✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मी सखाराम गटणे

न
नंदन यांनी
Fri, 06/12/2009 - 07:26  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11016 वाचन

💬 प्रतिसाद (39)

प्रतिक्रिया

आता वय

विसोबा खेचर
Fri, 06/12/2009 - 07:41 नवीन
आता वय झालं. डोळे, कान काही नीट साथ देत नाहीत. पण तिकडे संपलेली कॅसेट माझ्या मनात सुरूच राहते. मी पन्नासेक वर्षांपूर्वी असा होतो, हे माझं मलाच खरं वाटत नाही. एखाद्या तिर्‍हाईतावर हसावं तसं माझे किस्से आठवून मला हसू येत राहतं. बोळा कधीच निघालेला असतो, पाणी अखंड खळखळत वाहत राहतं. " सु रे ख...! अन्य शब्द नाहीत... नंदनसायबा, जियो..! आपला, (गजा खोत प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

नंदनसायबा, जियो..!

संदीप चित्रे
Sun, 06/14/2009 - 09:10 नवीन
असेच म्हणतो... असं वाटलं की गटणे प्रत्यक्षात बोलतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

सु रे ख

सहज
Fri, 06/12/2009 - 07:51 नवीन
नंदन लेख फार छान आहे.
  • Log in or register to post comments

छान

चित्रा
Fri, 06/12/2009 - 08:59 नवीन
सखाराम गटणेंच्या प्रवासाचे वर्णन आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

नवं लिवा

मेघना भुस्कुटे
Fri, 06/12/2009 - 07:53 नवीन
नवं लिवा की राव. मी किती आशेनं बघायला आले... :(
  • Log in or register to post comments

ओ तै, आमी

घाटावरचे भट
Fri, 06/12/2009 - 08:04 नवीन
ओ तै, आमी वाचलं नव्हतं. लै भारी हाय बगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे

हे घ्या -

मेघना भुस्कुटे
Fri, 06/12/2009 - 08:08 नवीन
हे घ्या - http://marathisahitya.blogspot.com/ ज्यांनी वाचलं नव्हतं, त्यांना सहीच आहे हे. पण मला मारे वाटलं, इतक्या नवसासायासानं, इतक्या महिन्यांनी वगैरे लिहिलंय, तर कायतरी सॉल्लिड असणार. कसलं काय - म्हणून आवर्जून निराशा नोंदवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

सहमत

श्रावण मोडक
Fri, 06/12/2009 - 08:59 नवीन
लिहिलं आहे चांगलंच, पण मेघनाशी सहमत. हे लिहिलं होतंस तेव्हाच मी म्हटलं होतं आता एकेक कॅरेक्टर घेऊन करा सुरवात. कसलं काय? हा नंदन खूप आळशी आहे असं दिसतंय मंडळी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे

सबब

नंदन
Fri, 06/12/2009 - 09:05 नवीन
नानाला लिहिल्याप्रमाणे सवय मोडली होती, तेव्हा एकदम धावण्यापेक्षा रांगत रांगत पुन्हा सुरूवात करतो आहे :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

>>रांगत

यशोधरा
Fri, 06/12/2009 - 09:35 नवीन
>>रांगत रांगत पुन्हा सुरूवात करतो आहे हे म्हणून कोणाला तक्रार करु द्यायला वाव ठेवलेला नाहीस, त्याचा निषेध! :) आणि कारण दिले आहेस तरीही - नवीन काही न लिहिल्याचाही निषेध! अवांतरः हे लिहिलेले उत्तमच आहे! परत वाचायलाही खूप मजा आली. :) जरा नियमित लिही रे माणसा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

सहमत!! नियम

भाग्यश्री
Fri, 06/12/2009 - 11:42 नवीन
सहमत!! नियमित लिही माणसा!! :) http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

+१

प्राजु
Fri, 06/12/2009 - 22:25 नवीन
लिहिलेले आधी वाचले होते तरीही नव्याने आनंद घेता आला. पण आता नवे काहीतरी जोरदार येऊदे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

रांगत?

श्रावण मोडक
Fri, 06/12/2009 - 20:17 नवीन
पाठीवर एक मूल घेऊन बाबागाडी करण्याची वेळ आली तरी हा म्हणतोय रांगत. धन्य आहे तुझी. __/\__ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

सुरेख...

सुबक ठेंगणी
Fri, 06/12/2009 - 08:15 नवीन
आता इतर व्यक्ती आणि वल्ली पण येऊदेत... :)
  • Log in or register to post comments

सहमत आहे!

Nile
Fri, 06/12/2009 - 09:49 नवीन
सहमत आहे! सुरेखच! बाकी वल्लींची वाट पहातो! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबक ठेंगणी

वा! मस्त

अवलिया
Fri, 06/12/2009 - 08:50 नवीन
वा! मस्त सुरेख लेख !! --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments

!

