✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चायपे बुलाया है...(अंतिम)

स
सुबक ठेंगणी यांनी
Mon, 06/22/2009 - 08:50  ·  लेख
लेख

Book traversal links for चायपे बुलाया है...(अंतिम)

  • ‹ चायपे बुलाया है...(भाग १)
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10955 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

धन्यवाद

ज्ञानदा कुलकर्णी
Mon, 06/22/2009 - 09:06 नवीन
खरेच खूप छान आहे हा अनुभव ... आणि असा कडू चहा काय कोणताही चहा पिताना टपरी वरच्या "कटिंग" ची आठवण होणारच.. आपला अनुभव सर्वासोबत वाटल्याबद्दल धन्यवाद. जर कधी अशा टी सेरेमनी ला जाण्याचा योग आला तर्..........पाहू विचार करु आणि मगच निर्णय घेऊ
  • Log in or register to post comments

छान

चंबा मुतनाळ
Mon, 06/22/2009 - 09:08 नवीन
दोन्ही लेख उत्तम झाले आहेत. आपण म्हंटल्या प्रमाणे, शेवटी रस्त्यावरचा/कॅंटीनमधला चहा हाच बेष्ट! अवांतरः आपण डहाणूकरच्या दिसता!
  • Log in or register to post comments

धन्यवाद...

सुबक ठेंगणी
Mon, 06/22/2009 - 10:07 नवीन
धन्यवाद... मी डहाणूकर नाही साठ्येची आहे हो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंबा मुतनाळ

दिक्षित रोडवरच्या भटाचा चहा म्हणजे खासचं!

मुशाफिर
Mon, 06/22/2009 - 22:33 नवीन
तुमच्या लेखाने 'कटिंगशी' संबंधीत बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या. भटाचा तो 'कटिंग' चहा एकदम फर्मास. विषेशतः 'उत्सव' च्या वेळी रात्री जागवताना तर अमृतच! साठ्ये बाहेरच्या चहावाल्या भटाने एकदा आमच्या एका तिथेच 'पडीक' असणार्‍या वर्गमित्राला 'तुला ग्रॅजुऐशन नंतर किती पगार मिळेल?' विचारल होतं. आणि आकडा ऐकून 'ग्रॅजुऐशन नंतर माझ्याकडे ये, पार्टनरशिप देईन. जास्त कमवशील!' असही सांगितल होतं :). मुशाफिर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबक ठेंगणी

दोन्ही भाग

मदनबाण
Mon, 06/22/2009 - 09:27 नवीन
दोन्ही भाग मस्त वाटले... :) अवांतर टवाळकी :-- http://www.jokeemail.com/pictures/japanese.jpg मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka
  • Log in or register to post comments

हा हा हा

सुबक ठेंगणी
Mon, 06/22/2009 - 15:22 नवीन
दाखवलं शाळेत्...त्यांना जपानी पण नाही आलं वाचता आणि इंग्रजी पण ! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

सेरेमनी

सहज
Mon, 06/22/2009 - 09:44 नवीन
"चहा नको पण सेरेमनी आवर" :-) एकंदरीत हा सोहळा इज नॉट अवर कप ऑफ टी म्हणायचे तर :-)
  • Log in or register to post comments

बापरे! चहा

Nile
Mon, 06/22/2009 - 13:00 नवीन
बापरे! चहा सेरेमनी भलताच. हे जपानी लोक सगळी कामं अशीच शिस्तीत-आसनं वगैरे घालुन-करतात की काय? (तरीच जपानी लोकांच्या 'सुबक' पणाबद्द्ल आम्ही एवढ ऐकुन आहोत. ;) )
एकंदरीत हा सोहळा इज नॉट अवर कप ऑफ टी म्हणायचे तर
हा हा! गुड वन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

एकंदरीत हा

सुबक ठेंगणी
Mon, 06/22/2009 - 15:37 नवीन
एकंदरीत हा सोहळा इज नॉट अवर कप ऑफ टी म्हणायचे तर हा हा हा...खरं आहे! चहा चं नाव ऐकून कोणी फसू नये म्हणून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

दोन्ही

नंदन
Mon, 06/22/2009 - 09:46 नवीन
भाग मस्त, खुसखुशीत शैलीतलं वर्णन आवडलं. दीक्षित रोड वाचून साठ्येमधल्या आठवणी जाग्या झाल्या (कटिंग, सँडविच, शुक्ला चाट सेंटर इ.) :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

+१

बिपिन कार्यकर्ते
Tue, 06/23/2009 - 18:48 नवीन
सहमत... लेखाबद्दल आणि साठ्ये (आमच्या वेळचं पार्ला कॉलेज), दिक्षितरोड वगैरे बद्दल पण. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

सह्हीच लेख

विसोबा खेचर
Mon, 06/22/2009 - 10:30 नवीन
सह्हीच लेख आहे.. जियो... तात्या.
  • Log in or register to post comments

हा भागही

वर्षा
Mon, 06/22/2009 - 10:35 नवीन
हा भागही छान! आणि फोटोही :)
  • Log in or register to post comments

मस्त..

