या माध्यमांचं काहीतरी करा रे....
टीम इंडिया २०-२० मधून बाहेर पडली आणि वखवखलेल्या माध्यमांनी रीतसर धोनी आणि कंपनीच्या डोक्यावर पराभवाचं खापर फोडलं. २०-२० क्रिकेट हे बरंचसं जुगार आणि नशिबावर अवलंबून आहे. त्या दिवशी तुमच्या चाली यशस्वी झाल्या, की तुम्ही जिंकणार.
चुका करायला जवळपास शून्य जागा आणि १०० हून कोटी भारतीयांच्या अपेक्षेचे ओझे डोक्यावर घेवुन खेळणे सोपे नाही. गेली जवळपास दोन वर्षे धोनी आणि कंपनी विजयाचे मनोरे रचत आहे. तेव्हाही त्यांना नको इतके डोक्यावर घेवून नाचणारा हाच मीडिया होता.
हल्ली वर्तमानपत्रांनाही चॅनल पत्रकारितेची इंगळी डसली आहे. अतिशय उथळ विश्लेषण आणि गंभीर समालोचनापेक्षा सनसनाटी बातम्या देण्याकडे त्यांचा ओढा वाढतो आहे. वर्तमानपत्र वाचण्याचा तर हल्ली नॉशिया आलाय. अर्ध्या हळकुंडात पिवळी झालेली पोरे काहीही तारे तोडतात आणि ते छापुनही येतात.
धोनी आणि कंपनीवर टीका करताना कृपया याही गोष्टी लक्षात घ्या,
- गेली दोन वर्षे हा संघ अविश्रांत खेळत आहे.
- त्यात भर पवारांच्या गल्लाभरू आयपीएलची पडली. त्यामुळे वेळापत्रकावर आणि खेळाडुंच्या खेळावरही अधिक ताण आला.
- "आयपीएलमध्ये खेळू नका ना मग" असे सल्ले देणे सोपे आहे. शेवटी संघातली आपली जागा प्रत्येकालाच प्रिय असते. आपण त्यांच्या जागी असतो तर हेच केले असते.
- प्रत्येक वेळी आपणच जिंकायला हवं हा अटृटाहास विचित्र नाही का ?
- धोनी ब्रिगेडला दोषी ठरवून आपण एका गुणवत्तेने ठासून भरलेल्या संघाचे मनोधैर्य खच्ची करत आहोत हेही लक्षात घ्या.
- सेहवाग-धोनीतील मतभेदाच्या बातम्या नको तितक्या रंगवून माध्यमांनी काय मिळवले?
- जगात छापण्याजोगे दुसरे विषय राहिले नाहीत, की हल्लीच्या पत्रकारांची बौदिधक कुवत फक्त गल्ली-दिल्लीतले राजकारण आणि गेलाबाजार क्रिकेट याभोवती घुटमळण्याइतकीच आहे?
- या माध्यमांचं काही तरी कराच !
वाचने
3417
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुवत
हम्म. तरी
करमणुक
In reply to हम्म. तरी by नितिन थत्ते
शंभर टक्के सहमत
मी तर म्हणतो कि धोनीने म्याच फिक्सींग केली आहे.
बाकी
+१ सहमत
In reply to बाकी by विसोबा खेचर
गेल्या
In reply to बाकी by विसोबा खेचर
सहमत आहे .....
In reply to गेल्या by टारझन
+१
In reply to सहमत आहे ..... by मानस
माध्यमं सटकलीयेत
माध्यम
माझेही मत...
जगात