कांद्याच्या भज्यांचा मुखपृष्ठावरील फोटो पाहिला. एक धागाही त्या निमित्ताने सुरू झाला आहे. मध्यंतरी एका विषयात कांद्याच्या भज्यांचा उल्लेख केल्यावर संदीप चित्रेनं (आणि परीकथेत(च) रमलेल्या राजकुमाराने) त्याची रेसिपी टाकायला सांगितली होती. आज हा समसमासंयोग जुळून आल्यानं रेसिपी देत आहे. यात काही विशेष असेल, असं अजिबात वाटत नाही. तरीही, काही खवैयांसाठी कदाचित मार्गदर्शक ठरू शकेल!
साहित्य ः सुमारे सहा ते सात कांदे, लाल तिखट, बेसनपीठ, मीठ, तेल, किंचित सोडा.
अतिरिक्त साहित्य ः कढई, गॅस आणि पाऊस!
कृती ः कांदे उभे बारीक कापून घ्यावेत. (कापताना शक्यतोबोट कापून घ्यावे. भज्यांना चांगली चव येते!) त्यात गरजेनुसार तिखट आणि अंदाजे मीठ मिसळावे. हे मिश्रण चांगले कालवून अर्धा तास तसेच ठेवून द्यावे. अर्ध्या तासाने कांद्याला पाणी सुटते. त्यातच बेसनपीठ मिसळून घ्यावे. काटेरी भजी करायची असतील, तर पिठाचे प्रमाण कांद्याच्या सुमारे वीस टक्के असावे. कापलेला कांदा व पीठ एकत्र होईल, पण एकूण मिश्रणावर कांद्याचे वर्चस्व राहील, असे पाहावे. म्हणजे कांद्याच्या दोन पाती जुळविण्यापुरता पिठाचा वापर करावा. (पुण्यातल्या बहुसंख्या हॉटेलांत कांद्याची भजी म्हणून पिठाचे गोळे भरवतात, तसे अजिबात करू नये!)
तेल खरपूस तापवून त्यात हळुहळू भजी सोडावीत. मस्त खमंग तळून खाणाऱ्याला ("गीळ मेल्या' म्हणत) वाढावीत. कांद्याची ही भजी दह्यात लाल तिखट कालवून त्यासोबत खाण्यास छान लागतात. त्यापेक्षाही, ताटात काढल्यानंतर, किंबहुना झाऱ्यातच तेल पाघळायला ठेवलेली असताना त्यातून काढून तोंड पोळत पोळत खाल्ली, तर त्यांची खुमारी आणखी वाढते!
वाचने
9451
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
मेलो ...
तु यात मावलास कसा बाबा!!
In reply to मेलो ... by टारझन
हा प्रयोग यशस्वी झालेला दिसतो आहे तुझा!!!!
+१ पण खरी
In reply to हा प्रयोग यशस्वी झालेला दिसतो आहे तुझा!!!! by प्राजु
भज्यांइतक
आम्ही
हे
In reply to आम्ही by विसोबा खेचर
पाकृं
In reply to आम्ही by विसोबा खेचर
चवदार
त्रास्स आहे च्य्यायला !
मस्त!
In reply to त्रास्स आहे च्य्यायला ! by संदीप चित्रे
झक्कास
छान पाकृ.
झक्कास!
भज्यांप्रमाणेच
कुरकुरीत लेख...
वा वा