शाही टुकडा...
या पदार्थात शाही म्हणण्यासारखे काय आहे माहित नाही.. जिथे सर्वप्रथम खाल्ला.. तिथे याच नावाची पाटी होती.. [नाहीतरी.. नावात काय आहे?]. कृती आंतरजालावरचीच आहे.. थोडाफार बदल केलाय सुचेल तसा..
साहित्यः
१. चार ब्रेड स्लाईसेस
२. पाव वाटी तूप
३. १५०-२०० मिली दूध
४. वाटीभर साखर.. [गोडाच्या आवडीनुसार कमी-जास्त करता येईल ]
५. वेलची, चारोळी
६. रोझ इसेन्स
७. सजावटीसाठी बदाम पिस्त्याचे काप, चांदीचा वर्ख.
पाककृतीसाठी लागणारा वेळ : तीस मिनिटे
पाक़कृती:
१. प्रथम आटीव दूध तयार करून घ्यावे.. त्यासाठी दुधात साखर नि वेलची घालून ते मंद आंचेवर आटवण्यास ठेवावे.. [लागणारा वेळ साधारण २० मिनिटे]
२. ब्रेड स्लाईसेस च्या कडा सुरीने कापून टाकाव्यात.. नि ब्रेड स्लाईसचे त्रिकोणकृती दोन किंवा चार भाग करावेत..
३. सपाट बुडाच्या कढईत थोडे थोडे तूप घालून हे त्रिकोणकृती तुकडे सोनेरी रंगावर तळून घ्यावेत..
४. आटलेले दूध थोडे थंड झाले की त्यात आधी रोझ इसेन्स घालून नंतर हे तळलेले तुकडे घालावेत..
५. बदाम पिस्त्याचे काप घालून नि वर्ख लावून सजवावे [ घरी आयत्यावेळी या तिन्ही वस्तू नव्ह्त्या म्हणून एव्हरेस्टचा केशरी दूध तयार करण्याचा मसाला होता तो घातलाय.. त्यात बदाम पिस्त्याचे काप तर असतातच.. नि त्याचे चूर्ण ही असते.. हे दूधात मिसळले जाऊन आणखी छान लागतेआणि वर्खाला फाटा दिलाय :) ]
६. १५-२० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून थंड केले.. की खायला तय्यार...!!!!
खरंतर काल मी दोन पदार्थ बनवले.. पिकल्या आंब्याचा मुरांबा नि शाही टुकडा.. त्यातला पहिला पदार्थ पूर्णपणे फसला!!! ;)
तो फक्त दिसतोय चांगला!!! बाकी...इतका घट्ट आहे की कापायला धारदार सुरी वापरावी लागतेय.. चवीबद्द्ल विचारू नका.. काकवीतला आंबा.. किंवा घट्ट आंबापोळी.. आंबा चिक्की.. नक्की काय चव आहे..!हेच कोडं आहे!!!
एवढे करून खायचा प्रयत्न केला.. तर इक्लेअर चॉकलेट्सारखे, दात.... टाळू.... दाढा.... हिरड्या.. जिथे जिथे चिकटणे शक्य आहे.. अशा सर्व ठिकाणी चिकटतो.. नमनालाच असं घडल्यामुळे दुसरा पदार्थ कसा बनेल ही शंकाच होती.. म्हणून प्रत्येक कृतीचे फोटो काढले नाहीत.. शेवटी तयार झाल्यानंतर एकदा खाऊन पाहिला.. नि मगच फोटो काढला... :)
अवांतरः पिकल्या आंब्याचा मुरांबा खाण्यासाठी अजून गिनिपिग मिळाला/ली नाही.. :(
वाचने
9207
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
पिकल्या
पाणी टाका
In reply to पाणी टाका by दिपाली पाटिल
ऐकलं???
In reply to पाणी टाका by दिपाली पाटिल
छान युक्ती....
In reply to छान युक्ती.... by मस्त कलंदर
एक शंका...
शाही टुकडा
In reply to शाही टुकडा by रेवती
मस्त
शाही तुकडा
In reply to शाही तुकडा by विसोबा खेचर
तात्या,
In reply to तात्या, by चतुरंग
आम्ही
In reply to आम्ही by विसोबा खेचर
शाब्बास! ये हुई ना बात!!
शाही टुकडा खरंच शाही आहे!
In reply to शाही टुकडा खरंच शाही आहे! by चतुरंग
(अवांतर -
डबल का मीठा?
भारी
शाही टुकडा
In reply to शाही टुकडा by परिकथेतील राजकुमार
अरे.. अपडेट्स पण वाचत जा..
In reply to अरे.. अपडेट्स पण वाचत जा.. by मस्त कलंदर
ते वाचले ग
शाही तुकडा
हल्लीच
शाही
वावा..
शाही टुकडा..