एका नोकराला जन्मभर वातानुकूलित डब्यातून फुकटचा प्रवास मंजूर करून घेतला
राजकारणी कितीही मोठ्या पदावर असला तरी नोकरशहांच्या संमत्तीशिवाय भ्रष्टाचार करुच शकत नाही.पंतप्रधानांच्या निर्णयाला पण केंद्रिय सचिवांची संमत्ती आवश्यक असते.कुठलेही भ्रष्टाचाराचे प्रकरण घ्या,सरकारी अधिकार्यांचा त्यात सहभाग असतोच.
राजकारणी मंत्रीपदावर आला की पैसे खायचे वेगवेगळे मार्ग हेच सरकारी अधिकारी मंत्र्याला सांगतात्.कुठ्ल्या नियमांमध्ये त्रुटी आहेत्,कुठ्च्या नियमांचा कचाट्यात न अडकता गैरफायदा घेता येइल,कुठला अधिकारी पैसे खातो,कोण कडक आहे असली सर्व माहिती मंत्र्याला दिली जाते.वरील प्रकरणात ज्या अधिकार्यानी हा प्रवास मंजूर केला त्याना आधी झोडले पाहिजे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
दिलेल्या दुव्यातील राम नाईक यांची टीका वाचून गंमत वाटली.
राम नाईक काही काळ रेलवेमंत्री होते. त्यांनी रेलवेमंत्री होताच आपल्या मुलीला स्वतःची सहाय्यक म्हणून नेमले (रेलवेच्या पेरोलवर) आणि आपले एक संपर्क कार्यालय गोरेगाव स्थानकाच्या आवारात उभारले. ते रेल्वे मंत्री नसताना सुद्धा ते कार्यालय गोरेगाव स्थानकाच्या आवारातच चालू होते.
(हे कार्यालय मी अनेक वर्षे पहात आलोय. रेलवेची जागा बळकावण्याचाच हा एक प्रकार आहे. नंतर पेट्रोलिअम मंत्री झाल्यावरचे पेट्रोलपंपवाटप तर प्रसिद्धच आहे.)
खराटा
(रंग माझा वेगळा)
अरे बापरे! इतक्या जाहिर शिव्या देण्यासारखं काय झालंय ते कळलं नाहि. लालुंनी जे केले आहे ते चुक का बरोबर हा चर्चेचा वेगळा मुद्दा असला तरी त्यांनी जगावेगळं कहिहि केलेलं नाहि.. असा एकतरी पक्ष दाखवा ज्याचे मंत्री स्वच्छ निर्णयच घेतात
(शांत)ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
आपण शीर्षकात लालू यादव याचे एकच नांव तीनदा लिहून काय साधले? द्विरुक्ती सारखी त्रिरुक्ती ?
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
गेल्या वर्षी बहुतेक मटामध्ये एक बातमी आली होती.. पुण्याच्या एका गृहस्थाने माहिती अधिकाराच्या अंतर्गत राज्यपाल कृष्णा यांच्या देशांतर्गत दौर्यांवर किती रूपये खर्च झाले याची माहिती मागवली होती..
उत्तर: एकूण २५ लाख.
त्यांपैकी फक्त एकच दौरा कार्यालयीन होता..
बाकी सगळे दौरे दक्षिण भारतातील पत्नीच्या माहेरी झाले होते.. नि सगळ्या दौर्यांमध्ये त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत होत्या..
याचाच अर्थ.. कृष्णा यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा मनमानीपणे सासुरवाडीला जायला खर्च केला..
पण ही माहिती मिळूनही त्या प्रकाराची ना चौकशी झाली.. ना कुठल्या न्यूज चॅनेलने तो प्रश्न ऐरणीवर घेतला.. आताही लालूंची ही सवलत रद्द होईल.. की थोड्याच दिवसांत लोक ही बातमी विसरून जातील.. हे पहायचे..
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
प्रतिक्रिया
यादव
अशा
नोकरशहा
दिलेल्या
एक चूक
सहमत. (पण
अरे बापरे!
एकच नांव
हा हा!
यावर उपाय काय?