स्वाती दिनेश
Mon, 06/22/2009 - 11:32 नवीन
हा भाग पण छान जमला आहे, आवडला. स्वाती
  • Log in or register to post comments

मस्तच झाला आहे चहा...

मैत्र
Mon, 06/22/2009 - 11:54 नवीन
हे सगळे फोटो पाहून एक गोष्ट आधी विचारावीशी वाटते? प्रत्येक जपानी घर इतकं अतीव नीट नेटकं असतं का हो ? म्हणजे हरलोच मी ते फोटो पाहून्... अगदी मिठाई सुद्धा आपल्या लाडू किंवा दुधाच्या बंगाली टाईप मिठाया कशा जरा तरी रँड्म आकार.. एक रचना असली तरी... ह्या मिठाया म्हणजे चॉकलेटचे सुद्धा आकार वेडे वाकडे वाटाव्यात इतक्या सुबक!! जरा वेडेच आहेत हे लोक वाटतं! आणि तुमच्या आजीबाई अगदी बाहुली सारख्या आहेत ... आजी कसल्या... :)
  • Log in or register to post comments

चव सोडून

सुबक ठेंगणी
Mon, 06/22/2009 - 15:34 नवीन
चव सोडून बाकी सगळंच चांगलं असतं... ;) आणि मैत्र, हे घर नाहिये काही! हा पंचतारांकित हाटेलाचा हॉल आहे... पण अव्यवस्थितपणाच्या बाबतीत मी नक्की हरवेन त्यांना! :>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

मस्तच

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 06/22/2009 - 12:05 नवीन
मस्तच वर्णन! झक्कास...Tea.Y.B.A. तर फारच आवडलं! तुझा फोटो पाहून तुझ्या नावातल्या सुबकचा अर्थ कळला, पण ठेंगणी अगदीच अस्थानी वाटलं!
  • Log in or register to post comments

मस्त

क्रान्ति
Mon, 06/22/2009 - 19:20 नवीन
आहे हा पण लेख आणि फोटोही छान! :) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments

हा भागही

रेवती
Mon, 06/22/2009 - 19:25 नवीन
हा भागही मस्त! काकू आणि आज्जी किती तुकतुकीत आहेत. त्यांच्या किमोनोंचे रंग एकदम फिकट पण अल्हाददायक! मिठायांचे प्रकार आणि व्यवस्थितपणा बघून आईने केलेल्या नारळाच्या वड्या खाताना लहानपणी जो धसमुसळेपणा केला होता तो आठवला (आता मनातल्यामनात त्याबद्दल लाज वाटते). (देवाला नैवेद्य चौकोनी वड्यांचा दाखवायचा असल्याने कडेच्या निराकार ;) वड्या तोंडात कोंबल्या होत्या.) एकूणच सेरेमनी वाचायला आवडला. रेवती
  • Log in or register to post comments

भारीच

परिकथेतील राजकुमार
Mon, 06/22/2009 - 19:41 नवीन
भारीच सेरेमनी ! अशा सेरेमनीबद्दल ऐकले खुप होते पण सविस्तर वर्णन आज वाचायला मिळाले, आपल्याला सुबक धन्यवाद. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

छान आहे

चित्रा
Tue, 06/23/2009 - 01:15 नवीन
लेखही सुबक झाला आहे! आवडला हे सांगायला नको. (आता हे वाचूनच चहाची भयंकर तल्लफ आली आहे. बाहेर पावसानेही रिपरिप लावली आहे. अशा वातावरणात एकट्याने आपला आपण चहा करून घ्यायचा हे एक मोठे दु:ख.).
  • Log in or register to post comments

मजा आली

धनंजय
Tue, 06/23/2009 - 01:23 नवीन
मस्तच लिहिले आहे.
  • Log in or register to post comments

टी सेरेमनी वाचूनच अवघडल्यासारखं झालं!

चतुरंग
Tue, 06/23/2009 - 01:33 नवीन
एक तास वज्रासनात बसणे म्हणजे काय गम्मत ए? 'थर्डडिग्री' लावल्यासारखेच वाटले मला! :T लिवलंय नेहेमीप्रमाणे मस्त. मी मात्र मस्त खुर्चीत बसून चहा पितापिताच वाचला हा लेख! बाहेर पाऊस, संगणकावर हा लेख आणि हातात चहाचा कप व्वा!! 'काषाय्-शर्करा'योग असला तर तो हाच असावा, आणि नसला तर आजपासून म्हणायला लागूयात! ;) (चहाबाज)चतुरंग
  • Log in or register to post comments

'काषाय्-शर्

सुबक ठेंगणी
Tue, 06/23/2009 - 06:10 नवीन
'काषाय्-शर्करा'योग हाहाहा...आवड्या! :)) (काषाय-शर्करा योगी) सुबक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

दोन्ही भाग

प्राजु
Tue, 06/23/2009 - 02:07 नवीन
दोन्ही भाग आवडले. :) चहा नको पण सेरेमनी आवर.. मस्त!!!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त

श्रीयुत संतोष जोशी
Tue, 06/23/2009 - 08:48 नवीन
दोन्ही भाग एकदम मस्त झालेत. मजा आली वाचताना. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

मस्तच लेख...खुप नवी माहिती मिळाली.

वेताळ
Tue, 06/23/2009 - 18:23 नवीन
जपान मध्ये खाद्यपदार्थाना चव जरा कमीच असते.माझ्या बर्‍याच मित्राना जपान मध्ये खाण्यापिण्या बाबत खुप अडचणी आल्या.आज तुमच्या टी सेरेमनी वरुन ते लक्षात आले. काही शाकाहारी पदार्थात ते बिन्धास्त माशांचा व समुद्रप्राण्याचा वापर करतात असे एकले आहे ते खरे आहे का? माझ्या मित्राचा मुलगा लहानाचा मोठा तिथे झाला (आता ते परत भारतात आले आहेत) तो एकदा जपानिझ नुडल्स खात होता, त्याचा वास देखिल मला सहन झाला नाही. परंतु त्याने चवीने ते संपवले.त्या जाड नुडल्स उकळुन त्यात कच्चे अंडे टाकुन खातात.एकदंरीत खाण्यापिण्या बाबतीत भारतिय खुपच नशीबवान आहेत असे वाटते. वेताळ
  • Log in or register to post comments

छान !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 06/23/2009 - 18:28 नवीन
दोन्ही भाग आवडले !
  • Log in or register to post comments

मस्त

यशोधरा
Tue, 06/23/2009 - 18:54 नवीन
मस्त लिहिलं आहेस हां सुठें :)
  • Log in or register to post comments

इच्ची गोचीच की हो!

धमाल मुलगा
Tue, 06/23/2009 - 19:35 नवीन
हे “इचि गो इचि ए” म्हणजे. आपल्याला त्यातलं काही म्हणता काही सुधरत नाही, 'एक ते च्या पियाचं तर किती वो ते कुचकुचऽऽत्त बसायचं' असं काहीसं झालं माझं. बाकी, अनुभव वर्णन छानच. आवडलं वाचायला..पण................ चहा कसा प्यावा ह्याबद्दलची माझी वैयक्तीक प्रांजळ मतं ही अशी: चहा हा कधीही पुर्ण/फुल्ल वगैरे पिण्यात मजा नाही. तो कटींग कटींग करत चारदा प्या हवं तर लागोपाठ पण...कटींगच. कटींग चहा हा त्या चिमुकल्या ग्लासातच हवा. कप वगैरे जहागिरदारी खास कॉफीसाठी राखीव!! (कॉफी कोणी ग्लासात दिली तर मी तो ग्लास, देणार्‍यावर भिरकावण्यापासून स्वतःला महत्प्रयासानं रोखतो :) ) चहाच्या चवीचे प्रमाण ही चहाची टपरी, बनवायची भांडी, चहावाला ह्यांच्या कळकटपणाशी चढत्या भाजणीत असते. :) (आठवा, फाईव्हस्टार हाटेलातला पुचाट चहा आणि कोपर्‍यावरच्या टपरीवरला खणखणीत कटींग :) ) चहा हे पेय माझ्या मते उभ्याने पिण्याचे पेय आहे :) (आठवा, क्क्क्क्क...कॉलेज के दिन ;) ) चहा पिताना गप्प गप्प गंभीर बसणारा माणूस हा एकतर मुकबधीर असतो किंवा डोक्यावर भयानक चढलेलं कर्ज कसं फेडायचं ह्याच्या चिंतेत असतो. हे जपानी लोक असं गप्गुमान कसं काय चहा पिऊ शकतात राव? आमच्याकडं तर चहाच्या एकेका कटींगसोबत एकेक दोस्त होत जातो :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

लेख आवडले

संदीप चित्रे
Tue, 06/23/2009 - 23:07 नवीन
>> आम्हाला ही टपरी म्हणजे कॉलेजचंच एक extension वाटायची. अग आम्हाला तर कर्वे रोड आणि पलीकडचं गरवारे कॉलेज हे 'मयूरेश्वर' अमृततुल्यचं एक्स्टेन्शन वाटायचं :)
  • Log in or register to post comments

हा हा हा

सुबक ठेंगणी
Wed, 06/24/2009 - 09:15 नवीन
खरं आहे. कॉलेजपेक्षा टपरीवर भरणारे 'वर्ग' अधिक interesting असायचे हे बाकी खरं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा