पिकलेल्या आंब्याचा मुरांबा.
मिपाच्या सदस्या 'मस्त कलन्दर'ह्यांनी काही दिवसांपूर्वी पिकलेल्या आंब्याच्या मुरांब्याची कृती विचारली होती.
माझ्या कृतीबरहुकूम मुरांबा केल्यावर पाक थोडा घट्ट झाल्याने पाककृती मनाजोगी जमली नाही; त्यामुळे इथल्या ग्रोसरी
स्टोअरमधे मिळणार्या हापूससदृश आंब्याचा मुरांबा करुन बघितला.
साखर आणि आंब्याच्या फोडी ह्यांचे प्रमाण बदलून बघितल्यावर हवा तसा मधाळ मुरांबा जमल्यासारखे वाटते. पहा बरे मंडळी! :)
साहित्य - आंबे सोलून मोठाल्या फोडी, फोडींच्या दीडपट मापात साखर,
साखरेच्या ३०% पाणी (आंबे खूपच रसाळ होते म्हणून, अन्यथा साखरेच्या निम्मे पाणी घ्यावे), ३ लवंगा व थोडा लिंबूरस.
कृती - साखर व पाणी एकत्र करून दोनतारी पाक करावा. लगेच आंब्याच्या फोडी व लवंगा घालाव्यात.
आंब्याच्या रसामुळे पाक पुन्हा पातळ होइल. मध्यम आचेवर मुरांबा उकळत राहूद्या. मधूनच ढवळायला विसरू नये.
आता इतकेच चट द्यायचे आहेत की पुन्हा दोनतारी पाक व्हावा. थंड झाल्यावर पाक आणखी घट्ट होतो हे लक्षात ठेवून थोडी लवकर आच बंद करावी.
मुरांबा साधारण कोमट झाला की त्यात पाव चमचा लिंबाचा रस घालावा म्हणजे साखरेचे कण तयार होत नाहीत.
पाक फार गरम असताना लिंबूरस घातल्यास पाक कधीकधी कडू लागतो.
भरपूर प्रमाणात मुरांबा करायचा असल्यास प्रिझर्वेटिव म्हणून १/८ चमचा पोटॅशियम मेटाबायसल्फेट घालावे.
रेवती
रेवती
वाचने
14737
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
खुप मस्त
आ हा हा! मस्त दिसतंय! :)
In reply to आ हा हा! मस्त दिसतंय! :) by Nile
आपली इच्छा
रेवती, असेच
छान
In reply to छान by चित्रा
हेच
In reply to छान by चित्रा
मी आधी
सुंदर..
In reply to सुंदर.. by शितल
हेच म्हणते..
रेवती,
मार डाला
च्यामारी !!
****
In reply to **** by शितल
घाबरू नका !!
In reply to घाबरू नका !! by टारझन
टारू,
रेवती
In reply to रेवती by मराठमोळा
मराठमोळास
जबरा!!
In reply to जबरा!! by शाल्मली
कधी
छानंच
काय बोलु ?
In reply to काय बोलु ? by अवलिया
मुरांब्याचा फोटो लैच भारी !
भन्नाट!
फोटो पाहूनच
In reply to फोटो पाहूनच by संदीप चित्रे
तुझी कल्पना आत्ताच प्रत्यक्षात आणली रे!
In reply to तुझी कल्पना आत्ताच प्रत्यक्षात आणली रे! by चतुरंग
एक तर
वाह वाह...
+१
सर्व
मस्त..
कसला जिवघेणा
अरे वा ...
In reply to अरे वा ... by लिखाळ
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
थोडं
काय करणार