नुकताच पाऊस सुरू झालाय. वाटतं अशावेळी माथेरान, महाबळेश्वर सारख्या ठिकाणी जावं. वस्तीपासून जरा दूर एकांत स्थळी असलेल्या एखाद्या व्हिक्टोरियन शैलीतील लॊजच्या एका कोप़रयातील सुट्च्या गॆलरीत मस्त आरामखुर्चीत पहुडावं, समोरची हिरवाई धुक्याचे झिरझिरीत वस्त्र ल्यायलेली असावी. सायंकाळच्या त्या वेळी हवेतील गारठा अंगावर घेतलेल्या शालीशी लगट करीत असावा. बाजूच्या टेपरेकॊर्डरमधून मस्तपैकी गुलाम अली किंवा मेहदी हसनचे सूर पाझरत असावेत. हातात सोनेरी छटा धारण करणार्या वारुणीचा ग्लास असावा. पाऊस आला की त्याची मजा अनुभवण्याचा हा मार्ग मला आवडतो. पण प्रत्येक वेळी ते शक्य होतेच असे नाही. पावसावरची काही छान गाणी आठवत, ऐकत मी माझे दु:ख विसरायचा प्रयत्न करतो. ती आठवणारी गाणी अशी....
१.. वाट इथे स्वप्नातील संपली जणू
२.. येरे घना येरे घना
३.. केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर
४.. ओलेत्या पानात सोनिया उन्हात भरून मेघ आले
५.. श्रावणात घन निळा बरसला
६.. आला आला वारा संगे पावसाच्या धारा
७.. रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात
८.. नभ उतरू आलं
९.. गारवा
१०.. पाऊस दाटलेला
आपल्यालाही अशी काही गाणी आठवत असतील...
मग, वाट काय पहाता? टाका यादीत भर...
वाचने
19789
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
चिंब...
सलाम
In reply to चिंब... by श्रावण मोडक
हम्म्म...
गजल आणि मल्हार
In reply to हम्म्म... by घाटावरचे भट
आला पाऊस
घन ओथंबून
पाउस असा
पाऊस पहिला जणू सानुला बरसून गेला
निशाणा
पावसाची गाणी
गाणी तर भरपुर आठवतात..
ढगाला
रिमझिम
१.तुझ्या
माझी आवडती ५ पावसाची गाणी
तम्मा
मराठी माणसा जागा हो
In reply to तम्मा by टारझन
नाच रे मोरा....!!!
माझी आवड
झुन्जूर मुन्जूर पाऊस
ग्रेस
ए आई, मला पावसात जाऊ दे