एकलव्य
Fri, 06/12/2009 - 09:20 नवीन
आयुष्य ('जीवन' म्हणायचे तेव्हाच सोडले) ही काही फार सीरियसली घ्यायची गोष्ट नाही, हे जरा उशीरानेच का होईना पण समजलं खरं. वा! - एकलव्य गटणे
  • Log in or register to post comments

अजुन येऊ देत ...

छोटा डॉन
Fri, 06/12/2009 - 09:52 नवीन
नंदन मालकांचा हा लेख आम्ही बर्‍याच आधी वाचला होता, तेव्हा फार आवडला होता. आता अजुन पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळाला ... एक विनंती, असेच बाकीच्या व्यक्तीरेखांवर लिहावे. मस्त जमतो आहे हा प्लॉट तुम्हाला, आम्ही वाट पहात आहोत ... ------ डॉन्या बर्वे. एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments

मस्त

दिपक
Fri, 06/12/2009 - 09:52 नवीन
आधी नंदनच्या ब्लॉगवर वाचला होता. परत वाचताना मजा आली. भारीच लिहिले आहे. अजुन असे वाचायला आवडेल. विनंती आहे नंदन आमची. :) (पु.ल.प्रेमी) दिपक
  • Log in or register to post comments

हा लेख आधी

निखिल देशपांडे
Fri, 06/12/2009 - 09:54 नवीन
हा लेख आधी वाचल्याचे आठवते... परत पण वाचायला तेव्हढीच मजा आली. आता इतर व्यक्ती आणि वल्ली पण येऊदेत असेच म्हणतो ==निखिल
  • Log in or register to post comments

पळा पळा

ऋषिकेश
Fri, 06/12/2009 - 10:09 नवीन
अरे हे काय! परत तेच? पुन्हा वाचायला आवडलं.. पण.....!!! असो. रांगु नकोस रे फार काळ.. पळ पाहु पटापट.. (पळपुटा)ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

:)

आनंदयात्री
Fri, 06/12/2009 - 10:23 नवीन
पुर्नवाचनाच्या आनंदाचा पुर्नप्रत्यय. :)
  • Log in or register to post comments

अप्रतिम

अरुण वडुलेकर
Fri, 06/12/2009 - 10:49 नवीन
या पेक्षा अन्य चांगला शब्द सुचत नाही. पहिल्यांदाच वाचला. फार छान वाटला. भाईंच्या पुण्य तिथीला सादर झाला हे विशेष. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मस्तच झालाय...

मनिष
Fri, 06/12/2009 - 11:16 नवीन
मी पहिल्यांदाच वाचला आणि हा गटणे आवडला! :) - मनिष (अवांतर - हल्लीचे आधुनिक गटणे मिपा वर निबंध लिहितात म्हणे! ;))
  • Log in or register to post comments

वा ! वा !! वा !!! क्या बात है णंदण सेट

टारझन
Fri, 06/12/2009 - 20:34 नवीन
वरिल लेखातील गटणे आम्हाला ही भयंकर आवडला .. पुर्व इतिहास माहित नसल्याने .. आमचे मेंदूत पुलंच्या गटण्याची प्रतिकृती "ओव्हर राईट" झाली होती .. पण आता वेगळाच गटणे असल्याने सुखावलो .. णंदण भौ .. लिवा की राव आजून .. इथे "उरलेल्या पाकाचं काय करावं ? " आणि "फाटलेल्या चड्ड्यांचं काय करावं ? " असले लेख उचकून लै बोर झालंय राव ... @ मनिष : कसा आहेस रे दोस्ता , बरेच दिवस झाले तुझी खरड नाही , काळजी वाटली. - तुकाराम मटणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

मी सुद्धा

परिकथेतील राजकुमार
Fri, 06/12/2009 - 11:50 नवीन
मी सुद्धा पहिल्यांदाच वाचला, मस्त वाटले वाचायला. एकदम आवडला. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

नितिन थत्ते
Fri, 06/12/2009 - 12:25 नवीन
लेख आवडला. लोकांच्या मनात घट्ट प्रतिमा असलेल्या व्यक्तिचित्राबाबत लिहिणे अवघड असते. चांगले जमले आहे. (आम्हाला आधी कौलाराम परत आले असे वाटले होते) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

मस्त..

स्वाती दिनेश
Fri, 06/12/2009 - 12:27 नवीन
नंदन, पुन्हा वाचायला मजा आली पण इतरही व्यक्तिचित्रे रांगेत उभी राहून वाट पाहत आहेत,:) स्वाती
  • Log in or register to post comments

पुनःप्रत्ययाचा आनंद!

