वेज हैद्राबादी बिर्यानी :)
मित्रांनो हा माझा लिहण्याचा पहिलाच प्रयत्न आहे .... आणि तेही मराठीत ....माझी काही चूक झाली तर क्षमा करा ......
तसे तर ही रेसीपी नॉन वेज असते पण माझ्या सारख्या शाकाहारी लोकांना हे नक्कीच आवडेल.....चला आता सुरु करुया...
सर्व प्रथम आपण लागणार्या वस्तूंची लिस्ट करुया.....
हवे असलेले साहित्य :
बासमती राईस (पतेली मधे मीठ टाकून वाफायचा,सुट्टा भात करण्यासाठी त्यात १ टी स्पून तेल एड करा) : ५००ग्राम
कांदे (उभा कापलेला) : ४ते ५
टॉमेटो : ५ते ६
गाजर : २
कॅपसीकम : ३
फ्लॉवर : ५०ग्राम
वटाने : १०० ग्राम
वाफवलेल्या पालकची पेस्ट : २५०ग्राम
आले - लसूणची पेस्ट : २टेबलस्पून
गरम मसाला :१टेबलस्पून
एवरेस्ट बिर्यानी मसाला : १टी स्पून
लाल मिर्च पावडर : २टेबलस्पून
हळद पावडर : १टीस्पून
जीरा : २टी स्पून
मीठ् : चवीनुसार
सोडा :१टीस्पून
लवंग ,कडी पत्ता , इलायची, कोथींबीर गरजेनुसार
शेवटी सजावट करण्यासाठी
काजू आवडीनूसार
तेल : १ वाटी,
घी : ३/४ वाटी ,
मलाई : १वाटी
कोळसा
कृती:
सर्व प्रथम एका पॅन मधे तेल टाका, आणि ते गरम झाले की त्यात जीरा,लवंग्,कडी पत्ते आणि ईलायची टाका.
त्यानंतर उभा कापलेला कांद्यात मीठ घालून तो गुलाबी रंगाचा होईपर्यंत गरम करा.त्यात आल्या लसूणची पेस्ट टाका.
आता गाजर , कॅपसीकम,वटाने आणि फ्लॉवर घेऊन त्यात सोडा घालून,पॅनला धाकून त्यात पाणि सुटे तोपर्यंत शिजवा.
आता कापलेला टॉमेटो टाका आणि त्याचाही पाणि सुटेपर्यत पकवा.
पुढे त्यात पालकची पेस्ट आणि मलाई टाका .
तो उकळे तो पर्यत त्यात मीठ्,हळ्द्,लाल मीर्च्,गरम मसाला आणि एवरेस्ट मसाला टाका आणि सगळे मसाले आणि भाज्या बरोबर मिक्स करा.
हे झाले की त्यात भात टाका आणि मस्तपैकी पालकचा आणि मसालेचा रंग येईपर्यंत मिक्स करा.
सगळे झाले की शेवटी पॅन मधे बिर्याणिवर १ कोळशाचा तुकडा ठेवा आणि २ मिनीटांसाठी पॅनला झाका. पॅन उघड्ले की त्यातून मस्त तंदूरचा सुगंध येतो.
त्यानंतर एका प्लेट मधे वाढून त्यावर कोथींबीर आणि काजूने सजावट करा. बिर्याणी आपण रायता बरोबर खाऊ शकतो.
फोटो नेटवरून घेतला आहे.
ह्या पाककृती चे क्रेडीट जाते माझ्या आईला जी मला सतत अशी रेसीपी शिकवत असते.
थँक्स
ह्या पाककृती चे क्रेडीट जाते माझ्या आईला जी मला सतत अशी रेसीपी शिकवत असते.
थँक्स
वाचने
13978
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
वा छान आहे
१+
व्हेज ??????????
In reply to व्हेज ?????????? by टारझन
थोडेसं
In reply to व्हेज ?????????? by टारझन
नुसते मास खाणारा!!!!!
काय चाललेय
घाबरु नकोस राजे....
In reply to घाबरु नकोस राजे.... by जेन
+१ सहि
सुंदर फोटो दिसत नाही.
वाह!
धन्यवाद लोक्स!!!!
मित्रांनो
खमंग!
चला......मिपा
In reply to चला......मिपा by रेवती
असेच
खरंच म्हटले !!!!!
जेन मस्त दिसतोय फोटो
फोटो
नेटवरचा फोटो आहे!!!
In reply to नेटवरचा फोटो आहे!!! by जेन
नको
ह्या
आवडलि........!!
जेन, मस्त