२००% सहमत १
आपलेही मत मदनमोहनलाच...
लता आणि मदनमोहन या जोडगोळीने दिलेली अजरामर गाणी... अहाहा...! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
माझी इथे मत द्यायची लायकी नाही. पण एक शंका आहे ... अण्णू मलिक का नाही ? तो पण बराच जुणा आहे की =))
बाकी आपल्याला जुणी गाणी जिव की प्राण .. कोणाची आहेत कोणी गायलीत ह्या कडे अंमळ दुर्लक्ष होतं :(
अधिक मतं देता नाही येणार? ही सगळीच इतकी अद्वितिय रत्नं आहेत, की अलिबाबाच्या गुहेत गेल्यासारखं वाटतंय! तरीही रोशनजींना मत दिलंय. सर्वांचीच गुणवत्ता वादातीत होती. हे १००% पटलं. खूप चांगला कौल!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
सहमत...
सगळेच आवडतात. प्रत्येकाचेच काही एक वैशिष्ठ्य आहे आणि त्यांनी चांगली गाणी दिलेली आहेत..
पण आमच्या पंचमदांना पर्याय नाही हे आमचे व्यक्तिगत मत! :)
आपला,
(पंचमभक्त) तात्या.
अहो क्रम लावायचाय की सर्वात आवडीचा कोण ते सांगायचंय?
सर्वांत आवडीचा आर डी.
पण बेष्ट म्हणाल तर शंकर जयकिशन, एस डी, रोशन, मदनमोहन, नौशाद (यादीत नाहीत) या क्रमाने. बाकीच्यांचे खूप संगीत ऐकायला मिळाले नाही.
खराटा
(रंग माझा वेगळा)
शंकर जयकिशन, सचिनदा, ओपी, मदनमोहन, सलिल चौधरी, रौशन, हंसराज बहल, श्यामसुंदर, सी रामचंद्र, नौशाद,
खेमचंद प्रकाश, सज्जाद हुसैन, पंचमदा, गुलाम मोहम्मद, हेमंतकुमार, चित्रगुप्त, एस एन त्रिपाठी, जी एस कोहली, जयदेव,
रवी, वसंत देसाई, उषा खन्ना, रामलाल, राम गांगुली, हुस्नलाल भगतराम, सरदार मलीक, दत्ताराम, रवी शंकर, स्नेहल भाटकर,
अनिल विश्वास, कल्याणजी वीरजी शाह, किशोरकुमार हे सगळे माझे लाडके संगीतकार आहेत. ह्या यादीतल्या प्रत्येकानेच अतिशय
सुंदर रचना पेश केल्या आहेत. तर कधी गुणवत्तेशी तडजोड करून वाईट गाणीही केली आहेत. त्यामुळे डावे-उजवे करणे जरा अवघडच आहे.
एकेका संगीतकाराच्या कारकिर्दीचा आढावा घ्यायचा म्हटला तरी किमान एक वर्षं तरी लागेल एव्हढं प्रचंड काम ह्या लोकांनी करून
ठेवले आहे!
ही माझी यादी....
ओ पी नय्यर
खय्यामसाहेब
शंकर जयकिशन
मदनमोहन
नौशाद
सचिन देव बर्मन
कल्याणजी-आनंदजी
वसंत देसाई
रोशन
सलिल चौधरी
आर डी बर्मन
उषा खन्ना
स्नेहल भाटकर
सज्जाद हुसैन
किशोरकुमार गांगुली
गुलाम मोहम्मद
....बबलु
ओ पी नैय्यर नंबर एक वर : पूर्णपणे सहमत.
इतरांचा क्रम थोडा पुढे-मागे असू शकेल, पण पयला नंबर ओपी साहब काईच.
एक प्रश्न :आपल्याकडे असलेल्या आडियो फायली नेट वर कश्या, कुठे टाकाव्यात?
मार्गदर्शन करावे.
मदन मोहन no doubt about it
सलील चौधरी
RD ची काही गाणी आवडतात. काही सरळ सरळ english गाण्यांवरून उचललेली होती. त्यापेक्षा वडील SD निदान स्वतः ची बंगाली चालीच हिंदीत आणायचे.
- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
माझेही प्राधान्य स्व. मदनमोहनजीनाच आहे.
पण सज्जादनेही काही खुप सुंदर गाणी दिली आहेत. त्याच्या विक्षिप्त स्वभावापायी तो लाईमलाईटपासुन दुरच राहीला. गाणार्यांत सर्वोत्कृष्ट लता (एक लता गाती है, बाकी सब रोती है!) आणि संगितकारात सर्वोत्कृष्ट सज्जाद हुसैन (कौन नौशाद ! ) हे त्याचं ठाम मत होतं. पण तरीही त्याने दिलेली अप्रतिम गाणी अविस्मरणीयच आहेत.
उदा. बदनाम मोहोब्बत कौन करे (नुरजहान)
आज मेरे नसीब ने (लता)
भुल जा ए दिल (लता)
फिर तुम्हारी याद (मो. रफी)
ये हवा ये रात ये चांदनी (तलत मेहमुद)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
आमचं नवीन पाडकाम : चकवा : http://www.misalpav.com/node/8223
श्यामसुंदरच्या नितांतसुंदर संगीताने नटलेली पुढील गाणी मला आवडतातः
साजन की गलियां - लता - बाजार
दुनिया हमारी प्यार के - लता व करण दिवाण - लाहौर
बहारें फिरभी आयेगीं - लता - लाहौर
सुनलो सजन मेरी बात - लता व करण दिवाण - लाहौर
टूटे हुए अरमानों किं - लता - लाहौर
ही सगळीच गाणी मस्त आहेत पण त्यातलं 'बहारें फिरभी आयेगी, मगर हमतुम जुदां होंगे' हे गाणे अंगावर काटा आणतं. साजन कि गलियां' चा ठेकाही मला खूप आवडतो (पडद्यावर निगार सुल्तानाने हे गाणे साकार केले आहे, तीही एक बर्यापैकी गायिका होती; नशीब हे गाणं स्वतःच म्हणायचा आग्रह धरला नाही!)
सुनलो सजनचा उडता ठेका आणि लताचा कोवळ्या काकडीसारखा आवाजही अति अति मोहक आहे..
तर्री
आर्.डि. ला पहिली पसनन्ती........पण मदन मोहन प्रथम...... आण्णाना अग्रपूजेचा मान .......एस्.डी पन्चम पिता म्हणून त्यापुढे ........वसन्तराव देसाई /जयदेव / ह्रदयनाथ पहिल्या नबराचे दावेदार.
.........दुबळी माझी झोळी, दुसरे काय ?
हा निकष अत्यंत आवडला. कारण तोच निकष मीही लावतो. तेव्हा
* हृतिक रोशन आवडतो, म्हणून त्याच्या आज्याचे (स्वर्गीय रोशन) संगीत आवडते.
* राधा मंगेशकरचा आल्बम आवडला, म्हणून तिच्या वडीलांचे संगीत आवडते. तसेच लता मंगेशकर आणि आशा भोसले ह्या एकेकाळच्या गायिका तिच्या आत्या आहेत म्हणे! त्यामुळे त्याही आवडतात असे म्हणणे आलेच..
*अमितकुमार आवडतो, तेव्हा त्याचा बाप किशोरकुमार ह्याचा नंबर लावणेही आलंच!
* महम्मद रफीचा मुलगा चांगला आहे असे ऐकले आहे, म्हणून त्याच्या बापाचे गायनही आवडले म्हणणे भाग आहे!
* करिष्मा कपूर आवडते, तेव्हा तिचे आजोबा राज (का कोणीतरी-- एकेकाळचे नट, दिग्दार्शक होते म्हणे) आवडतात.
* पल्लवी जयकिशनचे बाटिकचे दुकान आवडते, तेव्हा तिच्या नवर्याचे (जयकिशनचे) 'आवडते' ह्या सदरात नाव घेतले पाहिजे!
* नाकात गाणार्या गायिकेचा जमाना शारदापासून सुरू झाला. ती आवडते, म्हणून तिला ह्या क्षेत्रात आणणार्या शंकर नावाच्या कुण्या संगीतकाराबद्दलही 'आवडतो' असे म्हटले पाहिजे!!
...क्रॉस्ड वायर्स.....
>>मदन मोहन no doubt about it
>>सलील चौधरी
>>RD ची काही गाणी आवडतात. काही सरळ सरळ english गाण्यांवरून उचललेली होती. त्यापेक्षा वडील SD निदान स्वतः ची बंगाली चालीच हिंदीत आणायचे.
अहो, बॉसला नावं ठेवायची नाहीत अजिबात!
सलिलदांबद्दल पुर्ण आदर बाळ्गुन सांगतो - सलिलदांची कित्येक गाणी सिंफनीवर आधारीत आहेत. त्यामुळेच ते कोरसचा अनावश्यक वापर करतात असे म्हटले जाते.
काही हिंदी गाणी आपल्याला नितांतसुंदर अवीट चालीमुळे आवडतात त्या चाली कुठून ढापलेल्या आहेत (sorry inspired from)
ते इथे बघू शकता
http://www.itwofs.com/hindi-rdb.html
- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
सचिन देव बर्मन यांना मत दिले आहे.
कारण बंदिनी गाईड आराधना
आराधनाची गाणी आर्.डी. नी तयार केली होती हे जगजाहीर आहे. एस्.डी. पेक्षा आर्.डी. कीतीतरी प्रतिभावान होते!
आराधनाची गाणी आर्.डी. नी तयार केली होती हे जगजाहीर आहे.
आराधनाच काय, गाईडबद्दलही असेच ऐकून आहे. प्यासातील काही गाण्यांबद्दल तर हे म्हटले जातेच. आणि 'चल मेरी टोपी' ची स्टोरी माहितीच आहे सर्वांना.
खरे तर तो म्हातारा पान खाणे, स्वतःच्या कंजूषीचे दाखले देत फिरणे, 'एक लॉता गायेगी, एक व्हायोलिन बजेगा' असे म्हणणे, फूटबॉलचे वेड जगजाहीर करणे असल्या गोष्टीच करत होता, सगळे त्याच्यामागे अभिमन्यू सुपुत्र व इतर अॅरेंजर्स (बासू 'दा', मनोहारी'दा', मारुतिराव, दिलीप नाईक, केर्सी लॉर्ड वगैरे)च करायची. म्हातार्याचे उग्गाच नाव यायचे! त्याला काढून टाका या यादीतून!
ओ भाऊ ... ओ.पी. नय्यर कुठे आहेत?
आशाजींची कित्येक गाणी ...ओ.पीं.च्या तालबद्ध ठेक्यामुळे चिरस्मरणीय झाली आहेत
त्यांच्याशिवाय आणि अजून काही संगीतकारांशिवाय ही यादी अपूर्ण आहे. त्यांच्यावर कृपया अन्याय नको...
संगीतकार रवि
लक्ष्मी - प्यारे
हृदयनाथ मंगेशकर
राम-लक्ष्मण
किशोरदा..
अशी मला आठवलेली काही नावे
- संगीतप्रेमी - सागर
अरे अरे! अहो प्रदीप एवढं मनाला लाउन घेउ नका! आम्हाला एस.डी. पण आवडतात हो! - शर्मिलि, तेरे मेरे सपने! पण बॉस ईज बॉस!
पण काही म्हणा, या हेरंबने मात्र मस्त धागा टाकला आहे. हे युध्द आता लवकर थांबणार नाही!
संगीतकार रवि
लक्ष्मी - प्यारे
हृदयनाथ मंगेशकर
राम-लक्ष्मण
मग बप्पी लाहीरी, नदीम श्रवण, आनंद मिलिंदने काय घोडे मारले आहे?
आणि नव्या संगितकारांपैकी जतीन ललीतचे नाव यायला हरकत नाही!
ते बॉसच्या शाळेचेच विद्यार्थी आहेत !
ओ.पी सारखा संगीत कार झाला नाहि..त्याला लतादिदिचि सुध्धा गरज नव्हति...
ह्या मताशी सहमत. लताबाईंचा आवाज अजिबात न वापरताही स्वतःचे स्थान निर्माण करणे हे सोप्पे काम नव्हे.
अगदी भीतभीतच हे लिहीले आहे, कारण आसे सहमत होण्याचा तरी मला अधिकार आहे, की नाही हे माहित नाही. तसा असल्यास आनंद आहे. तसा तो नसल्यास अविनाशकुलकर्णींनी कृपया त्याचे वाटप कोण व कोठे करतो(ते) ह्याविषयी सांगावे. मी त्यांचा (मला तसा अधिकार असल्यास) आजन्म ऋणि राहीन.
श्री. अविनाशकुलकर्णी,
आपण समोरा समोर उभे राहू. मी माझ्या हाताचा पंजा पाचही बोटे तुमच्याकडे उभी करून उभा राहीन. तुम्ही त्यांतला अंगठा, पॉइंटर, आणि करंगळी, आणि रिंग फिंगर बंद करून घ्यावे. हे आमचे मत !
-- मिसळभोक्ता
जो मानुस ओ.पी नय्यर ला विसरतो त्याला असले कौल काढायचा अधिकार नाहि..
ओ.पी. च कशाला, आणखी बरेच संगीतकार राहून गेलेत. पण आपण माझे "मला न आठवलेले संगीतकारही घेऊ शकता" हे वाक्य वाचले नाही का ? इथे कुणाला कमी जास्त लेखण्याचा प्रश्नच नाहीये. ही लोकशाही असल्यामुळे प्रत्येकाची आवड वेगवेगळी असू शकते.
असो. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
संगीतक्षेत्रात इतके महान लोक होऊन गेलेत की मला धागा काढायचाच काय, नुसता "आ" करण्याचाही अधिकार नाही.
सज्जाद हुसेनच्या विक्षिप्त आणि परखड स्वभावामुळे त्याला मिळावी तेवढी प्रसिध्दी मिळू शकली नाही. पण त्याला स्वत:च्या संगीताबद्दल अत्यंत अभिमान होता (काही लोकांच्या मते अनाठायी). त्याचे एक दोन किस्से:
१. तलत महमूद्ला तो "गलत" महमूद म्हणत असे. कारण त्याचा आवाज चांगला असला तरी त्याला शास्त्रीय संगीताचा गंधही नव्हता.
२. त्याच्या "ये हवा ये रात ये चांदनी" या गाण्यावरून मदन मोहन ने "तुझे क्या सुनाऊ मै दिलरूबा" ची चाल तंतोतंत घेतली होती. आणि ते गाणे पण खूप लोकप्रिय झाले होते. हे कळल्यावर सज्जाद विषादाने म्हणला होता "आजकल अपने तर्जोंकी परछाईयांभी चलती है".
३. सज्जाद्च्या चाली गायकांसाठी खूप अवघड असत. एका चित्रपटातल्या गाण्यासाठी लता स्टुडिओमधे रिहर्सल करत होती पण तिला अनेक वेळा प्रयत्न करूनही एक अवघड जागा जमत नव्ह्ती. तेव्हा वैतागून तो लताला म्हणाला होता 'लताजी, ये नौशादमियां का गाना नही है. आपको मेहनत करनी पडेगी."
अनिल विश्वासच्या मते हिंदी चित्रपटाच्या संगीतकारांमधला एकमेव ओरिजिनल संगीतकार म्हणजे सज्जाद.
सज्जाद हुसैनच्या विक्षिप्तपणाच्या किश्श्यांपेक्षा त्यांच्या अप्रतिम गाण्यांची चर्चा अधिक शोभली असती ह्या धाग्यावर.. असो.
सज्जाद हुसैनसाहेबांचा जन्म मध्यप्रदेशातल्या सीतामहू गावी झाला होता. त्यांचे वडिलही तेथील संस्थानात कलाकार होते. पुढे मुंबईत आल्यावर अतोनात मेहनत घेऊन सज्जादसाहेबांनी मेंडोलिनसारख्या इटालियन वाद्यावर कमालीची हुकूमत मिळवली होती. ते हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत मेंडोलिनवर वाजवित असत; जलसेही करीत. एक किस्सा आठवला.. एका संगीत महोत्सवात त्यांचे मेंडोलिनवादन ठेवले होते. स्टेजच्या मागच्या खोलीत उस्ताद बडे गुलामअलींची गाठ पडली. उस्तादजींनी छेडलं," मेंडोलिन पे हरकत- तान कैसे बजेगी..?" स्टेजवर हिराबाई बडोदेकर गात होत्या, त्यांनी एक अवघड तान घेतली.. ती संपते ना संपते तोच इथे सज्जादने मेंडोलिनवर सही सही तान वाजविली.. उस्तादजी बघतच राहिले! ते मेंडोलिनवर 'मींड' काढण्याची अशक्य गोष्ट लीलया करू शकत! काय रियाझ असेल!
प्रतिभेचीसुद्धा असामान्य देणगी खुदाने त्यांना बक्षली होती. पण विक्षिप्त स्वभाव आणि नालायक चित्रपट निर्माते ह्या दोन गोष्टींमुळे सज्जादने फक्त तेरा चित्रपटांना संगीत दिलं. त्रेसष्ट सालच्या 'रूस्तूम सोहराब' नंतर निवृत्तीच पत्करली.
'ये हवा ये रात ये चांदनी' (तलत- संगदिल), 'दिल में समा गये सजन (तलत- लता- संगदिल. ह्या गाण्यावरून प्रेरीत होऊन ह्रदयनाथांनी 'संधीकाली या अश्या' हे गाणे तयार केले होते! ), ये कैसी अजब दास्तां' (सुरैय्या- रूस्तूम्-सोहराब) आणि त्याच चित्रपटातलं लताने म्हटलेलं 'ऐ दिलरूबा..' ही सगळीच गाणी इतकी सुंदर आहेत की वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाहीत. विशेषकरून ये कैसी अजब आणि ऐ दिलरूबा ही गाणी तर काळजाचा ठाव घेतात.. गूढ वातावरणात नेतात.. तात्या किंवा प्रदीपच लिहू शकतील.
सज्जाद जरी वागायला चमत्कारीक असले तरी समकालीन वा ज्युनिअर संगीतकार त्यांना मानत असत. ओपी तर स्वतःचे कान पकडून त्यांना 'वलीसाहब' असे आदराने संबोधित असे. ते एक अवलियाच होते. खुदावर नितांत श्रद्धा असलेले सज्जाद 'ये हवा ये रात ये चांदनी, तेरी इक अदा पे निसार हैं' असे अल्लाला उद्देशून म्हणत असत.
सहसा इतर (व इतरांच्या) गाण्यांबद्दल न बोलणार्या सज्जादने एस डी च्या 'मेघा छाये आधी रात' आणि पंचमदांच्या 'रैना बीती जाय' चं भरभरून कौतूक केलं होतं.
आज सज्जादसाहेबांची मुलं इंडस्ट्रीमध्ये तरबेज मेंडोलिन वादक म्हणून नाव कमावून आहेत.
खरंच, रुस्तम सोहराब ची गाणी.......
ए दिलरुबा, आणि ये कैसी अजब दासता हो गयी है....छुपाते छुपाते बयां हो गयी है.......( यातील हळू हळू वर - वरच्या स्वरात जाणारे मधले वाद्यसंगीत....) केवळ अप्रतीम......
अॅग्रीड ......"इलाही ये तुफान है किस बला का के हाथोंसे छूटा है दामन हया का" : )............ अ-प्र-ति-म गाणी आहेत रुस्तम्-सोहराब ची.
मला सडं बर्मन फार आवडतात ..... त्यांचं "मेरे साजन है उस पार" वेड लावतं मला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
स्नेहल भाटकर आणि एस. एन त्रिपाठी यांची देखिल खूपच छान गाणी आहेत...
तसेच " मेरे मेहेबूब न जा...आजकी रात न जा...होनेवाली है सहर....थोदी देर और ठहर....हे गाणे कुणी संगीत बद्ध केले आहे?
एस. एन. त्रिपाठीने थोडे चांगले संगीत दिले हे कबूल, पण त्यात वैविध्य नव्हते आणि पाश्चिमात्य संगीताशी त्याला फटकून रहायचे होते. त्याच्या असिस्टंट चित्रगुप्तने वेगळी वाट चोखाळली. भारतीय व पाश्चिमात्य संगीताचा सुंदर मिलाफ त्याच्या संगीतात दिसून येतो.
पॅथॉसचे एक उत्तम उदाहरण त्याचे लताने गायलेले हे गाणे देते.
अरे व्वा.... फार व्याकुळ करणारे गाणे आहे ते...
आणखी एक तसले सुप्रसिद्ध गाणे म्हणजे " कभी तनहाइयोंमे....हमारी याद आएयेगी....अंधेरे छा रहे होंगे....ते स्नेहल भाटकरांचे आहे ना?
जानीबाबू कव्वाल यांची हिंदी चित्रपटातील आणखी गाणी कोणती ? आणि त्यांच्या प्रसिद्ध कव्वाल्या कोणत्या? लहानपणी ऐकलेले असेल, पण आता आठवत नाही....
अण्णा चितळकर ऊर्फ सी.रामचंद्र
नौशाद
मदन मोहन
एस.डी.बर्मन
सलिल चौधरी
शंकर जयकिशन
रोशन
ओ.पी.नय्यर
आर.डी.बर्मन
हेमंत कुमार
लक्ष्मीकांत प्यारेलाल
कल्याणजी आणंदजी
प्रतिक्रिया
मदन मोहन
२००% सहमत
In reply to मदन मोहन by दत्ता काळे
नालायक!!!
अजुन एक नालायक
In reply to नालायक!!! by बिपिन कार्यकर्ते
हे बाकी
In reply to अजुन एक नालायक by टारझन
हिर्यांचं वर्तुळ आहे कुठूनही सुरुवात करा तिथेच येऊन पोचाल!
ओ.पी. नय्यर
एका वेळी
अर्थात आर डी !!
सहमत... सगळे
In reply to अर्थात आर डी !! by अनिल हटेला
अहो क्रम
कुणी एक निवडणे अशक्य आहे!
ही माझी
ओ पी नैय्यर नंबर एक वर : पूर्णपणे सहमत.
In reply to ही माझी by बबलु
माझी यादी
पंचम
मदन मोहन
माझेही
एस डी
जयदेव आणि खेमचन्द प्रकाश
शाम सुन्दर
श्यामसुंदर
In reply to शाम सुन्दर by प्रमोद्_पुणे
धन्यवाद
In reply to श्यामसुंदर by डॉ.प्रसाद दाढे
तर्री आर्.ड
हा हा हा!
In reply to तर्री आर्.ड by तर्री
हुर्र....
In reply to तर्री आर्.ड by तर्री
बॉस ईज ऑलवेझ राईट !
बॉस बद्दल थोडे
In reply to बॉस ईज ऑलवेझ राईट ! by सचीन जी
आराधना!
तर, तर....
In reply to आराधना! by सचीन जी
काही नावे राहिली आहेत
त्याला काढून टाका या यादीतून!
मग हे का नकोत?
चतुरंग जी शी सहमत !!
जो मानुस
अंशतः सहमत
In reply to जो मानुस by अविनाशकुलकर्णी
लतादीदी, गरज
In reply to जो मानुस by अविनाशकुलकर्णी
ओ.पी सारखा संगीतकार झाला नाहि
In reply to जो मानुस by अविनाशकुलकर्णी
अरेरे!
सज्जाद
सज्जाद!
रुस्तम सोहराब ची गाणी
अॅग्रीड
In reply to रुस्तम सोहराब ची गाणी by चित्रगुप्त
माझा क्रम
स्नेहल भाटकर आणि एस. एन त्रिपाठी
जानीबाबू
In reply to स्नेहल भाटकर आणि एस. एन त्रिपाठी by चित्रगुप्त
चित्रगुप्त
In reply to स्नेहल भाटकर आणि एस. एन त्रिपाठी by चित्रगुप्त
जानीबाबू कव्वाल
होय...
माझा क्रम