प्रमोद देव
Fri, 06/12/2009 - 12:30 नवीन
लेख ह्या आधी वाचला होता तेव्हाही आवडलेला आणि आताही तितकाच आवडला. काही काही गोष्टी करण्यात पुनःप्रत्ययाचा आनंद मिळत असतो. त्यातील एक म्हणजे हा लेख. नंदन असाच लिहीता राहा! हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments

मीही

डॉ.प्रसाद दाढे
Fri, 06/12/2009 - 13:10 नवीन
मीही पहिल्यांदाच वाचला.. मस्तच आहे..खूप आवडला लेख. पुलंना एका प्रकारे आदरांजलीच आहे! थोडीशी मुकुंद टांकसाळ्यांच्या बटाटा अपार्टमेंट्समध्ये पुलं' ची आठवण झाली.. अर्थातच तुम्हां-आम्हां सर्व पुलंप्रेमींच्या भावना अश्याच आहेत. मी एकवेळ माझे नाव, आयडेंटिटी विसरू शकेन्..पण पुलंच्या व्यक्तिरेखा नाही विसरू शकणार
  • Log in or register to post comments

सुरेख कल्पना रे नंदन!

चतुरंग
Fri, 06/12/2009 - 17:00 नवीन
मी पहिल्यांदाच वाचला लेख. फारच छान लिहलं आहेस. (जरा नियमित येऊ दे असं म्हणायचं होतं पण त्याआधी माझीच अर्धी राहिलेली कामं पूर्ण करायला हवीत हे लक्षात आल्यानं तसं म्हणत नाहीये! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

सॉल्लिड

भोचक
Fri, 06/12/2009 - 17:17 नवीन
नंदन, मस्तच.!!! लेख सॉल्लिडच आवडला. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/
  • Log in or register to post comments

लेख

मुक्तसुनीत
Fri, 06/12/2009 - 17:53 नवीन
मी पहिल्यांदाच वाचले हे. अर्थातच आवडले. "त्याचे पुढे काय झाले ?" अशा प्रकारची क्लोजर्स आपल्याला हवी असतात. "व्यक्ती आणि वल्ली" च्या संदर्भात विशेषच. हा अशा क्लोजरचा एक प्रयत्न वाटला. काही जाणवलेले विशेष : लहानपणीचा भोळसट वाटणारा सख्या स्वत:ला (आणि जगाला )समजून घेण्याच्या बाबतीत मचुअर , अनाग्रही वाटतो. एकेकाळी ज्याच्या वागण्याबोलण्यातून व्यंगात्म बाबी डोकावायच्या , त्याच्या विचारसरणीचे वर्णन "विवेकी" असे करता येईल. थोडक्यात "तो" सख्या पुलंचा , आणि आताचे श्री. गटणे नंदनचे आहेत. हे एकूण तर्काला धरूनच झाले. दुसर्‍या कुणाचे गटणे स्वतःला समजून घेण्याऐवजी काहीसे तिरसट म्हणा किंवा काहीसे आत्मप्रौढी मिरविणारे बनले असते. तसे इथे होत नाही. एकूण जगाशी नाळ त्याने जोडून घेतलीसे दिसते. तो एक टिप्पिकल "गीक" राहिला नाही. बाय द वे , काळाचा हिशेब करता, गटणेचे कान डोळे काम न करणे तर्कसुसंगत वाटत नाही. (का माझा हिशेब चुकतोय ??)
  • Log in or register to post comments

वाह!

llपुण्याचे पेशवेll
Fri, 06/12/2009 - 18:55 नवीन
वाह! सुंदरच.. छान लिहीले आहे. आवडले. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

सखाराम गटणेचा आत्मवृत्तांत आवडला

धनंजय
Fri, 06/12/2009 - 19:36 नवीन
मी पहिल्यांदाच वाचला. सखाराम गटणेचा आत्मवृत्तांत आवडला.
  • Log in or register to post comments

आवडला.

क्रान्ति
Fri, 06/12/2009 - 20:56 नवीन
हा वेगळा पैलू खूप आवडला. बाकीच्या वल्ली पण वाट पहात असतील नाण्याची दुसरी बाजू घेऊन प्रकाशात यायची! त्यांनाही येऊ द्या लवकर! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments

नंदन,

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 06/12/2009 - 21:17 नवीन
नंदन, गटणेचं आत्मकथन आवडलं. तू तुझी लेखणी का रे म्यान करून ठेवतोस? या लेखामुळे अशाच प्रकारातला आणखी एक लेख आठवला. (फाफॉ वापरणार्‍यांना कॅरॅक्टर एन्कोडींग वेस्टर्न करावं लागेल.)
  • Log in or register to post comments

मस्त!

राघव
Sat, 06/13/2009 - 10:49 नवीन
छान लिहिलेत. खूप आवडले. :) बाय द वे, मी शब्दबंधच्या चौथ्या सत्रात होतो, त्यामुळे तुमचे लेखन ऐकता आले नाही. असो. पुन्हा कधीतरी. राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर लेख

फारएन्ड
Sat, 06/13/2009 - 12:59 नवीन
अतिशय सुंदर लेख, एकदम आवडला! असे इतर व्यक्तिरेखांबद्दल ही वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा