओळीनंतर म्हणतात, लेकिन तेरी यादों के मच्छर मुझे सोने नहीं देते. असो. धन्यवाद आणि शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Wed, 03/05/2008 - 07:26 नवीन

माफ करा...

@आपल्या नावातील लावण्य कवितेत उतरले सृलाताई. पण ही कविता माझी नाही किंबहुना ह्या जगात कोणतीच कविता माझी नाही. कारण कविता करण्यासाठी जी प्रतिभा लागते ती माझ्याकडे नाही. मी नेहेमी विचार करते की केशवसुमारांसारखे कविता कौशल्य माझ्याकडे असते तर मिपावर कवितांचा रतीबच घातला. (केशवसुमार हेच नाव किती छान आहे आणि विनम्रता दर्शकसुद्धा, आपल्या बरेच काही येत असूनसुद्धा जास्त काही येत नाही ही जाणीव ठेवणारे विरळा कारण भाषेचा सागर इतका मोठा आहे की त्यातून आपण फार तर २-३ थेंब घेऊ शकतो). > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 03/05/2008 - 08:52 नवीन

छान कविता...

कविता छान आहे... तात्या.
  • Log in or register to post comments
फ
फटू Wed, 03/05/2008 - 09:19 नवीन

वाह... क्या बात हैं

कविता कुणाचीही असो पण खूपच छान आहे... अस्मादिकास कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली. आमच्यावेळीही प्रत्येक नवीन प्रयत्नात काहीतरी असाच फालतुपणा व्हायचा.... पण आम्ही हार न मानता पुन्हा नव्या उमेदीने दुसरं प्रकरण चालू करण्याच्या मागे लागायचो...
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Wed, 03/05/2008 - 20:26 नवीन

माझी एक जुनी कविता... 'स्वर्ग' कवितेवरुन आठवलेली.

दिवाळीत तुझ्या घरी मी आलो पाहुणा रूप तुझे पाहुनिया केल्या तुजला खुणा तू ही हासूनी पाहशी झाला मनी आनंद प्रेमाचा गे तुझिया लागे मजला छंद मुक्तपणे बोलशी, हासशी पाहून माझ्याकडे त्या हास्याने होई धक धक हृदयी माझ्या गडे रुजत होते अजुनी माझ्या मनी प्रेमाचे बीज तो एके सकाळी ओवाळूनी दिलास धक्का मज तेव्हाचे ते शब्द तुझे उठले मजला खाया "भाऊबीज आज असे" वदलीस "भाऊराया" -अविनाश ओगले
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Wed, 03/05/2008 - 23:41 नवीन

ही घ्या अजून एक...

आठवतो का तो दिवस, तो होता दसरा, आठवतो मला तुझा चेहरा गोड आणि हसरा, सीमा ओलांडली आपण आणि सोनं ही लुटलं, आता मात्र म्हणतेस कोण आणि कुठलं.....! संकलक - अनुराधा धुपकर > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
  • Log in or register to post comments
क
कोलबेर गुरुवार, 03/06/2008 - 03:16 नवीन

मस्त

वर दिलेली आणि ही कविता दोन्ही आवडल्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सृष्टीलावण्या

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा