चित्रकला माझा आवडीचा विषय ...नेहमी चांगलेच मार्क मिळायचे शाळेत पण तेंव्हा करीयर म्हणुन पण ह्याचा वापर करता येईल असा विचार केला नव्हता...
कॉलेजात गेल्यावर हळु हळु फक्त मित्र मैत्रिणींच्या वाढदिवसाची कार्ड बनवणे इतकाच काय तो चित्रकलेशी संबध यायचा... पुढे एम बी ए करताना हि प्रॉजेक्ट्स बनवताना थोडी फार क्रिएटिव्हिटी पाजळुन घ्यायचे. पण खर्या अर्थाने शिकले ते माझ्या एक जिवलग मैत्रिणी कडे ..ती कमर्शियल आर्टिस्ट होती आणी क्लासेस घ्यायची.. एकदा आइच्या वाढदिवसाला एखादे पेंटिंग विकत घेउन द्यावे म्हणुन तिच्या कडे गेले... तर तिने मला पटवले कि विकत घेण्यापेक्षा तुच बनव मी शिकवते.... आणि तिथे माझा क्लास सुरु झाला...
आई च्या नकळत नोकरी वरुन परस्पर तिच्याकडे जाउन जसा वेळ मिळेल तसा एक गणपती चे म्युरल बनवले.... एक महिना लागला कधी एक तास कधी अर्धा तास मिळेल तसा पण ते करुन आईला गिफ्ट दिले आणि आई इतकी खुश झाली कि बास...
तेव्हा पासुन जस जमत गेला तसे शिकत गेले ... म्युरल.. ग्लास पेंटिंग..ईजिप्शियन ..थाई पेंटिंग्स्...एकदा वारली पेंटिंग चे पण वर्कशॉप केले.
ऑईल आणि ऍक्रिलिक पेंटिंग मात्र राहुन गेले होते शिकायचे.
ईथे दुबई ला आल्यावर संधी मिळाली आणि नवर्याने पण पाठिंबा दिला आणी माझा क्लास सुरु झाला...
मी काढलेली काहि चित्रे इथे देत आहे .
हे चित्र फक्त निळया रंगात केले आहे.. सिंगल कलर थीम... ह्यात निळ्या रंगाच्या हव्या त्या शेडस मिळवण्यासाठी पांढरा आणी थोडासा लाल रंग वापरला आहे.
हे ऍक्रिलिक कलर्स वापरुन कॅनव्हास वर बनवले आहे.
हे चित्र मेमरी ड्रॉईंग आहे... केरळ मधिल मंदीरे मला अतिशय आवडतात्..तिथुन प्रेरणा घेउन मी हे चित्र बनवले आहे. ह्यात एक्रिलिक कलर्स वॉटरकलर पध्दती प्रमाणे वापरले आहेत.
हे माझे पहिले ऑईल पेंटिंग.... Abstract style.
तुम्हाला आवडतील अशी आशा आहे. बाकि चित्रांविषयी पुढच्या भागात.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8808
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद.
कुठे तरी
In reply to धन्यवाद. by सायली पानसे
खूप छान!
चित्रे
छान!
वा! मस्त
छान...
नाहि समई आहे
In reply to छान... by मदनबाण
मस्त आहेत
नक्की.
In reply to मस्त आहेत by माधुरी दिक्षित
सुरेख जमली
सुरेख.....
अप्रतिम!
+१
In reply to अप्रतिम! by क्रान्ति
वा!
सुंदर.
मला